LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजना

LEK LADAKI YOJANA | महाराष्ट्र सरकार ने २०२३ च्या आर्थिक बजेट मध्ये या योजनेची सुरवात केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलींना त्यांच्या जन्मण पासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.

या योजेने नुसार पात्र लाभार्थी मुलींना त्यांच्या जन्मा पासून ते वयाच्या १८ वर्षे पर्यन्त एकूण ९८,००० / रुपये इतकी रक्कम ५ टप्प्यांमध्ये देण्यात येणार आहे. हे ५ टप्पे मुलीच्या शिक्षणा नुसार ठरवले आहेत. ते आपण पुढे बघणार आहोत. ही एक महत्व कांक्षी योजना असून या योजने मुळे महाराष्ट्र राज्यातील मुलींचे आर्थिक व सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे.


योजनेचे नावलेक लाडकी योजना | LEK LADAKI YOJANA
उद्देशमुलींचे शिक्षणा साठी आर्थिक मदत करणे.
लाभ५ टप्या मध्ये रुपये ९८००० / इतकी आर्थिक मदत
लाभार्थीआर्थिक मागास कुटुंबातील मुली

LEK LADAKI YOJANA

Table of Contents

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे –

  • महाराष्ट्रातील मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वयाच्या १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत शिक्षण साठी आर्थिक मदत करणे.
  • मुलींना शिक्षणा साठी प्रोत्साहित करणे.
  • मुली बाबतीत समाज मध्ये असणारे निगेटिव विचार संपवून, गर्भ हत्ये ला प्रतिबंध करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील कोणतीही मुलगी आर्थिक पैशां अभावी शिक्षण पासून वंचित राहू नये.
  • मुलींना आर्थिक दृष्ट्या शिक्षणासाठी स्वावलंबी बनवणे.
  • मुलींच्या शिक्षणाचा भार सरकार उचलत आहे त्यामुळे मुलीच्या जन्म दर वाढण्यास  मदत होईल.
  • शिक्षण पासून वंचित असलेल्या मुलींच्या संख्ये मध्ये घट करणे.

 LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेची काही खास वैशिष्टे-

  • एकदम सोपी अर्ज प्रक्रिया आहे.
  • योजनेच्या आर्थिक लाभाची रक्कम ही DBT मार्फत थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेचे लाभार्थी / पात्रता –

  • महाराष्ट्र तिल आर्थिक मागास दृष्ट्या कुटुंबातील मुली.  
  • पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेली कुटुंबे.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजने च्या आर्थिक लाभाचे वितरण –

पहिला टप्पामुलीच्या जन्मा नंतर५००० रुपये
दूसरा टप्पामुलगी १ लि मध्ये गेल्यावर६००० रुपये
तिसरा टप्पामुलगी ६ वी मध्ये गेल्यावर ७००० रुपये
चौथा टप्पामुलगी ११ वी मध्ये गेल्यावर८००० रुपये
पाचवा टप्पामुलगी १८ वर्षाची झाल्यावर७५००० रुपये
 एकूण लाभ १,०१,००० रुपये  

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजने चा फायदा-

  • लेक लाडकी योजने अंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या वयाच्या १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत एकूण १०१००० रुपये इतकी आर्थिक रक्कम आर्थिक मदत म्हणून मिळते.
  • आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलते.
  • मुलींच्या वयाच्या महत्वाच्या वर्षी म्हणजेच १८ वर्षे असताना सरकार एकरकमी  ७५००० रुपये ची रक्कम शासन मुलीच्या खात्या मध्ये जमा करत असते.
  • अशा योजना समाजात जनजागृती करण्याचे काम करत असतात. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल आणि समाजात गर्भ हत्या रोखण्यास मदत होईल आणि मुलगा-मुलगी भेदभाव  कमी होईल.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजने साठी पात्रता आणि अटी –

  • ही योजना फक्त महाराष्ट्र पुरती मर्यादित आहे त्यामुळे अर्जदार कुटुंब हे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेला पात्र ठरण्यासाठी अर्जदार कुटुंबा ने मुली च्या शिक्षणा साठीच्या राज्य किंवा केंद्र शासनाच्या इतर ओकणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होई पर्यंत तिच्या खात्यावर ७५००० रुपये रकमेचा हफ्ता जमा केला जात नाही.
  • लेक लाडकी योजने अंतर्गत शिक्षणं घेणाऱ्या मुलीला तिचे शिक्षण पूर्ण केले तर किंवा शिक्षण पूर्ण करत असताना च फक्त योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे, जर काही कारणास्तव शिक्षण मध्येच थांबले तर मुलीला आर्थिक लाभाची रक्कम मिळणार नाही.
  • अर्जदार कुटुंबातील कोणीही सरकारी नोकर नसावा.
  • ही योजना १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुली आणि एक मुलगी किंवा एक मुलगा असल्यास मुलीला लागू होईल.
  • पहिल्या मुलीच्या लाभच्या तिसरा हफ्ता आणि दुसऱ्या मुलीचा दूसरा हफ्ता साठी अर्ज सादर करताना कुटुंब नियाजणाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • योजनेसाठी पात्र कुटुंबासाठी त्यांची वार्षिक उत्पन्नाची अट ही १ लाख रुपये आहे त्यामुळे उत्पन्न हे १ लाख रुपये च्या अंत मध्ये असावे.
  • लाभार्थी चे बँक खाते ही महाराष्ट्रातील बँक मध्ये च असणे बंधनकारक आहे.
  • कुटुंबातील दुसरे अपत्य च्या वेळी जर जुळी अपत्ये जन्माला आल्यास त्यापैकी एक किंवा दोन्ही मुलींना योजनेसाठी पात्र राहता येईल. परंतु त्यानंतर कुटुंबातील माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे-

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • वार्षिक आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसलेला तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • पालकांचे आधार कार्ड
  • मुलीचे आधार कार्ड
  • बँक पासबुक डिटेल्स
  • पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • मतदान ओळखपत्र
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • शाळेतील बोनाफाईड सर्टिफिकेट
  • मुलीचे अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेचा अर्ज भरण्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे –

  • अर्ज करीत असलेली व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे जर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी नसेल तर त्या व्यक्तीचा अर्ज हा बाद केला जाईल.
  • जर सदर योजनेला अर्ज करीत असलेली मुलगी ही केंद्रशासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा ऑलरेडी फायदा घेत असेल तर अशा मुलीला सदर योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. म्हणून तिचा अर्ज बाद केला जाईल.
  • जर अर्जदाराने चुकून किंवा मुद्दामून एकापेक्षा जास्त अर्ज केले तर अशा परिस्थितीमध्ये त्याचा फक्त एकच अर्ज विचारात घेतला जाईल बाकीचे अर्ज बाद केले जातील.
  • जर लाभार्थी चे बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या अर्जदाराचा अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने अर्ज करत असताना त्याच्यामध्ये काही चुकीची माहिती दिली किंवा अपूर्ण कागदपत्र जोडली तर अशा परिस्थितीमध्ये अर्ज रद्द केला जाईल.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी जो व्यक्ती सदर योजना अर्ज करू इच्छित आहे अशा व्यक्तीला त्याच्या जिल्ह्यातील महिला व बालविकास या विभागाच्या कार्यालयाला भेट देणे गरजेचे आहे.
  • महिला व बाल कल्याण विकास विभाग या च्या कार्यालयामधून लेक लाडकीयोजनाचा अर्ज घ्यायचा.
  • अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये जी काय विचारलेली माहिती आहे ती अचूक रित्या भरायची अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडायची.
  • भरलेला अर्ज आणि जोडलेली कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून बघायची.
  • सदरचा अर्ज हा संबंधित अधिकाऱ्याकडे मैदानी बालविकास विभागाच्या जमा करायचा.
  • अशा रीतीने अर्ज भरण्याची प्रोसेस कम्प्लीट होईल.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • ज्या अर्जदाराला सुधार योजनेसाठी अर्ज करायचा आहे अशा अर्जदार आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे.
  • वेबसाईटच्या होम पेज वरती तुम्हाला लेक लाडकी योजना असे बटन दिसेल.
  • त्या लेक लाडकी योजना या बटणावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्यासमोर लेक लाडकी योजनेचा अर्ज ओपन होईल.
  • त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती आवश्यक रित्या अचूक रित्या भरायची.
  • अर्ज सोबत लागणारे सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
  • भरलेला अर्ज सबमिट बटणावर क्लिक करून जमा करायचे.
  • अशा रीतीने तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

LEK LADAKI YOJANA | लेक लाडकी योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

लेक लाडकी योजना ही कोणामार्फत सुरू करण्यात आलेली आहे ?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली आहे.

लेक लाडकी योजना चा उद्देश काय आहे ?

महाराष्ट्र राज्यांमध्ये नवीन जन्म घेणाऱ्या मुलींच्या भविष्याच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी त्यांना आर्थिक साह्य करणे.

लेक लाडकी योजना अंतर्गत लाभार्थी कोण असणार आहेत ?

महाराष्ट्र राज्यांमध्ये आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांमध्ये असणाऱ्या मुली या लेक लाडकी योजनेच्या लाभार्थी असतील.

लेक लाडकी योजना अंतर्गत दिला जाणारा आर्थिक लाभ किती असेल ?

सदर योजनेअंतर्गत मिळणार आर्थिक लाभ हा रुपये 98 हजार इतक्या रकमेपर्यंत दिला जाणार आहे.

लेक लाडकी योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक लाभाची रक्कम कशी जमा केली जाणार आहे ?

सदर योजनेच्या लाभार्थीच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत लेक लाडकी योजनेचे रक्कम जमा केली जाईल, त्यासाठी लाभार्थीचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड हे एकमेकांना लिंक असणे बंधनकारक आहे.

लेक लाडकी योजना साठी अर्ज करण्याच्या पण कोणत्या पद्धती आहेत ?

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला व बालकल्याण विकास यांच्या कार्यालयाला भेट देऊन ऑफलाईन रित्या अर्ज करता येतो. तसेच त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन देखील ऑनलाईन अर्ज सदर योजनेसाठी करता येतो.


अशा रीतीने लेक लाडकी योजनाही राबवली जाते. महाराष्ट्र शासनाचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षण साठी त्या मुलींना प्रोत्साहित करावे.

वाचकांना एकच विनंती आहे की सदर योजनेचा लाभाबद्दल सदर योजनेबद्दल जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना कळवा जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक सदर योजनेचा लाभ घेतील.

चला तर मग भेटू परत एकदा अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये…