SHRAVAN BAL YOJANA |महाराष्ट्र राज्यात आज देखील दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या कुटुंबांची संख्या ही भरपूर आहे. अशा दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना दैनंदिन जीवन जगत असताना खूप सार्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक शैक्षणिक आरोग्य संबंधित अडचणी असतात. अशा परिस्थितीमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांमध्ये असणारी ज्येष्ठ वृद्ध लोक ज्यांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा कौटुंबिक सदस्यांना नक्कीच कोणता ना कोणता तरी आजार असतो, अशावेळी त्या कुटुंबासमोर कोणती गरज भागवणे महत्त्वाचे आहे हा मोठा प्रश्न उभा राहतो कारण की नवीन पिढीचे शिक्षण खर्च असतील किंवा दैनंदिन जीवनातील खर्च असतील किंवा कुटुंबातील वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची खर्च असतील या अशा भरपूर गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते आणि त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे की ह्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या.
अशा आर्थिक रित्या हलकीच्या परिस्थितीमध्ये घरातील वृद्ध कुटुंब सदस्यांवरती अन्याय होऊ नये व त्यांना वेळोवेळी आरोग्य संबंधित उपचार मिळावेत आणि पैशाअभावी कोणत्याही गोष्टीला त्यांना दुसऱ्या वरती अवलंबून राहायला लागू नये आणि त्या कुटुंबाला एक आर्थिक हातभार म्हणून महाराष्ट्र सरकार 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय वर्ष असलेल्या वृद्ध लोकांना एक निवृत्ती वेतन म्हणून दर महा 600 रुपये देते.
हा आर्थिक लाभ ज्या योजनेअंतर्गत दिला जातो त्या योजनेचे नाव आहे श्रावणबाळ योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना.
चला तर मग आज आपण बघूया श्रावण बाळ योजना नेमकी आहे काय, याचे पात्रतेची निकष काय आहेत, अर्ज करण्याची पद्धत काय आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा, या योजनेमध्ये नेमका किती आर्थिक लाभ आहे तो कसा दिला जातो इतर सर्व माहिती आपण आता बघणार आहे.
६०० रुपये दरमहा मिळणारा आर्थिक लाभ हा पुढील प्रमाणे विभाजित केलेला आहे. राज्य सरकार मार्फत श्रावणबाळ योजना या अंतर्गत प्रति महिना ४००/- आणि केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत द२००/-प्रति महिना दिले जातात असे एकूण दर महा ६००/- यांचे आर्थिक सहाय्य लाभार्थीला दिले जाते.
योजनेचे नाव | श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना | SHRAVAN BAL YOJANA |
योजनेचा उद्देश | ६५ वर्षे पेक्षा जास्त असलेल्या लोकाना निवृत्ती वेतन आर्थिक लाभ स्वरूपात देणे. |
मिळणारा लाभ | दरमहिना १५०० /- रुपये चा आर्थिक लाभ |
अर्ज कसं करायचा | ऑफलाइन |
अधिक माहिती साठी योजनेच्या विभागाचा फोन. नंबर | १८००-१२०-८०४० |
SHRAVAN BAL YOJANA | श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे –
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या 65 वय वर्षे वयोगटापेक्षा जास्त च्या नागरिकांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे.
- महाराष्ट्र राज्यातील वृद्ध नागरिकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
- वृद्धापकाळ त्यांची जीवन जगणे सोपे व्हावे आणि त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे, त्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून देणे.
SHRAVAN BAL YOJANA |श्रावण बाळ योजनेची पात्रता-
- ही योजना सर्व प्रवर्गातील वृद्ध लोकांसाठी खुली आहे.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे असे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतील.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासीच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील. यामध्ये महाराष्ट्र रहिवासी असण्याची अट ही कमीत कमी 15 वर्षे महाराष्ट्रात स्थित असलेला व्यक्ती असा आहे.
SHRAVAN BAL YOJANA |श्रावण बाळ योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या लाभाचे स्वरूप पुढीलप्रमाणे-
- निवृत्ती वेतन म्हणून दर महिन्याला १५०० रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यावरती जमा केली जाते.
SHRAVAN BAL YOJANA |श्रावणबाळ योजनेचा फायदे पुढील प्रमाणे-
- महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील 65 वय वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा १५०० रुपये निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येणार आहे.
- वृद्ध नागरिकांना त्यांचे वृद्धाप काळातील जीवन जगण्यास मदत होईल आर्थिक गोष्टींसाठी त्यांना कोणावर राहण्याची गरज नाही ते स्वावलंबी बनतील आणि त्यांना एक प्रकारचे आर्थिक पाठबळ हे महाराष्ट्र सरकार देत आहे.
- मृदाकाळात सामोरे जावे लागणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक आरोग्याची समस्या ही प्रमुख आहे आणि औषध उपचाराच्या खर्चासाठी वृद्ध लोकांना कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही औषधोपचारचा खर्च त्यांचा या निवृत्ती वेतन योजनेच्या अंतर्गत आर्थिक लाभातून त्यांना करता येईल.
SHRAVAN BAL YOJANA |श्रावणबाळ योजनेच्या अटी आणि शर्ती-
- अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे २१००० रुपये च्या आत असावे त्यावरील उत्पन्न असणारा व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- अर्जदार व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या गरीब म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील असावा.
- अर्जदार व्यक्तीचे हे वय किमान 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे, 65 वर्षे पेक्षा कमी वय असणारे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
- अर्ज करीत असलेला व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे तो मागील किमान १५ वर्षापासून महाराष्ट्रात स्थित असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- श्रावण बाळ योजना ही कोणत्याही एका विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव नसून ती सर्व प्रवर्गासाठी खुली आहे.
श्रावणबाळ योजनेसाठी अर्ज करीत असताना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराचा वयाचा दाखला
- ज्येष्ठ नागरिक कार्ड
- अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- अर्जदाराचा मोबाईल नंबर
- अर्जदाराचे पासपोर्ट साईज चे फोटो अर्जदाराचा रहिवासी दाखला
श्रावणबाळ योजनेत अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे-
- श्रावणबाळ योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधायचा आहे. तेथील संबंधित अधिकाऱ्याकडून या योजनेचा अर्ज मागून घेणे.
- त्या अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूकपणे भरणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडणे आणि तो अर्ज पुन्हा त्या अधिकाऱ्याकडे जमा करणे.
- संबंधित अधिकारी तो अर्ज चेक करतील आणि जर अर्ज योजनेसाठी पात्र ठरला तर तुम्हाला दरमहा या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ सुरू होईल.
श्रावण बाळ योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे-
- श्रावणबाळ योजनेचा अर्ज करायसाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन पेज वरती जाऊन तिथे नवीन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
- नवीन रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्यासमोर दोन पर्याय उपलब्ध होतील
- पर्याय पहिला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जिल्हा निवडायचा आणि त्यानंतर तुम्हाला यूजर आयडी पासवर्ड घ्यावा लागेल.
- पर्याय दुसरा यामध्ये तुम्हाला एक अर्ज दिसेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकपणे भरायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पर्यावरण क्लिक करावे लागेल.
- अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा त्यानंतर तुम्ही आपले सरकार या पोर्टलवर लॉगिन केलेले असेल.
- एकदा का लॉगीन झाले की तुम्ही श्रावणबाळ योजनेचा अर्ज करण्यासाठी तयार आहात.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर जे पेज ओपन झालेला आहे त्याच्या डाव्या बाजूला क्लिक करून तुम्हाला त्या लिस्ट मधून तुमच्या योजनेचा संबंधित विभाग निवडायचा आहे.
- श्रावणबाळ योजनेसाठी तुम्हाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा पर्याय दिसेल आणि त्या पर्याय वरती तुम्हाला क्लिक करून त्या पर्यायांमध्ये जायचं आहे.
- पुढे येणारे योजनांच्या लिस्ट मधून तुम्हाला श्रावण बाळ योजना ही योजना सिलेक्ट करायची आहे.
- परत एकदा तुम्हाला लॉगिनचं पेज दिसेल त्यात सर्व माहिती भरून पुन्हा एकदा लॉगिन करायचा आहे.
- लॉग इन केल्यानंतर तुम्हाला श्रावणबाळ योजनेचा एक अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी माहिती जशी विचारली आहे तशी भरायची आहे.
- अर्जासोबत जोडावयाची जी आवश्यक कागदपत्रे तिथे नमूद केली आहे त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे.
- संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण अर्ज नीट व्यवस्थित तपासून घ्यायचा आहे सर्व माहिती भरलेली अचूक आहे का ते पुन्हा एकदा चेक करायचे आहे.
- चेक करून झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल तो तुमच्यापाशी नोंद करून ठेवायचा आहे.
- या अर्ज क्रमांकावरून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्हाला बघता येईल.
- या वरील दिलेल्या कोणत्याही प्रोसेस मध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही श्रावणबाळ योजना या योजनेच्या अधिकृत टोल फ्री क्रमांक वरती मदत मागण्यासाठी कॉल करू शकता.
- श्रावण बाळ योजना हेल्पलाइन क्रमांक पुढील प्रमाणे -१८०० १२० ८०४
श्रावणबाळ योजनेबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न –
श्रावणबाळ योजना ही कोणी सुरू केली आहे ?
श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांसाठी सुरू केली आहे.
श्रावणबाळ योजना ही कुणासाठी आहे ?
श्रावणबाळ योजना ही 65 वय वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध लोकांसाठी एक आर्थिक सहाय्य देणारी योजना आहे.
श्रावणबाळ योजना ही कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे ?
श्रावणबाळ योजना ही कोणत्याही एका प्रवर्गासाठी राखीव नसून ती सर्व प्रवर्गातील सर्व लोकांसाठी खुली आहे.
श्रावणबाळ योजनेमार्फत किती रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो ?
श्रावण बाळ योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये निवृत्ती वेतन म्हणून दिले जाते, त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजना आणि केंद्र शासनाची इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या दोन योजना च्या संयुक्त विद्यमानाने हा आर्थिक लाभ दिला जातो.