MAGEL TYALA SHET-TALE YOJANA |मागेल त्याला शेततळे योजना |

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA || भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य नागरिक वर्ग हा शेतीशी निगडित आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. शेती करताना आजच्या परिस्थितीमध्ये खूप साऱ्या गोष्टींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते, त्यामध्ये महागाई, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, खतांची टंचाई, वाढणारा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव, यासारख्या असंख्य समस्या या शेतकऱ्यांसमोर उभ्या आहेत.

त्यातील एक प्रमुख समस्या ती म्हणजे पाण्याची टंचाई. शेती पिकाला पाण्याची गरज असते आणि आपल्याकडे पाण्याचा स्त्रोत हा पूर्णपणे पावसावर ते अवलंबून आहे. आपल्याकडे पाऊस हा फक्त वर्षातून चार महिनेच पडतो, त्यामुळे पावसाची कमतरता किंवा पाण्याची कमतरता ही शेतकऱ्यांना जाणवत असते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पीक घेण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागते. कधी कधी तर हाताला आलेले पीक पाण्याच्या अभावी त्यांना असेच सोडून द्यावे लागते. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बहुतांश प्रदेश हा एक कोरडा प्रदेश म्हणून किंवा कमी पर्जन्यमान असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. तेथील शेतकऱ्यांना शेती करताना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा कमी पाऊस झाल्यानंतर पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा साठा करणे खूप महत्त्वाचे ठरते, जर शेतकऱ्याकडे शेततळे असेल तर उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या पाण्याचा त्रास हा त्याला कमी होतो. त्यामध्ये शेततळे असताना जर त्याने पाण्याची व्यवस्थित व्यवस्थापन केले जसे की ठिबक सिंचन करणे तर शेती करणे सोईस्कर होऊन जाते. हे शेततळे बनवणे प्रत्येकच शेतकऱ्याला जमेल असे नाही कारण त्यासाठी येणारा खर्च हा खूप असतो. त्यातच शेतकऱ्याचा इन्कम हा एक तुटपुंजा असतो.

पाण्याच्या या टंचाईची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने मागील त्याला शेततळे अशी योजना काढली आहे. या योजनेअंतर्गत पाण्याची टंचाई कमी व्हावी आणि वर्षभर पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार जो शेतकरी शेततळे मागतो त्या शेतकऱ्याला शेततळे दिले जाते त्या शेततळे बनवण्यासाठी मदत केली जाते.

चला तर मग आपण आजच्या लेखांमध्ये मागील त्याला शेततळे योजना याबद्दल माहिती घेणार आहोत.


योजनामागेल त्याला शेत तळे योजना MAGEL TYALA SHET-TALE YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थी पात्रतामहाराष्ट्र राज्याचा शेतकरी
मिळणारा लाभशेत तळे बांधनेसाठी आर्थिक मदत
अर्ज कसा करायचंऑनलाइन

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA

Table of Contents

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA |मागेल त्याला शेततळे योजनेची उद्दिष्टे –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःची शेततळे बांधण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक सहाय्य देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईच्या समस्येतून बाहेर काढणे.
  • शेतीसंबंधी विविध योजना काढून शेतीला प्रोत्साहन देणे.
  • हंगामी शेती चे चित्र बदलून संपूर्ण वर्षभर शेतकऱ्याला शेती पिकवता येईल यासाठी तरतूद करणे.
  • पाण्याचे टंचाईचे समस्या कमी झाल्यानंतर शेतकऱ्याला नगदी पिके घेणे किंवा वार्षिक द्विवार्षिक पिके घेणे किंवा फळबागा लागवडीसाठी प्रोत्साहित करणे.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA | मागेल त्याला शेततळे योजनेची वैशिष्ट्ये –

  • या योजनेतून मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA | मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ पुढीलप्रमाणे-

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50 हजार रुपये इतकी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. अनुदानाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात DBT मार्फत जमा केली जाते. त्यासाठी त्या शेतकऱ्याचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA | मागेल त्याला शेततळे योजना यासाठी निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे-

  • जे शेतकरी दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा शेतकऱ्यांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाते.
  • ज्या कुटुंबातील शेतकऱ्यांनी ची आत्महत्या झाली आहे अशा कुटुंबातील वारसांना या योजनेमध्ये निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते.
  • इतर सर्व प्रवर्गातील लोकांना या योजनेत जो पहिला अर्ज करेल त्यास प्रथम प्राधान्य या नुसार निवड प्रक्रिया राबवली जाते.

शेततळ्याचे नियोजित आकारमान कसे असेल –

या योजनेअंतर्गत खाली दिलेल्या तक्त्यांमधील कोणत्याही एका प्रकारचे शेततळ्याचे आकारमान निवडणे गरजेचे आहे. तसेच अपेक्षित खोदकाम आणि पृष्ठभागाच्या वरील क्षेत्रफळ याची देखील माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

इणलेट आऊटलेटसह व इणलेट आऊटलेट विरहित शेततळे-

अ. क्र . शेत तळ्याचे आकारमान क्षेत्रफळ होणारे खोदकाम
अ. इणलेट आऊटलेटसह
१५*१५*३ मीटर २२५ ४४१
२०*१५*३ मीटर ३०० ६२१
२०*२०*३ मीटर ४०० ८७६
२५*२०*३ मीटर ५०० ११३१
२५*२५*३ मीटर ६२५ १४६१
३०*२५*३ मीटर ७५० १७९१
३०*३०*३ मीटर ९०० २१९६
ब. इणलेट आऊटलेट विरहित शेततळे
२०*१५*३ मीटर ३०० ६२१
२०*२०*३ मीटर ४०० ८७६
२५*२०*३ मीटर ५०० ११३१
२५*२५*३ मीटर ६२५ १४६१
३०*२५*३ मीटर ७५० १७९१
३०*३०*३ मीटर ९०० २१९६

या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येऊ शकते, आणि कमीत कमी इनलेट आउटलेट या प्रकारांमध्ये कमीत कमी 15 x 15 x 3 मीटर या साईज चे शेततळे घेता येते.

शेततळे बनवत असताना त्याची जागा निवडणे हे एक महत्त्वाची काम आहे तर जागा निवडण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करणे बंधनकारक आहे –

  • काळी माती असणारी किंवा चिकन माती असणारी जमिनीला प्रमुख प्राधान्य द्यावे, अशी जमीन उपलब्ध नसल्यास ज्या जमिनीतून कमी पाण्याचा निचरा होतो अशा जमिनीची निवड करावी.
  • मुरमाड जमीन, सच्छिद्र खडक असणारी जमीन, वालुकामय जमीन अशी जमीन विचारात घेऊ नये.
  • पाणलोट क्षेत्रात शेततळे बनवण्यास प्राधान्य द्यावे.
  • टंचाईग्रस्त गावांमध्ये लाभ क्षेत्रात जलसंपदा विभागाच्या सर्व अटी आणि शर्तींना जोडून शेततळे घेण्यात यावे.
  • शेततळी बनवणारी जमिनीचा उतार हा जनरली तीन टक्के पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  • कोणत्याही प्रकारच्या नाला, ओढा, ओहोळ याच्या प्रवाहाच्या वाटेमध्ये शेततळे घेणे टाळावे.
  • शेततळ्यातून पाणी पाजून शेजारील इतर शेतकऱ्यांच्या रानात जाऊ नये आणि आसपासची जमीन दलदल किंवा चिखल होईल अशा ठिकाणी शेततळे घेणे टाळावे.
  • पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची क्षमता ही शेततळ्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.

आंमलबाजवणी वेळापत्रक – MAGEL TYALA SHET-TALE YOJANA

जाहिरात प्रसिद्ध करणे शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर ७ दिवसात
लाभयार्थ्यानी पूर्ण अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करण्याची मुदत जाहिरात नंतर ४५ दिवस
शेत तळ्याची जागेची पाहणी १० दिवसांचा कालावधी
अर्जाची छाननी , पात्र अर्जदार यादी तयार करणे आणि तालुका स्तरीय समितीकडून मान्यता घेणे कालावधी १५ दिवस
तालुका स्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्या नंतर शेत तळ्यांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, पात्र अपात्र उमेदवार यादी प्रसिद्ध करणे. कार्यारंभ आदेश देणे. कालावधी १५ दिवस

शेतकरी बांधत असताना लाभार्थ्याने खालील जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे –

  • शेततळे हे कृषी विभागाने संमती दिलेल्या जागेवरती बांधणे बंधनकारक आहे.
  • शेततळे बांधायला मंजुरी मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या आत शेततळ्याचे काम पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थीने त्याचे बँक डिटेल्स ही कृषी विभागातील कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.
  • योजनेत मंजूर झालेल्या रक्कमे व्यतिरिक्त एकही रुपया जादा महाराष्ट्र सरकारकडून मिळणार नाही.
  • शेतकऱ्यांनी आपल्या शेततळ्यांची निगा राखणे गरजेचे आहे वेळोवेळी दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
  • शेततळ्याच्या बांधावरती झाडे लावणे आवश्यक आहे.
  • बांधत असलेल्या शेततळ्याची नोंद ही सातबारा वरती करणे बंधनकारक राहील.
  • शेततळे बांधून पूर्ण झाल्यानंतर या योजनेमार्फत शेततळ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे असा बोर्ड शेततळ्यापाशी लावणे हे अनिवार्य आहे, याचा खर्च शेतकऱ्याला स्वतःला करावा लागेल.
  • शेततळ्यासाठी लागणारा प्लास्टिकचा कागद हा शेतकऱ्याने स्वखर्चाने टाकावा.
  • अचानक होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेततळ्याचे नुकसान झाले तर शेततळ्याची भरपाई मिळणार नाही.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA |लाभार्थीची पात्रता-

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
  • योजनेच्या नावाप्रमाणे मागेल त्याला शेततळे या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना शेततळे बांधणीसाठी आर्थिक सहाय्य मिळेल पण प्रथम अर्ज येणाऱ्या शेतकऱ्यांस प्राधान्य दिले जाईल.
  • महाराष्ट्राचा रहिवासी असलेला शेतकरीच फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • शेतकरी व्यक्तीच या योजनेसाठी पात्र ठरेल.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA | मागेल त्याला शेततळे योजनेच्या अटी आणि शर्ती-

  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याच्या नावावरती कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेला शेतकरी योजनेसाठी पात्र ठरेल महाराष्ट्र बाहेरील शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.
  • निश्चित केलेल्या किंवा मंजूर झालेल्या आकारमानाचे शेततळे बांधणे अनिवार्य आहे.
  • कृषी विभागाने निश्चित केलेल्या जागेवरती शेततळे बांधावे.
  • मंजुरी पासून तीन महिन्याच्या आत शेत तळे बांधण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे.
  • शेततळे बांधून पूर्ण झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेचा अर्ज हा महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन करणे गरजेचे आहे.
  • शेततळ्याची जागा निवडताना ती जागा तांत्रिकदृष्ट्या बरोबर असणे गरजेचे आहे.
  • मशीन चालक किंवा मजूर यांना पेमेंट हे शेतकऱ्यामार्फत केले जाईल त्यांना पेमेंट परस्पर महाराष्ट्र सरकार देत नाही.
  • या योजनेमार्फत जास्तीत जास्त 50 हजार रुपये इतकी रक्कम मंजूर होते त्याच्यावरील जर खर्च झाला तर तो खर्च शेतकऱ्याला स्वतःला करणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करीत असलेला शेतकरी याने यापूर्वी सामुदायिक शेततळे भात खाचरा सोबत तयार होणारी बॉडी यासारखे शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  • शेततळ्यातून पिकांना पाणी पुरवण्याची व्यवस्था शेतकऱ्याला स्वतःला करावी लागते.
  • शेततळ्यामध्ये गाळ साठू नये किंवा पावसाच्या पाण्यासोबत गाळ वाहून येऊ नये यासाठी योग्य ती तरतूद शेतकऱ्याला करणे भाग आहे.

MAGEL TYALA SHET-TALE YOJANA | मागेल त्याला शेततळे योजनेला अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे-

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • पिवळ्या रेशन कार्ड किंवा दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • जमिनीचा ७/१२ आणि ८ अ
  • प्रतिज्ञापत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला

अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –

  • गुगल वरती शेत मागेल त्याला शेततळे योजना असे सर्च करायचे.
  • अधिकृत योजनेची वेबसाईटला भेट देऊन शेततळे योजनेचा अर्ज उघडायचा.
  • अर्ज ओपन झाल्यावर त्याच्यात विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करायचं.