BANDHKAM KAMGAR YOJANA | आज आपण बांधकाम कामगार योजने बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
योजनेचे नाव | बांधकाम कामगार योजना | BANDHKAM KAMGAR YOJANA |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
कोणत्या विभागामार्फत सुरू करण्यात आली | महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार विभाग |
योजनेचा उद्देश | बांधकाम कामगारांचा आर्थिक विकास करणे |
लाभार्थ्याची पात्रता | महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन आणि ऑफलाइन |

BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार योजनेच्या उद्देश-
- बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी करणे.
- महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे त्यांच्याकडून आवश्यक माहिती गोळा करणे व त्यांचा डाटा संकलित करणे.
- शासनाकडून बांधकाम काम करण्यासाठी सुरू करण्यात येणारे विविध प्रकारच्या योजनांची माहिती बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवण्याची तरतूद करणे.
- बांधकाम कामगारांच्या काम करण्याच्या जागेवर ती जाऊन टेन्शन नोंदणी करून घेणे.
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार योजने ची वैशिष्ट्ये–
- बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगारांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यात येतो.
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत इतर कामगारांच्या योजनेच्या वतीने हार्दिक मार्फत जमा केला जातो.
- बांधकाम कामगारांची जीवनमान सुधरवणे.
- विविध कल्याणकारी योजनांची माहिती बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवने.
- जड व घातांक कामातून बालकामगारांना काढून टाकाने. कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा विचार करने.
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार योजनेचे फायदे –
- योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचा टाटा संकलित केला जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण डाटा ला ज्यावेळेस शासनाकडून काही नवीन योजना येतील त्या योजनांची माहिती पुरवणे तसेच त्या योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा लाभ याचे वितरण करणे हे खूप सोयीस्कर होऊन जाणार आहे.
- बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार हे आर्थिक रित्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनणार आहेत.
- कामगारांचे काम करते वेळेस होणारे अपघातात घट होईल आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना केल्या जातील.
- या योजनेअंतर्गत कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या किंवा नव्याने रिलीज होणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जाईल.
- योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभांमुळे किंवा इतर प्रकारच्या लाभांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यास खूप मदत होणार आहे.
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार नोंदणी शुल्क –
- २५ रुपये नोंदणी फी
- ६० रुपये वार्षिक वर्गणी
- १ रुपया मासिक वर्गणी
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार योजनेची पात्रता –
- ज्या कामगारांचे वय हे 18 वर्ष ते साठ वर्ष या वयोगटांमध्ये येते असे कामगार या योजनेसाठी पात्र ठरतील.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी त्या कामगाराने संपूर्ण बारा महिन्याच्या वर्षांमध्ये कमीत कमी 90 दिवस काम करणे गरजेचे आहे. जो बांधकाम कामगार 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस काम करेल तोच या योजनेसाठी पात्र ठरेल.
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार यादी –
- इमारती
- रस्ते
- रेल्वे
- एअरफिल
- सिंचन ड्रेनेज
- तटबंध नेवीगेशन वर्क्स
- निर्मिती
- पारेषण
- पावर वितरण
- पाणी वितरणासाठी चॅनल
- इलेक्ट्रिक लाईन
- वायरलेस रेडिओ
- दूरदर्शन
- दूरध्वनी
- डॅम
- नद्या
- रक्षक
- पाणीपुरवठा
- टेलीग्राफ
- कोर्स कम्युनिकेशन
- इलेक्ट्रिक लाईन
- तेल आणि गॅस
- जलसंचयन संरचना चे बांधकाम
- पाईपलाईन टॉवर्स
- जलविद्युत पूल
- ट्रान्समिशन टावर
- दगड कापणे फोडणे
- रंग वर्निष लावणे
- गटार कामे
- नळ जोडण्याची कामे
- अग्निशामन यंत्रणेची कामे
- सुरक्षा दरवाजे बसवणे
- विविध प्रकारच्या धातूच्या ग्रील्स खिडक्या तयार करणे बसवणे
- काच कापणे
- काचेची कामे
- आधुनिक मॉड्युलर किचन युनिट बसवणे
- खेळ मनोरंजना सुविधांचे बांधकाम करणे
- जलतरण गोल्फ मैदान
- माहिती फलक रोड
- फर्निचर प्रवासिनी वारे व स्थानके सिग्नल यंत्रणा रोटरीचे बांधकाम करंजी बसवणे
- सार्वजनिक उद्याने इत्यादी बांधकामे
BANDHKAM KAMGAR YOJANA | बांधकाम कामगार योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना
सामाजिक सुरक्षा योजना
बांधकाम कामगार सुरक्षा संच योजना –
महाराष्ट्र राज्याच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने दिनांक 22 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्र राज्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काही सुरक्षा उपकरणे किंवा सामान देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा उद्देश हा नोंदणी बांधकाम कामगारांच्या संरक्षण करणे व सुरक्षेचे जनजागृती करणे हा आहे.
सुरक्षा संचामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे –
- सेफ्टी शूज
- मास्क
- इयर प्लग
- सेफ्टी हेल्मेट
- रिफ्लेक्टिव जॅकेट,
- safety harness.
योजनेच्या अटी आणि शर्ती –
- जवान कामगारांचे मंडळाकडे नोंदणी आहे असे कामगारच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील.
- पत्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच भेट देण्यासाठी विविध पद्धतीने विभागाकडून एका योग्य त्या संस्थेचा किंवा कंपनीच्या निवड करून त्यांच्या मार्फत हे संच पुरवण्यात येतील.
- निविधीप्रमाणे त्या संस्थेला किंवा कंपनीला वर्क ऑर्डर देण्याआधी ते पूर्वत असलेल्या सुरक्षा संचातील गोष्टींची दर्जाची पाहणी केली जाईल.
- त्यानंतर पात्र लाभार्थीला सुरक्षा संच देण्यात येतील.
बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवण्याची योजना
खालील गोष्टीं ची पुरवणी केली जाते-
- प्लॅस्टिकची चटई
- मच्छरदाणी
- सोलरची टॉर्च
- जेवणाचा डबा
- पाण्याची बाटली
- खांद्यावरील बॅग
- पत्र्याची पेटी
योजनेच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे –
- फक्त नोंदी बांधकाम कामगाराची योजनेसाठी पात्र राहतील.
- ई निविदा पद्धतीने एका कंपनीची निवड करण्यात येईल जी कंपनी बांधकाम कामगारांना या अत्यावश्य वस्तूंचा पुरवठा करेल.
- या निविदेमध्ये या वस्तूंचा दर पुरवठा वाहतूक वितरण इत्यादी सर्व गोष्टींचा किमतीचा समावेश असेल.
- अध्यक्ष वस्तूंच्या संचातील प्रत्येक गोष्टीच्या दर्जाचे पाणी अगोदर केली जाईल त्यानंतरच त्या इनिवेदेतून निवडलेल्या कंपनीकडून सर्व माल स्वीकारला जाईल.
- त्यानंतर पात्र असलेले लाभार्थींना अत्यावश्यक वस्तूचा संच पुरवला जाईल.
शैक्षणिक योजना –
आता आपण ज्यापुढे योजना बघणार आहे त्या शैक्षणिक योजना ह्या बांधकाम कामगारांच्या फक्त पहिल्या दोन मुलांसाठी लागू होतील.
योजनेतून मिळणारा आर्थिक लाभ –
इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी चे पात्र विद्यार्थी – वार्षिक 2500 रुपयांची आर्थिक मदत.
इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी – वार्षिक पाच हजार रुपयांचे आर्थिक मदत.
शैक्षणिक योजनेसाठी पात्रता आणि अटी –
- पात्र बांधकाम कामगारांच्या मुलांची शाळेतील उपस्थिती ही कमीत कमी 75 टक्के असणे बंधनकारक आहे.
- 75 टक्के उपस्थिती आहे असा शाळेचा दाखला अर्जासोबत देणे गरजेचे आहे.
- सरकारी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल प्रायव्हेट शाळेतील विद्यार्थी हे या योजनेसाठी पात्र ठरत नाहीत.
योजनेला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
- 75 टक्के हजेरी आहे त्याचा दाखला
- शिक्षण प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड
दहावी किंवा बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे –
पात्रता आणि अटी –
- विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असावा.
- कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक आहेत.
लागणारी कागदपत्रे-
- दहावी किंवा बारावीचे गुणपत्रक.
- शिक्षण प्रमाणपत्र.
अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य देणे –
पात्रता आणि अटी –
- विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत शिकणे बंधनकारक आहे.
- विद्यार्थ्यांची शाळा कॉलेजमधील हजेरी 75% असणे बंधनकारक आहे.
लागणारी कागदपत्रे –
- इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची गुणपत्रिका.
बांधकाम कामगारांच्या मुलांना शाळेच्या उपयोगाच्या वस्तू पुस्तके वगैरे भेट देणे-
महाराष्ट्र राज्य सरकारचे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कडून निर्णय घेण्यात आला आणि जे नोंदणी बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलांना एक हजार रुपये पर्यंत किमतीच्या विविध प्रकारची पुस्तके संच भेट देण्यात येतो. याच्या मागचा उद्देश हाच आहे की बांधकाम कामगारांच्या मुलांच्या ज्ञानात भर पळावी सामान्य ज्ञानात भर पडावी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं त्यांच्या शारीरिक बौद्धिक विकास व्हावा.
महाराष्ट्राच्यात एकूण 2 लाख नोंदीत बांधकाम कामगार आहेत आणि त्यापैकी जीवित बांधकाम कामगारांची संख्या एक लाख आहे असे धरून त्यांच्या पाल्यांना एक हजार रुपये किमतीचे पुस्तकांचा संच भेट देणे अशी योजना गव्हर्मेंट मार्फत आखण्यात आली आहे. हे पुस्तके नवनीत प्रकाशन यांच्याकडून देण्यात येणार आहेत तर ते नवनीत प्रकाशन पुस्तकांचे संच हे दहा टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यास तयार आहेत. एकूण एक लाख कामगारांच्या 1000 रुपये याप्रमाणे दहा कोटी खर्च अपेक्षित आहे.
पदवी अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्षी वीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत देणे–
मिळणारा आर्थिक लाभ –
प्रतिवर्षी वीस हजार रुपये.
लागणारी कागदपत्रे –
- मागील इयत्तेचे पास झालेले गुणपत्रक
- नवीन वर्गामध्ये ऍडमिशन घेतलेली पावती किंवा बोनाफाईड
वैद्यकीय पदवीकरिता कामगारांच्या मुलांना किंवा पत्नीला प्रतिवर्षी एक लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य –
तसेच अभियांत्रिकी पदवी करता देखील वार्षिक 60000 रुपयांचे हार्दिक साह्य
लागणारी कागदपत्रे –
मागील इयत्तेचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
शासनमान्य पदविकेसाठी प्रत्येक वर्षाला 20 हजार रुपये च्या आर्थिक सहाय्य
पदवीत्तर पदविकेसाठी प्रति वर्षाला 25 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
लागणारी कागदपत्रे –
- मागील वर्षाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- चालू वर्षात शिकत असलेले बोनाफाईड
म्हणून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना एमएस-सीआयटी शिक्षणाची शुल्काची प्रतिपूर्ती करणे–
त्यासाठी लागणारी कागदपत्रे
- एम एस आय टी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र
- एम एस आय टी च्या शुल्क भरलेली पावती
तर अशा रीतीने वरती दिलेल्या प्रमाणे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून देण्यात येणारी विविध योजना बद्दल माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या उद्देश हा फक्त बांधकाम कामगारांचे जीवन म्हणून सुधारणे हाच नाही तर त्यांच्यासोबतच त्या कामगारांचे कुटुंबाचा देखील सर्वांगीण विकास व्हावा हा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यासाठी सरकार हे फक्त बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या योजनेस सोबतच त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाबाबत देखील खूप मोठा आर्थिक पाठपुरावा करत आहे. आपण जर बघितलं तर अगदी वैद्यकीय शिक्षण घेणं असेल अभियांत्रिकी शिक्षण घेणं असेल तर अशा लेवलचं शिक्षण घेण्यासाठी देखील सरकारकडून आर्थिक मदत पुरवली जात आहे.
याचबरोबर सरकारकडून बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देखील भेट दिली जाते जसे की पुस्तकांचा संच असेल इतर गोष्टी देखील त्यांच्याकडून वेळोवेळी पुरवल्या जातात.
त्याचप्रमाणे आरोग्याचा विचार केला तर नोंदीत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून किंवा ह्या दोन्हींच्या विद्यमानाने काही आरोग्य विषयक योजना सुरू करण्यात आलेले आहेत आणि त्या योजनेअंतर्गत त्यांना त्याच गोष्टींचा लाभ दिला जातो आता ह्या आरोग्यविषयक योजनांच्या बाबतीत जर थोडक्यात सांगायचं तर जननी विमा योजना असेल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असेल अशा विविध योजनांच्या अंतर्गत या नोंदीत बांधकाम कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सहाय्यक केले जाते.
या आरोग्यविषयक असणाऱ्या ज्या योजना आहेत नोंदणी बांधकाम कामगारांसाठी काढलेल्या त्याबद्दल आपण सविस्तर माहिती ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.