SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | आजच्या घडीला जर आपण बघितले ते महाराष्ट्र राज्यात भरपूर अशी लोक आहेत की जी निराधार आहेत. खरं बघायला गेलं तर निराधार प्रवर्गामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो त्यामध्ये अंदलोक अपंग अनाथ मुले क्षयरोग असणारी लोक कर्करोग असणारे लोकं एड्स असणारे लोक विधवा स्त्रिया घटस्फोटीत स्त्रिया यांना पोटगी मिळाली नाही अशा अत्याचारित किंवा वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया तृतीयपंथी लोक अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी इत्यादी लोकांचा समावेश निराधार या कॅटेगिरी मध्ये होतो. आता या प्रत्येक प्रकारच्या लोकांची व्यथा, त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या अडचणी त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांना समाजात सहन करावा लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या हे एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या आहेत. या लोकांना प्रामुख्याने आर्थिक आणि आरोग्या च्या समस्यांना सामोरे जावे लागते.
यावरती उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेची सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील वर दिलेल्या प्रवर्गातील निराधार व्यक्तींना दर महिन्याला एक आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून किंवा एक निवृत्ती वेतन म्हणून दिले जाते.
एखादा भारतीला सहाशे रुपये दर महिना एवढे आर्थिक सहाय्यक दिले जाते एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त जर लाभार्थी असतील तर अशा कुटुंबाला 900 रुपये प्रति महिना इतकी हार्दिक साह्य दिले जाते.
चला तर मग आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेची सविस्तर माहिती घेऊया.
योजनेचे नाव | संजय गांधी निराधार योजना | SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य शासन |
योजनेचा उद्देश | राज्यातील निराधार नागरिकांना दर महिन्याला आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी पात्रता | महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षा खालील निराधार नागरिक |
मिळणारा लाभ | ९०० रुपये प्रती महिना आर्थिक लाभ |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन / ऑफलाइन |
![SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA](https://atozmarathi.in/wp-content/uploads/2024/12/SANJAY-GANDHI-NIRADHAR-YOJANA-300x169.webp)
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | संजय गांधी निराधार योजनेची उद्दिष्टे –
- महाराष्ट्र राज्यातील विविध प्रवर्गातील निराधार व्यक्तींना दर महिन्याला आर्थिक सहाय्य करणे.
- निराधार व्यक्तींना आर्थिक रित्या स्वावलंबी बनवणे.
- महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्च तसेच आरोग्याचा खर्च इथे त्यासाठी कोणावरती अवलंबून न राहता त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वैशिष्ट्ये –
- या योजनेअंतर्गत लाभार्थीला प्रत्येक महिन्याला मिळणारा आर्थिक लावा थेट त्याचे बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेला पात्र ठरण्यासाठी अर्जदाराला अपत्य संख्येची अट नाहीये.
- जी अनाथ मुले व मुली अनाथ आश्रमात राहत नाहीत आणि किंवा त्यांचे आई वडील काही कारणास्तव मृत्यूमुखी पडले आहेत अशा मुलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | संजय गांधी निराधार अनुदान योजना मार्फत दिले जाणारे आर्थिक अनुदान / पेन्शन पुढील प्रमाणे –
- संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थीला दर महिन्याला 600 रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त जर लाभार्थी असतील तो त्या कुटुंबाला दर महिन्याला 900 रुपये इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
कोण कोण या योजनेची लाभार्थी होऊ शकते ?
- पोटगी न मिळालेल्या घटस्फोटीत महिला.
- निराधार व्यक्ती
- तुरुंगात असलेल्या कैद्याची पत्नी
- दिव्यांग प्रवर्गात मूकबधिर कर्णबधिर मतिमंद अंध स्त्रिया आणि पुरुष
- अनाथ मुले मुली
- देवदासी
- अत्याचारी महिला
- वेश्या व्यवसायातून सुटका झालेल्या महिला
- दुर्लक्षित महिला
- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
- तृतीयपंथी
- क्षयरोग कर्करोग पक्षाघात एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारांमुळे स्वतःचे चरित्र चालू शकणारे स्त्री-पुरुष
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी –
- अशा निराधार लोकांना दरवर्षी वर्षातून एकदा त्यांच्या हयातीचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना एक जानेवारी ते 31 मार्च या कालावधी दरम्यान ज्या खात्यात त्यांची बँक आहे अशा बँक मॅनेजर कडे किंवा गावातील पोस्टमास्टर कडे स्वतः हजर राहून आयात असल्याची नोंद करून घेणे गरजेचे आहे.
- जर लाभार्थी हायात असल्याचे प्रमाण देऊ शकला नाही तर त्याच्या योजनेचा लाभ बंद केला जातो.
- काही कारणास्तव एक जानेवारी ते 31 मार्च दरम्यान लाभार्थीच पोस्टमास्टर कडे किंवा बँक मॅनेजर कडे उपस्थित नाही राहिला तर त्याला नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्यासमोर हजर राहून आहे तिचे प्रमाणपत्र बनवून घ्यावे लागते आणि ते प्रमाणपत्र जमा केल्यानंतर त्याचा योजनेचा लाभ पुन्हा सुरू होतो.
SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA | संजय गांधी निराधार योजनेची पात्रता, अटी आणि शर्ती –
- मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेलेच निराधार लोक या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
- महाराष्ट्र बाहेरील निराधार लोक जे की सध्या महाराष्ट्रात राहत आहेत अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्ज करीत असलेल्या व्यक्तीला सध्या कोणताच उत्पन्नाचा स्रोत नसावा.
- अर्जदार व्यक्ती हा भूमीहीन असावा त्याच्या नावावर ती जमीन नसावी.
- दारिद्र्यरेषेखाली असणारे निराधार लोकच फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतील.
- 65 वय वर्षे गटाच्या आतील निराधार व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरतील.
- जो अर्जदार मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात रहिवासी आहे असेच अर्जदार या योजनेसाठी पात्र धरले जातील.
- जर अर्जदार व्यक्ती संजय गांधी निराधार योजना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या पेन्शन च्या योजनेचा लाभ घेत असेल तर तो या योजनेस पात्र ठरू शकत नाही.
- जर लाभार्थीला मुली असतील आणि त्या अविवाहित असतील तरच लाभार्थीला या योजनेअंतर्गत लाभ मिळेल.
- जर लाभार्थीच्या मुलाला कोणत्याही प्रकारची नोकरी मिळाली तर त्यानंतर त्या मुलाच्या उत्पन्नावरती विचार करून या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता ठरवण्यात येईल.
- जोपर्यंत लाभार्थी आहे आता आहे तोपर्यंत या योजनेचा आर्थिक लाभ घेता येईल.
- अस्थिभंग अंध मूकबधिर कर्णबधिर मतिमंद अशा प्रवर्गातील लोकांना जर 40% पेक्षा जास्त अपंगत्व असेल तरच त्यांना या योजनेसाठी पात्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.
- फक्त पोटगी न मिळणाऱ्या घटस्फोटीत महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
- ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
- पासपोर्ट साईज चे फोटो
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- आर एस बी वाय कार्ड
- जॉब कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन.
- दारिद्र्यरेषेखालील असलेला प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला.
- वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंद.
- उत्पन्नाचा दाखला
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- संजय गांधी नगर अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या जिल्हा कार्यालयात किंवा तहसीलदार कार्यालयात किंवा तलाठी कार्यालयात जाऊन या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चौकशी करायची आहे.
- त्या संबंधित अधिकार्याकडून या योजनेचा फॉर्म घ्यायचा त्या फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे या फॉर्म सोबत जोडायची.
- तो फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
- च्या रीतीने तुमची संजय गांधी निराधार अनुदान योजनेची फॉर्म भरण्याची प्रक्रिया समाप्त होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्ज करत असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन नवीन युजरची नोंदणी करायची आहे.
- नंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करायचं.
- लग्न करून झाल्यानंतर तुमच्यासमोर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म उघडेल.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती चुकली ते भरायची आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
- सर्व माहिती भरून झाल्यावरती तब्येत बटणावर क्लिक करायचे.
- अशाप्रकारे तुम्ही चा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म भरून होईल.
अर्ज मंजूर करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्जदार वरील योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी अर्जाच्या दोन प्रती आपल्या गावच्या संबंधित तलाठ्याकडे सुपूर्द करेल.
- या योजनेसाठी वर दिलेल्या प्रमाणे पात्रतेच्या अटी व निकष पूर्ण करणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जदाराने अर्जासोबत जोडावीत.
- गावच्या तलाठ्याकडे आलेल्या अर्जांची छाननी केली जाते व ते अर्ज त्या विभागातील तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडे पाठवले जातात.
नायब तहसीलदार किंवा तहसीलदार अर्जाची छाननी कशी करतात –
- नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या कार्यालयात आलेली अर्ज हे आलेल्या तारखेनुसार क्रमांकाने लावले जातात आणि तशी त्यांची नोंद केली जाते.
- त्या अर्जांचे छाननी ही क्रमवारी पद्धतीने केली जाते ही छाननी ही नायक तहसीलदार किंवा तहसीलदार हे स्वतः करतात आणि प्रत्येक तीन महिन्या मध्ये समितीचे सचिव म्हणून अर्जदारांची यादी समिती समोर निर्णयासाठी ठेवली जाते.
- समिती समोर ठेवलेल्या अर्जांमधून समितीने पात्र उमेदवारांची एक यादी बनविली जाते अपात्र उमेदवारांची यादी बनविली जाते आणि त्या यादी सूचनाफलकावर लावल्या जातात.
- ज्या अर्जदारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत ते त्यांना कारणासहित कळविले जाते.
- तसेच पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी ही संबंधित ग्रामपंचायतीला किंवा त्या प्रभागाला कळविले जाते आणि त्या संबंधित ग्रामपंचायतच्या सूचनाफलकावरती देखील लावली जाते.
संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक सहाय्य मंजुरी आणि तिचे वितरण पुढीलप्रमाणे –
- संजय गांधी निराधार योजनेची समिती यांच्यामार्फत या योजनेसाठी आर्थिक सहाय्य मंजूर केले जाते.
- प्रतीक तीन महिन्यानंतर या समितीमार्फत लाभार्थ्यांची माहिती शासनाला कळवणे बंधनकारक आहे.
- नवीन नोंद झालेल्या लाभार्थ्यांना निधी हा शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध झाल्यानंतरच दिला जातो.
- संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समितीचे अध्यक्ष हे स्थानिक विधानसभा सदस्य असतात.
- तसेच नायब तहसीलदार किंवा तहसीलदार एक शासकीय प्रतिनिधी म्हणून या समितीवरती सचिव म्हणून कार्यरत असतात.
- या समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यातून घेण्यात येते, नाही तहसीलदार किंवा तहसीलदार हे समितीचे अध्यक्ष यांची वेळ घेऊन त्यानुसार मीटिंग आयोजित करतात. मीटिंगसाठी 50% उपस्थिती असेल तरच मीटिंग पुढे घेतली जाते.