KADABA KUTTI MACHINE YOJANA | आपल्या महाराष्ट्र मध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि शेती सोबतच जोडधंदा म्हणून जास्तीत जास्त शेतकरी जो व्यवसाय करता तो म्हणजे पशुपालनाचा व्यवसाय. शेतीचा प्रमुख व्यवसाय असेल किंवा एक नंबरचा व्यवसाय असेल तर पशुपालन हा नक्कीच क्रमवारीमध्ये दुसरा प्रमुख असणारा व्यवसाय आहे.
महाराष्ट्रातील भरपूर नागरिका पशुपालनाचा व्यवसाय हा एक प्रमुख व्यवसाय म्हणून करतात आणि भरपूर शेतकरी अशी आहेत की जे शेती सोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये देखील सध्याच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान येत आहे. त्यामध्ये नवीन यंत्र नवीन मशीन यांचा वापर वाढत आहे. त्यामध्ये जर विचार केला तर कडबा कुट्टी मशीन असेल गोठा साफ करायचे मशीन असेल दूध काढायचे ऑटोमॅटिक मशीन असतील, स्वयंचलित गोठा सिस्टीम असेल असे विविध नवीन तंत्रज्ञान पशुपालन व्यवसायामध्ये येतात.
अशाच एक नवीन तंत्रज्ञान किंवा यंत्र म्हणा किंवा मशीन मनात ही घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान पुरवत आहे. तर कडबा कुट्टी मशीन हे मशीन घेण्यासाठी पशुपालकांना आर्थिक अनुदान हे महाराष्ट्र सरकार पुरवत आहे. ज्या योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जाते त्या योजनेचे नाव कडबा कुट्टी मशीन योजना असे आहे.
तर कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना किंबहुना पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी 50% एवढे अनुदान किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये रकमेचे अनुदान दिले जाते. कडबा कुट्टी मशीन योजनेचा उद्देश हाच आहे की पशुपालकांचा चारा कापण्यासाठीचा होणारा त्रास कमी व्हावा जनावरांना उत्तम प्रकारचा चारा मिळावा चाऱ्याची नासाडी कमी व्हावी परिणामी शेतकऱ्याचे किंवा त्या पशुपालकाची उत्पादन क्षमता वाढावी आणि त्याचा आर्थिक विकास व्हावा. हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
तर KADABA KUTTI MACHINE YOJANA ही नेमकी काय आहे या योजनेच्या पात्रतेच्या अटी काय आहेत या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेतून मिळणारा लाभ कसा आहे तो लाभ किती मिळतो तो लाभ कसा दिला जातो त्यासाठी अर्ज करायला लागणारी कागदपत्रे कोण कोणती आहेत इत्यादी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना | KADABA KUTTI MACHINE YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभाग यांनी |
योजना चालू करण्यामागचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे. |
योजनेचे लाभार्थी कोण आहेत | महाराष्ट्रातील शेतकरी पशुपालक सर्वसामान्य नागरिक सुशिक्षित बेरोजगार |
योजनेतून काय लाभ मिळणार आहे | दहा हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत. |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन आणि ऑफलाइन |

KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना चे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीनचे वितरण करणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी लागणाऱ्या चारा व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या कडबा कुटी मशीनचे उपलब्धता करून देणे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मध्ये पशुपालनाच्या बाबतीत जनजागृती निर्माण करणे.
- पशुपालकांना प्रोत्साहन देणे.
- पशुपालन क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालनाच्या कामाची गती वाढवणे आणि उत्पादन वाढवणे.
- पशुंना दिल्या जाणाऱ्या चाऱ्याचा दर्जा वाढवण्यासाठी कडबा कुटी मशीनचे वितरण करणे.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना ची वैशिष्ट्य
- महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने जी कडबा कुट्टी मशीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ हा लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केला जातो.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना चा फायदा –
- शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना ज्यावेळेस कडबा कुटी मशीनचे वितरण केले जाईल तेव्हा ते पशुपालनासाठी लागणारा चारा हा जलद गतीने तयार करू शकतील.
- कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने तयार केला जाणारा चा राजा पशुंना टाकला जातो त्यावेळेस पशूंचे चारा ग्रहण करण्याचे प्रमाण वाढते परिणामी चाऱ्याची नासाडी कमी होते.
- कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने चारा हा बारीक कापला जातो तो किती बारीक किती मोठा कापायचा याचे नियोजन देखील करता येतं आणि बारीक चारा कापल्यामुळे पशुंना जनावरांना तो चारा खाण्यासाठी सोपे होते.
- शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्र राज्यातील पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून अनुदान देण्यात येते ते अनुदान 50 टक्के पर्यंत देण्यात येते किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपयांची आर्थिक अनुदान कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी दिले जाते.
- शेतकऱ्यांचा आणि पशुपालकांचा चाऱ्याच्या उपलब्ध करून देण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ कडबा कुट्टी मशीनच्या सहाय्याने कमी होईल.
- पशुपालकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत मिळणारा लाभ –
- महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने जी कडबा कुट्टी मशीन योजना चालू केलेली आहे या कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पशुपालकांना शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
- दोन एचपी चिक क्षमता असलेली विजेवर चालणारी कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला कडबा कुट्टी मशीनच्या रकमेच्या 50% किंवा दहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना चे लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारे जे शेतकरी किंवा सामान्य नागरिक किंवा सुशिक्षित बेरोजगार जे की पशुपालनाचे व्यवसाय करतात असे सर्व पशुपालक सदर योजनेसाठी पात्र आहेत.
- कडबा कुटी मशीन योजनेसाठी सरकारने कडबा कुट्टी मशीनच्या आर्थिक अनुदानाच्या वितरणामध्ये एक महत्त्वाचा पाऊल उचललेला आहे ते म्हणजे कडबा कुट्टी मशीनच्या अनुदान वितरणामध्ये 30 टक्के महिला लाभार्थ्यांचा समावेश केला जाईल त्यांना 30 टक्के आरक्षण दिले जाईल.
- तसेच त्याप्रमाणे तीन टक्के अपंग लाभार्थी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना साठी आवश्यक पात्रता आणि अटी –
- कडबा कुट्टी मशीन योजना साठी अर्ज करीत असलेला शेतकरी किंवा पशुपालक हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे तसा रहिवासी दाखला त्याला अर्ज सोबत जोडावा लागतो.
- जो व्यक्ती सदर योजनेसाठी अर्ज करत आहे त्या व्यक्तीकडे जाणारे पशु असणे आवश्यक आहे अन्यथा सुधार योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- कडबा कुट्टी मशीन योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी आहे.
- ज्या शेतकरी किंवा पशुपालकाकडे कमीत कमी दोन जनावरे आहेत असा पशुपालकच सदर योजनेसाठी अर्ज करून त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- अर्ज करीत असलेल्या अर्जदाराचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे रुपये दोन लाख च्या आत असणे बंधनकारक आहे.
- सदर योजनेला अर्ज करण्याच्या ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धती आहेत या पद्धतीने सदर योजनेसाठी अर्ज करता येईल.
- जहाज दराने कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी अर्ज करून कडबा कुट्टी मशीन घेतली आहे आणि त्याला या योजनेच्या लाभांमध्ये अनुदान मिळाले आहे अशा लाभार्थ्याला विकत घेतलेली कडबा कुट्टी मशीन ही विकता येणार नाही.
- सदर योजनेअंतर्गत घेतलेली कडबा कुट्टी मशीन ही लाभार्थ्याला दुसऱ्या कोणाला हस्तांतरित करता येणार नाही.
- अर्जदार अर्ज करीत असताना त्याचे आधार कार्ड आणि बँक एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे कारण डीबीटी मार्फत सदर योजनेचा मिळणारा लाभा लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो आणि त्यासाठी आधार आणि बँक एकमेकांना लिंक असणे बंधनकारक आहे.
- आधार आणि बँक जर एकमेकांना लिंक नसतील तर अशा परिस्थितीमध्ये अर्जदाराला जर योजनेचा लाभ मिळाला नाही तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार हा अर्जदार राहील.
- शेतकरी किंवा पशुपालक जे कोणतेही कडबा कुट्टी मशीन विकत घेणार आहे ते कडबा कुट्टी मशीन हे भारतीय मानक संस्थेचे प्रमाणीकरणानुसार म्हणजेच आयएसओ सर्टिफाइड स्टॅंडर्ड नुसार असणे आवश्यक आहे.
- जे कडबा कुट्टी मशीन भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणीकरणानुसार नसतील अशा कडबा कुट्टी मशीन या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत.
- महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे मुंबई आणि मुंबई उपनगर ही दोन शहरे ही कडबा कुट्टी मशीन योजने मधून वगळण्यात आलेली आहेत.
- महाराष्ट्र राज्यातील ज्या पशुपालक किंवा शेतकऱ्यांनी या अगोदर केंद्र शासनाच्या कडबा कुट्टी मशीन योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना परत एकदा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
- कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे बिल
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत –
- कडबा कुट्टी मशीन योजनेला अर्ज करण्यासाठी अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- वेबसाईटच्या होमपेज वरती गेल्यानंतर अर्ज करू इच्छित असलेल्या व्यक्तीला वेबसाईट वरती नवीन युजरचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.
- नवीन यूजर चे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळणारा युजरनेम आणि पासवर्ड टाकून पुन्हा एकदा लॉगिन करायचे.
- लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या पेज वरती शेती योजना या बटणावरती क्लिक करायचे.
- त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल आणि त्या पेज वरती शेतकऱ्यांसाठी सध्या चालू असलेल्या सर्व योजनांची लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल.
- त्या लिस्ट मधून कडबा कुट्टी मशीन योजना या योजनेवरती क्लिक करायचे.
- त्यानंतर तुमच्यासमोर कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती अचूक रिते भरायची.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्ज सोबत अपलोड करायची.
- कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करून तुमचा अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण करून टाकायची.
KADABA KUTTI MACHINE YOJANA | कडबा कुट्टी मशीन योजना चा अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत –
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केलेली कडबा कुट्टी मशीन योजना याला ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदार पशुपालकाला आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायचे आहे.
- सदर कार्यालयातून कडबा कुट्टी मशीन योजनेचा अर्ज घ्यायचा.
- अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती असू कृती भरायची आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
- भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा आणि आपली अर्ज भरण्याची प्रोसेस अशा रीतीने पूर्ण होईल.