PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

PM SURAKSHA VIMA YOJANA | आज आपण बघितलं तर भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विमा हा लोकांकडून तितकाचा वापरला जात नाही. त्याचं कारण म्हणजे प्रामुख्याने भारत देशातील लोकसंख्या वर्ग हा सामान्य कुटुंबातून येतो. अशा सामान्य कुटुंबामध्ये त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा असतील किंवा इतर काही आर्थिक गरज असते त्या भागवणे हेच प्रमुख उद्दिष्टे असते. अशा परिस्थितीमध्ये विम्यासाठी सेपरेट खर्च करणे या सामान्य लोकांच्या विचारात नसते.

जे काही विमा एजंट किंवा विमा कंपन्या विम्याची विक्री करतात अशा लोकांना देखील विमा विकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. विमा विकणाऱ्या प्रतिनिधींना लोकांच्या मागे लागावे लागते त्यांना कन्व्हिन्स करावे लागते त्यांना विम्याचे महत्त्व पटवून सांगावे लागत तरी देखील काही लोक विमा घेत नाहीत.

विमा हा लोकांच्या फायद्यासाठी असतो हे लोकांना माहीत असतं तरी देखील आर्थिक परिस्थितीच्या अभावी लोक या गोष्टीपासून स्वतःला वंचित ठेवतात. विमा जर असेल तर भविष्यात न सांगता होणारा खर्च मग तो अपघातामुळे असेल कोणत्याही आजारामुळे असेल किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या अचानक मृत्यू पावल्यामुळे असेल तो भरून काढण्यास मदत होते. अशा परिस्थितीमध्ये जर घरातील कर्ता व्यक्ती काही कारणास्तव मृत्युमुखी पडला कायमचे अपंगत्व आले तर त्या कुटुंबावरती खूप मोठी आर्थिक अडचण निर्माण होते. या अशा सर्व गोष्टींमधून वाचण्यासाठी विमा असणे ही काळाची गरज आहे.

यासाठीच केंद्र सरकारने भारत देशातील नागरिकांना अपघाती विमा देण्याचा ठरवलं आहे. म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत जर विमा धारकाचा काही दुर्दैवी कारणास्तव अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते, जर अपघातामध्ये कायमस्वरूपी चे अपंगत्व आले तर दोन लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते, आणि काही प्रमाणात अपंगत्व आल्यात जे की ठराविक काळासाठी असेल अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत या विम्याच्या योजनेअंतर्गत मिळते.

तर ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना नेमकी आहे तरी काय हे आपण सविस्तरपणे आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया….


योजनाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | PM SURAKSHA VIMA YOJANA
लाभार्थीभारत देशातील सर्व नागरिक
योजनेचा मिळणारा आर्थिक लाभदोन लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण
उद्देशभारत देशातील नागरिकांना कमी खर्चामध्ये विमा संरक्षण पुरवणे.
अर्ज कसा करायचाऑफलाइन पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या मार्फत

PM SURAKSHA VIMA YOJANA

Table of Contents

PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची उद्दिष्टे

  • भारत देशातील नागरिकांना विमाचे संरक्षण पुरवणे हे प्रमुख उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने ही योजना सुरू केली.
  • भारतीय कुटुंबातील एखाद्या कर्त्या व्यक्तीचे अकस्मित अपघातामध्ये जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत या योजनेच्या अंतर्गत केली जाते.
  • जर अपघातामध्ये विमाधारकाला कायमस्वरूपी चे किंवा टेम्पररी अपंगत्व आले तर अशा काळामध्ये त्या कुटुंबातील आर्थिक खर्च चालू ठेवण्यासाठी रुपये दोन लाख किंवा एक लाख अशी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत करणे.
  • कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना विमा संरक्षण पुरवणे.
  • भारत देशातील नागरिकांमध्ये विम्याचे महत्त्व पटवून देणे आणि जास्तीत जास्त लोकांना विमा घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.

PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री सुरक्षा योजनेची वैशिष्ट्ये

  • PM SURAKSHA VIMA YOJANA ही विमा योजना केंद्र शासन पुरस्कृत विमा योजना आहे.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा त्यास अपंगत्व आले तर त्या विम्याची रक्कम विमाधारकाच्या वारसदाराच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत दिली जाते.
  • भारत देशातील सामान्य लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी केंद्र शासनामार्फत योजनेच्या विम्याची रक्कम जी आहे विमाचा जो प्रीमियम आपण भरतो ते प्रीमियमची रक्कम कमी कमीत कमी ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा फायदा घ्यावा.
  • काही कारणास्तव जर विमा पॉलिसी विमाधारकाकडून बंद झाली तर ती पुन्हा सुरू करता येते.
  • ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेवरती केंद्र शासनाचे संपूर्ण लक्ष असते तसेच या योजनेमध्ये गैरविवार होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.

PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचे लाभार्थ्याची पात्रता –

  • भारत देशातील सर्व भारतीय नागरिक असलेले नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
  • सर्व जाती धर्मातील नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.

PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेचे फायदे पुढील प्रमाणे –

  • अगदी कमीत कमी विमा प्रीमियम भरून या योजनेसाठी पात्र होत आहे. वर्षाला फक्त 20 रुपये विमा हप्ता भरून दोन लाख रुपयांचा विमा मिळवता येतो.
  • विमाधारकाला अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी चे अपंगत्व आल्यास अनुक्रमे दोन लाख रुपये आणि एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
  • विमाधारकाच्या कुटुंबामध्ये करता व्यक्तीचा जर अचानक अपघाती मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावा लागत नाही कारण या योजनेअंतर्गत त्याला आर्थिक मदत केली जाते.

PM SURAKSHA VIMA YOJANA | प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभ –

  • जर विमाधारकाला अकस्मिक अपघातामध्ये एक डोळ्याची दृष्टी किंवा एक हात किंवा एक पाय काही काळासाठी गमवावा लागला तर प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना अंतर्गत त्याला एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • जर अपघातामुळे दोन्ही डोळे दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले तर विमाधारकाच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचे आर्थिक भरपाई दिली जाते.
  • जर विमाधारकाला अपघातामध्ये त्याचे एका डोळ्याची दृष्टी एक हात किंवा एक पाय कायमस्वरूपी जर गमवावा लागला तर त्याला दोन लाख रुपयांची आर्थिक रक्कम भरपाई म्हणून दिली जाते.
  • अपघातामध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला वारसदाराला दोन लाख रुपये विम्याची रक्कम दिली जाते.

PM SURAKSHA VIMA YOJANA |योजनेचा कालावधी –

  • एक जून ते 31 मे असा या योजनेचा दरवर्षीचा कालावधी आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत आकारला जाणारा विमा प्रीमियम

  • वार्षिक 20 रुपये + सेवा कर, अशी मिळून विम्याच्या प्रीमियम आकारला जातो.

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेच्या अटी आणि शर्ती –

  • ज्या लोकांकडे भारताचे नागरिकत्व आहे अशा लोकांना जी योजनेचा फायदा येऊ शकतो.
  • भारत देशाच्या बाहेरी लोकांना योजनेचा फायदा घेता येत नाही.
  • वय वर्ष 18 ते 70 च्या वयोगटातील लोकांना या योजनेसाठी अर्ज करता येईल.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे नॅशनल बँक मध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे.
  • जर दुर्दैवाने विमाधारक व्यक्तीचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला अपघात झालेल्या 30 दिवसांच्या आत मध्ये विमाचा दावा करणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराला दरवर्षी विम्याचा अर्ज नूतनीकरण करावा लागतो.
  • वार्षिक वीस रुपये विम्याचा हप्ता अर्जदाराला भरावा लागतो.
  • जर विम्याचा हप्ता भरला नाही आणि त्या कार्यकाळामध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर त्याला विमा योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक भरपाई दिली जाणार नाही.
  • विम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी विमाधारक अर्जदाराला त्याच्या बँक मध्ये ऑटो डेबिट किंवा नेच सर्विस चालू करणे गरजेचे आहे.
  • अर्जदार हा एकाच पॉलिसीसाठी पात्रता आहे

खालील कारणास्तव विमाधारकाला विम्याचे संरक्षण दिली जाणार नाही –

  • अर्जदाराला 70 वर्षापेक्षा जास्त त्याचे वय झाल्यानंतर विम्याचे संरक्षण दिले जाणार नाही.
  • विम्याचा हप्ता भरण्यासाठी पुरेशी रक्कम जर बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये जर नसेल तर विम्याचे संरक्षण दिले जाणार नाही. जर काही तांत्रिक अडचणींमुळे विमा संरक्षण थांबवले गेल्यास ते संरक्षण योजनेअंतर्गत लावल्या गेलेल्या अटींच्या नुसार वार्षिक विमा हप्ता भरून परत सुरू ठेवले जाईल.
  • या संपूर्ण कालावधीच्या मते विम्याचे संरक्षण निलंबित करणे किंवा ते पुन्हा चालू करणे हे पूर्णपणे विमा कंपनीच्या मर्जी वरती अवलंबून राहील.

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला अर्जदाराचे पॅन कार्ड
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर
  • अर्जदाराचा ईमेल आयडी
  • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  • अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील वारसदार लावायचा असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्याचे तपशील
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज

प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

बँकेच्या मार्फत अर्ज करण्याची पद्धत

  • ज्या बँक मध्ये अर्जदाराचे खाते आहे अशा बँक मध्ये जाऊन भेट देणे.
  • बँकेतून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज घेऊन त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • त्या अर्जासोबत आवश्यकते कागदपत्र सर्व जोडायची आणि तो अर्ज बँक मध्ये जमा करायचा.
  • बँकेतील कर्मचारी या अर्जाची छाननी करून पुढील प्रोसेस करतील आणि बँक खात्यामधून वार्षिक वीस रुपये इतकी रक्कम प्रीमियमची तुमच्या खात्यांमधून वजा केली जाईल.

पोस्टाच्या मार्फत अर्ज करण्याची प्रोसेस –

  • इच्छुक असलेले व्यक्तीने आपल्या जवळचे पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वरून आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायचे आणि तो अर्ज पोस्ट ऑफिस मध्ये जमा करायचा.
  • ऑफिस मधील कर्मचारी त्या अर्जाची छाननी करतील आणि पोस्टच्या खात्यातून वीस रुपये वार्षिक विमा हप्ता कट केला जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा दावा कसा करायचा-

  • विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वर्षांनी 30 दिवसाच्या आतमध्ये विमा कंपनीकडे दावा सादर करणे गरजेचे आहे .
  • मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीने किंवा त्याच्या वारसदाराने विमा कंपनीकडे दाव्यासाठी मृत्यूचा दाखला अपंगत्व प्रमाणपत्र आधार कार्ड बँक खाते पासबुक अशी कागदपत्रे जमा करून दावा सादर करावा.