आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सरकार ची योजना आंतरजातीय विवाह योजना किंवा आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना याब्ब्द्दल …
हि एक राज्य शासनाची योजना असून, या योजनेचा उद्देश समाजात अजून काही ठिकाणी पाळली जाणारी अस्पृश्यता हि आहे, समाजात एकोपा निर्माण व्हावा, अस्पृश्यता कायमची नाहीशी व्हावी, जाती-जातीं मध्ये भेदभाव कमी व्हावा हा आहे.हि योजना आंतरजातीय वैवाहिक जोड प्याला एक आर्थिक साह्हाय करणारी योजना आहे. या योजनेच्या लाभयार्थ्याना आर्थिक मदत म्हणून प्रोत्साहन पर ५०००० रुपये एवढी रक्कम दिली जाते.
याच सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन कडून रुपये २,५०,००० इतकी आर्थिक रक्कम प्रोत्साहन पार दिली जाते.
हि योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गासाठी आहे.
योजनेचे नाव | आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर योजना |
योजनेचा प्रकार | महाराष्ट्र राज्य सरकार yojana |
योजनेचा उद्धेश | अस्पृश्यता नाहीशी व्हावी, जाती-जातीं मध्ये भेदभाव कमी व्हावा |
योजनेतून मिळणारा लाभ | रुपये ५०,००० ते ३,००,००० |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
योजनेची सुरवात | ३ सप्टेंबर 1959 |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी |
विभाग | समाजकल्याण |
मंत्रालय | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार. |
योजनेच्या प्रमुख नियम व अटी-
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे, महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येवू शकत नाही.
- अर्जदार वैवाहिक जोडप्या पैकी किमान एक जन हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गा मधील असावा.
- अर्जदार वैवाहिक जोडप्याकडे विवाह नोंदणीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- आंतरजातीय विवाह केल्याच्या ३ वर्षाच्या अंत या योजनेला अर्ज करणे आवश्यक आहे.
- हिंदू विवाह अधिनियम कायदा १९५५ किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा १९५४ या कायद्यानुसार ज्यांचा विवाह जल असेल तेच जोडपे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
- विवाहित जोडप्या पैकी लग्ना च्या वेळी वराचे वय २१ वर्षे व वधू चे वे ही 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
- दोन प्रतिष्ठित व्यक्ति कडून शिफारस पत्रे आणणे.
- विवाहित जोडप्याचे कोर्ट मॅरेज होणे देखील आवश्यक आहे.
- लग्नातील वधू व वराचे एकत्रित फोटो
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या पैकी एक व्यक्ति आणि दुसरी व्यक्ति जर जैन, शिख, सवर्ण हिंदू लिंगायत यांच्यातील असतील तरी देखील आंतरजातीय विवाह संबोधण्यात येतो.
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांच्या अंतर प्रवर्गात होणाऱ्या विवाहास आंतरजातीय विवाह म्हणून पकडले जाईल.
- यापूर्वी केंद्र शासन किंवा राज्य सरकार च्या कोणत्याही आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
आंतरजातीय विवाह योजने चा मिळणार लाभ-
आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्या ला प्रोत्साहन पर महाराष्ट्र राज्य सरकार ५०,००० रुपये देते. हा आर्थिक लाभ हा पती पत्नी च्या संयुक्त नावाने देण्यात येतो. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन कडून रुपये २,५०,००० इतकी आर्थिक रक्कम प्रोत्साहन पार दिली जाते.
आंतरजातीय विवाह योजना चे उदिष्टय-
- समाजामध्ये अस्पृश्य तेचे निवारण होवून जाती – धर्मा मधील भेदभाव कमी करणे.
- आंतरजातीय होणाऱ्या विवाहास प्रोत्साहन देणे. व जास्तीत जास्त लोकाना आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहित करणे.
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास आर्थिक लाभ देणे, हा लाभ रुपये ३००००० इतका आहे.
- आंतरजातीय विवाह बद्दल समाजात जन जागृती निर्माण करणे.
- समजतील आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुटुंबाचा आर्थिक उद्धार व्हावा.
- समाजातील जाती-जातीं मध्ये असणारी भेदभावाची भावना व तेढ कमी व्हावी.
- समाजात समानता व एकोपा निर्माण व्हावा.
आंतरजातीय विवाह योजना चे वैशिष्टे –
- आंतरजातीय विवाह योजनेची काही वैशिष्टे खालील प्रमाणे आहेत-
- आंतरजातीय विवाह योजना ही महाराष्ट्र सरकार ने सुरू केलेली योजना आहे.
- समाजात एकोपा निर्माण व्हावहा व समाजात जातीवड कमी व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार ने ही योजना सुरू केली आहे.
- या योजनेच्या लाभारथ्या च्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे-
- विवाहित जोडप्याचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र-
- विवाहित जोडप्याचे आधार कार्ड
- कोर्ट मँरेज प्रमाणपत्र
- वधू व वरा चे पासपोर्ट साईज चे फोटोग्राफ्स
- वधू व वरा चे लग्नातील फोटोग्राफ्स
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- इमेल आयडी
- मोबाईल नंबर
- दोन प्रतिष्टीत व्यक्ती कडून शिफारस पत्रे
- विवाहित वधू वरा चा शाळा सोडल्याचा दाखला.
- विवाहित जोडप्यापैकी एका जनाचा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गा तील दाखला
- राष्ट्रीय बँकेचे बचत खात्याचे पासबुक
- बचत खाते आणि आधार कार्ड एक मेकांना लिंक असने आवश्यक आहे.
योजनेसाठी कोण कोण पात्र आहे –
- अनुसूचित जाती,
- अनुसूचित जमाती,
- विमुक्त जाती,
- भटक्या जमाती, आणि
- विशेष मागास प्रवर्गा
आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रोसेस-
- आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन चौकशी करणे व तिथून अंतजातीय विवाह योजनेचा अर्ज मागून घेणे.
- अर्जातील सर्व माहिती भरून देणे व सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून देणे.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रोसेस –
- ऑनलाइन प्रक्रिया ही पुढील प्रमाणे करता येईल.
- महाराष्ट्र सरकार च्या अधिकृत वेबसाइट वरती जावे.
- वेबसाइट च्या home page वरती गेल्यावर “आंतरजातीय विवाह योजना” हा ऑप्शन दिसेल.
- त्या ऑप्शन वरती क्लिक करा, त्यानंतर नवीन पेज उघडेल, त्या पेज वरती जावा.
- त्या पेज वरती नोंदणी फॉर्म दिल असेल त्यामध्ये सर्व माहिती भरून, कागदपत्रे pdf स्वरूपात आपलोड करा.आणि अर्ज सबमिट करा.
योजनेचा अर्ज रद्द / बाद होण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे-
- अर्जा सोबत सगळी आवश्यक कागदपत्रे न जोडणे.
- जर जोडप्यातिल एक किंवा दोघेही भारताचे नागरिक नसतील तरी देखील अर्ज बाद होवू शकतो.
- जर जोडपे सध्या एकमेकांपासून विभक्त झाले असतील किंवा वेगळे राहत असतील तर..
- विवाहित जोडपे सध्या घटस्फोट घेण्याच्या विचारात आहे किंवा प्रक्रिया सध्या चालू आहे तरी देखील अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- जाती चे प्रमाण पत्र अवैध सापडले तर..
- दोन्ही जोडीदारणे विवाह केलाच नसला तर..
- योजनेचा अर्ज मुदत असलेल्या तारखे नंतर
- योजने च्या अटीं मध्ये वय, जात, उत्पन्न, निवास स्थान इत्यादि गोष्टीं कहा संवेश आहे, त्याची पूर्तता केली नसेल तरी अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- अर्जा तिल माहिती खोटी व चुकीची आहे ही निदर्शनास आळीनंतर देखील अर्ज बाद केला जाऊ शकतो.
- महाराष्ट्र शासन ने जर ही योजना बंद केली तर भरलेल्या अर्जा वरती पुढील प्रक्रिया होत नाही . अर्जा तपासणी करणारी अधिकाऱ्याना जर माहिती मध्ये विसंगती आढळून आली तरी अर्ज बाद होतो.
- अर्जा सोबत जोडलेल जाती प्रमाणपत्र बद्दल काही शंका वाटल्यास व ते बनावट आहे आशे आढळून आल्यास
- विवाह झाला आहे ही दर्शविणारे कागदपत्र योग्य नसतील वा सादर कागद पात्र मधून त्या गोष्टी ची पुष्टी हित नसेल तर.
- अर्जा मध्ये जर बँक डिटेल्स चुकीच्या असतील तर आर्थिक लाभाची रक्कम मिळणार नाही
- एकावेळी एक च अर्ज करायचा असतो, २ किंवा त्यापेक्षा जास्त अर्ज केले तर सगळेच अर्ज बाद होतात आणि तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरता. त्यानंतर होणाऱ्या कार्यवाही ला देखील तुम्हाला सामोरे जायला लागू शकते.
योजनेचा अर्ज बाद झाल्यास की करायचे ते जाणून घ्या खालील माहिती द्वारे –
- अर्ज बाद झाला की, ते बाद करण्याचे कारण तुम्हाला ईमेल किंवा मोबाइल वरती मेसेज वरती कळविण्यात येते.
- त्या अर्ज बाद केलेल्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही पुन्हा अपील करू शकता, अधिकाऱ्यानी मागितलेली माहिती वा कागदपत्रे परत दिलेल्या वेळेत जमा करावीत.
- महत्वाची सूचना – वरती दिलेल्या अटी व शर्ती यांमध्ये सरकार कडून बदल घडवण्यात येतात, नवीन उपडेटेड माहिती साथी अधिकृत वेबसाइट बघावी किंवा आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयात संपर्क करावा.
आंतरजातीय विवाह योजना इन मराठी याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –(FAQ)
आंतरजातीय विवाह योजना नेमकी काय आहे ?
समाजातील अस्पृश्यता नाहीशी व्हावी, जाती-जातीं मध्ये भेदभाव कमी व्हावा यासाठी आंतरजातीय विवाहाला जास्तीस जास्त प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार ची ही आर्थिक लाभ देणारी योजना आहे.
या योजनेसाठी समाजातील कोणता घटक पात्र ठरू शकतो ?
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग यातील कोणीही आंतरजातीय विवाह केला असल्यास या योजनेसाठी पात्र ठरू शकता. बाकी देखील काही निकष आहेत, ते वरील लेखा मध्ये वाचावेत.
आंतरजातीय विवाह योजणे मधून किती आर्थिक लाभ मिळतो ?
महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यास रुपये ५०,००० इतका आर्थिक लाभ देते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन कडून रुपये २,५०,००० इतका आर्थिक लाभ देखील मिळतो. अशा प्रकारे एकूण रुपये ३,००,००० इटकस आर्थिक लाभ मिळतो.
आंतरजातीय विवाह साठी २,५०,००० रुपये आर्थिक लाभ देणारी योजना कोणती आहे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशन यांच्या कडून रुपये २,५०,००० इतका आर्थिक लाभ हा आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला दिल जातो.
आंतरजातीय विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.