TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजना

TRACTOR ANUDAN YOJANA | आज आपण बघत आहोत की भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा ट्रॅक्टर घेणे हे खूप मोठे आव्हान आहे. आणि दैनंदिन शेतातील कामांसाठी ट्रॅक्टर तर लागतोच. पूर्वीच्या काळी ट्रॅक्टरच्या ऐवजी बैल जोडी वरती शेतातील मशागत केली जायची पण आता आधुनिक युगामध्ये बैल जोडीचा वापर करून मशागत करणे हे खूप वेळ खाऊ होऊन जाते. त्यासाठी आता सर्रास सर्व शेतकरी हे ट्रॅक्टरला जास्त महत्त्व देतात.

परंतु सर्व शेतकऱ्यांच्या दारात ट्रॅक्टर आहे असं नाहीये. शेतकऱ्यांना एक तर अगोदरच भरपूर गोष्टींना सामोरे जावे लागते भरपूर अडचणी त्यांच्या जीवनामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये एक तर दुष्काळस पडतो एकतर जास्त पाऊस पडला की म्हणून बोलला दुष्काळ पडतो कधीकधी शेतमालाला भाव मिळत नाही कधी कधी आयात निर्यातीचे नियम बदलतात त्यामुळे शेतमाला वरच्या भावावरती परिणाम होतो. जो पैसे तुम्हाला मार्केटमध्ये जातो त्याच्यामध्ये आडत ट्रान्सपोर्ट या सगळ् या खर्चाचा विचार करता त्याच्या हातात खूप कमी पैसा राहतो. तसेच वाढते खतांचे किमती असतील वरती मजुरी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आजकाल तर मजूर देखील मिळत नाहीत हे असे विविध अडचणींना शेतकऱ्यांना रोज सामोरे जावे लागते.

आणि यात सोबत शेतकऱ्याला स्वतःचा संसार देखील चालवायचा असतो घरातील लागणाऱ्या गोष्टी कडे त्याला बघायचं असतं घरातील ज्येष्ठ लोकांचे दवाखान्याचे खर्च बघायचे असतात आपल्या मुलाबाळांचे शिक्षणाचा खर्च बघायचं असतो, या अशा विविध गोष्टींचा विचार करता शेतकऱ्याला स्वतःच्या राहण्यासाठी ट्रॅक्टर घेणे परवडत नाही. किंबहुना तो ट्रॅक्टर घेणे टाळतो आणि ज्या काही शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे त्यांच्याकडून मशागत करून घ्यायची म्हणलं तर मशागतीचा जो त्यांची मजुरी म्हणा किंवा ट्रॅक्टरचा रेट आहे तू खूपच आहे. त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःचा ट्रॅक्टर असला तर त्याचा जो अतिरिक्त खर्च होतो माझ्या गतीला तो कमी होईल त्याला स्वतःचा खर्च कमी करून स्वतःच्या रानात इतर गोष्टींसाठी वापरता येतील पैसे. त्याला जेव्हा हवं तेव्हा तू शेतीची मशागत करू शकतो दुसऱ्या ट्रॅक्टर वाल्याच्या भरोशावरती बसायची गरज नाही.

परत विषय हाच येतो की ट्रॅक्टर घ्यायचा कसा कारण एकदम एवढी गुंतवणूक करणे सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. परंतु याच्यावरती एक उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान द्यायचे ठरवले आहे. त्यासाठीच केंद्र शासनाने महाराष्ट्र शासन यांनी मिळून ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणून एक योजना सुरू केलेली आहे.

तर आज आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हे ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी १.५ लाख रुपयांपर्यंत अनुदानही दिले जाते. तर ही योजनेबद्दल सविस्तर माहिती जसे की योजनेचा उद्देश काय आहे योजना कोणी सुरू केली कधी सुरू केली या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत या योजनेसाठी पात्रता काय आहे हे योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकतो आणि ह्या योजनेचा अर्ज कसा भरायचा याचे पैसे कसे मिळणार कोणत्या एचपी चा ट्रॅक्टर घ्यायचा या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज ब्लॉक मध्ये मिळतील.

चला तर मग सुरु करूया आपण आजच्या TRACTOR ANUDAN YOJANA च्या ब्लॉगला.


योजनेचे नावट्रॅक्टर अनुदान योजना | TRACTOR ANUDAN YOJANA
सुरुवात कधी झालीसन 2023
योजनेचा विभागकृषी विभाग महाराष्ट्र राज्य
योजनेचा उद्देश काय आहेमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर असावा आणि तो पुरवण्यासाठी शासनाकडून आर्थिक अनुदान देणे.
योजना कोणामार्फत सुरू करण्यात आलीकेंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना चालू करण्यात आली आहे
लाभार्थी कोण आहेतमहाराष्ट्रातील गरीब आणि गरजू शेतकरी
योजनेंतर्गत मिळणारा लाभ काय आहे1.5 लाख रुपयांपर्यंत ट्रॅक्टर खरेदीसाठी आर्थिक अनुदान
अर्ज कसा करायचाऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज केला जातो

TRACTOR ANUDAN YOJANA

Table of Contents

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेची उद्दिष्टे –

  • महाराष्ट्र राज्यातील गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी त्यांना आर्थिक अनुदान पुरवणे.
  • शेतकऱ्यांना स्वतःचा मालकीचा ट्रॅक्टर घेण्यास प्रोत्साहन दिल्याने सुधारणारे शेतकऱ्यांचे जीवनमान एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू करण्यात आली आहे.
  • बैलाच्या मशागतीपेक्षा चांगले रीतीने मशागत ही ट्रॅक्टर मुळे होते आणि याचाच परिणाम शेतकऱ्याच्या उत्पादन वाढवण्यावरती देखील होणार आहे तर अशा रीतीने शेतकऱ्याचे उत्पादकता वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचे आहे.
  • पारंपारिक मशागतीच्या पद्धतींना साईडला ठेवून नवीन आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी आत्मसात करावे आणि शेतीचे यांत्रिकीकरण व्हावे हे मुख्य उद्दिष्टे या योजनेचे आहे.
  • स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टर वापरून शेतमशागत केल्याने होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे.
  • शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे ही कमी करून त्यांचा आत्महत्या रोखणे हे एक मुख्य उद्दिष्ट आहे.

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेचे फायदे –

  • शेतकऱ्याला स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांवरती किंवा ट्रॅक्टर वरती मशागतीसाठी अवलंबून राहावा लागणार नाही.
  • तसेच पारंपरिक बैल जोडा पद्धतीने मशागत  करण्याची गरज नाहीये.
  • स्वतःचा ट्रॅक्टर आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापर वाढल्याने परिणामी त्यांचे शारीरिक कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.
  • शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे जशी की ट्रॅक्टर ट्रॅक्टर मुळे होणारे मशागती आणि त्याच्यामुळे वाचणारा वेळ पैसा या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्याचे उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
  • ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरची अवजारे वापरून शेतीतील भरपूर कामेही सोप्या पद्धतीने केली जाणार आहेत जसे की नांगरणी करणे पेरणी करणे उसाची बांधणी करणे इत्यादी कामे.
  • शेतकऱ्यांचा झोप जास्त वेळ बैल जोडा पद्धतीने मशागत करण्यावरती जातो तो वेळ वाचून तो दुसऱ्या कामांमध्ये लावता येईल परिणामी शेतकऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
  • सामान्य शेतकऱ्यांकडे देखील स्वतःच्या मालकीचे ट्रॅक्टर आल्याने ते स्वावलंबी बनतील आणि परिणामी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होईल.

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत कोण कोणते ट्रॅक्टर तुम्ही घेऊ शकता ?

  • जे ट्रॅक्टर 12 ते 20 HP पर्यंतची ताकद असणारे दिसायला लहान. जे प्रामुख्याने फळांची शेती करणारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत असे ट्रॅक्टर ज्यांना मिनी ट्रॅक्टर म्हणून ओळखले जाते असे ट्रॅक्टर तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकता.
  • जे ट्रॅक्टर 20 ते 50 HP चे आहेत अशा ट्रॅक्टरला पावर ट्रॅक्टर म्हटले जाते आणि हे ट्रॅक्टर प्रामुख्याने शेतातील मोठमोठी असणारी मशागतीची कामे करण्यासाठी वापरले जातात असे पावर ट्रॅक्टर देखील तुम्ही या योजनेअंतर्गत घेऊ शकता.

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेत अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ किंवा अनुदान –

  • सरकारकडून विविध प्रकारच्या ट्रॅक्टर साठी विविध प्रकारचे अनुदान दिले जाते आणि त्याचे वर्गीकरण हे ट्रॅक्टरच्या ताकतीनुसार म्हणजेच HP च्या क्षमतेनुसार केलेली आहे.
  • 40 ते 70 HP – या कॅटेगरीमध्ये येणारे ट्रॅक्टरला १ लाख 25 हजार इतकी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
  • 20 ते 40 HP – एक लाख रुपयांचे अनुदान हे 20 ते 40 एचपी कॅटेगिरी मधील ट्रॅक्टर घेतल्यानंतर देण्यात येते.
  • 8 ते 20 HP – आठ ते वीस एचपी कॅटेगिरी मधील ट्रॅक्टर साठी सरकारकडून 75000 रुपये किंवा 40% इतकी अनुदान देण्यात येते.

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता –

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेल्या शेतकरीच फक्त या योजनेसाठी पात्र आहे.
  • अर्ज करीत असलेला शेतकऱ्याच्या नावावरती लागवड युक्त जमीन असणे गरजेचे आहे.
  • जर अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याकडे पहिलाच ट्रॅक्टर असेल किंवा त्याच्या सातबारे वरती तसे ट्रॅक्टरची नोंद असेल किंवा त्याच्या जवळच्या कुटुंबीयांकडे जर ट्रॅक्टर असेल तर असा शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • छोटे शेतकरी ज्यांची जमीन थोडीच आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते.

TRACTOR ANUDAN YOJANA | ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –

  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराच्या बँक चा तपशील /  पासबुक
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • मोबाईल नंबर
  • जमिनीचा 7-/12 उतारा  आणि 8 अ

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाणे बंधनकारक आहे.
  • नेट वरती गेल्यावरती लॉगिन करायचे आहे, लॉगिन केल्यावरती वेबसाईटचा होम पेज चा नवीन अर्जदार नोंदणी असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करायचे.
  • त्यात विचारलेली सर्व माहिती भरून नवीन अर्जदाराची नोंदणी करून घ्यायची.
  • आता पुन्हा नव्याने तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर होम पेजवरील कृषी विभागीय पर्याय मधील ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आहे.
  • आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करायची आहे ती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर अर्जाच्या सबमिट बटणावर क्लिक करायची, रीतीने तुमचा अर्ज भरायची प्रक्रिया पूर्ण होईल.

ट्रॅक्टर अनुदान योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ट्रॅक्टर अनुदान योजना नेमकी काय आहे ?

महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी आर्थिक अनुदान देणारी ही एक महत्त्वाची योजना आहे

अनुदान योजनेअंतर्गत किती रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते ?

एक लाख 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक अनुदान ट्रॅक्टर घेण्यासाठी दिली जाते.

ट्रॅक्टर अनुदान योजना ही कोणामार्फत सुरू करण्यात आली आहे ?

ट्रॅक्टर अनुदान योजना ही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यामानाने आणि सुरू करण्यात आले आहे.

ट्रॅक्टर अनुदान योजना ही कोणत्या विभागामार्फत राबवली जाते ?

ट्रॅक्टर अनुदान योजना ही महाराष्ट्र राज्यात शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जाते.