SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA | सोलर रूफ टॉप सबसिडी योजना

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA | आपण जर आज बघितलं तर विजेचा वापर वाढत चालला आहे आणि त्याच सोबत त्या विजेची किंमत देखील वाढत चालली आहे. घरगुती वापरासाठी भरपूर प्रमाणात विच लागत आहे टीव्ही झालं फ्रीज एसी फॅन लाईट इत्यादी सर्व गोष्टींचा वापर वाढला आहे त्यामुळे परिणाम विजेचा वापर वाढलेला आहे.

आता माणूस वीज वापरण्यामध्ये काटकसर तर करू शकत नाही कारण भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत ज्या विजय चालतात त्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये त्या आवश्यक अशा आहेत.

यावरती पर्याय काय तर सोलार एनर्जीचा वापर वाढवणे. घरावरती सोलर सिस्टिम बसवून त्याचा वापर आपल्या घरगुती विजेसाठी करणे हा एक चांगला पर्याय आहे यातून विजेची बचत होणार आहे पैशाची बचत होणार आहे आणि जी काय एक्स्ट्रा उत्पादित होणारी वीज आहे ती महावितरण ला आपल्या मार्फत विकली जाणार आहे त्यामुळे त्यातून एक इन्कम चा सोर्स तयार होत आहे.

पण जनजागृतीचा अभाव आणि सोलर सिस्टीमची किंमत यामुळे भरपूर नागरिक इच्छा असून देखील त्या मार्गाला जात नाही. यावरती एक चांगला उपाय म्हणून सरकारने सोलर रूफ टॉप सबसिडी योजना योजना सुरू केली आहे.

तर SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA योजना नेमकी काय आहे यामध्ये कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे त्याची प्रोसेस काय आहे अर्ज कसा करायचा कोण कोण या योजनेसाठी पात्र आहे इत्यादी सर्व बाबी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया आजचा ब्लॉगला….


योजनेचे नावसोलर रूप टॉप सबसिडी योजना |SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA
योजनेचा उद्देशजास्तीत जास्त नागरिकांना सोलर बसविण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी अनुदान पुरवणे.
लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक
योजनेतून मिळणारा लाभसोलर पॅनल खरेदीसाठी अनुदान
अर्ज कसा करायचाऑनलाइन

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA

Table of Contents

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी स्वतःच्या घरावरती कार्यालयावरती कारखान्यावरती विविध प्रकारचे इमारतींच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी पुढे यावे.
  • महाराष्ट्र राज्याचे नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • सौर ऊर्जेबद्दल जनजागृती निर्माण करणे.
  • सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनल खरेदी करावे लागतील आणि त्या सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी लोकांना आर्थिक अनुदान पुरवणे.
  • आजच्या काळात देखील विजेचे लोड शेडिंग काही भागांमध्ये बघायला मिळते तर विजेचा लोड शेडिंग चा त्रास कमी व्हावा पूर्ण कमी व्हावा त्यासाठी सोलर पॅनल योजना राबवले आहे.
  • महावितरण व इतर वीज वितरण कंपन्यांवरील किंवा सरकार वरील वाढत असलेला वीज वितरणाचा भार कमी करणे.

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA सोलर रूफटॉप सबसिडी योजनेचे वैशिष्ट्ये –

  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना अगदी कमी खर्चामध्ये विज उपलब्ध होईल.
  • योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे याच्यामध्ये कोणत्याही जाती धर्माची निकष लावण्यात आलेले नाही.

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA | सोलर रूफटॉप सबसिडी योजने अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा निवडीचे निकष पुढीलप्रमाणे –

एक किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी दहा वर्ग मीटर जागेची गरज असते.


SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA चा फायदा

  • योजने मुळे घरगुती वीज बिल मध्ये बचत होणार आहे.
  • ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
  • गॅस अंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत नागरिक आपल्या घरावरती कार्यालयावरती किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इमारतीच्या छतावरती सोलर पॅनल बसू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेंतर्गत एकदा का सोलर पॅनल बसवला तर त्या सोलर पॅनल 25 वर्षांची गॅरंटी असते त्यामुळे हा एकदाचा खर्च आहे वारंवार याला कोणत्याही प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही.
  • जर स्वतःच्या कुटुंबाला वापरून जास्तीची वीज तयार झाली शिल्लक राहिली तर ती वीज आपल्याला महावितरण ला विकता येत आहे आणि त्याचे आपल्याला पैसे देखील मिळतात त्यामुळे एक अर्थाने आपल्याला तो एक इन्कम चा नवीन सोर्स चालू होतो.
  • या योजनेअंतर्गत एकदा का जर लाभ घेतला तर एखाद्या कुटुंबाच्या लाभार्थी कुटुंबाच्या घराला लोड शेडिंगचा कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.
  • या सोलर पॅनल एकदाच खर्च करायचा आहे त्याची जी काही किंमत आहे ती किंमत पहिल्या चार ते पाच वर्षात फेटून जाते त्यानंतर तिथून पुढचे वीस वर्ष वीज वापरकर्त्याला मोफत वीज वापरावास मिळते.
  • सोलर रूप टॉप सबसिडी योजना अंतर्गत व्यवस्थित व्यवस्थापन केलेस तर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे वीज बिल येत नाही त्यांना ते भरण्याची गरज नाही.
  • सोलर पॅनल द्वारे पर्यावरणास हानीन पोहोचवता वीजनिर्मिती होत असतो.

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA चे लाभार्थी

  • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि याचा लाभ घेऊ शकतो.

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA अंतर्गत दिले जाणारे अनुदान –

  • जर 3 KW क्षमतेचे सोलर पॅनल विकत घ्यायचे असतील तर त्यासाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान देण्यात येते
  • 3 KW पेक्षा जास्त क्षमतेच्या सोलर पॅनलच्या खरेदीसाठी सरकारकडून 20 टक्के अनुदान मिळते.
  • 500 KW क्षमतेचे सामूहिक वापरासाठी घेतलेले सोलर पॅनल त्याच्यावरती सरकारकडून 20% अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी 10 KW चा क्षमतेच्या उपकरणावरती 20% अनुदान मिळते.

SOLAR ROOFTOP SUBSIDY YOJANA अंतर्गत सोलर पॅनल ची किंमत –

  • 1 किलो वॅट- 46820 रुपये
  • 1 ते 2 किलोवॅट-42470 रुपये
  • 2 ते 3 किलोवॅट- 41380 रूपये
  • 3 ते 10 किलोवॅट – 40290 रुपये
  • 10 ते 100 किलोवॅट 37,020 रुपये

सोलर रूप टॉप सबसिडी योजना साठी चे नियम व अटी-

  • या योजनेअंतर्गत अशा गावांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल ज्या गावांना आजपर्यंत विजेची जोडणी झाली नाही कारण ती दूर पण भागांमध्ये आहेत.
  • या योजनेअंतर्गत अर्जदाराला शंभर टक्के अनुदान मिळत नाही त्यामुळे त्याला उर्वरित रक्कम ही स्वतःच्या पदर न भरणे गरजेचे आहे थोडेफार अनुदानही सरकार मार्फत देण्यात येते.
  • योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले नागरिकांनाच आहे, महाराष्ट्र बाहेरी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या जागेवरती सोलर पॅनल लावायचा आहे ती जागा त्या अर्जदाराच्या स्वतःच्या मालिकेचे असणे आवश्यक आहे.
  • एक व्यक्ती एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे नॅशनल बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचा बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासन यांचा कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
  • एका कुटुंबामध्ये एकदा या योजनेचा लाभ घेता येतो.

सोलर रूप टॉप सबसिडी योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र –

  • अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचे रेशन कार्ड अर्जदाराचे पॅन कार्ड अर्जदाराचा रहिवासी दाखला जमिनीचा सातबारा बँक खात्याचा पासबुक उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर विजेचे बिल सोलर पॅनल साठी निवडलेल्या जागेचा माहिती उत्पन्नाचे प्रमाणपत्र

सोलर रूप टॉप सबसिडी योजना साठी अर्ज कसा करायचा –

  • सर्वात प्रथम अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नवीन युजरचे रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरून मोबाईल नंबर ओटीपी ईमेल आयडी सगळं व्यवस्थित तरी त्या टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • पुन्हा एकदा लॉगिन करून तुम्हाला एक समोर पेज दिसत त्याच्यावरती रूफ-टॉप सोलार या बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन फेसबुक ओपन होईल आता त्यावरती महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • नंतरच्या पेज वरती या योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे. आणि संबंध बटनावरती क्लिक करायचे.
  • अशा रीतीने तुमचा अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

सोलर रूप टॉप सबसिडी योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सोलर रूप टॉप सबसिडी योजना चा उद्देश काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावरती सोलर बसविण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना त्याच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान पुरवणे.

सोलर रूप टॉप सबसिडी योजना च्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ?

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो यामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या आधारावर ती निकष लावण्यात आलेले नाहीत.

सोलर रूप टॉप सबसिडी योजना अंतर्गत किती टक्के पर्यंत अनुदान मिळते ?

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 40 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येते. अनुदान हे 20 टक्के पासून 40% अशा वर्गवारीत विभागले गेलेले आहे.


तर अशा रीतीने वरती दिल्याप्रमाणे घरावरती सोलर पॅनल बसवण्याची प्रक्रिया आहे त्यासाठी सरकार अनुदान देखील देत आहे. तर मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सर्व नागरिकांना हेच आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि एक पर्यावरण पूरक विकास यादृष्टीने वाटचाल करावी. जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या पेज वरती कमेंट करून विचारू शकता.