MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA | भारतासारख्या कृषीप्रधान देशांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. परंतु भारतातील सर्वच भौगोलिक प्रदेशांमध्ये शेतीसाठी पूरक वातावरण आहे असंच नाही. काही भागांमध्ये शेतीसाठी पूरक पाऊस पडतो तर काही भागांमध्ये खूप कमी पाऊस पडतो आणि काही भागांमध्ये तर इतका पाऊस होतो की आलेली पिकं देखील नासधूस होऊन जातात.
एकतर आपला बळीराजा कर्ज काढून शेती करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर शेतीची नुकसानी झाली किंवा शेतमालाला जर योग्यरीत्या भावनाही मिळाला तर याची फळ देखील शेतकऱ्यालाच भोगावे लागतात. परंतु कर्ज देणाऱ्या कंपन्या किंवा शेतकरी संस्था त्यांचे कर्ज वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावत असतात.
अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमके करायचे काय कारण त्याचा हा व्यवसाय हा पूर्णपणे निसर्गावर ते अवलंबून आहे. आणि आपलं महाराष्ट्र शासन झाले किंवा इंडियन गव्हर्मेंट झालं तर त्या एक वेल्फेअर स्टेट या मॉडेलच्या खाली कार्य करतात. त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षाही शेतकऱ्यांना राहते.
अशा जर काही नैसर्गिक आपत्ती सारख्या गोष्टी किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला भावना मिळणे यासारख्या गोष्टींमुळे जर शेतकऱ्यांची कर्ज थकत गेली आणि कर्ज वसुली करणारे कंपन्यांकडून जर कायम तगादा लागत राहिला तर शेतकरी आत्महत्या करण्याचा पर्याय निवडतात किंवा शेती करणे सोडून देतात. त्यावरती उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना या योजनेची सुरुवात केली.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाते आणि नवीन कर्ज घेण्यास आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
तर MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA नेहमी काय आहे तिची पात्रतेची निकष का आहेत त्याचा अर्ज कसा करायचा त्याचा लाभ कसा मिळणार आहे त्याच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला तर मग आपण आज चा ब्लॉकला सुरुवात करूया…
योजनेचे नाव | महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य कृषी विभाग |
योजनेचा उद्देश काय आहे | शेतकऱ्यांची थकीत कर्जबाफी माफ करणे त्यांना आर्थिक पाठबळ देणे आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे |
योजनेचे लाभार्थी कोण आहेत | महाराष्ट्र राज्यातील गरजू शेतकरी |
योजनेचा लाभ | शेतकऱ्यांचे आर्थिक कर्ज माफी |
अर्ज कसा करायचा | अर्ज करण्याची गरज नाही |
MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा उद्देश-
- महाराष्ट्र राज्यातील थकीत कर्जदार असलेले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करणे.
- शेतकऱ्यांना कर्जातून सुटका करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे.
- शेतकऱ्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर करून त्यांना सामर्थ्य पुरवणे आणि शेतीला प्रोत्साहन देणे.
- शेतमालाचे नुकसान झाल्यानंतर घेतलेले कर्ज कसे परत भेटायचं या गोष्टीची चिंता शेतकऱ्यांनी करण्याची गरज नाही कारण त्याचे परत फेड हे सरकार करणार आहे.
MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी –
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी लाभ घेऊ शकतो.
MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मिळणारा लाभ –
- जे शेतकरी थकीत कर्जदार आहेत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या योजनेअंतर्गत केली जाते.
- जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत असतात त्या शेतकऱ्यांना एक प्रोत्साहन पर आर्थिक लाभ दिला जातो.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक पाठबळ तर मिळणारच आहे परंतु त्यांच्या मागे एक खंबीरपणे कोण ना कोणतरी साथ द्यायला उभा आहे की भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि सरकार बद्दल त्यांची पॉझिटिव्ह भावना तयार होईल.
- महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठा शेतकऱ्यांच्या बाबतीत असणारा प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या, परंतु या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती मिळाल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखले जातील.
- या योजनेमुळे इतर नागरिक देखील शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आवश्यक पात्रता काय आहे ?
- अर्ज करीत असलेला शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे गरजेचे आहे तसे त्याला रहिवासी दाखला जोडावा लागतो.
MAHATMA PHULE KARJMUKTI YOJANA | महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अटी आणि शर्ती –
- या योजनेअंतर्गत मिळणारी कर्जमाफी ही फक्त राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच गाव लेवलच्या विविध सहकारी संस्था यांच्याकडून घेतलेल्या कर्जासाठी मिळणार आहे. खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जासाठी कर्जमाफी मिळत नाही.
- अर्ज करीत असलेल्या शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्ज करीत असलेला नागरिक हा शेतकरी असणे गरजेचे आहे.
- ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना कर्ज प्रोत्साहन चा लाभ भेटत नाही.
- शेतकऱ्याचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे तसेच ते बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.
- शेतकरी प्रोत्साहन पर लाभ देताना जास्तीत जास्त 50 हजार रुपये इतका लाभ दिला जातो.
- शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देताना त्या शेतकऱ्यांनी किती बँकांकडून कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेड कशी केली आहे किती रकमेची केली आहे या गोष्टी विचारात घेतल्या जातात.
- जर एखाद्या शेतकऱ्याचे मयत झाले तर त्याच्या वारसाने जर कर्जफेड केली तर ते वारस देखील प्रोत्साहन पर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील.
- अतिवृष्टी किंवा महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जर कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल ते शेतकरी देखील या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने चा तपशील-
- प्रोत्साहन पर लाभ देताना त्या शेतकरी ने किती बँकांकडून कर्ज घेतले आहे त्याची परतफेड किती केली आहे त्याची किती रक्कम परत काही केली आहे या सर्व गोष्टींचा विचार करून त्याला प्रोत्साहन पर लाभ दिला जाईल ज्याची जास्तीत जास्त मर्यादा 50 हजार रुपये इतकी आहे.
- योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
- या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल हे माननीय मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येतात.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ खालील व्यक्तींना दिला जाणार नाही –
- या योजनेचा लाभ हा राजकीय पद भूषवलेल्या व्यक्तींना दिला जाणार नाही जसे की महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री राज्यमंत्री आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य इत्यादी व्यक्तींना त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- चतुर्थश्रेणीतील कर्मचारी सोडून इतर पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त पगार असलेले केंद्र शासन व राज्य शासनाकडे काम करत असलेली सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंब त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- महाराष्ट्र राज्यातील महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांच्यासारखे सार्वजनिक उपक्रम असलेल्या संस्थांमधील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या वेतन पंचवीस हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशा लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही यामध्ये देखील चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वगळून बाकी कर्मचाऱ्यांसाठी ही नियम लागू आहे.
- ज्या शेतकऱ्यांचे शेती सोबत इतर काही व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायाच्या इन्कम मधून ते इन्कम टॅक्स भरतात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्या शेतकऱ्यांचे मासिक निवृत्तीवेतन हे 25 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे निवृत्तीवेतनधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही अट फक्त माजी सैनिक यांच्यासाठी लागू नाही.
- पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त पगार असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँका सरकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- शेतकऱ्याचे रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- जमिनीचे कागदपत्र जसे की सातबारा आणि आठ अ
- पासपोर्ट साईज चे फोटो
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कशी कार्य करते ?
- शेतकऱ्याने आपला आधार नंबर हा बँक खात्यासोबत किंवा सहकारी संस्थेच्या खात्यासोबत संलग्न करणे बंधनकारक आहे.
- बँक आधार क्रमांक सोबत कर्ज खात्याचे रकमेच्या याद्या मार्च 2020 पासून च्या सूचना फलकावरती लावते.
- त्या याद्या मध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या खात्यासमोर एक विशिष्ट ओळख दिलेला आहे.
- तो आपला ओळख क्रमांक घेऊन शेतकऱ्याने आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपल्या कर्जाच्या रकमेची पडताळणी करायची.
- त्यानंतर शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा होईल.
- जर शेतकऱ्याला ऑनलाइन दाखवलेल्या कर्ज रकमेमध्ये काही अडचण असेल तर त्याने ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समिती समोर मांडणे गरजेचे आहे. ती समिती त्याबाबत अंतिम निर्णय घेईल.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अर्ज करण्याची पद्धत –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना थेट कर्ज माफी झालेली आहे हे बँकेमार्फत समजून येते.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी-
- महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे.
- परंतु या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येत आहेत, अजून देखील काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही राज्य सरकारी या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत बाबत महत्त्वाच्या गोष्टी –
- योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज आहे ते माफ केले जाते.
- जे शेतकरी या योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ साठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँका त्यामध्ये डीबीटी मार्फत लाभाशी रक्कम जमा केली जाते.
- एक पारदर्शक कार्यपद्धती असली योजना आहे.
- योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सामावून घेणारी योजना आहे यामध्ये कोणत्याही जाती धर्माशी निकष लावण्यात आलेले नाहीत.