इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना | INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | आज जर आपण बघितलं तर समाजामध्ये विधवा महिलांना जगणं खूपच कठीण आहे. महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांना तिथून पुढचे जीवन जगण्यासाठी खूप सार्‍या समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्यांपैकी सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या समस्या असतात. त्यांना आरोग्याच्या समस्याला देखील स्वतःला एकट्याला सामोरे जावे लागते.

महत्वाचे म्हणजे त्यांच्या आयुष्यात जगण्याचा एक आधार म्हणजे त्यांचा पती हा त्यांनी गमावलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तिथून पुढचे जीवन स्वतःला एकट्याला काढायचे असते. त्यांना सामोरे जावे लागणार या विविध समस्यांना तोडगा म्हणून केंद्र शासनाने राज्य शासन यांच्या  संयुक्त विद्यमानाने एक योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचे नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना.

ही तर एक केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दर महिन्याला एक निवृत्ती वेतन दिले जाते. त्यामध्ये केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रति महिना आणि राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 400 रुपये प्रति महिना असे एकूण 600 रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. चला तर मग आपण आज या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया जसे की या योजनेसाठी पात्रता काय आहे या योजनेचा आर्थिक लाभ कोणत्या परिस्थितीमध्ये दिला जातो आणि कशाप्रकारे दिला जातो त्यानंतर या योजनेचा अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात वगैरे यासारख्या सर्व गोष्टी आपण सविस्तर मध्ये बघूया.


योजनेचे नावइंदिरा गांधी  राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना | INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA
योजनेचा प्रकारकेंद्र शासन पुरस्कृत
उद्देशमहाराष्ट्रतिल विधवा महिलाना आर्थिक सहाय्य देणे.
लाभार्थीमहाराष्ट्रातील विधवा महिला
अर्ज कसा करायचाऑनलाइन / ऑफलाइन

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA

Table of Contents

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना दर महिन्याला आर्थिक रुपी निवृत्ती वेतन देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील निराधार विधवा महिलांना आर्थिक सामर्थ्य देऊन स्वावलंबी बनवणे आत्मनिर्भर बनवणे.

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये

  • इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मार्फत दिला जाणारा आर्थिक लाभ लाभार्थीच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पुरवला जातो.
  • इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना ही सर्व प्रवर्गातील विधवा महिलांसाठी खुली आहे, यामध्ये कोणत्याही विशिष्ट प्रवर्गाला आरक्षण नाही.

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी पेन्शन योजना मार्फत दिले जाणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे

केंद्र शासना मार्फत आर्थिक लाभराज्य शासना मार्फत आर्थिक लाभएकूण आर्थिक लाभ
२०० /- रुपये प्रती महिना४०० /- रुपये प्रती महिना६०० /- रुपये प्रती महिना

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची पात्रता

  • दारिद्र रेषेखालील विधवा महिला
  • 40 ते 65 वर्षे वयोगटातील विधवा महिला
  • महाराष्ट्र किंवा भारताचे रहिवासी असलेली विधवा महिला

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा फायदा –

  • या योजनेअंतर्गत व महिलांना आर्थिक रित्या आत्मनिर्भर बनवले जाते.
  • या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दर महिन्याला सहाशे रुपये इतका आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जातो.

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेच्या अटी आणि शर्ती

  • दारिद्र्यरेषेखालील  कुटुंबात असलेली विधवा महिला या योजनेसाठी पात्र राहील.
  • अर्ज करत असलेली विधवा महिला हिचे वय 40 ते 65 वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे.
  • चाळीस वर्षे पेक्षा कमी असलेल्या महिला किंवा 65 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्ज करीत असलेली महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे कारण या योजनेचा आर्थिक लाभ हा थेट डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये जमा केला जातो. झोप आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर त्या लाभार्थीला या योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही.
  • एकदा अर्ज केल्यानंतर या योजनेचा निर्णय प्रक्रियेस तीन महिन्याचा कालावधी लागतो.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना अर्ज करत असताना लागणारी कागदपत्रे

  • इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा अर्ज
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रेशन कार्ड
  • पतीच्या मृत्यूचा दाखला जो की ग्रामसेवक किंवा नगरपालिके यांनी दिलेला असेल
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी दाखला
  • दारिद्र्यरेषेखालील असलेले प्रमाणपत्र किंवा पिवळे रेशन कार्ड ग्राह्य धरले जाईल
  • प्रतिज्ञापत्र

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • इंदिरा गांधी युद्ध पेन्शन योजनेचा अर्ज ऑफलाईन रित्या करायचा असतो.
  • अर्ज करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला आपल्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या योजनेची चौकशी करायची आहे.
  • संबंधित विभागाकडून इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा अर्ज घ्यायचा.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
  • तयार केलेला अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून बघायची.
  • पुन्हा एकदा तपासलेला अर्ज आणि कागदपत्रे ही त्याच कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचे.
  • अशा रीतीने इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा तुमचा अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | अर्ज निवडीची प्रक्रिया –

  • अर्जाची निवड प्रक्रियेला तीन महिन्याचा कालावधी लागतो.
  • एकदा का अर्ज केला की दोन महिन्याच्या आत तलाठी किंवा चौकशी अधिकाऱ्यांच्या मार्फत अर्जावरती सखोल चौकशी करून त्याच्या कागदपत्राची छाननी केली जाते आणि त्यानंतर जे अचूक अर्ज आहेत असे अर्ज मीटिंगमध्ये मंजुरीला पाठवले जातात.
  • या योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादीही संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये नगरपंचायतीमध्ये किंवा महानगरपालिका प्रभागाच्या कार्यालयांमध्ये लावण्यात येते.
  • जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंजूर झालेले लाभार्थ्यांची यादी ही वेबसाईट वरती टाकण्यात येते.
  • इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थ्यांचे अर्ज हे फक्त माहितीच्या हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या समिती समोर सादर केले जातात.
  • या समितीची या अर्जांना मंजुरी असणे गरजेचे नाही.
  • पात्र अर्जदाराला पेन्शन मंजूर केली जाते.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचे आर्थिक सहाय्यक कसे मंजूर होते

  • या योजनेसाठी आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मंजूर केले जाते. दर तीन महिन्यांनी नवीन लाभार्थ्यांची यादी सरकारला जमा करणे बंधनकारक आहे.

लाभार्थी हयात असल्याची तपासणी वर्षातून एकदा खालील प्रमाणे केली जाते-

  • हयात असल्याची तपासणी करण्यासाठी लाभार्थीला प्रत्येक वर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च हा कालावधी दिला जातो.
  • या कालावधी दरम्यान लाभार्थीने आपल्या बँकेमध्ये ज्या बँक मध्ये त्याचे खाते आहे अशा बँक मध्ये मॅनेजर कडे जाऊन हयात असल्याची नोंद करायची आहे किंवा आपल्या गावच्या पोस्ट मास्तर कडे जाऊन हयात असल्याची नोंद करणे बंधनकारक आहे.
  • जर लाभार्थी काही कारणास्तव हयात असल्याची नोंद करून घेऊ शकला नाही तर त्यानंतर त्याने आपल्या संबंधित नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन स्वतः हजर राहून हयात असल्याची नोंद करून घेणे गरजेचे आहे आणि ते प्रमाणपत्र तहसीलदारांकडे जमा करणे गरजेचे आहे.
  • जर लाभार्थीने आयात प्रमाणपत्र जमा केले नाही तर एक एप्रिल नंतर पासूनचे मिळणारा योजनेचा लाभ बंद केला जाईल.
  • फक्त माहिती करता अशा प्रकारे जमा झालेली आहेत प्रमाणपत्रही तहसीलदार कार्यालयाकडून फाईल मध्ये रेकॉर्ड साठी ठेवली जातात.

INDIRA GANDHI VIDHAVA PENSION YOJANA | लाभार्थी चा मृत्यू झाल्यानंतर काय होते

  • लाभार्थी मृत्यू पावल्यानंतर त्या संबंधित गावातील ग्रामसेवकांनी किंवा नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी अशी बातमी तहसीलदारांना किंवा नायब तहसीलदारांना देणे बंधनकारक आहे.
  • दिलदार वनायक तहसीलदार या गोष्टीची नोंद घेऊन तिथून पुढचे आर्थिक लाभ देणे बंद करतात.
  • लाभार्थी व्यक्तीच्या मृत्यु दिनांक पर्यंत जर काही योजनेची लाभाची थकबाकी देणे बाकी असेल तर ती थकबाकी लाभार्थीच्या वारसदारास दिली जाते.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना कधी सुरू करण्यात आली ?

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना ही 2009 मध्ये सुरू करण्यात आली.

ही योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?

योजना केंद्र शासन यांच्यामार्फत सुरू करण्यात आली.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा उद्देश काय आहे ?

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा उद्देश हा समाजातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे आहे.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना मार्फत किती रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो ?

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेअंतर्गत प्रति महिना 600 रुपये इतक्या रकमेचा आर्थिक लाभ दिला जातो.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेमध्ये दिला जाणारा आर्थिक लाभ हा कोणामार्फत देण्यात येतो ?

या योजनेमध्ये दिला जाणारा आर्थिक लाभ हा केंद्र शासनाकडून 200 रुपये प्रति महिना राज्य शासनाकडून चारशे रुपये प्रति महिना असा मिळून एकूण सहाशे रुपये प्रति महिना असा आर्थिक लाभ दिला जातो.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची पात्रता काय आहे ?

अर्ज करत असलेली व्यक्ती ही विधवा असणे गरजेचे आहे तसेच ती दारिद्र रेषेखालील कुटुंबातील असणे गरजेचे आहे, त्या अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे वय हे 45 ते 65 वर्षे यादरम्यान असणे बंधनकारक आहे. तसेच ती अर्जदार व्यक्ती भारताची नागरिक असणे गरजेचे आहे.

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा आर्थिक लाभ कुठे आणि कसा मिळतो ?

इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेचा मिळणारा आर्थिक लाभ लाभार्थीच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेचा अर्ज भरल्यानंतर किती कार्यकाळात आर्थिक लाभ मिळणे चालू होते ?

एकदा अर्ज भरल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीनंतर आर्थिक लाभ मिळणे सुरू होते.