MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | सद्यस्थितीला महाराष्ट्र मध्ये बेरोजगारी ही खूप मोठी समस्या बनलेली आहे. की बेरोजगारी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन ऑटोकाठ प्रयत्न करत आहे.
बेरोजगारी कमी करणे किंवा त्यासाठी प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देणे प्रत्येकाला सरकारी नोकरी उपलब्ध करून देणे सद्यस्थितीच्या घडीला शक्य नाही. म्हणून सरकारने यावरती तोडगा काढलेला आहे सरकार महाराष्ट्रातील बेरोजगार युवक युवती यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देत आहे.
त्यामुळे प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवाराला प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळणे सोपे होईल तसेच यासोबत उमेदवार स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतील.
यासाठी महाराष्ट्र सरकारने महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू केली.
तर ही MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA नेमकी काय आहे याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत या योजना काढणे मागचा उद्देश काय आहे या योजनेला अर्ज करण्याची पद्धत काय आहे अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात याच्या पात्रतेच्या अटी आणि शर्ती काय आहेत मी तरी सर्व बाबींची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना | MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्याच्या रोजगार विभाग यांनी सुरू केली |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यामधील सुशिक्षित बेरोजगार युवकांना त्यांचा वैयक्तिक उद्योग चालू करण्यासाठी त्यांना पाठबळ पुरवणे. |
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता | लाभार्थी होण्यासाठी तो युवक महाराष्ट्र राज्याचा सुशिक्षित बेरोजगार असणे गरजेचे आहे. |
योजनेतून मिळणारा लाभ | कौशल्य विकास प्रशिक्षण पुरविणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना चे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील वय वर्ष 18 ते 45 वयोगटातील योग्य उत्तीर्ण वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण पुरवणे.
- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग आणि नॉन क्रिमिलियर गट यातील सुशिक्षित बेरोजगार योग्य उत्तीर्ण निवासी आणि अनिवासी पद्धतीचे कौशल्य विकास प्रशिक्षण पुरवणी.
- महाराष्ट्र राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देणे.
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
- महाराष्ट्र राज्याचा औद्योगिक विकास करण्याला मदत करणे.
- महाराष्ट्र राज्यातील युवक युवतींना आत्मनिर्भर बनवून स्वावलंबी बनवणे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून बेरोजगारी कमी करणे.
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना चे वैशिष्ट्य –
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाच्या महा ज्योती नागपूर या स्वायत्त संस्थे मार्फत अंमलबजावणी केली जाते.
- सदरची योजना ही महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग नॉन क्रिमीटर गटातील युवक युती 18 ते 45 वय वर्ष असलेले युवक युवती यांच्यासाठी प्रशिक्षण देणारी महत्त्वकांक्षी योजना आहे.
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ही युवकांबरोबर युवतींना देखील प्रशिक्षण देणारी योजना आहे.
- सदरची योजना ही फक्त ग्रामीण भागापुरची मर्यादित नसून ती शहरी भागातील युवक युवतींसाठी देखील आहे.
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना साठी लाभार्थी ची पात्रता पुढील प्रमाणे –
- महाराष्ट्रातील 18 ते 45 वय वर्ष वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार या योजनेसाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्रामधील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मधील सुशिक्षित बेरोजगार या योजनेसाठी पात्र आहेत.
- सदरच्या योजनेच्या पात्रतेसाठी नॉन क्रिमिलियर गटात मोड बसलेले सुशिक्षित बेरोजगार देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना चा फायदा –
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत दिले जाणारे कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे त्याची फी शासन भरणार आहे.
- सदरच्या कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी लाभ घेणार आहे त्यांना दर महिन्याला 1000 रुपयांचा आर्थिक भत्ता मिळणार आहे.
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थींना निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते.
- सदरचे कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवाराला रोजगार मिळवून देण्यासाठी देखील मदत केली जाते.
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण मिळते.
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत खालील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात-
Sr. No. | Name of course | Educational criteria | Age | Duration in hours |
1 | EMS technician | 12th | 18 to 45 | 400 |
2 | Technical support Engineer | 12th | 18 to 45 | 400 |
3 | Retail sales associate | 10th | 18 to 45 | 250 |
4 | Inventory clerk | 12th | 18 to 45 | 280 |
5 | Machine operator plastic processing | 8th | 18 to 45 | 960 |
6 | Machine operator injection moulding | 8th | 18 to 45 | 960 |
7 | Machine operator tool room | 10th / ITI / diploma | 18 to 45 | 960 |
8 | Machine operator and programmer CNC lathe | 10th / ITI / diploma | 18 to 45 | 960 |
9 | Machine operator and programmer CNC miling | 10th / ITI / diploma | 18 to 45 | 960 |
10 | Maintenance of machinery technician | 10th / ITI / diploma | 18 to 45 | 960 |
11 | General duty assistant | 10th | 18 to 45 | 420 |
12 | Emergency medical technician | 12th | 18 to 45 | 360 |
13 | Home health aid | 10th | 18 to 45 | 360 |
14 | Warehouse supervisor | any diploma | 18 to 45 | 240 |
15 | CRM domestic voice | 10th | 18 to 45 | 400 |
16 | Web developer | 12th | 18 to 45 | 400 |
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत निवासी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये खालील नाष्टा आणि जेवण दिले जाते –
- सकाळचा नाष्टा आणि चहा
- दुपारचे जेवण
- दुपारचा चहा
- रात्रीचे जेवण
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना साठी आवश्यक पात्रता –
- ज्या बेरोजगार युवक किंवा युतीला सदरच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल ती युवक किंवा युवती ही महाराष्ट्र राज्याची मूळची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
MAHAJYOTI KAUSHALYA RASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना च्या अटी आणि शर्ती –
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी असलेली योजना आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील युवक युवतींना सदरच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना फक्त इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या कॅटेगरीतील बेरोजगार युवक युवतींसाठी आहे.
- ज्या बेरोजगार युवक युवती यांच्याकडे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट आहे आणि ते नॉन क्रिमीलेअर गटांमध्ये मोडतात असेच नागरिक फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- ही योजना खुल्या प्रवर्गासाठी नाही.
- अर्जदाराने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्याची पहिली आवश्यक शैक्षणिक पात्रता असली पाहिजे.
- सदरची योजना ही फक्त 18 वर्षे ते 45 वय वर्ष या वयोगटातील युवक युवतींसाठी आहे.
- सदर योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या अर्जदार व्यक्तीला रोजगार करण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी रोजगार करण्याची इच्छा असणे बंधनकारक आहे.
- महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभ दिले जाणारे बेरोजगार युवक युवती यांनी या अगोदर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही कौशल्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
- जे सुशिक्षित बेरोजगार युवक युती हे आर्थिक रित्या गरीब कुटुंबातून येतात अशा योगीयोतींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्ज भरण्याची मुदत संपायच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर मिळालेल्या अर्जांवरती विचार केला जाणार नाही.
- अर्ज करीत असलेला युवक किंवा युवती यांची इच्छा जरी एकापेक्षा जास्त कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये भाग घेण्याची असली तरी त्यांना कोणत्याही एकाच प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा लाभ घेता येईल.
- सदरच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला निवासाचा खर्च भोजन खर्च प्रशिक्षण खर्च इत्यादी देण्यात येईल या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे आर्थिक अनुदान मिळणार नाही.
- प्रशिक्षणामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा रोजगार भत्ता दिला जाणार नाही.
- एकदा प्रशिक्षणामध्ये शिक्षण चालू केल्यानंतर त्या अर्जदार युवक किंवा युवतीला 80 टक्के उपस्थिती लावणे बंधनकारक आहे.
- महा ज्योती नागपूर यांच्या व्यवस्थापकीय संचालक यांना अर्जदार उमेदवारांचे अंतिम निवड करण्याचे अधिकार राहतील ही निवड उमेदवाराची मुलाखत घेतल्यानंतर करण्यात येईल.
- प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जर उमेदवार गैरवर्तणूक करताना सापडला तर त्याच्यावरती कार्यवाही केली जाईल.
MAHAJYOTI KAUSHALYA PRASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना साठी आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
- जातीचा दाखला
- जन्माचा दाखला
- किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- बँक खात्याचे पासबुकची झेरॉक्स
- नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट
MAHAJYOTI KAUSHALYA PRASHIKSHAN YOJANA | महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- जे बेरोजगार युवक युवती सदरच्या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छितात अशा युवक युवतींना शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल होमपेज वरती कौशल्य विकास या बटनावरती क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर एक नवीन पेज उघडून त्यावरती कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम नोंदणी अर्ज २०२१ ह्याच्यावरती क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमच्यासमोर सदर योजनेचा अर्ज उघडेल त्या अर्ज मध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
- पुनश्च एकदा सर्व अर्ज तपासून बघायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचे.
- अशाप्रकारे तुमचा अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.