DIESEL PUMP ANUDAN YOJANA | भारतासारखे कृषिप्रधान देशांमध्ये आज देखील शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत आहेत. शेतीमध्ये लागणारे विविध गोष्टींसाठी ते पारंपारिक अवजारे असतील किंवा पारंपारिक पद्धत असतील तर त्या वापरतात. जसे की ट्रॅक्टरचे ऐवजी बैल जोडा वापरणे, नवीन आलेल्या संशोधित यांत्रिकीकरणाचा कमी वापर करणे, सिंचनासाठी जुन्यात पारंपारिक पद्धतीचा वापर करणे.
आज आपण जी योजना बघणार आहोत ती शेतकरी वापरत असलेल्या सिंचन पद्धती बद्दल आहे. प्रामुख्याने शेतकरी आज देखील सिंचनासाठी पारंपारिक सारा पद्धत वापर पद्धत किंवा मोकळ पाणी सोडणे अशी पद्धत वापरतात. हळूहळू शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढत आहे जसे की ठिबक सिंचन तुषार सिंचन वापरण्याबद्दल आणि ते हळूहळू त्या दिशेने वाटचाल देखील करत आहेत. हे त्यांना पाणी घेण्याच्या बाबतीत मध्ये जर पाण्याची कमतरता ही एक मोठी अडचण आहे आणि दुसरी जर कोणती मोठी अडचण असेल तर ती आहे विजेचा लोड शेडिंग. विजेचे लोड शेडिंग असल्याकारणाने शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी ताटकळत राहावे लागते रात्री अपरात्री शिक्षिकांना पाणी द्यावे लागते तसेच सामुदायिक मी असणाऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये यावरून वादावादी देखील होतात. परिणामी याचा इम्पॅक्ट हा पिकावर ती पडतो पिकाला हानी होते परिणामी उत्पादन घटक असते.
शेतकरी शेतीसाठी विजेवर चालणारे पंप वापरत आहे. आजकाल थोडीफार जनजागृती वाढल्यामुळे सौर उर्जेवर चालणारे पंप संच देखील शेतकऱ्यांकडून वापरले जात आहेत.
परंतु लोडशेडींग मुळे विजेच्या पंपाचा वापर मर्यादित होत आहे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सौर ऊर्जा वरती चालणाऱ्या कंपन्यांची कार्यक्षमता कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अजून एक मार्ग म्हणजे डिझेलचा पंप संच वापरणे.
परंतु डिझेलचा पंपसंच घेणे शेतकऱ्याला वैयक्तिकरित्या परवडत नाही त्याचं कारण आहे त्याची महागडी किंमत त्याचा महागडा मेंटेनन्स तसेच त्याला वारंवार डिझेल टाकत राहणे हे असे भरपूर गोष्टी आहेत त्यामुळे त्याला तो पंपसंच घेणे परवडत नाही. त्यासाठीच सरकारने डिझेल पंप अनुदान योजना सुरू केलेली आहे.
या योजनेअंतर्गत सरकार हे शेतकऱ्याला डिझेलचा पंप घेण्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. याचा फायदा शेतकऱ्याला नक्कीच होणार आहे कारण शेतकरी स्वतःच्या मालकीचा डिझेल पंप घेऊ शकतो त्याला विजेवरती किंवा सौर ऊर्जा वरती अवलंबून राहण्याची गरज नाही. त्याला हव तो त्याच्या सोयीनुसार पिकाच्या गरजेनुसार पाणी देऊ शकतो. पिकाची होणारी हानी या गोष्टींमुळे कळेल आणि परिणामी पिकाचे उत्पादन वाढेल.
तर ही डिझेल पंप अनुदान योजना नेमके आहे काय याबद्दल आपण आजचा विस्तार बघणार आहोत ती योजना नेमकी काय आहे त्याच्या पात्रतेच्या आरटी काय आहेत त्याचा अर्ज कसा करायचा इत्यादी गोष्टी चला तर मग सुरु करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजना | डिझेल पंप अनुदान योजना | DIESEL PUMP ANUDAN YOJANA |
कोणी सुरू केली | कृषी विभाग महाराष्ट्र राज्य |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांना डिझेल पंप संच घेण्यासाठी 50 टक्के अनुदान पुरवणी आणि शेतीसाठी प्रोत्साहित करणे |
लाभार्थ्याची पात्रता | महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी |
योजनेतून मिळणारा लाभ | डिझेल पंप बसवण्यासाठी 50 टक्के आर्थिक अनुदान |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
DIESEL PUMP ANUDAN YOJANA चा उद्देश –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती वरती डिझेल पंप संच बसवण्यासाठी 50 टक्के अनुदान पुरवणे.
- शेतकऱ्यांपुढे असलेला विजेच्या लोड शेडिंग मुळे येणारा सिंचनाचा प्रॉब्लेम सोडवणे.
- पाण्याअभावी पिकाला होणाऱ्या नुकसानापासून वाचवणे पिकाचे संरक्षण करणे.
- महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी आत्मनिर्भर बनवणे.
- अशा विविध प्रकारच्या योजना काढून महाराष्ट्र राज्यातील इतर नागरिकांना शेतीकडे आकर्षित करणे.
- डिझेल पंप विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना इतर कोणावरही अवलंबून न राहता कोणतेही कर्ज न काढता त्यांना ते स्वतःच्या बळावरती घेण्यास मदत करणे.
- शेतकऱ्याचे सिंचनाचे असणारे प्रॉब्लेम सोडवणे आणि त्यातून शेतकऱ्याचा विकास करणे.
- शेतकऱ्याची आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
DIESEL PUMP ANUDAN YOJANA ची वैशिष्ट्ये –
- योजना कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सरकार यांनी सुरू केली आहे.
- शेतकऱ्यांच्या हिताची एक महत्त्वाकांक्षा योजना आहे याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप विकत घेण्यासाठी 50% पर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
- या योजनेचा अर्ज ऑनलाईन रित्या करता येणार आहे त्यामुळे शेतकरी तो अर्ज आपल्या घरी बसून मोबाईल वरती देखील भरू शकतो त्यामुळे ही प्रोसेस खूप सोपी आहे.
- ऑनलाइन अर्ज करायचा असल्याकारणाने शेतकरी आपल्या अर्जाची प्रक्रिया तसेच अर्ज केल्यापासून ते पात्रता आणि योजनेचा मिळणारा लाभ याच्याबद्दल वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थिती तो ऑनलाइन रित्या जाणून घेऊ शकतो.
- प्रक्रिया ऑनलाईन असल्याकारणाने या प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता आणण्यात आली आहे, कोणताही गैरव्यवहार्य प्रक्रिया अंतर्गत होत नाही.
- योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जातो.
DIESEL PUMP ANUDAN YOJANA च्या लाभार्थ्याची पात्रता –
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेला शेतकरी पाहिजे.
- महाराष्ट्र राज्यातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी फक्त या योजनेचा लाभ घेतील.
- महाराष्ट्राचे दुर्गम भागाची दुर्गम भाग आणि आदिवासी भागातील शेतकरी योजना साठी पात्र ठरतील.
- ज्या शेतापर्यंत वीज कनेक्शनची जोडणी झालेली नाही अशा शेताचे मालक असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.
- ज्या शेतकऱ्यांनी महावितरण कडे नवीन वीज कनेक्शन साठी पैसे भरलेले आहेत परंतु ते प्रलंबित प्रकरण आहे असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतासाठी वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे आहे किंवा त्यांच्या शेताच्या शेजारून नदी ओढा वाहत आहे किंवा विहीर आहे अशी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्र राज्यात अशी काही गावे आहेत या गावात विद्युतीकरण झालेले नाही कारण त्या ठिकाणी वनविभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नसते अशा गावातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील.
- या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत कृषी पंप पाच लाभ घेतलेल्या नाही असे शेतकरी योजना साठी पात्र आहेत.
- शेतात विद्युत पंप कृषी पंप किंवा डिझेल पंप असे कोणत्याही प्रकारचे पंप बसवण्यासाठी आर्थिकरित्या सक्षम असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
DIESEL PUMP ANUDAN YOJANA अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ-
- या योजनेअंतर्गत जे अर्जदार पात्र ठरतील अशा अर्जदारांना डिझेल कंपाऊंड योजनेअंतर्गत शासनाकडून 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
- उर्वरित पन्नास टक्के रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्याला स्वतःच्या पदराची भरणे गरजेचे आहे.
- ५ एचपीच्या पंपासाठी पंधरा हजार रुपये, पाच ते दहा एचपी पर्यंतच्या डिझेल पंपासाठी 20000 रुपये दहा एचपी पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या डिझेल पंपासाठी ३० ००० रुपये इतक्या अनुदान देण्यात येते.
DIESEL PUMP ANUDAN YOJANA चा फायदा –
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना डिझेल पंप बसवण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्यात येत आहे.
- डिझेल पंप बसवल्यानंतर शेतकऱ्यांना विजेवरती अवलंबून राहावा लागणार नाही.
- लोडशेडिंगच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांच्या पिकाच्या सिंचनाच्या टाईम टेबल मध्ये फरक पडणार नाही त्यांच्या पिकांना नियमित रित्या पाणी मिळेल.
- नियमित पाण्याची सोय झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारा नुकसान थांबेल परिणामी शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल.
- योजनेमुळे शेतकरी आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
- डिझेल पंप च्या वापरामुळे विजे वरील ताण कमी होईल.
- लोड शेडिंग च्या कारणाने पाणी उपलब्ध नसणे ही समस्या दूर होऊन पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.
DIESEL PUMP ANUDAN YOJANA च्या अटी-
- फक्त महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरचे शेतकरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याच्या नावावरती शेतजमीन आहे असे शेतकरी फक्त या योजनेसाठी लाभ घेऊ शकते.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अगोदर पासून वीज विद्युत कनेक्शन आहे आणि ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.
- एक शेतकरी फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- डिझेल पंप संशय फक्त विकत घेण्यासाठी अनुदान देण्यात येईल त्याच्या मेंटेनन्सचा खर्च त्याच्या सुरक्षा जबाबदारी पूर्णपणे त्याला भारतीय शेतकऱ्याची राहील.
- अर्जदार शेतकरी त्याच्या शेतामध्ये पाण्याचा स्त्रोत आहे का या गोष्टीची हमी केल्यानंतरच सरकार त्याला या योजनेचा लाभासाठी ग्राह्य धरेल.
- अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याने जर या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही पंपा संचेच्या योजनेचा जर लाभ घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
- जर अर्जदार शेतकरी हा शेत जमिनीमध्ये अर्धा मालक असेल तर त्याला सहहिसीदाराची ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
- योजना अंतर्गत मिळणारे अनुदान ही डिझेल पंपसंचाच्या रकमेच्या 50% आहे उर्वरित पन्नास टक्के शेतकऱ्याने स्वतः भरणे गरजेचे आहे.
डिझेल पंप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटोज
- अर्जदाराचे बँक खात्याचा तपशील
- जमिनीचा सातबारा आणि उतारा
- शपथ पत्र
- सहहिसेदार चे ना हरकत प्रमाणपत्र जर जमिनीचे मालक हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील तर.
डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज कसा करायचा –
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत – .
- आपले सरकार महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईट वरती शेतकऱ्याला भेट द्यावी लागेल.
- आधार कार्ड किंवा युजरनेम पासवर्ड च्या सहाय्याने लॉगिन करायचे.
- जर लॉगिन क्रिएट नसेल तर नवीन अकाउंट उघडायचे.
- लॉगिन केल्यावर तिचा नवीन एक पेज दिसेल त्या पेज वरती तुम्हाला अर्ज करा या बटणावर क्लिक करायचे आहे.
- नंतर च्या पेज वरती कृषी यांत्रिकीकरण या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- नवीन पेज वरती तुम्हाला डिझेल पंप पाव अनुदान योजनेचा अर्ज दिसेल त्याच्यावरती क्लिक करून अर्ज ओपन होईल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि अर्ज सबमिट करायचा.
- त्यानंतर तुम्हाला नेट बँकिंग द्वारे 23 रुपये रक्कम ही अर्जाची रक्कम भरायची आहे.
- असे रीतीने तुमचा ऑनलाईन रित्या अर्ज भरून होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत –
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जायचे आहे.
- तिथून डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज मागवून घ्यायचा, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
- तो संपूर्ण भरलेला अर्ज कृषी विभागामध्ये जमा करायचा.
- अशा रीतीने तुमचा ऑफलाइनरीत्या अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.