MAGEL TYALA VIHIR YOJANA | मागेल त्याला विहीर योजना

MAGEL TYALA VIHIR YOJANA | आज आपण बघितले तर महाराष्ट्र राज्यात भरपूर प्रदेशात पर्जन्य छायेचा प्रदेश मध्ये येतो. प्रफुल ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची टंचाई भासते. यामुळे पिकांना पाणी मिळत नाही. हाता तोंडाला आलेली पिके पाणी वाचून वाळून जातात. खूप दादर लोकांना पिण्याच्या पाण्याची त्रास देखील सहन करावा लागतो खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये.

शेतकऱ्याचे दैनंदिन जीवन हे पाण्यावरती अवलंबून आहे, त्याला घर खर्च साठी लागणारे पाणी, पिण्यासाठी लागणारे पाणी यापासून ते अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शेतीसाठी पाणी लागते. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असते. त्यामध्ये मागील त्याला शेततळे ही एक देखील योजना आहे. शेतकरी योजना अंतर्गत उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेती वापरासाठी पाणी साठवून करता येते.

अशीच एक पाण्याचा प्रश्न दूर करणारी महत्त्वकांक्षी अशी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे मागील त्याला विहीर योजना.

आपण जर विचार केला तर विहीर खोदण्यासाठी भरपूर साऱ्या पैशांची गरज असते जे शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आणि त्याच्या आणि मीच उत्पन्नाच्या साधनांनी मधून त्याला तो विहीर खोदण्याचा खर्च करणे हे खूप जिकरीचे होऊन जाते. त्यासाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देते मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत देते.

चला तर मग आज आपण जाणून घेऊया मागेल त्याला विहीर योजना सविस्तर मध्ये.


योजनामागेल त्याला विहीर योजना | MAGEL TYALA VIHIR YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासन
कोणत्या विभाग मार्फत राबवली जातेकृषि विभाग
उद्देशविहीर बनवण्यासाठी आर्थिक सहाय्य
पात्रतामहाराष्ट्र तिल शेतकरी
मिळणार लाभ४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
अर्ज कसा करायचंऑफलाइन / ऑनलाइन

MAGEL TYALA VIHIR YOJANA

Table of Contents

MAGEL TYALA VIHIR YOJANA | मागेल त्याला विहीर योजनेची उद्दिष्टे –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवणे.
  • उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते, हा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सुटावा हा एक महत्त्वाचा उद्देश मागेल त्याला विहीर योजनेचा आहे.
  • शेतीसाठी विविध योजना काढून तरुण वर्गाला शेतीकडे आकर्षित करणे.
  • पाण्याच्या टंचाईमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान थांबवणे.
  • शेतकऱ्यांचा कायमचा पाण्याचा प्रश्न सोडवून त्यांना आत्मनिर्भर बनवणे.

MAGEL TYALA VIHIR YOJANA | मागेल त्याला विहीर योजना ची वैशिष्ट्ये-

  • मनरेगाच्या योजना अंतर्गत चार लाख रुपयांचे अनुदान हे विहीर खोदण्यासाठी मागेल त्याला विहीर योजना या अंतर्गत दिले जाणार आहे.
  • पहिले विहीर खोदणे च्या योजनेसाठी एका गावामध्ये जास्तीत जास्त किती विहिरी असावे यासाठी महाराष्ट्र शासनाने अट घातली होती, परंतु आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून ती अट काढून टाकण्यात आली आहे.
  • योजना सर्वप्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी खुली आहे.
  • या योजनेला पंचायत समिती विहीर योजना या नावाने देखील ओळखले जाते.
  • मागेल त्याला विहीर योजनेच्या अनुदानाची लाभाची रक्कम ही लाभार्थीच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते.

MAGEL TYALA VIHIR YOJANA | मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ –

  • मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य विहीर खोदण्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात येते.

MAGEL TYALA VIHIR YOJANA | मागेल त्याला विहीर देखील योजनेचे लाभार्थी –

  • भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी
  • जे शेतकरी स्वतःची विहीर खोदण्यास आर्थिक परिस्थितीमुळे असमर्थ आहेत असे शेतकरी.
  • अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकरी
  • इतर मागासवर्गीय वर्गातील शेतकरी
  • जॉब कार्ड असलेले शेतकरी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • पिवळ रेशन कार्ड शेतकरी कुटुंब म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • अल्पभूधारक शेतकरी
  • सीमांत शेतकरी – 2.5 एकर पेक्षा कमी जमिनी असणारे शेतकरी
  • आत्महत्याग्रस्त कुटुंब असलेले शेतकरी महिला करता असलेल्या कुटुंबातील शेतकरी

MAGEL TYALA VIHIR YOJANA | लाभधारकाची पात्रता

  • अर्जदाराकडे कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्र सलग रीत्या असावे.
  • पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटरच्या परिसरात नवीन विहीर खोदू नये.
  • लाभधारकाचे ७/१२ वरती विहिरीची नोंद नसावी.
  • ज्या लाभधारकांकडे जॉब कार्ड आहे त्यांनाच फक्त विहीर योजनेचा लाभ घेता येईल.
  • एका पेक्षा जास्त लाभदारकांना जर विहीर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे कमीत कमी 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे बंधनकारक आहे.

मागेल त्याला विहीर योजनेचे फायदे-

  • मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल.
  • सिंचनाच्या पाण्या वाचून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही.
  • तरुण पिढीतील शेतकरी शेतीकडे आकर्षित होण्यास मदत होईल.

मागेल त्याला योजनेची पात्रता –

  • महाराष्ट्राचा शेतकरी जो महाराष्ट्रात पूर्वीपासून स्थित आहे तो या योजनेसाठी पात्र राहील.

मागेल त्याला विहीर योजनेच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे –

  • योजना फक्त महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांसाठीच सीमित राहील.
  • या योजनेसाठी कोणीही अर्ज करू शकत नाही, योजनेसाठी फक्त आणि फक्त शेतकरीच अर्ज ही करू शकतील आणि त्याच अर्जदाराच्या नावावरती जमीन असणे आवश्यक आहे.
  • पूर्वीपासूनच जर शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची विहीर असेल तर या योजनेसाठी शेतकरी अर्ज करू शकत नाही.
  • महाराष्ट्र शासनाचे नियमानुसार शेतकरी हा खालीलपैकी फक्त कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामध्ये मागील त्याला शेततळे, सामुदायिक शेततळे, मागेल त्याला विहीर, भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी यापैकी कोणतेही एका योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याच्या नावावरती कमीत कमी 0. 40 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या लाभाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते त्यामुळे शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे अनिवार्य आहे अन्यथा योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही.
  • महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार दोन विहिरींमध्ये किमान पाचशे मीटरचे अंतर असणे बंधनकारक आहे, त्यामुळे अर्जदार खोदत असलेल्या जागेपासून पाचशे मीटरच्या अंतरात दुसरी कोणतीही कोणाचीही विहीर नसावी.
  • भूजल सर्वेक्षण विकास इंटरनेटचे अधिकारी सर्वेक्षण करून जी जागा निश्चित करते त्या जागेवरतीच विहीर खोदण्याचे बांधकाम करणे हे अनिवार्य आहे.
  • रन ऑफ झोन, अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्यरेषेखाली कुटुंब यांना दोन विहिरींमध्ये किमान 150 मीटर जागा ठेवणे हा नियम लागू होत नाही.
  • अर्ज करीत असलेले शेतकऱ्याच्या सातबारा वरती विहिरीची नोंद असावी.
  • अर्जदाराला त्याच्या एकूण जमिनीचा ऑनलाईन दाखला काढून घेणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीमध्ये जर पार्टनर असतील तर त्या अर्जदाराला त्याच्या इतर पार्टनरची एनओसी देणे अनिवार्य राहील.
  • लाभार्थी एकापेक्षा जास्त असते किंवा एक शेतकरी गट या योजनेसाठी अर्ज करीत असेल तर त्या सर्वांची 0.40 हेक्टर जमीन सलग असणे आवश्यक आहे.

विहीर कोठे खोदावी –

  • नाल्यांच्या जवळ किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त नाल्यांचा जिथे संगम होतो अशा ठिकाणी
  • मातीचा थर कमीत कमी 30 सेंटिमीटर  व पाच मीटर पर्यंत जिजलेला मऊ खडक आढळतो अशा ठिकाणी
  • दमट वाटणाऱ्या जागेत
  • घनदाट झाडांच्या प्रदेशात
  • नदीच्या गोलाकार वळणाच्या आतल्या भागात
  • नदी नाल्यांच्या जुन्या प्रवाहाच्या मार्गामध्ये परंतु तिथे आता नदीचा किंवा नाल्याचा प्रवाह हा नसेल अशा ठिकाणी.

विहीर कोठे खोदू नये

  • कडक खडक असणाऱ्या जमिनीवरती विहीर खोदू नये.
  • ज्या ठिकाणी डोंगराचे कडे आहेत तो आणि त्याच्या आसपास चा 150 मीटरचा परिसर अशा भागात विहीर खोदायचे टाळावे.
  • ज्या पृष्ठभागावर्ती मातीचा थर हा 30 सेंटिमीटर पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी विहीर खोदू नये.
  • ज्या ठिकाणी विहीर खोदायची आहे अशा ठिकाणी मुरमाची किंवा झिजलेल्या खडकाची खोली ही पाच मीटर पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. (मुरमाची खोली चा अंदाज घेण्यासाठी आपल्या आसपासच्या खोदलेल्या विहिरीत डोकावले की आपल्याला त्याचा अंदाज लागतो. )

मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात-

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • जमिनीचा ७/१३ आणि ८ अ
  • बँक अकाउंट डिटेल्स
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
  • सामुदायिक विहिरीच्या अर्जात सर्व गटाची मिळून किमान जमीन 0.40 हेक्टर आहे असा पंचनामा
  • गट विहीर मध्ये सामोपचाराने पाणी वापरण्यात येईल असे करार पत्र.

मागेल त्याला विहीर योजनेच्या लाभार्थीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे –

  • या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही ग्रामसेवक यांच्यामार्फत केली जाते.
  • या योजनेसाठी प्रथम प्राधान्य हे आत्महत्यप्रस्थ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिली जाते
  • त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना प्राधान्य दिले जाते
  • आणि त्यानंतर इतर सर्व लाभार्थ्यांना ज्यांचे अर्ज पाहिले येथील त्यांना प्रथम प्राधान्य आहे अनुसार निवड केली जाते.

मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया-

  • अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, आणि लॉगिन करावे लागेल.
  • होमपेज वरती मागील त्याला विहीर योजना या योजनेत वरती क्लिक करावे लागेल.
  • योजनेवर च्या नावावरती क्लिक केल्यावर ती अर्ज ओपन होईल त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायचे आहे आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून अर्जाच्या सबमिट बटनावरती क्लिक करायचे.

विहिरीच्या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे

  • शक्य तेवढ्या लवकर विहिरीचे काम पूर्ण करावे असे अपेक्षित असते.
  • चांगल्या गतीने काम चालू असेल तर चार महिन्यात विहिरीचे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित आहे.
  • पावसाळ्यामध्ये पावसाच्या परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता वीर बांधकामाचा कालावधी हा लांबू शकतो तरी तो सलग दोन वर्षे इतक्यापर्यंत असावा.
  • काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर विहिरीच्या बांधकामांचा कालावधी दोन वर्षापेक्षा जास्त लांबणार असेल तर जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे.

विहिरीचे बांधकाम चालू असताना घेण्याची काळजी

  • वीर बांधकामा ला आलेल्या मजुरांना हेल्मेट देणे बंधनकारक आहे.
  • मजुरांच्या हेल्मेटचा खर्च  सहा टक्के प्रशासकीय निधीतून भागवला जातो.