KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोकसंख्या वर्ग हा शेती या पिकामध्ये गुंतलेला आहे. जनरली जर बघायला गेलं तर शेतकरी हा फक्त शेती करत नाही तर त्याच्या सोबत त्याची जोडधंदे देखील असतात, जसे की पशुपालन कुक्कुटपालन मासेमारी इत्यादी. काही नागरिकांचा कुक्कुटपालन हा प्राथमिक व्यवसाय असतो तर काही जहा दुय्यम व्यवसाय असतो जे की ते शेती सोबत करत असतात.
ग्रामीण भागातील गरजू गरीब शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नावरती घर चालवणे जी केली जाते त्यामुळे ते जोडधंदा शोधत असतात. त्यामध्ये कुक्कुटपालन हा एक अतिशय चांगला जोडधंदा म्हणून उदयास येत आहे.
कुक्कुटपालनासारख्या व्यवसायाचे वाढ व्हावी यासाठी शासन देखील मदत करते.
सध्या राज्य शासनाने कुक्कुटपालनासाठी एक योजना काढलेली आहे आणि या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. हे अनुदान 75 टक्के किंवा एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आताच्या महागाईच्या काळामध्ये एका व्यवसायावर तेव्हा नमून राहणं परवडत नाही. शेतकऱ्याला शेतीसाठी काही ना काहीतरी जोड धंदा पाहिजे. शेती सध्या अनिश्चिततेचा व्यवसाय झालेला आहे जसं की लॉटरी असते त्याप्रमाणे शेतीचे सध्याचे परिस्थिती आहे. शेतकरी कष्ट करून शेती पिकवतो शेतीत घामगाव तसेच पैसा टाकतो परंतु ती शेत तयार होऊन त्याचे उत्पन्न काढून ते मार्केटमध्ये जाऊन त्याचं मोबदला मिळेल तोपर्यंत कोणत्याही गोष्टीची खात्री नाही एक तर कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागते. किंवा शेतमाला हवा तसा भाग मिळत नाही. परिणामी शेतकऱ्या च्या पदरी निराशा येते.
म्हणून शेतकऱ्याला शेती सोबत काय ना काही तरी जोडधंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी प्रामुख्याने शेती सोबत जोडधंदा म्हणून पशुपालनाचा निवड करतात पशुपालन हा देखील तसा खूप कष्ट करावा लागणारा व्यवसाय आहे त्यासोबत शेतकरी शेततळे मध्ये मत्स्यपालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा इतर कोणत्या व्यवसायाचे ते निवड करत असतात.
असाच एक कुक्कुटपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांनी करावं त्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र सरकार धडपड करत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्र शासनाने कुक्कुटपालनांना प्रोत्साहन द्यावे म्हणून कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र अशी योजना काढलेली आहे. तर कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र नेमकी काय योजना आहे ती कोणी सुरू केली त्यावर सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे ते लाभार्थ्याची पात्रता काय आहे आणि त्या योजनेअंतर्गत काय लाभ मिळणार आहे आणि KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया आपण आजच्या ब्लॉगला..
योजनेचे नाव | कुकुट पालन योजना महाराष्ट्र | KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
विभाग | महाराष्ट्र सरकार कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्याचे नागरिकांना कुक्कुटपालन करण्यासाठी आर्थिक अनुदान देणे आणि प्रोत्साहन देणे. |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
योजनेतून मिळणाऱ्या लाभ | 75 टक्के अनुदान किंवा एक लाख साठ हजार रुपये पर्यंतचे अनुदान |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुक्कुटपालन योजना महाराष्ट्राचा मुख्य उद्देश –
- महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- राज्यातील इच्छुक नागरिकांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक अनुदान पुरवून त्यांना पाठबळ देणे.
- एक लाख साठ हजार रुपये पर्यंतचे किंवा 75 टक्के अनुदान हे कुकुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी देणे.
- कुकुट पालन व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना एक व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देणे परिणामी महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अशी ती सोबत काहीतरी जोडधंदा चालू करायला प्रोत्साहन देणे.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील तसेच इच्छुक शहरी भागातील नागरिकांमध्ये उद्योग करण्याची भावना जागवणे आणि इच्छुक असलेल्या नागरिकांना उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगाराच्या नवीन नवीन संधी निर्माण करणे.
- महाराष्ट्र राज्य पशुपालन कुक्कुटपालन यांचा विकास करणे.
- जास्तीत जास्त लोकांना कुक्कुटपालन व्यवसायाकडे आकर्षित करणे.
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुक्कुटपालन योजना महाराष्ट्राचे वैशिष्ट्य –
- कुकुट पालन योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत चालू करण्यात आलेली योजना आहे.
- योजना जिल्हास्तरावरती सदर जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यामार्फत राबविले जाणार आहे.
- योजनांतर्गत अर्ज करण्यासाठी एकदम सोपी पद्धत ठेवलेली आहे.
- या योजनेमुळे जे स्वतःचे व्यवसाय चालू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा नागरिकांसाठी एक उत्तम योजना आहे.
- योजना अंतर्गत मिळणारे अनुदान हे लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये डीव्हीडी मार्फत जमा केले जाते त्यासाठी त्याला भरतीचे बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुकुट पालन योजना महाराष्ट्र याच्यावर अंतर्गत मुख्य योजना पुढीलप्रमाणे –
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम –
- या कार्यक्रमांतर्गत पक्षी पालनाचे शेड आणि उपकरणासाठी 50 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते.
- या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थीला शंभर पिल्ले 16 हजार रुपयांपर्यंतची 50% अनुदानावरती वितरित केले जातात.
अंडी सुधार कार्यक्रम –
- अंडी निर्मिती युनिट चालू करण्यासाठी शासनाकडून पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते जे की 50% आहे.
- कुक्कुट प्रक्रिया युनिट साठी शासनाकडून जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे अनुदान 50% या हिशोबाने दिले जाते.
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र याच्या अंतर्गत 1000 माणसं पक्षी संवर्धनाचा खर्च खालील प्रमाणे –
तपशील | लाभार्थी / शासन सहभाग | एकूण अंदाजित रक्कम |
जमीन | लाभार्थी | स्वतःची / भाडे तत्वावर |
एक हजार चौरस फूट क्षमतेचे पक्षीगृह, स्टोर रूम पाण्याची टाकी निवासाची सोय विद्युतीकरण | लाभार्थी / शासन | दोन लक्ष रुपये |
उपकरणे खाद्याची किंवा पाण्याची भांडी | लाभार्थी / शासन | पंचवीस हजार रुपये |
एकूण | दोन लाख 25 हजार रुपये |
- वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे दोन लाख 25 हजार रुपये किमतीच्या युनिटच्या 50% म्हणजेच एक लाख 12 हजार पाचशे रुपये इतके आर्थिक अनुदान हे खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना मिळणार आहे.
- तसेच अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी उपाय योजना च्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना एक लाख 68 हजार 750 रुपये म्हणजेच 75 टक्के अनुदान हे मिळणार आहे.
- खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना अनुदाना व्यतिरिक्त ची 50% रक्कम आणि अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थींना अनुदान व्यतिरिक्त 25% रक्कम ही बँकेकडून कर्ज घेऊन बिजनेस मध्ये लावायचे आहे.
- बँकेकडून कर्ज घेत असताना खुल्या प्रवर्गातील लाभार्थी दहा टक्के रक्कम ही स्वतःच्या हिस्ट्री आणि देऊ शकतात आणि अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती 5% रक्कम हे स्वतःच्या हिस्स्याने देऊ शकतात व उर्वरित टक्केवारीसाठी त्यांना बँकेकडून कर्ज घेणे बंधनकारक आहे.
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुक्कुटपालन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पक्षांच्या जाती पुढील प्रमाणे –
- आय आय आर
- ब्लॅक
- एस्ट्रोलॉग
- गिरीराज
- वनराज
- कडकनाथ
- इतर सरकार मान्य जातीचे पक्षी.
नाबार्ड कुक्कुटपालन योजनेअंतर्गत खालील घटकांना प्राधान्य दिले जाईल –
- दारिद्र्यरेषेतील लाभार्थी
- भूमीन शेतमजूर मागासवर्गीय अल्प किंवा अत्यल्प धारक शेतकरी
KUKUTPALAN YOJANA MAHARASHTRA | कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र चे लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले आणि जे कुक्कुटपालन करण्यासाठी इच्छुक आहेत असे सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.
कुकुट पालन योजना महाराष्ट्र चे फायदे –
- या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे.
- कुकुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत इच्छुक गरजू नागरिकांना स्वतःचा कुक्कुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी आर्थिक अनुदान मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत 60000 रुपये किंवा 50% रकमेची आर्थिक अनुदान आहे कुक्कुटपालन व्यवसाय चालू करण्यासाठी देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांना शेती सोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनचा व्यवसाय करता येईल.
- उद्योग करण्यासाठी इच्छुक असणारे नागरिक परंतु आर्थिक दृष्ट्या परिस्थिती हलकीचे असल्यामुळे ज्यांना अडचणी येतात त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
कुकुट पालन योजना महाराष्ट्र यांच्या लाभार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे –
- प्रथम प्राधान्य हे अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दिले जाईल ज्या शेतकऱ्यांचे जमीन हे एक हेक्टर पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य निवडीच्या वेळेस दिला जाईल.
- जे शेतकऱ्यांची जमीन एक ते दोन हेक्टर पर्यंत आहे असे अल्पभूधारक शेतकरी.
- रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात ज्यांची नोंद आहे असे सुशिक्षित बेरोजगार
- बचत गटातील महिला लाभार्थ
कुकुट पालन योजनेअंतर्गत आवश्यक लाभार्थीची पात्रता –
अर्ज करत असलेल्या नागरिकांना महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे
कुक्कुटपालन योजनेसाठी अटी आणि शर्ती –
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासीसने गरजेचे आहे.
- लाभार्थी निवडीच्या वेळेस महिलांना 30 टक्के प्राधान्य दिले जाईल.
- योजना जाहीर झाल्यापासून पहिल्या 30 ते 45 दिवसापर्यंत फक्त अर्ज स्वीकारले जाईल त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही व विचारात घेतला जाणार नाही.
- ही योजना एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला फक्त लागू होईल.
- यावर्षी केलेला अर्ज हा फक्त यावर्षीच गृहीत धरला जाईल पुढील वर्षीच्या योजनेसाठी गृहीत धरला जाणार नाही.
- योजनेअंतर्गत मिळणारे अनुदानापेक्षा जर जास्त रक्कम खर्चामध्ये दिसून आली तर ती जास्तीच्या रकमेचा खर्च लाभार्थ्याला स्वतःच्या पदर ने करणे गरजेचे आहे.
- पिल्ले किंवा तलंगा वाटप करत असताना पशुवैद्यकीय दवाखान्यांमधून देवी आर डी राणीखेत मरेक्स इत्यादी रोगांवरचे लसीकरण करणे गरजेचे आहे.
- एकदा या योजनेचा लाभ घेतला की तिथून पुढे पाच वर्षे त्याला भरतीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- पिल्लांसाठी लागणारा निवारा वाहतुकीचा खर्च औषधे पाण्याची भांडी खाद्याची भांडी इत्यादीचा खर्च सर्व लाभार्थीला पदर ने करने गरजेचे आहे.
कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र साठी लागणारी कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- जमिनीचा सातबारा व आठ अ
- पासपोर्ट साईचे फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- शपथपत्र
- पशुपाल प्रशिक्षण सर्टिफिकेट
कुक्कुटपालन योजना महाराष्ट्र साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- इच्छुक नागरिकाला अर्ज करण्यासाठी आपल्या जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागांमध्ये जाऊन योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- सर्व कागदपत्रे जोडायची.
- सदरचा अर्ज पुन्हा एकदा तपासून संबंधित पशुसंवर्धनच्या कार्यालयामध्ये जमा करायचा.
- अशा रीतीने तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.