MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | आज आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. सदरची योजना ही महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे.

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना | MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र शासनाच्या बाल विकास विभाग यांनी
योजनेचा उद्देश कायमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य सुरक्षित करणे.
योजनेतून मिळणारा लाभमुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
योजनेचे लाभार्थी कोणमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टी गरीब कुटुंबातील मुली
अर्ज कसा करायचाऑफलाइन पद्धतीने

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA

Table of Contents

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना चे उद्दिष्ट –

  • महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींचा शैक्षणिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने सुधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • महाराष्ट्रातील गरजू मुलींचा सामाजिक आणि आरोग्य च्या बाबतीत विकास घडवून आणण्यासाठी सदर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाकडून मुलींना आर्थिक मदत पुरवणे हे या सदर योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींची जी भ्रूणहत्या केली जाते ती थांबवणे.
  • मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोन पसरवणे आणि जास्तीत जास्त मुलींच्या संगोपणाबद्दल त्यांचा विकास घडवून आणण्याबद्दल जनजागृती करणे.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना चे फायदा –

  • सदर योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांमध्ये असणाऱ्या मुलींचा शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्याच्या बाबतीत विकास घडवून येईल.
  • समाजामध्ये मुलींचा दर्जा उंचावेल त्यांना मानाची वागणूक मिळेल.
  • महाराष्ट्र राज्य मध्ये होणारे मुलींच्या बालविवाह थांबवले जातील.
  • महाराष्ट्र राज्य मध्ये बालिकांची जी भून हत्या केली जाते ते थांबवण्यास मदत होईल.
  • सदर योजनेअंतर्गत मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत सरकारकडून मिळेल.
  • मुलींच्या जीवनाबद्दल समाजामध्ये सकारात्मक भावना पसरवली जाईल.
  • समाजामधील नागरिकांच्या मध्ये मुलींच्या जन्मा बाबत त्यांच्या अस्तित्वाबाबत त्यांच्या संगोपनाबाबत जनजागृती घडवून येईल परिणामी मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल.
  • सदर योजनेच्या लाभाच्या अंतर्गत मुलींना शिक्षणासाठी लागणारे खर्च साठी दुसऱ्या कोणावरती या अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे मुलींना उच्च शिक्षण घेता येईल.
  • सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घेतल्यानंतर समाजामध्ये कोणतीही मुलगी शिक्षणापासून आर्थिक कारणांमुळे वंचित राहणार नाही.
  • मुली च्या आई आणि वडिलांना मुलीच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही ती चिंतामूगतो होऊन आपल्या मुलींचे संगोपन करू शकतील.
  • सदर योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुळे इतर मुली देखील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित होतील आणि सदर योजनेचा लाभ घेतील.
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेमुळे ज्यावेळेस मुली शिक्षण पूर्ण करतील त्यानंतर त्या चांगली नोकरी मिळवतील परिणामी ते आपल्या कुटुंबाचा चांगला सांभाळ करू शकते.
  • सदर योजनेअंतर्गत मुलगी 18 वयाची झाल्यानंतर एलआयसी कडून एक लाख रुपये दिले जातात त्यापैकी दहा टक्के रक्कम ही मुलीच्या कौशल्य विकासावर ती खर्च करणे बंधनकारक आहे. याचा फायदा त्याच मुलीला स्वतःचा रोजगार मिळवण्यासाठी होईल.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना चे लाभार्थी कोण –

  • ज्या मातेकडे एक मुलगी आहे आणि अशा मतेने कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केलेले आहे अशा प्रकरणांमध्ये त्या मुलीला सुधार योजनेअंतर्गत लाभ मिळतो.
  • जर मातेला दोन्ही मुली असतील आणि त्या मातेने कुटुंब नियोजन केले असेल तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही मुलींना सुधार योजनेचा लाभ मिळेल.
  • जर एखाद्या मातेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन आपत्ती असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला सदर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे –

टप्पा १- मुलीच्या जन्मावेळी

  • जेव्हा पहिली मुलगी जन्माला येते त्यावेळेस त्या मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येते.
  • यासाठी मुलीच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच दुसऱ्या मुली साठी सरकारकडून 2500 रुपये आर्थिक मदत केली जाते.
  • सदर योजनेच्या लाभाची रक्कम मिळवण्यासाठी आई आणि मुलगी यांच्या संयुक्त बँक खाते काढले जाते.
  • मुलीच्या नावाने एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट बँकेकडे काढला जातो.
  • महाराष्ट्र शासनाकडून मुलीच्या नावे 21 हजार 200 रुपयाचा विमा उतरवण्यात येईल आणि त्या विम्याचे एलआयसी कडून मुलगी 18 वयाची झाली की एक लाख रुपये दिले जातील.
  • जर मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर तीस हजार रुपये भरपाई अपघातामुळे मृत्यू झाला तर 75 हजार रुपये भरपाई देण्यात येईल.
  • जर मुलीचे अपघातामध्ये दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले तर 75 हजार रुपये आर्थिक मदत मिळेल आणि जर एक डोळा आणि एक अवयव अपघातामुळे निकामी झाला तर अशा परिस्थितीमध्ये 37 500 रुपयांची आर्थिक मदत मिळेल.

टप्पा २ मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी चा टप्पा

  • मुलगी चा जन्म झाल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे त्याच्या आधारेच दुसऱ्या टप्प्यात चे लाभ दिले जातील.
  • मुलीचे चांगले आरोग्य रहावे चांगले पोषण व्हावे यासाठी मुलीला दर दिवशी एक अंडे आणि दर दिवशी 200 मिली दूध सदर योजनेअंतर्गत दिले जाईल.
  • पहिली मुलगी आपत्ती असेल तर प्रतिवर्षी 2000 रुपये याप्रमाणे पाच वर्षांसाठी एकूण दहा हजार रुपये देण्यात येतील.
  • दुसरी मुलगी अपत्य असताना प्रतिवर्षी एक हजार रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी पाच हजार रुपये आर्थिक मदत मिळेल.

टप्पा ३ – प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर

  • प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्यानंतर संबंधित शाळेच्या उपस्थिती प्रमाणपत्र नुसार मुलीला सदर योजनेचा लाभ मिळेल.
  • या टप्प्यामध्ये मुलीचे गुणवत्तापूर्वक दर्जेदार पोषण व्हावे यासाठी पोषण आहार आणि इतर खर्च दिला जातो.
  • पहिल्या मुलीला दरवर्षी 2500 रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी बारा हजार पाचशे मिळतील.
  • तीच रक्कम दुसऱ्या मुलीसाठी प्रतिवर्षी पंधराशे रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी 7500 रुपये देण्यात येईल.

टप्पा ४ – माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये मुलीचा प्रवेश

  • शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • या टप्प्यामध्ये पहिल्या मुली अपत्यासाठी दरवर्षी 3000 रुपये याप्रमाणे सात वर्षासाठी २१ हजार रुपये देण्यात येतील.
  • तीच रक्कम दुसरी मुलगी आपत्ती यासाठी दरवर्षी दोन हजार रुपये याप्रमाणे सात वर्षांसाठी 14 हजार रुपये या पुढील रक्कम देण्यात येईल.

टप्पा 5 मुलीचे वय 18 वर्ष असताना

  • मुलगी अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र किंवा शपथपत्र पालकांनी जोडावे.
  • या टप्प्यामध्ये विम्याचा कालावधी पूर्ण झाला की एक लाख रुपये मुलीला मिळतील.
  • कॅम्प रकमेपैकी दहा हजार रुपये रक्कम मुलीचे कौशल्य विकास यावरती खर्च करणे आवश्यक आहे.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना साठी आवश्यक पात्रता –

  • अर्ज करीत असलेले कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे मोचे रहिवासी असणे बंधनकारक आहे.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना च्या अटी आणि शर्ती –

  • सदर योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी मर्यादित आहे.
  • सदर योजनेअंतर्गत ज्या मुली एक ऑगस्ट 2017 रोजी आणि त्यानंतर जन्मलेल्या आहेत अशा मुलींनाच फक्त लाभ घेता येईल.
  • या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मातेने आणि पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली आहे याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
  • दुसऱ्या पत्त्याच्या जन्मानंतर सहा महिन्याच्या आत मध्ये अर्जदार आई-वडिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • जर एखाद्या कुटुंबामध्ये पहिली आणि दुसऱ्या पत्ते ही मुलगी आहे आणि त्यानंतर तिसऱ्या पत्ते झाले आणि ती देखील मुलगी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तीन पैकी हे काही मुलीला सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर एका कुटुंबामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर दुसऱ्या अपत्याच्या वेळेस अर्जदार आईने जुळ्या मुलींना जन्म दिला तर अशा परिस्थितीमध्ये त्या जुळ्या दोन्ही मुली सदर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतील.
  • जर या योजनेच्या लाभार्थी असलेल्या मुलीचा मृत्यू काही नैसर्गिक कारणास्तव झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या पालकांना त्या मुलीच्या नावावरील संपूर्ण रक्कम ही मुदत संपल्यानंतर दिली जाईल.
  • जर एखाद्या कुटुंबाने एखादी मुलगी दत्तक घेतली तर ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल परंतु त्या दत्त घेतलेल्या मुलीचे वय हे शून्य ते सहा या वयोगटा दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • जर एखादे कुटुंब पहिल्या मुलीनंतर एका वर्षाच्या आत मध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करत नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • जर एखादी मुलगी सदर योजनेअंतर्गत लाभ मिळवत आहे आणि त्या मुलीचे वय 18 होण्याच्या आधीच त्यांचे विवाह झाले किंवा ती मुलगी दहावीमध्ये नापास झाली किंवा तिचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले तर त्या मुलीला सदर योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जाणार नाही.
  • अर्ज करीत असलेले कुटुंब यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे 7.5 लाखापेक्षा अधिक नसावे.
  • लाभार्थी मुलीच्या नावाने बँक अकाउंट उघडून त्यावर ती आर्थिक लाभ जमा केला जाईल.
  • सदरची योजना ही बीपीएल आणि एपीएल अशा कुटुंबातील दोन्ही मुलींना लागू होत आहे.

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • रेशनिंग कार्ड
  • रहिवासी दाखला
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईचे फोटो
  • मुलीचा जन्म दाखला
  • बँक खात्याची डिटेल्स
  • उत्पन्नाचा दाखला
  • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ घेतला नाही याचे प्रमाणपत्र
  • शपथपत्र
  • मागील शैक्षणिक वर्षातील उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • आई-वडिलांची कुटुंब नियोजन झालेल्या चे प्रमाणपत्र

MAJHI KANYA BHAGYASHRI YOJANA | माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज करण्याची पद्धत –

  • सदर योजनेचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे अशा अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा विभागीय उपायुक्त किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्र या ठिकाणी भेट द्यायचे आहे.
  • वर्णमूद केलेल्या कोणत्याही कार्यालयात भेट देऊन तिथून या योजनेचा अर्ज घ्यायचा अर्जामध्ये विचारलेली सौरव माहिती आवश्यक रित्या भरायची.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची आणि तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.