PM PIK VIMA YOJANA |भारत हा कृषिप्रधान देश आहे, आपल्या देशात बहुतांश लोकसंख्येवर हा शेती या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे. भारतासारख्या देशांमध्ये शेती करणे हे सोपे नाही. शेतकऱ्यांना त्यांनी जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यामध्ये बी बियाणे खते यांची महागाई, पावसाची कमतरता, वाढलेली मसुरी, महागाई, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, सुनामी, वादळी वारे, चक्रीवादळ, इत्यादी समस्यांचा समावेश होतो.
यापैकी काही समस्या या खूप मोठ्या आणि नुकसान करणारे आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे पूर्ण किंवा काही प्रमाणात नुकसान होते. असे झाले की शेतकऱ्यांनी एवढे दिवस केलेली मेहनत वाया जाते. या सर्व पिकाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानी पासून वाचण्यासाठी केंद्र शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना.
एक विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाचा विमा काढला जातो आणि जर काही कारणास्तव पिकाची हानी नुकसानी झाली तर विम्याच्या भरपाईतून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई मिळते. या योजनेसाठी शेतकऱ्याच्या बाजूने पीक विम्याची रक्कम हे राज्य शासन भरत असते.
चला तर मग बघूया प्रधानमंत्री पिक विमा योजना सविस्तर मध्ये.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पीक विमा योजना | PM PIK VIMA YOJANA |
राज्य | महाराष्ट्र |
कोणत्या विभाग ने सुरू केली योजना | कृषि विभाग |
सुरवात कधी झाली | एप्रिल २०१६ |
उद्देश | पिकाला होणाऱ्या नुकसानी पासून विमा संरक्षण पुरविणे. |
लाभार्थी | राज्यातील सर्व शेतकरी |
लाभ | पिकाला मोफत विमा |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन / ऑफलाइन |
PM PIK VIMA YOJANA | प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्दिष्टे-
- कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये आणि त्याच्या पिकाचे झालेले नुकसानीची भरपाई विम्याच्या रकमेतून मिळावी.
- शेती हे वेळ लागणारे व्यवसाय आहे आणि यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे आर्थिक रिस्क आहे तर विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याची ती रिस्क कमी करणे हा एक महत्त्वाचा उद्देश या योजनेचा आहे.
- नवीन तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करणे आणि त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- शेतकऱ्याचे होणारे आर्थिक नुकसान वाचवणे.
- शेतकऱ्यांच्या वाढत जाणाऱ्या आत्महत्या थांबवणे.
PM PIK VIMA YOJANA | प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये –
- कर्जदार शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरतील.
- DBT मार्फत विमा योजनेच्या लाभाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
- स्थानिक जोखीम आणि पीक काढल्यानंतर च्या होणाऱ्या हानी यादी केली पिक विमा योजनेमध्ये समाविष्ट आहेत.
कोण कोणते पिके या विमा योजनेसाठी पात्र आहेत ते पुढील प्रमाणे (PM PIK VIMA YOJANA )–
- भात
- बाजरी
- नाचणी
- ज्वारी
- मुग
- उडीद
- तुर
- मका
- भुईमूग
- कारळे
- तीळ
- सोयाबीन
- खरीप कांदा
- कापूस
इन्शुरन्स कंपनी | जिल्हा |
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | अहमदनगर नाशिक सोलापूर जळगाव सातारा |
युनिव्हर्सल सोंपो जनरल कंपनी लिमिटेड | जालना गोंदिया आणि कोल्हापूर |
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | परभणी नागपूर वर्धा |
एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | लातूर |
रिलायन्स जनरल इन्शुरन्स | यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली |
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग |
चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | औरंगाबाद भंडारा पालघर आणि रायगड |
भारतीय कृषी विमा कंपनी | वाशिम सांगली नंदुरबार बुलढाणा बीड |
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | अकोला धुळे पुणे उस्मानाबाद हिंगोली |
कोण कोणत्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसान ही विम्याचे संरक्षण दिले जाईल ते पुढील प्रमाणे –
- कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा पिकाच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंत च्या कालावधीत कीड व रोग याच्यामुळे जर पिकाच्या उत्पन्नात होणारी घट, अशा परिस्थितीत विमा संरक्षण मिळते.
- पिकाच्या लागवडी पूर्वीची नुकसान भरपाई – जर अपुरा पाऊस किंवा हवामानातील होणाऱ्या बदलांमुळे जर पिकाची लागवड पेरणी नाही झाली तर, यामध्ये लागवड न झालेले क्षेत्र हे 75 टक्के पेक्षा जास्त असावे.
- कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ म्हणजेच पूर परिस्थिती, हवामानातील होणारे बदल इत्यादी बाबींमुळे जर उत्पन्नात अपेक्षित उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त घट जर झाली तर अशा परिस्थितीमध्ये विम्याच्या मार्फत नुकसान भरपाई देण्यात येते.
- पिकाच्या कळणीनंतर काही कारणास्तव म्हणजे चक्रीवादळ सुनामी अवकाळी पाऊस यामुळे जर चुकवण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान झाले तर पंचनामा केल्यानंतर विम्याचे मार्फत नुकसान भरपाई दिली जाते. पिकाच्या काढणीनंतर 14 दिवसाच्या आत जर काही नुकसान झाले तर ते फक्त ग्राह्य धरले जाईल.
- पिकाचे नुकसान झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीला 48 तासांच्या आत नुकसानग्रस्त पिकाची माहिती नुकसानीचे कारण कळवणे बंधनकारक आहे.
- भूस्खलन व गारपीट या प्रकारच्या कारणांमुळे जर विमा संरक्षित असलेले अर्जदाराचे शेताला नुकसान झाले तर पंचनामा केल्यानंतर नुकसान भरपाई मिळते.
कोणत्या परिस्थितीमध्ये पिक विमा योजनेची भरपाई दिली जाणार नाही ते पुढील प्रमाणे –
- जाणून बुजून केलेले पिकाचे नुकसान
- एकमेकांच्या द्वेषातून केलेले पिकाचे नुकसान
- युद्ध परिस्थितीचे झालेले पिकाची नुकसान
- प्रतिबंधित जोखीम
PM PIK VIMA YOJANA | पिकाचे नुकसान झाल्यावर काय प्रोसेस करायची ?
- पिकाची नुकसान झाल्यावर ७२ तासांच्या आत विमा कंपनीला, कृषी विभागाला किंवा महसूल विभागाला कळवणे गरजेचे आहे.
PM PIK VIMA YOJANA | प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत मिळणारी हेक्टरी सबसिडी पुढीलप्रमाणे –
पिकाचा हंगाम | घेतली जाणारी पिके | शेतकऱ्याने किती विमा शुल्क द्यायचे |
खरीप | सर्व कडधान्य आणि तेलबिया पिके | २ % |
रब्बी | सर्व कडधान्य आणि तेलबिया पिके | १.५ % |
खरीप आणि रब्बी | वार्षिक व्यावसायिक बागायती पिके बारमाही बागायती पिके | ५ % |
योजनेसाठीची पात्रता –
- सर्व प्रवर्गातील शेतकरी
- कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी
- भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी
PM PIK VIMA YOJANA | प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या नियम आणि अटी –
- अर्ज करणारा व्यक्ती हा स्वतः शेतकरी असणे गरजेचे आहे.
- शेतीशी निगडित होणारे नुकसान ची फक्त भरपाई दिली जाईल, इतर संबंधित गोष्टीची भरपाई दिली जाणार नाही.
- नुकसानीची भरपाई मागण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करावा लागतो.
- पिक विमा योजनेला अर्ज करत असताना शेतामध्ये खरोखर पिकाची पेरणी किंवा लागवड झाली आहे याचा पुरावा द्यावा लागतो, तो पुरावा गावातील ग्रामपंचायत येथील सरपंच किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे पत्र हा असू शकतो.
- प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या पिकांसाठीच लागू होईल त्या व्यतिरिक्त इतर पिकांना ही योजना लागू होत नाही.
- भाडी तत्त्वावर केलेली शेती असेल तर भाडे कराराची झेरॉक्स अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
- मानवाकडून जाणून बुजून केलेल्या हानीला या योजनेअंतर्गत भरपाई दिली जाणार नाही जसे की आग लावणे चोरी होणे.
- या योजनेला पात्र होण्यासाठी शेतकऱ्याने या अगोदर राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही पिक विमा योजनेला अर्ज केलेला नसावा.
- नुकसान झाल्यानंतर नुकसानीचे मोजमापे मोबाईलच्या आधारे केले जाते.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- PM PIK VIMA YOJANA | प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- रेशनिंग कार्ड
- जमिनीचा ७/१२ आणि ८ अ
- पिकाची पेरणी झाली आहे याचा पुरावा
- प्रतिज्ञापत्र
- पासपोर्ट साईज चे फोटो
प्रधानमंत्री पिक विमा योजनेला अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत –
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत –
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अधिकृत वेबसाईट वरती जाऊन होम पेज वरती शेतकऱ्याचा अर्ज असे लिहिलेले असेल त्यावर ती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायची आहेत म्हणजेच अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती तपासून बघायची आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे.
- अशा रीतीने तुमचा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन रित्या भरून पूर्ण होतो.
ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत –
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील कृषी विभागाच्या ऑफिसमध्ये जायचे आहे.
- कृषी विभागाच्या ऑफिसमधून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा अर्ज घ्यायचा आहे तरी चाललेली सर्व माहिती भरायची आवश्यकता सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायची आणि तो अर्ज पुन्हा कृषी विभागांमध्ये किंवा आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा करायचा आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अर्जाची सद्यस्थिती कशी बघायची ?
- प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यायचे होमपेज वरती पॉलिसीची स्थिती हा ऑप्शन तुम्हाला दिसेल.
- या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा क्रमांक टाकायचा आहे आणि स्टेटस चेक या बटणावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती बघायला मिळेल.
प्रधानमंत्री पिक विमा योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
प्रधानमंत्री पिक विमा योजना साठी कोण कोण पात्र आहे ?
महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात कधी झाली ?
एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना याची सुरुवात केली.
भाडेकरू शेतकरी किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती शेतजमीन नाही अशी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात का ?
होय
शेतकऱ्यांनी पीक विमा योजना काढणे का गरजेचे आहे ?
चक्रीवादळ दुष्काळ व ला दुष्काळ कोरडा दुष्काळ कीटक रोग विजा नैसर्गिक आग वादळ यांच्यापासून पिकाचे संरक्षण व्हावे आणि काही यापासून जर काही आपत्ती झाली तर त्याची भरपाई मिळावी म्हणून पिक विमा काढावा.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या पिकांचे कव्हरेज घेतले जाते ?
तृणधान्ये बाजरी आणि कडधान्य तेलबिया पिके वार्षिक व्यावसायिक पिके वार्षिक बागायती