OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | शेतकऱ्यांना ऊस तोडणीचे यंत्र घेऊन एक जोडधंदा चालू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार संयुक्त विद्यमानाने आर्थिक अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी सरकारने ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना चालू करण्यात आलेली आहे.

तरी OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA योजना म्हणजे काय आहे या योजनेच्या अटी शर्ती काय आहेत योजनेची पात्रता काय आहे योजनेचा अर्ज कसा करायचा या सविस्तर बद्दलची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.

चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…


योजनेचे नावऊस तोडणी यंत्र अनुदान योजना |OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे
लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्राचे शेतकरी उद्योजक साखर कारखाने शेती सहकारी संस्था फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन
अर्ज कसा करायचाऑनलाइन
योजनेतून मिळणाऱ्या लाभअनुदानाची 35 लाख रुपयांपर्यंत रक्कम

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA

Table of Contents

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतीचा औद्योगिक विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील वैयक्तिक शेतकरी यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे.
  • महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखाने यांना ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी प्रोत्साहन देणे.
  • शेती सहकारी संस्था किंवा फार्मर प्रोडूसर ऑर्गनायझेशन यांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे.
  • शेतकऱ्यांचा ऊस तोडणी वरती होणारा खर्च कमी करण्यासाठी मदत करणे.
  • शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी लागणारा वेळ हा कमी करणे व त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील इतर शेतकऱ्यांना ऊस लागवडीकडे आकर्षित करणे आणि शेती व्यवसायाचा विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सोडून इतर नागरिक यांना शेती व्यवसायाकडे आकर्षित करणे.

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचे वैशिष्ट्य –

  • योजना राज्य सरकार मार्फत राबवली जाते.
  • या योजनेअंतर्गत फार्मर प्रोडूसर ऑर्गनायझेशन शेती सहकारी संस्था वैयक्तिक शेतकरी उद्योजक सहकारी किंवा खाजगी साखर कारखाने अर्ज करू शकतात आणि पात्र होऊ शकतात.
  • या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये थेट पी एफ एम एस च्या साह्याने जमा केली जाते.

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान –

  •  ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या किमतीचे 39% किंवा 35 लाख जी कोणतीही रक्कम कमी असेल एवढ्या रकमेची आर्थिक अनुदान दिले जाईल.
  • अनुदानाच्या रकमेपैकी 60 टक्के हिस्सा केंद्रशासन भरती आणि 40% हिस्सा राज्य शासनाचे भरला जातो.

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना साठी अर्ज चे शुल्क –

  • ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन 23 रुपये इतकी फी भरावी लागते.

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची लाभार्थी –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सहकारी साखर कारखाने किंवा खाजगी साखर कारखाने वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट हे या योजनेसाठी पात्र आहेत.

OOS TODANI YANTR ANUDAN YOJANA | ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेचा फायदा –

  • ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेमुळे जे वैयक्तिक शेतकरी स्वतःच्या मालिकेचे ऊस तोडणी यंत्र घेऊ इच्छितात अशा शेतकऱ्यांना सरकारमार्फत आर्थिक अनुदान मिळणार आहे त्यामुळे ते यंत्र घेऊ शकतात.
  • या योजनेंतर्गत उद्योजक सहकारी किंवा खाजगी साखर कारखाने शेती उत्पादक संस्था शेती सहकारी संस्था या संस्था देखील किंवा या घटक देखील ऊस तोडणीचे यंत्र अनुदानावरती घेऊ शकता.
  • शेतकऱ्याला ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी आर्थिक रित्या दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • शेतकऱ्यांना ऊस तोडणी साठी मजुरांवरती अवलंबून राहण्याची गरज नाही.
  • शेतकऱ्याचे ऊस तोडणीचा लागणारा वेळ वाचणार आहे खर्च देखील कमी होणार आहे.
  • महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास होण्यास मदत होईल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे –

  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याला किंवा व्यावसायिकाला एका कुटुंबातील एका व्यक्तीला एकदाच अर्ज करता येऊ शकतो आणि ह्या योजनेचा एकदाच लाभ घेता येऊ शकतो.
  • शेती सहकारी संस्था किंवा फार्मर प्रोडूसर ऑर्गनायझेशन यांना एक ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी अनुदानाचे रक्कम मिळेल. एका यंत्रासाठी अनुदान मिळेल.
  • साखर कारखाने यांना जास्तीत जास्त तीन ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी अनुदान देण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 40 टक्के रक्कम ही सरकारमार्फत देण्यात येईल 20 टक्के रक्कम ही अर्जदार आणि स्वतःच्या खर्चाने सो भांडवल म्हणून भरायचे आहे आणि उर्वरित रकमेसाठी अर्जदार कर्ज देऊ शकतो ते कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी सर्वस्वी अर्जदाराची असेल.
  • योजनेअंतर्गत लाभार्थी विकत घेत असलेला ऊस तोडणी यंत्र याची आरटीओ मध्ये नोंद करणे आवश्यक आहे त्याची जबाबदारी सर्वस्वी लाभार्थ्याची राहील.
  • जर अर्जदार हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला जात प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे ते जात प्रमाणपत्र वैयक्तिक अर्जदाराचे असले पाहिजे कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीची जात प्रमाणपत्र गृही धरले जाणार नाही.
  • योजनेच्या लाभार्थीला यंत्र विकत घेतल्यानंतर ते यंत्रावरती योजनेचे नाव लाभार्थीचे नाव अनुदान मिळालेले वर्ष अनुदानाची रक्कम हा तपशील कायमस्वरूपी राहील अशा स्वरूपात लिहावा लागेल ते बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याला ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी त्याने महाडीबीटी पोर्टलवर ज्या कंपनीचे यंत्र खरेदी करण्याचे कोटेशन व टेस्ट रिपोर्ट अपलोड केले आहे तेच खरेदी करणे बंधनकारक राहील त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे खरेदी करायची असेल तर तशी सहसंचालकांची लेखी संमती आवश्यक आहे.
  • एकदा अर्ज जमा केल्यानंतर त्या अर्जातून लाभार्थीची निवड ही लॉटरी पद्धतीने केली जाईल, ही लॉटरी संगणकीय पद्धतीने काढली जाईल.
  • निवड झालेल्या अर्जदाराचे निवडीचे कन्फर्मेशन त्याला एसएमएस द्वारे कळविण्यात येईल, त्यानंतर अर्जदाराला आवश्यक ती कागदपत्रे वेबसाईट वरती अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • कंप्यूटर लॉटरी पद्धतीने अर्ज निवड झाल्यानंतर त्याने आवश्यक कागदपत्र वेबसाईट वरती अपलोड करणे गरजेचे आहे जो कागदपत्रे अपलोड झाली नाहीत तर पुढील प्रक्रिया होणार नाही.
  • अपलोड केलेल्या कागदपत्र नंतर त्या अर्जांची छाननी केली जाईल आणि छाननी मध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पूर्वसंमती पत्र देण्यात येईल ते पत्र अर्जदारांच्या महाडीबीटी पोर्टलच्या अकाउंटला लॉगिन केल्यानंतर त्यांना भेटून जाईल.
  • पूर्व संमती पत्र मिळाल्यानंतर तीन महिन्याच्या आत लाभार्थ्याला यंत्र खरेदी करावे लागणार आहे, यंत्र खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याला आपल्या आरटीओ प्रमाणपत्र खरेदी चे बिल इत्यादी कागदपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे. जर तीन महिन्याच्या आत नवीन यंत्र खरेदी नाही झाले तर त्याचे नाव रद्द करण्यात येईल.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजने साठी आवश्यक पात्रता –

  • अर्ज करीत असलेल्या शेतकरी उद्योजक साखर कारखाना किंवा शेतकरी संस्था या महाराष्ट्र राज्यातील असणे गरजेचे आहे अर्जदार हे महाराष्ट्राचे रहिवाशासने बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेला अर्जदार हा शेतकरी असणे बंधनकारक आहे.

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेच्या अटी आणि शर्थी –

  • महाराष्ट्राचे रहिवाशी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकरी मशीन ज्या कारखान्याचे कार्यक्षेत्रांमध्ये चालवणार आहे त्या कारखान्याचे संमती पत्र असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थीला ऊस तोडणीचे यंत्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण सीझनची ऊस तोडणी होईपर्यंत वापरणे बंधनकारक आहे.
  • या योजनेअंतर्गत अनुदान हे फक्त अशा यंत्रासाठीच दिले जाईल या यंत्रांची मान्यता केंद्र शासनाच्या तपासणी संस्थेकडून करण्यात आलेली आहे.
  • ऊस तोडणी यंत्र निवडण्याची जबाबदारी ही लाभार्थीची किंवा साखर कारखाने यांची असेल.
  • यांनी अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थीला त्या चे ऊस तोडणीचे यंत्र हे महाराष्ट्र राज्यांमध्येच वापरणे बंधनकारक आहे महाराष्ट्राच्या बाहेर प्रदेशात जर ते यंत्र वापरले आणि त्या आढळून आले तर अशा लाभार्थी वरती कारवाई केली जाईल.
  • राज्य शासन हे फक्त यंत्राला अनुदान देण्याचे काम करते यंत्र घेतल्यानंतर त्यासाठी ऊस तोडणीचे काम मिळवणे ची जबाबदारी ही संपूर्णपणे लाभार्थीचे राहिला.
  • यंत्र चालवण्याचे प्रशिक्षण देणे हे काम यंत्र पुरवठादार कंपनी किंवा वित्रक यांचे जबाबदारी आहे.
  • अर्ज करीत असलेले शेतकऱ्याने या अगोदर कोणत्याही केंद्र केव्हा राज्य शासनाच्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या लाभ घेतलेला नसला पाहिजे.
  • ज्या अर्जदाराने या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन यंत्राची खरेदी केली आहे त्याला कमीत कमी सहा वर्षे ते यंत्र विकता येणार नाही किंवा हस्तांतरित करता येणार नाही.
  • ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.

ऊस तोडणी यंत्रानुसार योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचे पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • जमिनीचा सातबारा व आठ अ उतारा
  • प्रतिज्ञापत्र
  • ऊस तोडणी यंत्राचे कोटेशन
  • पासपोर्ट साईचे फोटो
  • कारखान्याचे संमती पत्र

ऊस तोडणी यंत्र अनुदान चा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • अर्ज करू इच्छित असलेल्या अर्जदाराला महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला येऊ स्वतःची नोंदणी करायची आहे.
  • रजिस्ट्रेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करायची.
  • लॉगिन केल्यानंतर शेतकरी योजना या बटणावरती क्लिक करायचे, नवीन पेज उघडले की अर्ज करा या बटणावरती क्लिक करायचे आता परत एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यावरती कृषी यांत्रिकीकरण च्या समोर बाबी निवड या बटनावरती क्लिक करायचे.
  • त्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये अर्ज ओपन होईल त्यात विचारलेली सर्व माहिती भरायची आणि सेव करा या बटणावरती क्लिक करायचे.
  • अर्ज जमा केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल त्याच्यावरती मेक पेमेंट या बटणावरती क्लिक करायचे.
  • त्यानंतर पैसे भरण्यासाठी विविध पर्याय खुले होतील त्यातील कोणताही आवश्यक तो पर्याय निवडून पेमेंट करून त्याची रेसिपी प्रिंट काढायची.
  • अशा रीतीने तुमचा अर्ज करण्याची प्रोसेस पूर्ण होईल.