SOLAR PUMP YOJANA | कुसुम सोलर पंप योजना  

SOLAR PUMP YOJANA | भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि सध्या विकासाच्या मार्गावरती आहे. या विकासाच्या मार्गामध्ये भरपूर अडचणी ह्या देशाला सध्याच्या काळामध्ये बघाव्या लागत आहेत. त्यामध्ये अपुरे संसाधन ही एक मोठी अडचण आहे. अपुरी संसाधन म्हणा किंवा जी काही संसाधन सध्या आहेत  त्यांचा वापर करून संपूर्ण लोकसंख्येचे गरजा भागवणे खूप जीखीरीचे काम आहे. शेती व्यवसायासाठी विजेची गरज असते, जर शेतीला व्यवस्थितरित्या पाणीपुरवठा करायचा असेल तर शेतीला विजेची गरज असते परंतु महाराष्ट्रात चालू असलेल्या लोड शेडिंग मुळे शेतकऱ्यांना वीज पुरत नाही विजेचा तुटवडा जाणवतो. बीज नसल्याकारणाने शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रामुख्याने लागणारी गोष्ट म्हणजे सिंचन ते देताना त्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. यावरती उपाय म्हणून एक तर तुम्हाला डिझेल पंप वापरावा लागतो किंवा सोलार पंप वापरावा लागतो.

डिझेल पंपाच्या किमती खूप महाग आहेत त्या शेतकऱ्याला परवडे बल नाहीत आणि सतत रित्या तुम्हाला त्या डिझेल वरती खर्च करावा लागतो. डिझेल पंप घेण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते त्यासाठी महाराष्ट्र शासनाची डिझेल पंप पाव अनुदान योजना ही एक योजना चांगल्या रीतीने काम करत आहे. त्या योजनेअंतर्गत डिझेल पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येते. त्याची माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.

आणि सौर पंपा बद्दल जर बोलायचं झालं तर अजून शेतकऱ्यांच्या मध्ये याच्याबाबत जनजागृती नाहीये आणि हिवाळ्याचे दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात ढगाळ वातावरणामुळे सौर पंपाच्या कार्यक्षमतेवरती मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो.

परंतु सौर पंप जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापरावे यासाठी सरकार आग्रही आहे म्हणूनच सरकार शेतकऱ्यांना सौर पंप खरेदीसाठी 95% रकमेचे अनुदान देण्यात येते.

सौर पंप योजना किंवा कुसुम सोलार पंप योजना अशी एक योजना सरकारने काढलेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर पंप घेण्यासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येते तर अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना 95 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते.

तर कुसुम SOLAR PUMP YOJANA ही नेमकी काय आहे ती कशी कार्य करते तिच्या पात्रतेच्या अटी काय आहेत त्याचा अर्ज कसा भरायचा आणि अनुदान कसे कधी मिळणार या बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी आजचा ब्लॉग पूर्णपणे नीट वाचा.


योजनेचे नावकुसुम सोलार पंप योजना | SOLAR PUMP YOJANA
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सोलार पंप घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी 95% पर्यंत अनुदान देणे.
लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्रातील शेतकरी कुटुंब
योजनेतून मिळणाऱ्या लाभसोलर पंप घेण्यासाठी 95 टक्के अनुदान
अर्ज कसा करायचाऑनलाइन

SOLAR PUMP YOJANA

SOLAR PUMP YOJANA चे उद्दिष्टे –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सोलार पंप घेण्यासाठी 95 टक्के अनुदान देणे.
  • शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी सौर ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी विजेवर ते अवलंबून न राहता सौरऊर्जेच्या मार्फत त्यांना सिंचनाच्या पर्यायाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे.
  • विज नसल्याकारणाने सिंचन नसणे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या समोर आहे तर तो प्रॉब्लेम सोडवून शेतीच्या पिकांचे होणारे नुकसान टाळणे हा एका योजनेचा मोठा उद्देश आहे.

SOLAR PUMP YOJANA चे वैशिष्ट्ये –

  • सोलर पंप योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ही डीबीटी मार्फत थेट बँक खात्यामध्ये पोहोच केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकारात कोणताही गैर व्यवहार होण्याचे चान्सेस नाहीत.
  • ही योजना जो अर्जदार प्रथम अर्ज करेल अशा अर्जदारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल या तत्त्वावरती राबवली जाणार आहे.
  • सोलार पंप योजनेच्या उद्दिष्ट असा आहे की पाच वर्षांमध्ये पाच लाख सोलार पंप वितरण शेतकऱ्यांना झालं पाहिजे.
  • या योजनेचे अनुदानाची रक्कम ही 30 टक्के केंद्र शासनामार्फत व उर्वरित 60 ते 65% ही राज्य शासनामार्फत भरली जाणार आहे.
  • आणि पाच ते दहा टक्के रक्कम ही शेतकऱ्यांमार्फत स्वतःच्या खर्चाने भरली जाणार आहे.
  • अडीच एकरापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी चा सोलर पंप मिळेल अडीच ते पाच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी चा सोलर पंप मिळेल.
  • ज्या शेतकऱ्यांना पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांना साडेसात एचपी चा पंप सोलर पंप मिळेल.

SOLAR PUMP YOJANA चे लाभार्थी ची पात्रता-

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेताला विहीर बोरवेल किंवा शेजारून वाहणारी नदी असा काही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे असेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यांमध्ये अर्ज केलेला आहे परंतु त्यांचा अर्ज मंजूर झाला नाही अशी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले नाहीत असे शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज विद्युत कनेक्शन नाही अशा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • आतापर्यंत कोणत्याही शासनाच्या कृषी पंपाच्या योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी.
  • काही शेतकऱ्यांना वीज विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते आणि जर अशा काही शेतकऱ्यांचे वीज विद्युत कनेक्शन मिळालेले नसेल वरील कारणामुळे तशी शेतकरी देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • महावितरण कडे नवीन कनेक्शन साठी पैसे भरलेले आहेत परंतु अद्याप ते कनेक्शन मिळालेले नाही अशी शेतकरी.

SOLAR PUMP YOJANA चा फायदा-

  • सोलर पंप घेण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत आहे अगदी 90 ते 95 टक्के पर्यंत, त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःच्या पदरचे फक्त पाच ते दहा टक्के रक्कम एवढीच टाकायची आहे.
  • सोलार पंप मिळाल्यामुळे विजेवरती अवलंबून न राहता देखील पिकाला पाणी देणे सोपे होणार आहे.
  • सोलर पंपाचे वापरामुळे विज बिलाचा खर्च वाचणार आहे.
  • सरकारच्या दृष्टीने विचार केला तर सोलार पंपाचा जास्तीत जास्त वापर वाढल्यानंतर वीज वितरणावरचा भार कमी होणार आहे.
  • सौर पंप योजनेसोबत पंपसंच यासोबत सौर पॅनल येतो त्याचे दोन फायदे आहेत एक तर तुमचा सिंचनासाठीचा पंप चालेल आणि दुसरं म्हणजे सोबतच वीज निर्मिती देखील होईल.
  • संपूर्ण दिवसभर वीज अखंडित रित्या सुरू राहील रात्री अपरात्री शेतांना पाणी द्यायची गरज भासणार नाही.
  • डिझेल पंप संचालक देखील डिझेलचा खर्च आहे परंतु सौर पंपाला तोही खर्च नाही त्यामुळे त्या तुलनेत सौर पंप जास्त फायदेशीर आहे.
  • सौर पंप चालवल्यामुळे पर्यावरणा ला हानी पोहोचणार नाही हा एक पर्यावरण पूरक पंप आहे.

सोलार पंपाची मुळची किंमत –

  • 3 HP- 1.56 लाख
  • 5 HP- 2.22 लाख
  • 7 HP-3.43 लाख

सोलर पंप योजनेच्या अटी आणि शर्ती –

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • इतर राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज करत असलेल्या शेतकऱ्यांनी जर यापूर्वी कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या पंपसंचाच्या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेअंतर्गत फक्त तीन एचपी पाच एचपी व 7.5 एचपी या तीन क्षमतेच्या सौर पंपसंच मिळणार आहेत.
  • या योजनेचा नियमानुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर पंपसंच्या क्षमतेच्या दहा टक्के रक्कम स्वतःहून भरणे अनिवार्य आहे.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सौर पंपसंच योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे.
  • अर्जदाराची निवड झाल्यानंतर सात दिवसाच्या आत सौर पंप संचासाठीची रक्कम जमा होणे बंधनकारक आहे अन्यथा अर्ज रद्द केला जाईल.
  • ज्या गावात ज्या वस्तीत अजून पर्यंत वीज पोहोचलेली नाही किंवा वीज जोडणी झालेली नाही अशा गावातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागतो.
  • जर अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीमध्ये सहमालक असेल तर त्या व्यक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
  • जर शेतकऱ्याच्या शेतात विहीर आहे किंवा बोरवेल आहे तर त्याची नोंद सातबाऱ्यावरती असणे बंधनकारक आहे.
  • एकदा सौर पंपाचे वितरण झाल्यानंतर तिथून फाडून त्याची देखभाल त्याची सुरक्षा त्याचा मेंटेनन्स याच सर्वांची जबाबदारी सर्वस्वी त्या लाभार्थी शेतकऱ्यांची राहील नंतरच्या कोणत्याही गोष्टीला सरकार जबाबदार राहणार नाही.
  • वॉरंटी नंतर जर सोलार पंप मध्ये काही बिघाड झाला तर त्यानंतर त्याचा दुरुस्तीचा खर्च हा शेतकऱ्याला स्वतःला करावा लागणार आहे.
  • जर महाराष्ट्र शासनाच्या असे लक्षात आले की काही शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही पंपसंच योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु तो पंपसंच काढून ठेवून नंतर सौर ऊर्जा पंपसंच योजनेसाठी अर्ज केला आहे तर अशा फसवीगिरीमुळे ते शेतकऱ्याच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केली जाईल.
  • एकदा का शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंप संच मिळाला त्यानंतर त्याने तो पाच वर्षे वापरणे बंधनकारक आहे.
  • जर शेतकऱ्याला शेतामध्ये जोडणी केलेल्या सौरकुष पंपाची जागा बदलवायची असेल तर त्याला महाऊर्जा यांच्याकडून लेखी परवानगी ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील.
  • अर्जदार शेतकऱ्याला सौर ऊर्जा पंपाचे हस्तांतरण विक्री किंवा तांत्रिक बदल करता येणार नाहीत.
  • जर सौर ऊर्जा पंप चोरीला गेला किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे त्याची नुकसानी झाली तर पंधरा दिवसाच्या आत आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये त्या गोष्टीची तक्रार करून तो अहवाल महाऊर्जा कार्यालय मध्ये जमा करावा लागतो. जर तसे केले नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही.
  • जर सौर ऊर्जा पंपाच्या स्थापित रचनेमध्ये काही बदल केले आणि त्यानंतर जर काही अडचण आली किंवा सौर पंपामध्ये काही बिघाड झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी शेतकऱ्यांची राहील.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याकडे शास्वत जलस्रोत असणे बंधनकारक आहे.
  • 60 m पेक्षा जास्त खोल असणारे विहिरींमध्ये किंवा कुठून आली कांमध्ये सौर पंप दिला जाणार नाही.

सोलार पंप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र –

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्यांचे रेशन कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्याचा रहिवासी दाखला
  • शेतकऱ्याचे विजेचे बिल
  • शेत जमीन चा सातबारा व आठ अ
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • कॅन्सल चेक
  • बँक खात्याचा तपशील म्हणजेच पासबुक

सोलार पंप योजनेचा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे-

  • अर्ज करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्याला प्रथम अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
  • लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती अर्ज करा असे बटन दिसेल.
  • अर्ज उघडून त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकरीत्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.