CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | महाराष्ट्र राज्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी देखील शेतकरी हा सुखी मनुष्य नाहीये. शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे अडचणींना सामोरे जावे लागते. जसे की कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ कधी कधी अतिवृष्टी होते कधी कधी अवकाळी पाऊस पडतो कधी कधी वादळ येत कधी कधी सुनामी येते असे वेगवेगळ्या प्रकारचे अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. फक्त नैसर्गिक आपत्तीच्याच अडचणी नाही तर यासोबत वाढता खतांचा रेट वाढता औषधांचा रेट जमिनीची मशागत करण्यासाठी वाटत असणारी किंमत थोडक्यात म्हणजे की वाढणारी महागाई ही शेतकऱ्याला देखील सोडत नाही.
अशा वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाऊन शेतकरी शेती करत असतो. आणि जर काही दुर्दैवी घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जगणे मुश्किल होऊन जाते. अशा परिस्थितीमध्ये काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात म्हणजे आत्महत्या करतात.
शेतकऱ्याला या सर्व गोष्टी म्हणून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने एक शेतकरी हिताची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरजू आर्थिक रित्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवले जाते कर्जमाफी दिली जाते.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा फायदा असा आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते जास्तीत जास्त शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतात या क्षेत्राकडे आकर्षिले जातात.
तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही नेमकी काय आहे त्याचा उद्देश काय आहे ते कोणी सुरू केली किती शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे कोण कोणत्या प्रकारचे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत शर्ती काय आहेत याचा अर्ज कसा करायचा ते अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत इत्यादी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना | CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA |
योजना चालू करण्यामागचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील गरजू शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवणे |
योजनेतून मिळणाऱ्या लाभ | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य |
योजनेची लाभार्थी कोण | महाराष्ट्र राज्यातील गरजू शेतकरी |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन |

CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्य मध्ये जे शेतकरी आर्थिक रित्या गरीब आहेत अशा गरजू शेतकऱ्यांना पाठबळ पुरवणी हे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे उद्दिष्ट आहे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवून शेतकऱ्यांच्या संकट काळामध्ये मदत करणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांना वेळोवेळी लागेल तिथे मदत करणे आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणे.
- शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीं कमी करून इतर शेतकऱ्यांना शेती या व्यवसायाकडे आकर्षित करणे.
- सध्या महाराष्ट्रात जे शेतकरी शेती या व्यवसायामध्ये काम करत आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
- जर काही कारणास्तव शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत आर्थिक पाठबळ देणे.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चे वैशिष्ट्य –
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे आणि हा शेतकरी कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असला तरी देखील तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- शेतकऱ्यांना सदर योजनेमधून मिळणारा आर्थिक लाभा थेट त्याचे बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जाणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील 40 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करणे.
- जे शेतकरी निमित्त रित्या खर्च भरत आहेत खर्चाची परतफेड करत आहेत अशा शेतकऱ्यांना भरलेल्या रकमेच्या 25% रक्कम परत करण्यात येईल.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चे लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जातीचे सर्व धर्मातील शेतकरी असलेला नागरिक हा या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चा होणारे शेतकऱ्यांना फायदा –
- महाराष्ट्र मध्ये अवकाळी पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे किंवा गारपीट मुळे किंवा वादळामुळे जर शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल.
- वर दिलेल्या आपत्ती सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्याचे पिकाचे आर्थिक नुकसान झाले तर शेतकऱ्याला सदर योजनेअंतर्गत आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल.
- शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत आर्थिक नुकसान भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या होणारे आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
- सदर योजनेमुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल परिणामी विचार कार बद्दल शेतकरी पॉझिटिव्ह असतील.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना साठी आवश्यक पात्रता –
- जो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहे असा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे अन्यथा सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना च्या अटी आणि शर्ती –
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच पात्र ठरवू शकतो.
- महाराष्ट्राच्या बाहेरील शेतकऱ्यांना सुधार योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जासोबत रहिवासी दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठीच सीमिती योजना आहे.
- जे शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर शासकीय कर्मचारी असेल तर अशा शेतकरी कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत आर्थिक लाभ मिळवता येणार नाही.
- जो शेतकरी सदर योजनेला अर्ज करत आहे अशा शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याची बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे कारण सदर योजनेअंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभा शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटीमार्फत जमा केला जातो आणि त्यासाठी आधार आणि बँक एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्र –
- आधार कार्ड
- रेशनिंग कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- पास पोर्ट चे फोटो
- शपथ पत्र
- जमिनीची कागदपत्रे सातबारा आणि आठ अ
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- जो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करू इच्छित आहे अशा शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटचे होम पेज वरती आल्यानंतर अर्जदाराला प्रथम नवीन अर्जदाराची नोंदणी करणे गरजेचे आहे.
- नवीन अर्जदाराच्या नोंदणीचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल आणि त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती आवश्यकरीत्या भरून तुमचे नवीन अर्जदाराची नोंदणी पूर्ण होईल.
- तुम्हाला मिळालेला युजरनेम आणि पासवर्ड हे टाकून तुम्हाला परत लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करायची.
- भरलेली माहिती आणि जोडलेली कागदपत्रे बरोबर आहेत का ते पुन्हा एकदा चेक करायचे.
- आणि सेव बटनावरती क्लिक करून सबमिट करायचा.
- अशा रीतीने तुमचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज भरून होईल.
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ SHETKARI SANMAN YOJANA | छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चा उद्देश काय आहे ?
महाराष्ट्र राज्यातील गरजू आर्थिक रित्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवणी हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चे लाभार्थी कोण आहेत ?
महाराष्ट्र राज्यातील गरजू आर्थिक रित्या गरीब आणि कर्ज घेतलेले शेतकरी हे सदर योजनेचे लाभार्थी असतील.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे ?
महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे उद्देश ठेवलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दिली जाणारी आर्थिक लाभाची रक्कम कशी मिळणार आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्याला मिळणारे आर्थिक लाभाशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कोणत्या जाती किंवा कोणत्या धर्मातील शेतकऱ्यांसाठी आहे ?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे ही कोणत्याही एका जाती किंवा धर्मासाठी आरक्षित नसून ती सर्व जाती आणि धर्मातील शेतकऱ्यांसाठी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना साठीच्या प्रमुख अटी आणि शर्ती काय आहेत ?
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी नसावा, शेतकऱ्याकडे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे, शेतकऱ्याची बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चा अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत ?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड रेशनिंग कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आयडी उत्पन्नाचा दाखला बँक खात्याची झेरॉक्स पासपोर्ट साईज चे फोटो शपथ पत्र जमिनीची कागदपत्रे जसे की सातबारा आणि आठ अ इत्यादी कागदपत्रे अर्ज करताना लागतात.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना चा अर्ज कसा केला जातो ?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ला अर्ज ऑनलाईन पद्धतीने केला जातो.