GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA | शेतात काम करत असताना शेतकऱ्यांचे छोटे-मोठे अपघात होत असतात, त्या मध्ये सर्प दंश, वीज पडणे, पुर येणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, अशा प्रकारच्या आपघातांचा समावेश असतो. जर एखाद्या शेतकरी कुटुंबाला आपला कर्ता व्यक्ति अशा अपघात मध्ये गमवावा लागला तर त्याच्या पश्चात येणाऱ्या वेग वेगळ्या अडचणी, आर्थिक अडचणी ना कमी करण्या साठी महाराष्ट्र राज्य शासनाने खास शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना चालू केली आहे. या योजनेला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव देण्यात आले आहे, “ गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना” अशे या योजनेचे नाव आहे.
या योजनेद्वारे शेतात काम करत असताना शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला २ लक्ष रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. जर अशा प्रकारच्या आपघटमध्ये शेतकऱ्याला जर कायम स्वरूपी चे अपंगत्व आल्यास १ लक्ष रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
यो योजनेचे अटी, निकष, फायदे, कागदपत्रे , इत्यादि गोष्टी आपण या लेखात पुढे बघणार आहेच.
GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA |गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे उद्दिष्टे-
- महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये योजनेमध्ये काही बदल केल त्यानुसार या योजनेचे नाव-“गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे ठेवण्यात आले आहे.
- या योजनेमध्ये नवीन बदल नुसार विम्याची रक्कम आणि एकूण लाभ मध्ये वाढ करण्यात आली आहे.
- जुन्या परिपत्राकणूसार या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे बंधनकारक होते, परंतु नवीन बदल केल्या नंतर जमीन नावावर असण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. यामुळे शेतात काम करणारे भूमिहीन मजुरांना या योजनेचा लाभ घेत येईल.
- या योजने अंतर्गत कुटुंबातील दोन व्यक्ति विमा संरक्षित होतात. यामध्ये आई-वडील, पती -पत्नी , मुलगा किंवा अविवाहित मुलगी यांच्या पैकी एक जन विमा संरक्षित कर्ता येवू शकतो.
- महाराष्ट्र शासन स्वत: आता विम्याचा लाभ देणार आहे, विमा कंपणीनच हस्तक्षेप काढून टाकण्यात आला आहे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकारींना जर शेतात काम करत असताना काही अपघात झाला आणि त्या मध्ये त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा अपांगत्व आले तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- अपघाता नंतर शेतकऱ्याच्या कुटुंबाला सामोरे जाव्या लागणाऱ्या आर्थिक नुकसणी पासून संरक्षण देणे.
GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA | गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने मधून दिला जाणारा लाभ-
अपघाताची बाब | नुकसान भरपाई |
अपघातात मृत्यू झाल्यास | २ लाख रुपये |
अपघाता मुळे जर दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास | २ लाख रुपये |
अपघाता मुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास | १ लाख रुपये |
GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA | गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने साठी पात्रता-
- शेतजमीन नावावर असलेला शेतकरी या योजनेसाठी पात्र राहू शकतो.
- शेतकरी कुटुंबातील च पन ७/१२ वर नाव नाही, असा १ सदस्य या योजनेसाठी पात्र आहे.
- शेतकरी व त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेत येईल, त्यामध्ये शेतकऱ्याची आई – वडील, पत्नी, मुलगा किंवा अविवाहित मूलगी यांच्या पैकी कोणतापण एक व्यक्त विमा संरक्षित होवू शकतो. त्या संबंधित व्यक्ति चे वय १० वर्षे ते ७५ वर्षे याच्या मध्ये असणे बंधनकारक आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने मध्ये खालील कारणांनी अपघात झाल्यास विमा संरक्षण दिले जाते-
- विजेचा शॉक लागून मृत्यू किंवा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्यास
- नैसर्गिक आपत्ति जसे की पुरामध्ये मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास,
- शेतात काम करत असताना सर्प दंश होणे, विंचू दंश होणे.
- वाहन अपघात, रस्त्यावरील अपघात, रेल्वे मध्ये अपघात उंचीवरुन पडून जर अपघात झाला तर
- खून होणे, दंगली मध्ये मृत्यू, नक्षलवाद्यांचा हल्ला होवून मृत्यू होणे.
- शेतात लागणरी किटाकणशके हातळतान विषबाधा वगेरे झाली तर
- रानटी, जंगली हिंस्र प्राणी हल्ला झाला व चावा काढला व त्यामध्ये मृत्यू झाला तर.
खालील कारणांनी मृत्युं व अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला विम्याची भरपाई दिली जाणार नाही.
- नैसर्गिक रित्या मृत्यू होणे.
- विमा काढण्या अगोदर च अपंगत्व असेल तर
- आत्महत्या करणे किंवा आत्महत्ये च्या प्रयत्नात अपंगत्व येणे
- स्वताला जाणून बुजून इजा / जखमी करून घेणे.
- अमली पदार्थांच्या सेवण करून त्या नशेत असताना झालेला अपघात
- मोटर शर्यतीतील अपघात
- सैन्यातील नोकरी व युद्धात झालेला मृत्यू किंवा अपंगत्व येईल असा अपघात
- गुन्हा करायचं उद्देशाने जर कायद्याचे उल्लंघन करताना अपघात झाला तर
- जवळच्या लाभार्थी कडून किंवा वारसा कडून खून
- शरीर अंतर्गत रक्तस्त्राव
- भ्रमिष्टपणा
GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA |गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने च्या अटी व शर्ती-
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे व तसा रहिवाशी दाखला त्याच्या कडे असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे त्यामुळे राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शेतकरी व शेतकरी कुटुंबातील व्यक्ति च फक्त या योजनेचा लाभ गहेवू शकतो व त्या साठी अर्ज करू शकतो.
- अर्ज करणार व्यक्ति हा वय वर्षे १० ते ७५ या मधील असणे बंधणकारक आहे.
- महाराष्ट्र शासन कडून चालू असलेल्या फक्त एका च अपघात ग्रस्त योजने चा लाभ घेता येईल.त्यामुळे अर्जदार किंवा त्याचा वारसदार ने जर दुसऱ्या अपघात ग्रस्त योजनेचा लाभ घेतला असेल तर ती व्यक्ति या योजने साठी पात्र ठरत नाही.
- विमा कालावधी संपल्या नंतर जर दावा करायचं असेल तर तो ३० दिवसाच्या यात करणे बंधन कारक आहे अन्यथा आर्थिक मदत दिली जात नाही.
दावा सादर करण्याचा कालावधी-
- विमा चालू असताना कालावधी मध्ये अपघात झाल्याच्या ३० दिवसात दावा करावा लागतो. आणि विमा कालावधी संपल्या नंतर देखील तुम्ही ३० दिवसाच्या आत दावा दाखल करू शकता.
दावा सादर करण्या साठी आवश्यक कागदपत्रे-
- आधार कार्ड / पॅन कार्ड / बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र
- ७/१२ उतारा
- मृत्यूचा दाखला
- रेशन कार्ड / वीज बिल
- शेतकरी असल्याचा दाखला
- अपघात ग्रस्त च्या वयाचा पुरावा- जन्म दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला / शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र / आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन परवाना / निवडणूक ओळखपत्र / ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स, कॅन्सल चेक.
- अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल, किंवा पोलिस पाटील अहवाल, घटना स्थळा चा पंचनामा.
- पासपोर्ट साईज फोटो
- पोलिसानी दिलेली FIR कॉपी
- कृषि अधिकारी पत्र
- औषध उपचाराची सर्व कागदपत्र
- डॉक्टरने दिलेले डिस्चार्ज कार्ड.
विविध अपघातांसाठी पुरावा म्हणून खालील कागदपत्रे जोडावी लागतील.
अपघाताचे स्वरूप | आवश्यक कागदपत्रे |
रेल्वे-रस्ता अपघात | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, वाहन चालवत असताना अपघात झाल्यास वैध वाहन परवाना. |
पाण्या मध्ये बुडून मृत्यू | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल, क्षतिपूर्ती बंधपत्र |
किटाकनाशके किंवा अन्य कारणांमुळे विष बाधा | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल |
विजेचा धक्का किंवा वीज पडून मृत्यू | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल |
खून | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल, दोषारोप पत्र |
उंचीवरुन पडून मृत्यू झालेला | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल |
सर्पदंश/विंचूदंश | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल (वैद्यकीय उपचारपूर्वी निधन झाल्याने पोस्ट मार्टम झाले नसल्यास या अहवाल तुण सूट) वैद्यकीय अधिकार्याचे प्रमाण पत्र, शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्य कडून प्रती स्वाक्षरीत असणे आवश्यक आहे. |
नक्षल वाद्यांकडून झालेल्या हत्ये मध्ये | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, नक्षल वादी हत्ये संदर्भात कार्यालयीन कागदपत्र |
जनावरांच्या चाव्या मुळे रेबिज होवून मृत्यू झाल्यास | औषध उपचाराची कागदपत्रे |
जनावरांच्या हल्ल्यात / चाव्या मुळे जखमी होवून मृत्यू झाल्यास | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल |
जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होवून शव / डेड बॉडी न मिळणे. | क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक |
दंगल | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, दंगली बाबतीत कार्यालयीन कागदपत्र |
अन्य कोणताही अपघात | इन्कवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, पोलिस अंतिम अहवाल |
अपंगत्वाचा लाभ घ्यायचा असल्यास | अपंगत्व बाबत डॉक्टर चे प्रमाण पत्र प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतीस्वाक्षरी सह कायम अपंगत्वचे प्रमाण पत्र |
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत विम्याचा दावा अर्ज करण्याची पद्धत –
- शेतकऱ्याचा अपघात झाल्या पासून शेतकरी किंवा त्याच्या वारसदाराने ३० दिवसाच्या आत दावा अर्ज व आवश्यक कागदपत्रे गहेवून तालुका कृषि अधिकारी यांच्या कडे जमा करणे.
GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA |दावा अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे-
- अर्जदार शेतकरी कुटुंबातील नसल्यास
- अर्जदार महाराष्ट्र चा रहिवाशी नसल्यास
- अर्जदारला अपंगत्व ही आत्महत्ये चा प्रयत्न करताना आले असल्यास
- अर्जातिल माहिती खोटी आहे ही आढळून आल्यास
- आवश्यक कागदपत्र जोडले नसल्यास
- योजनेच्या अटी व शर्ती पाळल्या नसल्यास देखील अर्ज बाद केला जाऊ शकतो.
दावा अर्ज करताना खालील गोष्टींची काळजी घ्या-
- GOPINATH MUNDE APGHAT VIMA YOJANA | योजनेचे सगळी अटी व शर्ती पुनः एकदा तपसून घ्या व आपण सर्व निकष मध्ये बसतो का ते बघा.
- सर्व आवश्यक कागद पत्र दावा अर्जा सोबत जोडा.
- अर्जा मध्ये खोटी माहिती भरू नका.
सूचना- कोणत्याही योजने च्या अटी व निकष मध्ये वेळो वेळी बदल होत असतात, अचूक माहिती साठी आपल्या जवळच्या तालुका कृषि अधिकारी यांच्या शी संपर्क साधावा.