RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA | नमस्कार वाचकहो ! आपले स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये… आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याच्याबद्दल माहिती… चला तर मग सुरु करूया इंट्रोडक्शन पासून…RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA
आज जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात आणि भारत देशात अजून देखील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेली कुटुंब भरपूर आहेत. अशा आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबा चे वर्गीकरण दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील असे केले जाते. अशा कुटुंबामध्ये तेथील लोकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यामध्ये त्यांच्या दैनंदिन खर्च जसे की अन्न वस्त्र निवारा यापासून ते आरोग्य व इतर अनेक खर्च हे त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या असते. अशा परिस्थितीमध्ये जर अशा आर्थिक दृष्ट्या करी बसलेल्या कुटुंबातील कमावत्या स्त्री किंवा पुरुषाचा जर काही कारणास्तव म्हणजे अपघाती किंवा नैसर्गिक रित्या जर मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी पहिल्या समस्येत ही अजून एक मोठी समस्या ऍड होऊन जाते.
अशा वेळेस त्या कुटुंबात एक खूप मोठी पोकळी निर्माण होते आणि या गोष्टीमुळे त्यांच्यावरती आर्थिक संकट उद्भवते. घरातील कमवती स्त्री किंवा कमवता पुरुष जर अचानक मृत्यू पडला तर त्यांच्या मुलांना व इतर कुटुंबातील लोकांना जीवन जगणे हे असह्य होऊन जाते.
अशा पीडित कुटुंबातील ही आर्थिक पोकळी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मदतीला येते. महाराष्ट्र राज्य सरकारने अशा पीडित कुटुंबाला एक रकमी आर्थिक मदत मिळावी यासाठी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमवते स्त्री किंवा कमवत्या पुरुषाचा मृत्यू हा अपघाती किंवा नैसर्गिकरित्या झाला असेल तर त्या कुटुंबाला एक रकमी २०,००० / रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
योजनेचे नाव | राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना | RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |
शासन | महाराष्ट्र सरकार |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र सरकार |
उद्देश | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबा मध्ये कर्त्या व्यक्ति च्या मृत्यू मुळे आलेल्या आर्थिक संकटा तून आर्थिक मदत देवून त्यांना बाहेर काढणे. |
लाभार्थीची पात्रता | आर्थिक दृष्ट्या गरीब / दारिद्र्य रेषे खालील कुटुंबे |
मिळणारा लाभ | २०,००० / रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज कसा करायचं | फक्त ऑफ लाइन |
RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची उद्दिष्टे –
- आर्थिक रित्या गरीब असलेल्या कुटुंबातील करता व्यक्तीचा स्त्री असो किंवा पुरुष यांचा अकस्मात अपघाती किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला सामोरे जावे लागणाऱ्या आर्थिक अडचणींना, आर्थिक मदत देऊन कमी करण्याचा प्रयत्न करणे.
- पीडित कुटुंबाला एक रकमी 20000 रुपये इतकी आर्थिक मदत देऊन त्या कुटुंबाला पुढील वाटचालीसाठी थोडासा आर्थिक हातभार लावणे.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना प्रत्येक प्रवर्गासाठी लागू आहे यामध्ये ही योजना स्पेसिफिक कोणत्याच प्रवर्गासाठी राखीव नाही तर ती सर्वांसाठी खुली आहे.
- पीडित कुटुंबांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करणे तसेच त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे.
RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची वैशिष्ट्ये –
- या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबातील लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणारी रक्कम म्हणजे 20 हजार रुपये हे एक रकमी दिली जाते.
- या योजनेच्या लाभाची मिळणारी आर्थिक रक्कम ही लाभार्थीच्या बँक अकाउंट मध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केली जाते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची पात्रता-
- दारिद्र्यरेषेखालील असणारी कुटुंबे
- घरातील मृत झालेला करता व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वयोगटात असणे गरजेचे आहे.
- याचबरोबर ज्या महिला विधवा आहेत त्या, घटस्फोटीत महिला आणि परितक्त्या स्त्री या देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील अपात्रतेचे निकष –
- आत्महत्येचा मृत्यू
- आत्महत्येचा प्रयत्न करून नंतर झालेला मृत्यू
- स्वतःला जाणीवपूर्वक जखम करून घेणे आणि त्यामुळे नंतर होणारा मृत्यू
- अमली पदार्थाचे सेवन जसे की दारू सिगारेट गांजा चरस इत्यादी कारणांमुळे झालेला मृत्यू
- मोटार शर्यतीतील अपघाती झालेला मृत्यू
- बाळंतपणातील मृत्यू
- गुन्हेगारी करत असताना झालेला मृत्यू
- आर्मीतील नोकरी
- घरातील व्यक्तीकडून वारसदाराकडून जर खून झाला तर
- युद्धामधील मृत्यू
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमार्फत दिले जाणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे –
- पीडित कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला एक रकमी 20000 रुपये इतकी रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाते.
- लाभार्थी म्हणजेच अर्जदार हा जर 75 वर्षे वयोगटातील असेल तर त्याला दर महिन्याला सहाशे रुपये इतकी पेन्शन दिली जाते.
- लाभार्थी हा जर 18 वर्षे वयोगटाच्या आतील असेल तर त्याच्या शिक्षणासाठी अनुदान दिले जाते.
RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अटी आणि शर्ती –
- अर्ज करीत असलेले कुटुंब किंवा व्यक्ती हे महाराष्ट्र राज्याचे मूळचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- घरातील कर्ता व्यक्ती ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचे वय हे 18 ते 59 या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- ज्या घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रीचा मृत्यू झाला आहे आणि त्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंबालाभ योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्या योजनेने त्या करता व्यक्तीच्या मृत्यूच्या तीन वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतरचे अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत.
- करता व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- फक्त दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे या योजनेसाठी पात्र राहतील.
- एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारी कुटुंबे फक्त या योजनेसाठी पात्र राहतील.
- जो करता व्यक्ती मृत्यू पावला आहे त्या व्यक्तीचा जर विमा असेल आणि त्याचा जर लाभ घेतला असेल / मिळाला असेल तर अशे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- पीडित कुटुंबातील कर्ता व्यक्ती किंवा त्याच्या व्यतिरिक्त इतर सदस्य जर केंद्रशासन किंवा राज्य शासन यांचा कर्मचारी असेल तर ते कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- योजनेचा अर्ज किंवा प्रतिज्ञापत्र
- मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
- बँक खात्याच्या डिटेल्स साठी पासबुक झेरॉक्स
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज करण्याची प्रोसेस –
- अर्जदाराला आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यायचा आहे आणि त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरायची आहे.
- त्या अर्ज सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून तो अर्ज पुन्हा तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करायचा.
- संबंधित अधिकारी अर्जाची छाननी करून पडताळणी करून पुढील कारवाई करून लाभाचे वितरण करतील.
या योजनेला अर्ज केल्यानंतर काही अर्जदारांचे अर्ज हे रद्द केले जातात तर ते अर्ज रद्द होण्याची काही कारणे पुढील प्रमाणे-
- मृत पावलेल्या व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास
- आत्महत्या ही जर मृत्यूचे कारण असल्यास
- मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 59 या वयोगटात बसत नसल्यास
- मृत व्यक्ती आणि त्याचे कुटुंब हे दारिद्र रेषेखाली जर नसेल तर
- जर अर्जदार कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल तर
- करता व्यक्तीच्या मृत्यूच्या तीन वर्षाच्या नंतर जर या योजनेसाठी अर्ज केला तर
RASHTRIY KUTUMBH LABH YOJANA |राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे –
- या योजनेच्या लाभाची रक्कम ही अर्जदाराच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत दिली जाते.
- महाराष्ट्र सरकार 45 कोटी इतके आर्थिक तरतूद दरवर्षी या योजनेसाठी करत आहे.
- ही योजना काही मर्यादित कालावधीसाठी नसून ही योजना अखंडितपणे चालू आहे.
राष्ट्रीय कुटुंब योजनेबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न –
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना काय आहे ?
या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाला अर्थिक मदत करणे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेमध्ये किती रुपयांची आर्थिक मदत मिळते ?
वीस हजार रुपये इतकी रक्कम आर्थिक लाभ म्हणून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मिळते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची मुख्य पात्रता काय आहे ?
दारिद्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू हा नैसर्गिक किंवा आत्महत्यातून झालेला असावा त्या मृत व्यक्तीचे वय हे 18 ते 59 या वयोगटाच्या दरम्यान असावे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही कोणत्या प्रवर्गासाठी आहे ?
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही सर्वांसाठी खुली आहे ती कोणत्या प्रवर्गासाठी राखीव नाही.
राष्ट्रीय कुटुंबालाभी योजनेचे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ?
या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयातून अर्ज घेऊन अर्ज भरणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही कोणत्या विभागामार्फत राबवली जाते?
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या मार्फत राबवली जाते.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अर्ज करणाऱ्या कुटुंबाची आर्थिक उत्पन्नाची काही मर्यादा आहे का ?
या योजनेसाठी अर्ज करीत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपये यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकरी आणि त्याचे कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरू शकतो का ?
आत्महत्या हे मृत्यूचे कारण असलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र ठरत नाही.