LADAKI BAHIN YOJANA | आज आपण बघत आहे महाराष्ट्रामध्ये गरिबी अजून पण मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. ही गरिबी कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासन खूप प्रयत्न करत आहे. सरकार हे वेगवेगळे योजना काढून लोकांना नवीन रोजगार उपलब्ध करून देणे असेल नवीन संधी उपलब्ध करून देणे असे नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे असेल व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी कर्ज घेऊन देणे असेल त्यानंतर समाजातील विविध घटकातील विविध प्रकारच्या नागरिकांना विविध प्रकारची मदत करणे असेल मग ती थेट आर्थिक मदत असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील असो.
महिला या समाजातील एक महत्त्वाचा घटक आहेत जसे बोलले जाते की यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो ते अगदी खरं आहे. यासाठी शासनाने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आर्थिक वृद्धीसाठी काही पावलं उचलायची ठरवली आहेत. त्याच्यामध्येच एक महत्त्वाचं आणि ऐतिहासिक पाऊल म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सहाय्य पुरवते. ही आर्थिक सहाय्यतांना घरातील खर्च भागवणे स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय चालू करणे व इतर त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी एक मोठा आणि मोलाचा हातभार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गरीब गरजू महिलांना महिना १५०० रुपये इतकी आर्थिक मदत मिळते. तरी या योजने बद्दल सविस्तर जाणून घेऊया, जसे की ही योजना नेमकी काय आहे याची पात्रता काय आहे याचा अर्ज करण्याची प्रोसेस काय आहे याचा आर्थिक लाभ कसा मिळणार परत याच्यामध्ये लाभार्थ्याची पात्रता काय आहे या सर्व गोष्टी आपण सविस्तर रित्या बघणार आहोत.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | LADAKI BAHIN YOJANA |
सुरू कोणी केली | महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजना कधी चालू झाली | 1 जुलै 2024 |
योजनेचे उद्दिष्ट | महाराष्ट्र राज्यातील गरीब गरजू महिलांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे. |
लाभार्थीची पात्रता | महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू महिला |
योजनेतून मिळणारा लाभ | १५०० रुपये प्रति महिना |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन/ ऑफलाइन |
योजना कधी सुरू करण्यात आली | ०१ जुलै 2024 |
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेची उद्दिष्टे –
- महाराष्ट्र राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना आर्थिक मदत करणे.
- राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि स्वावलंबी बनवणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना महिना 1500 रुपये आर्थिक मदत देणे.
- महिला सबलीकरण करणे आणि त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणणे.
- महाराष्ट्र राज्यातील गरजू गरीब आणि निराधार महिलांना आधार देणे.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेची वैशिष्ट्ये-
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचे पैसे महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पुरवले जाणार आहेत. त्यामुळे पैशाचा गैरव्यवहार होण्याचा विषय येत नाही.
- लाडकी बहीण योजना ही एक राज्य शासन पुरस्कृत योजना असून ती एक जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार चालू करण्यात आली.
- लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजने च्या लाभार्थ्याची पात्रता –
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसलेल्या कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- वयोगट वय वर्ष 21 पूर्ण ते 65 वर्षे पूर्ण यादरम्यानच्या महिलाच फक्त या योजनेसाठी पात्र ठरतील.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेचे फायदे –
- लडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.
- या योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभांमुळे महिलांना त्यांचा वैयक्तिक लघुउद्योग सुरू करणे घरगुती व्यवसाय सुरू करणे किंवा घरातील इतर दैनंदिन गोष्टींचा खर्च भागवण्यासाठी मदत होणार आहे.
- राज्यातील विधवा घटस्फोटीत निराधार महिलांना या योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ हा एक खूप मोठा आधार शासनामार्फत देण्यात येत आहे.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती
- अर्ज करीत असलेली महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे यादरम्यान असणे बंधनकारक आहे.
- या योजनेअंतर्गत विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
- तसेच कुटुंबातील कोणतीही एक अविवाहित महिला देखील या योजनेसाठी पात्र आहे.
- लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेचे बँक मध्ये खाते असणे बंधनकारक आहे.
- अर्जदार महिलेचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आणि बँक खाते हे एकमेकांना जोडलेले असणे गरजेचे आहे अन्यथा या योजनेचा लाभ मिळणे अशक्य आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी नोकरीमध्ये असतील अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्ज करीत असलेल्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे 2.50 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेचा अर्जाच्या अपात्रितेची कारणे –
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाच्या वार्षिक आर्थिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
- अर्जदार महिलेचे कुटुंब जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र नाहीत.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य महाराष्ट्र शासन केंद्र शासन किंवा या दोन्ही शासनाच्या कोणत्याही विभागातील किंवा महामंडळात मध्ये कंत्राटी किंवा कायमचा कर्मचारी म्हणून जर काम करत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना जमिनीसाठी पात्र ठरता येणार नाही.
- ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य सेवानिवृत्तीनंतरचे वेतन घेत असेल तर अशा कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
- या महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील या योजनेसाठी पात्र होऊ शकत नाहीत.
- माजी आमदार किंवा माजी खासदार ज्या कुटुंबामध्ये आहेत अशा कुटुंबातील कोणत्याही महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
- अर्ज करत असलेल्या महिला जर महाराष्ट्र शासनाचे किंवा केंद्र शासनाचे इतर कोणत्याही विभागाच्या अंतर्गत कोणत्याही योजनेचा चोर लाभ घेत असेल आणि त्या योजनेद्वारे जर तिला दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ मिळत असेल तर अशी महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
LADAKI BAHIN YOJANA | लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे –
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन फॉर्म.
- महाराष्ट्र राज्यात राहत असलेला पुरावा म्हणून रहिवासी दाखला देणे.
- जर कोणत्याही महिलेकडे रहिवासी दाखला किंवा आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेचे पंधरा वर्षांपूर्वींचे रेशनिंग कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र जोडणे बंधनकारक आहे.
- जर महिलाही परराज्यातील आहे परंतु तिने महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पुरुषासोबत विवाह केलेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी दाखला द्यावा लागेल.
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
- अर्ज करीत असलेल्या महिलेचे आधार कार्ड
- अर्ज करीत असलेल्या महिलेची रेशनिंग कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- आणि स्व साक्षांकित केलेले लाडके बहीण योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणारे हमीपत्र.
लाडकी बहीण योजना चा अर्ज कसा करायचा –
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिलेला आपल्या जवळील सेतू सुविधा केंद्र मध्ये जायचे आहे किंवा आपल्या मोबाईल वरती नारीशक्ती दूध हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
- ज्या महिलांना स्वतःच्या मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज करता येत नाही अशा महिलांसाठी अंगणवाडी केंद्र साहित्य सुविधा केंद्र ग्रामपंचायत ऑफिस किंवा बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयामध्ये अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.
- या योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
- या योजनेचा अर्ज भरत असताना महिलेने स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे कारण तिचा थेट फोटो काढावा लागतो.
- ऑनलाइन पोर्टल वरती म्हणजेच नारीशक्ती दूत ॲप मध्ये अर्ज उघडायचा, विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आणि अर्ज सबमिट करायचा.
- अशाप्रकारे माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून होईल.
लाडकी बहीण योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
लाडकी बहीण योजना ही कोणामार्फत सुरू करण्यात आली ?
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार मार्फत सुरू करण्यात आली.
लाडकी बहीण योजना ही कधी सुरू करण्यात आली ?
लडकी बहीण योजना ही एक जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली.
लाडकी बहीण योजना सुरू करण्याच्या मागे काय उद्देश आहे ?
महाराष्ट्र राज्यातील गरीब गरजू मुलांना आर्थिक मदत करणे.
लाडकी बहीण योजने चा मिळणारा लाभ काय आहे ?
माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतका आर्थिक लाभ मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करायचा ?
या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत ॲप घेऊन त्यामधून अर्ज करायचा. आणि ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात शेतू कार्यालयात ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज भरायचा आहे.