JANANI SURAKSHA YOJANA | भारतामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यांमध्ये दररोज कितीतरी नवीन लहान मुलं जन्माला येत असतात. तिला मूल जन्माला येण्यामागे त्या मुलाच्या आई वडिलांचा खूप मोठा त्याग आणि परिश्रम असतो. खास करून आर्थिक रित्या गरीब कुटुंबांमध्ये असणाऱ्या गरोदर माता यांना गरीब परिस्थितीमुळे खूप साऱ्या गोष्टींनी सामोरे जावे लागते.
त्यामध्ये औषधोपचार वेळेवरती न मिळणे प्रसुती बद्दल योग्य ते मार्गदर्शन नसणे पोषक आहार न मिळणे इत्यादी भरपूर अशी अडचणी त्यांना सामोरे जावे लागते. आणि परिणामी याचा परिणाम हा त्या लहान नवजात बालकावरती होत असतो. जर पोषक आहार मिळाला नाहीत आणि व्यवस्थित रित्या गरोदर काळांमधील काळजी नाही घेतली तर लहान मुले कुपोषित जन्माला येऊ शकते किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त अशा परिस्थितीमध्ये जन्माला येऊ शकते. परिणामी त्या गरोदर मातेचा किंवा त्यांना उजात बालकाचा किंवा दोन्हींचाही मृत्यू प्रसूतीदरम्यान होण्याची चान्सेस वाढतात.
तर यावरील सर्व अडचणी कमी करण्यासाठी आणि गरोदर माता आणि नवजात बालकांचा मृत्यू दर कमी व्हावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असतो. अशीच एक योजना सध्या कार्यरत आहे त्या योजनेचे नाव आहे जननी सुरक्षा योजना.
तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला सहा हजार रुपये आर्थिक लाभ हा तिच्या पोषक आहारासाठी आणि प्रसुती दरम्यान काळजी घेण्यासाठी दिला जातो. याचबरोबर अजून खूप साऱ्या सुविधा आणि या योजनेअंतर्गत देण्यात येतात.
तर JANANI SURAKSHA YOJANA ही योजना नेमकी काय आहे या योजनेचे पात्रतेच्या अटी काय आहेत योजना कोणासाठी आहे योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली आणि या योजनेतून मिळणारा लाभ काय आहे तो कसा मिळतो त्यासाठी अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | जननी सुरक्षा योजना | JANANI SURAKSHA YOJANA |
योजना सुरू करण्यामागचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील गर्भवती महिलांना पोषक आहार पुरवणे |
योजनेची लाभार्थी कोण | देशातील किंवा राज्यातील गर्भवती महिला |
योजनेतून मिळणाऱ्या लाभ | गर्भवती महिलांना 6000 रुपयांचे आर्थिक अनुदान |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मधील गर्भवती महिलांना आणि त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार पुरवणे.
- महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखाली गरीब कुटुंबातील गर्भवती महिला आणि त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार पुरवणे.
- गर्भवती महिला च्या आरोग्याची काळजी घेणे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या गर्भवती माता किंवा त्यांची जी लहान बालके आहेत त्यांचे होणारे मृत्यूचे प्रमाण रोकने.
- घरगुती करण्यात येणाऱ्या प्रसूती थांबवणे.
- गरोदरपणामध्ये आर्थिक गरिबीमुळे कोणत्याही गर्भवती स्त्रीला पौष्टिक आहारापासून वंचित राहता कामा नये या गोष्टीचे काळजी घेणे हा एक महत्त्वाचा उद्देश या योजनेचा आहे.
- नवीन जन्मलेल्या बालकांना पोषक आहार पुरवणी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांना पुरेसे पोषण मिळेल या गोष्टीची काळजी घेणे हा एक या योजनेचा आहे.
- प्रसूतीनंतर गरोदर महिला आणि त्यांचे नवीन जन्मलेल्या लहान मुलाची काळजी घेणे.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेचे वैशिष्ट्ये –
- जननी सुरक्षा योजनेची सुरुवात ही केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना या अभियाना अंतर्गत करण्यात आलेली आहे.
- सदर योजनेसाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी सोळाशे कोटी रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात येते.
- सदरची योजना ही सर्व जाती धर्मातील गरोदर स्त्रियांसाठी खुली आहे.
- सदरच्या योजनेअंतर्गत जो आर्थिक लाभ दिला जातो तो गरोदर महिलेच्या थेट बँकांच्या जमा केला जातो.
- जननी सुरक्षा योजना अंतर्गत गरोदर महिला आणि नवजात बालकांचे पोषण चांगले व्हावे त्यांना आरोग्य संरक्षण मिळावं आणि त्यांचे मृत्यूचा दर कमी व्हावा हे एक लक्ष ठेवण्यात आलेले आहे.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य –
- ग्रामीण भागातील महिलेची प्रसूतीनंतर सात दिवसाच्या आत मध्ये तिला सातशे रुपयांचा धनादेश हा दिला जातो त्यासाठी त्या महिलेची प्रसूती शासकीय किंवा निम शासकीय आरोग्य संस्थेत झालेली पाहिजे.
- शरीरातील गर्भवती महिलेची प्रसूती शासकीय किंवा निम शासकीय आरोग्य संस्थेमध्ये झाली असेल तर त्या महिलेला सात दिवसाच्या आत मध्ये प्रसूतीनंतर सहाशे रुपयांचा चेक किंवा खात्यामध्ये पैसे जमा केले जातील.
- जर एखाद्या दारिद्र्यरेषेखालील महिलेची प्रसूती घरगुती रित्या करण्यात आली तर त्या महिलेला पाचशे रुपये इतकी रक्कम प्रसूतीच्या नंतरच्या सात दिवसाच्या आत मध्ये देण्यात येते.
- जर गर्भवती महिलेची प्रसूती ही सिजेरियन पद्धतीने झाली तर तिला पंधराशे रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.
- सरकारी रुग्णालयामध्ये ज्या महिलांची प्रसूती होते अशा महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पाच हजार रुपये रक्कम आर्थिक लाभ होऊन दिला जातो.
- प्रसूतीनंतर महिला आणि तिच्या नवजात बालकांना लसीकरणाच्या वेळोवेळीच्या बातम्या या पाच वर्षांपर्यंत दिल्या जातात.
- नऊ सात बालके पाच वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रकारच्या लस या सरकारी रुग्णालयात सरकारकडून मोफत रित्या दिल्या जातात.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेअंतर्गत योजनेची लाभार्थ –
- महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या सर्व जाती धर्मातील महिला या सदरच्या योजनेसाठी पात्र आहेत.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेचा फायदा –
- प्रसुतीनंतर गरोदर महिला सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत.
- गरोदर महिलेला सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत प्रसूती शस्त्रक्रिया मोफत उपचार मोफत सर्व टेस्ट केला जातो.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेसाठी आवश्यक पात्रता-
- योजना ही संपूर्ण देशातील महिलांसाठी आहे पण ती महिला ज्या राज्यातून या योजनेसाठी अर्ज करत आहे त्या राज्याची ती मुळाची रहिवासी असणे आवश्यक आहे.
JANANI SURAKSHA YOJANA | जननी सुरक्षा योजनेसाठी अटी आणि शर्ती –
- ज्या गरोदर महिला सदरच्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा महिलेचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.
- जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा गरोदर महिलेच्या पहिल्या दोन अपत्यान पुरता देण्यात येतो.
- महिलेला तिसऱ्या अपत्यासाठी सदरच्या योजनेचा लाभ देता येणार नाही परंतु जर ती तिसऱ्या पत्त्यानंतर ऑपरेशन करणार असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
- जननी सुरक्षा योजना अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा जर महिलेची प्रसूती ही सरकारी रुग्णालयात किंवा सरकारने नेमून दिलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये झाले असेल तर देण्यात येईल.
- सदरच्या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक लाभाजी रक्कम ही त्या गरोदर महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते त्यामुळे त्या महिलेने आपले बँक डिटेल्स पुरवणी गरजेचे आहे.
- जर दुर्दैवाने प्रसूती दरम्यान आपत्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीमध्ये सदर योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारचा लाभ गरोदर महिला मिळत नाही.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था –
- ग्रामीण भाग – प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आणि काही जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मानांकित केलेली खाजगी रुग्णालय.
- शहरी भाग – वैद्यकीय महाविद्यालय नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या क्षेत्रातील आरोग्य केंद्र नागरिक कुटुंब कल्याण केंद्र त्यांच्याकडे लिहितो रुग्णालय शासन अनुदानित रुग्णालय.
जननी सुरक्षा योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साई चे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- आरोग्य केंद्राचे कार्ड
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आरोग्य सेविकांचे कार्य पुढील प्रमाणे-
- आरोग्य सेविका किंवा आशा वर्कर यांचा या जननी सुरक्षा योजनेमध्ये खूप मोठा हातभार आहे. आशा वर्करची जबाबदारी असते की जननी सुरक्षा योजनेमध्ये गर्भवती मातेची नोंद करायची आणि तिला या योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंत सर्व गोष्टींची पूर्तता या आशा वर्कर्स काम आहे.
- सदर योजनेसाठी गर्भवती महिलेचे नाव नोंदणीकरण हे आशा वर्कर च्या मार्फत केले जाते.
- नाव नोंदणीनंतर जननी सुरक्षा कार्ड मिळते आणि जनसुरक्षा योजनेचा अर्ज या आशा वर्कर मार्फत भरला जातो.
- गरोदर काळामध्ये मातेने आहार कसा समतोल ठेवावा कोणते पौष्टिक गोष्टी खाव्यात कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींनी बद्दलची माहिती प्रशिक्षण आशा वर्कर मार्फत पुरवले जाते.
- कसोटी पूर्वीच्या सर्व चाचण्या लसीकरणाची माहिती जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा वर्कर मार्फत पुरवले जाते.
- गर्भवती महिला लसीकरण आणि लोहयुक्त गोळ्या मिळवून देण्याची जबाबदारी आशा वर्करची आहे.
- जर गरोदर महिला इकडे स्वतःचे बँक अकाउंट असेल तर ते बँक अकाउंट ओपन करायला मदत आशा वर्कर मार्फत केली जाते.
- गरोदर महिलेला आरोग्य संस्थेमध्ये प्रसूती करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा वर्कर्सना मिळणारा आर्थिक लाभ –
- जननी सुरक्षा योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिलेला तिची प्रसूती रुग्णालयांमध्ये करण्यात यावी यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल एकूण सहाशे रुपयांचे मानधन देण्यात येते त्यापैकी तीनशे रुपये चे मानधन हे प्रसादीपूर्वक देण्यात येते आणि उर्वरित तीनशे रुपयांची मानधन हे प्रसूती पश्चात प्रसूती रुग्णालयात झाली या गोष्टीचे स्पष्टता मिळाल्यानंतर देण्यात येते.
- शहरी भागाकरिता आशा वर्कर ला प्रति महिलेप्रमाणे चारशे रुपये आर्थिक अनुदान किंवा मानधन देण्यात येते त्यातील दोनशे रुपये हे प्रसूची पूर्व मानधन देण्यात येते आणि दोनशे रुपये हे प्रसूती पश्चात मानधन आशा वर्कर ला दिले जाते.
जननी सुरक्षा योजनेचा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- जनसुरक्षा योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेला कोणत्याही सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही.
- महिला ज्या रुग्णालयात प्रसुती तपासणी करत आहे अशा रुग्णालयातील सेविका या सदरच्या योजनेचा अर्ज भरत असतात.
- गर्भवती महिला फक्त आवश्यक कागदपत्रे त्या रुग्णालयातील सेविकाला नेऊन देणे एवढेच काम आहे.