FREE SHILAI MACHINE YOJANA | आज आपण सगळीकडे बघत आहे भारत देशात गरिबी अजून देखील खूप प्रमाणात बघायला मिळते. भरपूर कुटुंब ही दारिद्र्यरेषेखालील आहेत. अशा कुटुंबांना त्यांचे हार्दिक खर्च भागवणे व त्यांचे स्वप्न पूर्ण करणे याच्यामध्ये खूप तडजोड करावी लागते.
अशा परिस्थितीमध्ये घरातील एकाकर्त्या पुरुषांनी काम करून त्याच्या आमदनी वरती पूर्ण घर चालवणे तुमची गिरीजा होऊन जाते. तो एकटा करता व्यक्ती काय म्हणून करणार, घरातील वृद्ध सदस्यांचे आरोग्याचा खर्च बघणार की मुलांच्या शाळांचा खाण्यापिण्याचा खर्च बघणार की बायकोच्या हौसेचा खर्च बघणार की इतर दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टींचा खर्च बघणार. या सर्व गोष्टींना योग्य रीतीने व्यवस्थापन करणे पैशाच्या अभावामुळे अडचणीचे होऊन जाते. त्यामध्ये जर काही आर्थिक रित्या गरीब कुटुंबांना जर कर्ता व्यक्ती सोबत अजून एखाद्या व्यक्तीने पुढे येऊ काही काम हातात घेतली आणि त्यातून चार पैसे कमवायला सुरुवात केली तर त्यांना तेवढाच हातभार लागतो. म्हणूनच घरातील महिलांनी त्यांना जमेल असे काम करून आपल्या घरातील कर्ता व्यक्तीला सपोर्ट करावा अशी सगळ्यांची इच्छा असते.
सपोर्ट करण्यासाठी महिलांनी काम करायची पण नेमके करायचे काय आपण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर हाच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढे सरसावले आहे. महाराष्ट्र सरकार काय करत आहे तर जे कुटुंब आर्थिक रित्या गरीब कॅटेगिरी मध्ये येतात अशा कुटुंबातील महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा त्यांना एक रोजगार मिळावा म्हणून धडपड करत आहे. अशा गोष्टी वारंवार सरकारकडून केल्या जातात, त्यामध्ये थेट आर्थिक मदत करणे जसे की लाडकी बहीण योजना असेल. तसेच काही अशा योजना आहेत की त्या योजनेमार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते.
अशीच एक महिलांच्या विकासासाठी हातभार लावणारी एक योजना आज आपण घेऊन आलेलो आहे. योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली या योजनेचे नाव आहे मोफत शिलाई मशीन योजना. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार गरजू गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करते. जेणेकरून अशा गरजू महिलांनी या शिलाई मशीन चा वापर करून चार पैसे कमवावेत आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक रित्या मदत करावी हा यामागचा आहे मुख्य हेतू आहे. तसेच अशा योजनांमुळे महिलांचे मनोबल वाढते त्या स्वावलंबी बनतात आत्मनिर्भर म्हणतात आणि स्वतःच्या पायावरती उभा राहतात. त्यामध्ये काही महिला या अपंग असतात तर काही विधवा असतात अशा महिलांसमोर त्यांची पूर्ण जीवन जगणे हे खूप जीगरीची असते अशातच या मोफत शिलाई मशीन योजना सारख्या योजना त्यांच्यासाठी वरदान ठरतात.
उपोषणा योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील गरजू गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवते किंवा शिलाई मशीन घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवते. या योजने साठी ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी पात्र ठरतील. योजनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग विधवा महिला यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल.
चला तर मग FREE SHILAI MACHINE YOJANA या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया…
योजनेचे नाव | फ्री शिलाई मशीन योजना | FREE SHILAI MACHINE YOJANA |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिला |
योजनेचा मिळणारा लाभ | मोफत शिलाई मशीन |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देणे |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |
FREE SHILAI MACHINE YOJANA | फ्री शिलाई मशीन योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्रातील गरीब महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी शिलाई मशीनचे मोफत वाटप करणे.
- महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी मदत करणे.
- महिलांना नवीन रोजगार असे संधी उपलब्ध करून देऊन त्या सामान्य कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती सुधारणे.
- महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करणे.
FREE SHILAI MACHINE YOJANA | फ्री शिलाई मशीन योजनेचे वैशिष्ट्य–
- राज्यातील गरजू 50000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन ची वाटप करणे हे सरकारचे लक्ष आहे.
FREE SHILAI MACHINE YOJANA | फ्री शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक रित्या गरीब असलेल्या कुटुंबातील महिला.
फ्री शिलाई मशीन योजनेचा फायदा–
- या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. या शिलाई मशीन चा वापर करून या महिला थोडेफार पैसे कमवून आपल्या कुटुंबाला आर्थिकरिते हातभार लावायला मदत करतील.
फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत खालील प्रवर्गांना प्राधान्य देण्यात येईल –
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अपंग विधवा महिला यांना जास्त प्राधान्य देण्यात येईल.
FREE SHILAI MACHINE YOJANA | फ्री शिलाई मशीन योजनेच्या अटी आणि शर्ती-
- महाराष्ट्र राज्याचे नागरिक असलेल्या महिलाच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील इतर राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आर्थिक रित्या घरी बसलेल्या कुटुंबातील महिला आणि बेरोजगार असलेल्या महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- वय वर्ष 20 ते 40 या दरम्यान वय असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
- 40 पेक्षा जास्त वय असणाऱ्या किंवा 20 पेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- फक्त महिलाच या योजनेसाठी पात्र ठरतील.
- अर्ज करीत असलेल्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे अन्यथा अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
- शिवणकामाच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असलेल्या महिलाच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील.
- विधवा आणि अपंग महिला यांना या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येईल.
- केंद्र किंवा राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतला असेल तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेता येणार नाही.
- ज्या महिला सरकारी नोकरी करत आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- विधवा अर्जदार महिलांना आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आज सोबत जोडणे बंधनकारक आहे.
- अपंग अर्जदार महिलेला अर्ज सोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
- एका कुटुंबात एकाच अर्जदार महिलेला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्ज करीत असताना महिलेने अर्जामध्ये जर काही चुकीची माहिती दिली असेल तर अशा महिलेचा अर्ज या योजनेमधून रद्द करण्यात येईल.
फ्रि शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराच्या रहिवासी पुरावा
- अर्जदाराच्या घराचे विजेचे बिल
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
- अर्जदाराचा ईमेल आयडी
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराच्या बँक खात्याचे तपशील
- विधवा महिला अर्जदाराच्या पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र
- अपंग महिला अर्जदाराच्या अपंग असलेले प्रमाणपत्र
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे –
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्ज करीत असलेली महिला आर्थिकदृष्ट्या करीत कुटुंबातील नसल्यास आणि तिच्या वर्षाचे आर्थिक एक लाख वीस हजार रुपये पेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- जर सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असलेली महिलेने अर्ज केला तर अशा महिलेचा अर्ज रद्द करण्यात येईल.
- फ्रि शिलाई मशीन योजनेच्या अर्जासोबत जर आवश्यक ती कागदपत्रे जोडली नाहीत तर अर्ज रद्द करण्यात येईल.
- जर अर्जदार महिलेचे वय हे 20 ते 40 वयोगटांमध्ये बसत नसेल तर अर्ज रद्द करण्यात येईल.
फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्याची पद्धत-
- ग्रामीण भागातील इच्छुक महिला अर्जदारांनी आपल्या जिल्हा कार्यालयात जाऊन महिला सशक्तिकरण विभागात जाऊन चौकशी करायची. शरीरातील महिला अर्जदारांनी आपल्या महानगरपालिकेत जाऊन चौकशी करायची.
- फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यायचा, त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- सोबत लागणारे सर्व कागदपत्रे जोडायची आणि तो अर्ज संबंधित अधिकारी कडे जमा करायचा.
- अशाप्रकारे तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
फ्री शिलाई मशीन योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी शिलाई मशीन हाताने किंवा पायाने किंवा मोटारीच्या सहाय्याने चालणारी असू शकते.
- शिलाई मशीन चालवण्याची मोफत प्रशिक्षण देखील महिलांना दिले जाईल.
- योजनेअंतर्गत शिलाई मशीन ला पैसे किंवा शिलाई मशीन अशा रीतीने योजनेचा लाभ दिला जाईल.
- फक्त आणि फक्त गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
मोफत शिलाई मशीन योजना ही कोणामार्फत सुरू करण्यात आली ?
महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली.
मोफत शिलाई योजना सुरू करण्यामागचा हेतू काय आहे ?
महाराष्ट्र राज्यातील महिलांना मोफत शिलाई चे वाटप करणे आणि त्यांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे.
योजनेची लाभार्थ्याची पात्रता काय आहे ?
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक करित्या गरीब असलेल्या कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरतील. ज्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
मोफत शिलाई वाटप योजनेसाठी अर्ज कोणाकडे करायचा आहे ?
शिलाई वाटत योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांना आपले जिल्हा कार्यालयातील महिला सशक्तीकरण विभागामध्ये अर्ज करावायला भेट द्यायचे आहे. शहरी भागातील महिलांनी आपल्या महानगरपालिकेमध्ये जाऊन चौकशी करून या योजनेचा अर्ज भरायचा आहे.
महाराष्ट्रात राहत असलेल्या परंतु महाराष्ट्राच्या बाहेरच्या नागरिक असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत का ?
नाही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आणि ज्या महिलांकडे महाराष्ट्रातील रहिवासी असलेचा पुरावा आहे अशा महिलाच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील.