PM JIVAN JYOTI BIMA YOJANA | पी एम जीवन ज्योती बिमा योजना |

PM JIVAN JYOTI BIMA YOJANA | आपल्या भारत देशामध्ये विमा हि एक जबरदस्तीने विकला जाणारी सेवा आहे. आपल्याकडे लोकान मागे लागावे लागत्रे कि विमा घ्या तुम्हाला त्याची गरज आहे. या गोषित मागची काही कारणे आहेत, जसे कि आपल्या भारत देश मध्ये विमा हि एक महाग वस्तू / सेवा आहे. ती सर्व सामान्य लोकांना परवडत नाही. आणि अजून एक कारण म्हणजे विमा बद्दला अजून पण ग्रामीण भागातील लोकांच्या मध्ये आपल्याला जागरुकता दिसून येत नाही.

या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र शासनाने एक महत्व पूर्ण आणि महत्वकांक्षी योजना सुरु केली आहे. या योजनेचे नाव “ प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा / विमा योजना “ अशे आहे. या योजने अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. या मध्ये रुपये २ लाख इतक्या रकमेचे विमा संरक्षण मिळणार आहे. जर विमा धारकाचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना रुपये २ लाख इअतके रक्कम भरपाई म्हणून मिळणार आहे.

आपल्या देशातील बहुतेक लोकांची आर्थिक परिस्थिती हि हलाकीची आहे आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असलेले भारताचे नागरिक हे विमा परवडत नाही म्हणून घेत नाहीत. अशा परिस्थिती मध्ये भारत सरकार ने उचललेले हे एक महत्वाचे पाउल आहे.

आपण आज याच योजने बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मग चला बघू या …


योजनेचे नावप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना | PM JIVAN JYOTI BIMA YOJANA |
लाभार्थी / पात्रताभारत देशाचे सर्व नागरिक / कोणत्याही जाती व धर्माचे / पंथाचे .
लाभविमा धारकाच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचे आर्थिक रित्या नुकसान भरपाई
उद्देशजास्तीत जास्त भारतातील नागरिकांना विम्याचे महत्व पटवून देणे आणि विमा संरक्षण देणे.
अर्ज कसा करायचा ?ऑनलाईन

वरील तक्ता हा संक्षिप्त मध्ये माहिती देवून जातो य आयोजने बद्दल कि नेमकी काय हि योजना आणि काय याचा उद्देश आहे, की लाभ आहे वगेरे वगेरे… आपण जरा आता सविस्तर रित्या या योजने बद्दल माहिती घेवूया.


PM JIVAN JYOTI BIMA YOJANA

Table of Contents

PM JIVAN JYOTI BIMA YOJANA | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चा उद्देश-

  • भारतातील लोकांना २ लाख रुपये किमतीच्या विम्याचे संरक्षण देणे तेही अगदी कमी प्रीमियम च्या बदल्यात…
  • घरातील कर्ता व्यक्ती च्या मृत्यू नंतर त्या कुटुंब वरती येणारया आर्थिक अडचणींना दूर करणे.
  • अचानक मृत्यू झालेला विमा धारकाच्या कुटुंबाला रुपये २ लाख इतकी रक्कम भरपाई म्हणून देणे.

PM JIVAN JYOTI BIMA YOJANA | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ची वैशिष्ट्ये –

  • योजनेचा लाभ घेत असताना अर्जदाराला कोणत्याही वैद्यकीय चाचणीची गरज भासत नाहीत.
  • विम्याची रक्कम DBT मार्फत लाभार्थी च्या खात्या मध्ये जमा केली जाते.
  • या योजनेसाठी चा प्रीमियम हा अर्जदाराच्या बँक खात्यामधून ऑटो डेबिट केला जातो त्यामुळे प्रत्येक विमा हफ्त्याला वयक्तिक रित्या जाऊन विमा हफ्ता भरायची गरज नाहीये.
  • भारतातील राष्ट्रीय कृत बँका आणि  भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने हि योजना चालवली जाते.
  • हि योजना भारताचे नागरिक असलेल्या सर्व जाती, धर्म, पंथ चे लोकांसाठी आहे.
  • या योजनेचा विमा हफ्ता हा दरवर्षी ३१ मी रोजी देयाचा असतो. आणि विम्याचे संरक्षण १ जून पासून चालू होते.
  • काही कारणस्तव जर एखादा अर्जदार / उमेदवार या योजनेतून बाहेर पडला तर त्याला भविष्यात १ जून नंतर कधीही या योजनेत सामील होता येईल.   
  • हा विमा ५५ वर्षानंतर मच्युर होते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने साठी आकारले जाणारे प्रीमियम –

दरवर्षी ४३६ /- रुपये इतक्या रकमेचा विमा हफ्ता हा प्रत्येक विमा अर्जदाराला आकारला जातो.

प्रिमियमएलआयसी / विमा कंपनीला विमाएजंट ना कमिशन ( फक्त नवीन नोंदणी साठीसहभागी बँकेला देय प्रशासकीय खर्च
पूर्ण वार्षिक प्रिमियम ४३६ रुपये३९५ रुपये३० रुपये११ रुपये
जोखीम कालावधी च्या दुसऱ्या तिमाहीत जमा ३४२ रुपये३०९ रुपये२२.५० रुपये१०.५० रुपये
जोखीम कालावधी च्या तिसऱ्या तिमाहीत जमा २२८ रुपये२०६ रुपये१५ रुपये७ रुपये
जोखीम कालावधी च्या चौथ्या तिमाहीत जमा११४ रुपये१०३ रुपये७.५० रुपये३.५० रुपये

PM JIVAN JYOTI BIMA YOJANA |प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने साठी पात्रता आणि अटी-

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय वर्षे १८ ते ५० वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • बँक योजनेच्या रक्कमे वर प्रशासकीय खर्च च रक्कम आकारली जाते.
  • विम्याचे दरवर्षी नुतनीकरण करणे आवश्यक असते.
  • विमा धारकाचा मृत्यू झाला कि त्याच्या वारसांनी ३० दिवसाच्या आत क्लेम चा दावा करणे आवश्यक असते.
  • जर विमाधारकाने एकापेक्षा जास्त बँके मध्ये प्रधानमंत्री विमा योजनेसाठी अर्ज केले असतील तरी देखील विमा भरपाई मिळताना फक्त एका विम्याची भरपाई म्हणजे २ लाख रुपये मिळतील.
  • ज्या दिवशी बँक मधून विम्याच्या हफ्त्याची रक्कम कट होईल त्यादिवसापासून विम्याचा लाभ सुरु होईल.
  • प्रधानमंत्री विमा योजने चा लाभ हा एका विमा कंपनी कडून किंवा एका बँक कडून च घेता येईल फक्त.
  • नवीन नोंदणी केलेल्या विमा धारक किंवा विम्याच्या बाहेर जाऊन परत नुतनीकरण केलेला विमा धारकाचा मृत्यू जर 45 दिवसाच्या आत झाला तर त्या विमा धारकाच्या वारसांना विम्याच्या दाव्याची रक्कम दिली जात नाही.
  • एकदा एका वर्षाच्या विम्याची रक्कम जमा केली कि त्या वर्ष साठी फक्त विमा संरक्षण मिळते, पुढच्या वर्षासाठी परत विमा हफ्ता भरने बंधनकारक आहे. हा विमा कवर १ जून ते ३१ ने मधील कालावधी साठी दिला जातो.
  • प्रथमच नाव नोंदणी केलेल्या विमा धारकाचा जर मृत्यू ३० दिवसाच्या आत झाला तर अपघात शिवाय तर विम्याचा दावा स्वीकारला जात नाही.

PM JIVAN JYOTI BIMA YOJANA |प्रधानमंत्री विमा योजने मध्ये नाव नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे-

  • ज्या व्यक्तीचे विमा काढायचा असेल त्या व्यक्तीचे आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आय डी
  • बँक पासबुक झेरोक्स
  • पासपोर्ट साईझ चे फोटो
  • पॅन कार्ड

प्रधानमंत्री विमा योजनेचा दावा सादर करण्यासाठीखालील कागदपत्रे लागतात-

  • आधार कार्ड ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • पॅन कार्ड ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • रहिवाशी दाखला ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • इ-मेल आय डी ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • मोबाईल नंबर ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • बँक पासबुक झेरोक्स ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • पासपोर्ट साईझ चे फोटो ( विमा धारकाच्या वारसदाराचे )
  • विमाधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र

मृत्यू चा पुरावा म्हणून खालील पैकी कोणतेही एक कागद पत्र जोडायला लागेल.

  • मृत्यू प्रमाण पत्र – स्थानिक जन्म आणि मृत्यू निबंधका कडून
  • दवाखान्यातील डिस्चार्ज प्रमाण पत्र – त्यामध्ये मृत व्यक्तीच्या बद्दल संपूर्ण नाव / वडिलांचे नाव / मृतुचे कारण / तारीख / वेळ इत्यादी असणे आवश्यक आहे.
  • मृत व्यक्तीच्या मृत्यू वेळी उपस्थित असलेल्या मेडिकल प्रॅक्टीशनर ने जारी केलेले प्रमाणपत्र
  • जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी यांनी अधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मृत व्यक्तीच्या संदर्भात प्रमाणपत्र आणि योजना दावा हक्क सेटलमेंट प्रक्रियेच्या विहित नमुन्यात द्यावे.

अपघाताने मृत्यू झाल्यास खालील पैकी कोणतेही प्रकारची कागदपत्रे द्यावी लागतील.

  • वरती दिलेल्या पैकी कोणताही एक दस्तऐवज आणि त्याच्या सोबत एफ आय आर, पंचनामा, शव परीक्षण अहवाल.
  • जिल्हा दंडाधिकारी / जिल्हाधिकारी / संबंधित जिल्ह्याचे उपयुक्त किंवा कोणत्याही अधिकृत कार्यकरी दंडाधिकार्यांनी अधिकृत केलेल्या अधिकार्याने मृत व्यक्तीच्या संदर्भात योजना दावा हक्क समझोता प्रक्रियेच्या विहित नमुन्यात दिलेले प्रमाणपत्र.
  • साप चावून, झाडावरून पडून  इत्यादी कारण मुळे मृत्यू झाल्यास मृत्यू अहवाला मध्ये आणि रुग्णालयाच्या नोंदी मध्ये मृत सदस्या बद्दल सर्व माहिती आणि मृत्यूचे कारण मांडणे आवश्यक आहे.
  • दावेदार व्यक्ती यांचे ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून त्याचे आधार कार्ड, निवडणूक कार्ड वगेरे असावे.

नोंदणी करण्याची पद्धत –

  • प्रधानमंत्री विमा योजना साठी नवीन नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या बँक मध्ये जावे. आणि या योजनेची चौकशी करावी.
  • बँक मधून योजनेचा फोरम भरून घ्यावा आणि त्यातील सर्व माहिती भरून सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून अर्ज बँक मध्ये जमा करावा.
  • अर्ज एकदा जमा झाला आणि बँक ने पुढे प्रोसेस केले कि तुमच्या बँक खात्य मधून ४३६ रुपये इतकी रक्कम वजा केली जाते आणि तुम्ही विमा योजनेसाठी पात्र ठरता.

दावा अर्ज करण्याची प्रोसेस-

  • विमा धारकाचा काही कारणास्तव जर मृत्यू झाला तर विमा धारकाच्या वारसाला दावा अर्ज करण्यसाठी बँक मध्ये जावे लागेल.
  • बँक मध्ये जाऊन दावा अर्ज घ्यायचा, सर्व विचारलेली माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज बँक मध्ये जमा करावा.
  • बँक मधील संबधित अधिकारी तुमच्या दावा अर्जाची पडताळणी करतील आणि विम्याच्या लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्य मध्ये जमा केली जाईल.

प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत काही खूप महत्वाच्या गोष्टी –

  • हि विमा योजना एका वर्ष साठी आहे, दरवर्षी विम्याचा लाभ घेण्यासाठी विमाच्या हफ्ताची रक्कम भरून नुतनीकरण करावे लागते.
  • विमा कवर हे १ जून ते ३१ मे पर्यंत च्या कालावधी साठी आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या विमा कवर साठी तुम्हाला ३१ मे च्या आत मध्ये विमा हफ्ता भरावा लागेल.
  • जर काही कार्नानामुळे तुम्ही योजनेतून बाहेर पडला तरी देखील तुम्ही नंतर योजनेसाठी पात्र ठरू शकता, त्यासाठी तुम्हाला पुढील विमा हफ्ता भरावा लागेल.