RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA | राजीव गांधी अपघात विमा योजना

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA | आपण या अगोदर गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना बघितलेली आहे ती योजना जी आहे ती प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अपघातासाठी काढलेली आहे त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विविध काम करताना होणारे जे अपघात आहेत ते अपघातापासून नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारची एक योजना आहे तिचं नाव आहे राजीव गांधी अपघात विमा योजना ही योजना शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काढण्यात आली आहे. आज आपण त्या योजनेबद्दल बघणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी जे प्रामुख्याने इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शिकत आहेत असे विद्यार्थी शाळेत खेळत असताना प्रवासामध्ये शाळांमधील विविध प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर खेळताना किंवा इतर कोणत्याही कारण असतो धडपड करत असतात. अशा परिस्थितीमध्ये काही दुर्दैवी अपघात जर झाला आणि तो विद्यार्थी जर जखमी झाला किंवा त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्या विद्यार्थ्यांना भरपाई म्हणून सरकारने विद्यार्थी अपघात विमा योजना चालू केलेली आहे.

ही योजना आहे ही स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव राजीव गांधी अपघात विमा योजना असे आहेत.

योजनेंतर्गत काय केले जाते तर या योजनेअंतर्गत जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांचा अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये त्यांची जखम झालेली आहे किंवा मृत्यू झालेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते जेणेकरून त्या अपघातामधून उपचार करण्यासाठी येणारा खर्च भागाव किंवा त्याला थोडाफार हातभार लागावा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

तर आपण RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA या योजनेबद्दल आता सविस्तर मध्ये बघूया आजच्या ब्लॉगमध्ये.


योजनेचे नावराजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना | RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA
कोणत्या विभागामार्फत सुरू करण्यात आलेशालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत योजना सुरू करण्यात आले
योजनेची सुरुवात कधी झाली20 ऑगस्ट 2003
योजनेचा मुख्य उद्देशशालेय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विम्याचे कवच देणे.
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रताइयत्ता पहिली ते इयत्ता बारावी मध्ये शिकणारे विद्यार्थी
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ1.5 लाख रुपये पर्यंत च्या आर्थिक सहाय्य
अर्ज कसा करायचाऑफलाइन

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA

Table of Contents

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA चा उद्देश –

  • इयत्ता पहिली इयत्ता बारावी मध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांचा काही कारणास्तव देवाने जर अपघात झाला तर त्या अपघातामधून जखमी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत देणे.
  • शालेय लेवलला विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी भाग घेत असतात परंतु दुर्दैवाने कधीच अपघात झाला तर अशा विद्यार्थ्यांना विम्यातून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यानंतर उपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कोणावरती अवलंबून राहावा लागू नये हायो योजनेचे मुख्य उद्देश आहे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या अपघाताचे खर्च स्वतः भागवण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे.
  • शालेय लेवलच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA ची वैशिष्ट्ये –

  • योजना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आले आहे.
  • सानुग्रह अनुदान योजना म्हणजेच राजीव गांधी अपघात विमा योजना होय.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विम्याच्या कवचनुसार जी काय आर्थिक रक्कम भरपाई म्हणून मिळते ती रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत दिली जाते.
  • योजना सर्व धर्म सर्व जातीतील विद्यार्थी यांच्यासाठी आहे.
  • योजना इयत्ता पहिली इयत्ता बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी जे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आशा ठेवतात अशा विद्यार्थ्यांना हा एक खूप मोठा आर्थिक पाठबळ देणारी योजना आहे.

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA चे लाभार्थी

  • योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात शिकत असणारे इयत्ता पहिली इयत्ता दहावी पर्यंत सर्व शालेय विद्यार्थी.

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA अंतर्गत लाभार्थ्याची पात्रता नियम आणि अटी-

  • अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे तसे त्यांनी रहिवासी दाखला जोडावा.
  • महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • योजना फक्त आणि फक्त पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू होते जे विद्यार्थी पहिली वर्गाच्या खालच्या वर्गात शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना ही योजना लागू होत नाही तसेच जे विद्यार्थी बारावी पास होऊन गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील ही योजना लागू होत नाही.
  • ही योजना मुलगा विद्यार्थी आणि मुलगी विद्यार्थी अशा दोघांसाठी देखील आहे.
  • जर काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडले तर तो या योजनेसाठी तिथून पुढे पात्र ठरणार नाही.
  • या योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी इथून मागे किंवा सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांच्या कोणत्याही सानुग्रह योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA चा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • विद्यार्थ्यांचे रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • बँक अकाउंट चे पासबुक
  • डॉक्टरांचे प्रमाणपत्र
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर

RAJIV GANDHI APGHAT VIMA YOJANA अंतर्गत मिळणारा लाभ –

  • इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना 1.5 लाख रुपयांचे नुकसान भरपाई देणारे विमा कवच या योजनेअंतर्गत दिले जाते. जर या शालेय विद्यार्थ्यांचा काही कारणास्तव अपघात झाला तो जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर ह्या विम्याच्या कवचाची रक्कम विद्यार्थ्याच्या कुटुंबाला दिली जाते.

राजीव गांधी अपघात विमा योजनेची विद्यार्थ्यांना फायदा –

  • योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एक भक्कम असे सुरक्षा कवच मिळणार आहे विम्याच्या रूपात.
  • 1.5 लाख रुपयांच्या आर्थिक विम्या कवचामुळे विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे कुटुंब हे विद्यार्थ्यांच्या जखमी झालेल्या अवस्थेतील उपचारासाठी आत्मनिर्भर बनेल.
  • या योजनेअंतर्गत अपघाता मार्फत होणारी विद्यार्थ्यांची हानी आणि त्यानंतर उपचारासाठी येणारा खर्च या गोष्टींवरती मार्ग म्हणून सरकारने विमा कवच दिला आहे यामुळे जे विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
  • या विमा योजनेमुळे जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडा क्षेत्राकडे तसेच शिक्षण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

राजीव गांधी अपघात विमा योजनेचा खालील कारणांमुळे आर्थिक लाभ मिळणार नाही –

  • जर विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर विमा योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळणार नाही.
  • तर विद्यार्थ्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक जखम करून घेतली किंवा आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात जखम झाली तर विमा योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारची आर्थिक नुकसान भरपाई दिली जात नाही.
  • जर विद्यार्थ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याला विमा योजनेचा लाभ घेता येत नाही.
  • जर विद्यार्थी अमली पदार्थाच्या नशेत असेल आणि अशा नशेत असताना जर काही अपघात झाला तर या योजनेअंतर्गत लाभ दिला जात नाही.
  • गुन्हा करण्याचे हेतूने जर कायद्याचे उल्लंघन करून जर अपघात झाला तर या योजनेअंतर्गत लाभ मिळत नाही.

विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ कसा मिळेल ?

  • विद्यार्थ्यांचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये विम्याच्या भरपाईची रक्कम ही त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते.
  • विमा भरपाईची रक्कम प्राधान्य क्रमाने प्रथमता विद्यार्थ्यांच्या आईला दिली जाते, विद्यार्थ्यांची आई हयात नसेल तर ती रक्कम विद्यार्थ्याच्या वडिलांना दिली जाते.
  • जर विद्यार्थ्याच्या आई आणि वडील दोन्ही हयात नसतील तर ती रक्कम 18 वर्षावरील भाऊ किंवा अविवाहित बहीण किंवा त्या विद्यार्थ्यांचे जो कोणी पालक असतील त्यांनाही रक्कम दिली जाते.

राजीव गांधी अपघात विमा योजने च्या विम्याचा दावा करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –

जर विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर –

  • या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला एक पॉईंट पाच लाख रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते.
  • दावा प्रस्तावासोबत पंचनामा
  • इंक्वेस्त पंचनामा
  • मृत्यूचा दाखला
  • सिव्हिल सर्जन यांनी केलेला शवविच्छेदन अहवाल

अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास ( त्यामध्ये दोन अवयव किंवा दोन डोळे किंवा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला तर )

  • एक लाख रुपये पर्यंतचे आर्थिक नुकसान भरपाई मिळेल.
  • त्यासाठी अपंगात्वा चे डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

जर अपघातामध्ये कायमचे अपंगत्वही एका अवयव किंवा एक डोळा यासाठी आले तर –

  • रुपये 75000 इतक्या आर्थिक नुकसान भरपाई मिळेल.
  • यासाठी देखील अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

जर अपघातामुळे विद्यार्थ्याला शस्त्रक्रिया करायला लागली तर –

  • त्या शस्त्रक्रियेमध्ये होणारा हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये इतकी आर्थिक भरपाई मिळेल.
  • शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

शालेय विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने किंवा पोहताना किंवा आजारी पडून मृत्यू झाल्यास –

  • अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याच्या कुटुंब मृत्यू प्रमाणपत्र आणि पोस्टमार्टम अहवाल देणे गरजेचे आहे.

जर विद्यार्थी कोणत्याही कारणांमुळे जखमी झाला जसे की क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना शाळेतील आगीमध्ये विजेचा धक्का लागून –

  • अशा परिस्थितीमध्ये जो काही हॉस्पिटलचा खर्च येईल तो किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मिळेल.
  • यासाठी उपचाराचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जन कडून घेऊन ते विमा दावा सोबत जोडणे गरजेचे आहे.

राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • जर विद्यार्थ्यास अपघात झाला त्यामध्ये तो जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या योजनेचा दावा सादर करण्याचा अर्ज शाळेमधून घ्यायचा आहे.
  • त्या अर्जासोबत विचारलेली सर्व माहिती चुकली त्या भरून लागणारी सर्व कागदपत्रे यांचा सोबत जोडून तो अर्ज संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करावा.

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

  • आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळेत या योजनेबद्दल चौकशी करायची.
  • व या योजनेला अर्ज करण्यासाठी सदरचा अर्ज शाळेमधून घेऊन तो भरून आणि आवश्यकते कागदपत्रे त्याच्यासोबत जोडून भरून द्यावा.

राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत खालील कारणामुळे अर्ज रद्द होऊ शकतो –

  • जर अर्ज करीत असलेल्या विद्यार्थी हम महाराष्ट्राचा मोर रहिवासी नसेल तर.
  • विद्यार्थी जर बारावीच्या पुढे शिक्षण घेत असेल आणि त्याने जर अर्ज केला तर तो या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
  • जर विद्यार्थ्यांनी या अगोदर कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या सानुग्रह योजनेचा लाभ घेतला असेल किंवा सध्या घेत असेल तर तो या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.