MAHA DBT SHETAKARI YOJANA | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत आहे. त्या योजनांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना शेतीमालासाठी लागणारे आर्थिक मदत पुरवणी असेल शेतीचे अवजार घेण्यासाठी आर्थिक आमंत्रण देणे असेल किंवा शेती सोबत शेतीला आधारित शेतीचे जोडधंदे म्हणून काही नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे प्रशिक्षण देण असेल किंवा नवीन प्रकल्प चालू करण्यासाठी आर्थिक अनुदान पुरवण असेल. त्यानंतर शेतकऱ्यांना शेती सोबतच कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल असे वेगवेगळे प्रकारचे गोष्टींसाठी सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काढत असते.
आता या नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या योजना अर्ज करण्यासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेबसाईटला जाऊन अर्ज करायचा त्याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करायची हे करणं शेतकऱ्यांसाठी खूप जीखीरीज होत. त्यावर ती एक उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट किंवा एक पोर्टल बनवला आहे. त्या पोर्टल च नाव आहे महाडीबीटी पोर्टल.
या महाडीबीटी पोर्टल वरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचे अर्ज हे तुम्ही एक पोर्टलवरून करता येतात. आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे तुम्हाला तिथे सेव करता येतात तुम्हाला लागेल त्यावेळेस तुम्ही त्यावरून कागदपत्रे अपलोड करू शकता अर्ज सोबत. त्याचबरोबर तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरती भरलेल्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते देखील जाणून घेता येते.
असे विविध प्रकारचे फायदे या महाडीबीटी पोर्टल चे आहेत.
तर MAHA DBT SHETAKARI YOJANA ही नेमकी काय आहे त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या योजनांचा समावेश केलेला आहे महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी कोण कोण पात्र आहे त्याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत ते अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे सर्व गोष्टी आपण आज सविस्तरित्या आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | महाडीबीटी शेतकरी योजना | MAHA DBT SHETAKARI YOJANA |
योजनेचा उद्देश | एकाच पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्याला सोप्या पद्धतीत सर्व गोष्टी पुरवणे. |
योजनेतून मिळणारा लाभ | विविध कृषी योजनांचा लाभ मिळवणे |
लाभार्थ्याची पात्रता | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन |
MAHA DBT SHETAKARI YOJANA | महाडीबीटी शेतकरी योजना चे उद्दिष्ट –
- शेतकऱ्यांना सध्या कार्यरत असलेल्या सर्व कृषी योजना या एका पोर्टल वरती बघायला मिळावेत आणि अर्ज करायला मिळावा यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- शेतकऱ्यांना वेगवेगळे येण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करण्याची गरज नाही.
- शेतकऱ्यांना आता अर्ज भरण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासू नये.
- वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि त्याच्या वितरणामध्ये पारदर्शक व्यवहार चालावा यासाठी शासनाने सर्व गोष्टी एका पोर्टलवर आणून ऑनलाईन केले आहेत.
- शेतकऱ्यांना जर काही पिकाचे नुकसानी झाली तर त्यांना त्वरित आर्थिक मदत भेटावे.
- शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्याचा अर्ज करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटला पोर्टल भेट द्यायला लागू नये.
MAHA DBT SHETAKARI YOJANA | महाडीबीटी शेतकरी योजनेचे वैशिष्ट्ये –
- शेतकऱ्यांना आपल्या विविध योजनांसाठी आता महाडीबीटी पोर्टल या एकाच पोर्टलवरून विविध योजनांसाठी अर्ज करता येईल.
- शेतकरी घरबसल्या देखील आपल्या योजनांसाठी अर्ज करू शकतो.
- शेतकऱ्यांनी एकदा सबमिट केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेणे आता सोपे झाले आहे.
- महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी आपल्या सातबारा खाते उतारा 8अ बँका त्याची प्रत इत्यादी गोष्टी अपलोड करू शकतात.
- डीबीटी पोर्टल वरती अर्जदाराला एसएमएस आणि ईमेल अलर्ट मिळतात त्यामुळे त्यांना अर्जाची स्थिती जाणून घेता येते.
- डीबीटी पोर्टल मार्फत शेतकऱ्याला कोणत्याही योजनेचा मिळणारा आर्थिक लाभ हा थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो त्यासाठी बँक आणि आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.
- कृषी योजना च्या अर्जांमध्ये आणि त्याच्या वितरणांमध्ये पारदर्शकता आली आहे.
MAHA DBT SHETAKARI YOJANA | महाडीबीटी शेतकरी योजनेमध्ये खालील योजनांचा समावेश आहे –
१. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पीक
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 55% पर्यंत आर्थिक अनुदान मिळते. हे अनुदान शेतकऱ्यांना तुषार आणि ठिबक सिंचन यांच्या साठी दिले जाते.
२. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्र अवजारे यांच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत खालील उपकरणांसाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
- पावर टिलर
- ट्रॅक्टर
- बैल चॅलेंज यंत्र
- मनुष्याच्या यंत्र
- प्रक्रिया संच
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र
- स्वयंचलित यंत्र
३. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य तेलबिया ऊस आणि कापूस
योजनेतर्गत शेतकऱ्याला विविध गोष्टी पुरविल्या जातात आणि त्या गोष्टी पुरवण्यासाठी शेतकऱ्याला सरकारमार्फत आर्थिक अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये सूक्ष्म मूलद्रव्य पिक संरक्षण औषधे जैविक घटक तणनाशके शेततळे पंपसंच पाईप कृषी अवजारे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
४. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विविध गोष्टींसाठी अनुदान देण्यात येते जसे की जुनी विहीर दुरुस्ती करून नवीन विहीर खोदणे वेल बोरिंग पंपसंच खरेदी 20 जोडणीची खरेदी शेतकऱ्यांचे प्रश्न अस्तरीकरण सूक्ष्म सिंचन योजना तुषार सिंचन पीव्हीसी पाईप खरेदी परसबाग इत्यादी गोष्टींसाठी आर्थिक अनुदान दिले जाते हे आर्थिक अनुदान रुपये 500 पासून ते अडीच लाख रुपये या दरम्यान दिले जाते.
५. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत विविध गोष्टींसाठी अनुदान देण्यात येते जसे की जुनी विहीर दुरुस्ती करून नवीन विहीर खोदणे वेल बोरिंग पंपसंच खरेदी 20 जोडणीची खरेदी शेतकऱ्यांचे प्रश्न अस्तरीकरण सूक्ष्म सिंचन योजना तुषार सिंचन पीव्हीसी पाईप खरेदी परसबाग इत्यादी गोष्टींसाठी आर्थिक अनुदान दिले जाते हे आर्थिक अनुदान रुपये 500 पासून ते अडीच लाख रुपये या दरम्यान दिले जाते.
६. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
या योजनेमध्ये खालील घटकांचा समावेश होऊ शकतो.
- आळंबी उत्पादन
- उत्पादन यांत्रिकीकरण
- नवीन बागा लागवड
- भाजीपाला विकास कार्यक्रम
- उती संवर्धन प्रयोगशाळा यांचे बळकटीकरण व पुनर्जीविकरण करणे
- नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा चालू करणे.
- पुष्प उत्पादन
- मसाला पिके लागवड
- जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवीकरण करणे
- हरितगृह शेडनेट प्लास्टिकच्या प्लास्टिक ट्रेनिंग पॉलीहाऊस मधील भाजीपाला लागवडी यासाठी अनुदान देणे.
- सेंद्रिय शेती
- एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
- एकात्मिक कीड व्यवस्थापन
- मधुमक्षिका पालन सामुक्षते वैयक्तिक शेततळे इत्यादींसाठी अनुदान.
७. कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
८. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत ठिबक सिंचनाच्या उभारणीसाठी शंभर टक्के आर्थिक अनुदान देण्यात येते.
९. राष्ट्रीय कृषी योजना
10. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
या योजनेतर्फ खालील कृषी अवजारांची खरेदीसाठी राज्य शासनाकडून आर्थिक बांधण्यात देण्यात येते.
- ट्रॅक्टर
- पावर टिलर
- प्रक्रिया संच
- मनुष्य चलित यंत्र
- बैलचलित यंत्र
- काढणी पश्चात तंत्रज्ञान
- फळ उत्पादनाचे अवजार
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र
- स्वयंचलित यंत्र
११. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
MAHA DBT SHETAKARI YOJANA | महाडीबीटी पोर्टलचा फायदा
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कृषी योजनांची माहिती एकाच पोर्टल वरती मिळणार आहे.
- शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या योजना अर्ज करण्यासाठी एकच पोर्टल एकच लॉगिन आयडी पासवर्ड लागणार आहे.
- शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरील कोणत्याही गोष्टीबाबत जर प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यावरती त्यांना मदत म्हणून हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे.
- महाडीबीटी पोर्टल मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अर्ज भरणे त्याचे वितरण होणे या सर्व गोष्टी पारदर्शक रित्या पार पाडल्या जातात.
- शेतकऱ्यांच्या पिकाचे जर काही आर्थिक नुकसान झाले नैसर्गिक आपत्तीमुळे तर त्यांना त्या पिकाच्या आर्थिक भरपाई देणे हे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अधिक सुलभ झालेले आहे.
- शेतकऱ्यांना कधीपासून मोबाईल वरती आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्जांची माहिती मिळणार आहे त्या अर्जाचस्थिती समजणार आहे.
शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे –
- सन 2017 18 पासून आधार क्रमांक अर्जदाराला बंधनकारक केलेला आहे परंतु आधार नोंदणी झालेले अर्जदार देखील डीव्हीडी पोर्टल वरती नोंदणी करू शकतात.
- अर्जदारांनी महाडीबीटी पोर्टलचे मार्गदर्शक पुस्तिका व्यवस्थित रित्या वाचून अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यायची.
- डीव्हीडी पोर्टलवरून अर्ज करण्यासाठी अर्जदार आवश्यक आहे का नाही या सर्व गोष्टींची पडताळणी अर्जदाराने स्वतः करणे गरजेचे आहे कोणत्याही अर्ज भरण्याच्या स्तरावरती जर असे आढळून आले की तो अर्जदार त्या योजनेसाठी अपात्र आहे तर त्याचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- अर्जदाराने अंतिम अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्यात मध्ये भरलेली सर्व माहिती अचूक आहे का हे पुन्हा एकदा तपासून घ्यायची एकदा भरलेला अर्ज परत एडिट करता येत नाही.
- महाडीबीटी पोर्टल वरती असलेल्या योजना साठी अर्ज हा फक्त ऑनलाईन या पद्धतीनेच करण्यात येतो.
MAHA DBT SHETAKARI YOJANA | अर्जदाराची पात्रता-
अर्ज करीत असलेला अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
महाडीबीटी पोर्टल योजनेसाठी आवश्यक कागदपत्र-
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- जातीचा दाखला
- जमीन सातबारा आणि आठ अ
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा पासबुक झेरॉक्स
- पिकाची माहिती
- डोमासाईल चे प्रमाणपत्र
- कुटुंबाची माहिती
- रेशनिंग कार्ड
महाडीबीटी पोर्टल वरती नवीन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्ज करू इच्छित असलेल्या नागरिकाला सर्वात प्रथम महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन नवीन यूजर चे नोंदणी करणे गरजेचे आहे.
- होमपेज वरती नवीन अर्जदार नोंदणी या बटनावरती क्लिक करायचे.
- आता समोर नवीन अर्जदार नोंदणीचा अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- त्यानंतर तुमची नवीन युजरची नोंदणी वेबसाईट वरती पूर्ण होईल.
- यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे.
- लॉग इन केल्यानंतर समोर एक पेज उघडेल त्याच्यावरती apply या बटणावर क्लिक करायचे.
- आता अर्जदाराला पुढे विचारलेली सर्व माहिती जसे की पत्ता असेल कुटुंबाची माहिती असेल तरी सर्व माहिती अचूक रित्या भरायची जमिनीचा तपशील त्या भरायचा त्यानंतर सध्या असलेले पिके याचा तपशील अचूक रित्या भरायचा आंतर पिकांचा तपशील जर असतील तर भरायचा.
- सर्व माहिती भरून झाल्यावर ती अर्ज सेव करायचा आणि सबमिट करायचा.
- अशा रीतीने महाडीबीटी पोर्टल वरती नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.