MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | आज जर आपण बघितलं तर समाजामध्ये स्त्री आणि पुरुष या एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. स्त्री पुरुष समानता, स्त्री सशक्तिकरण यासारख्या व्याख्या या फक्त पुस्तकापुरत्या मर्यादित न राहता आता प्रत्यक्षात उतरत आहेत. यामध्ये महिलांनी पुढाकार घेतला ही खूप मोठी गोष्ट आहे. तसेच अजूनही काही ठिकाणी महिला या स्वतःहून पुढे येऊन स्वावलंबी बनायला घाबरतात. त्याची कारणे म्हणजे कुटुंबाकडून पाठिंबा नसणे, आर्थिक परिस्थिती ने साथ न देणे, आवश्यक गोष्टींची माहिती नसणे, ज्या गोष्टी करायची इच्छा आहे अशा गोष्टींबद्दल प्रशिक्षण नसणे, इत्यादी कारणांमुळे महिला आत्मनिर्भर बनायला कमी पडत आहेत.

सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे आर्थिक पाठबळ नसणे, आर्थिक पाठबळ मिळाल्यानंतर बाकीचे समस्या या गौण ठरतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नुसार त्यांना प्रत्येक कुटुंब महिलांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सपोर्ट करेलच असे नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी अशी योजना सुरू केली आहे.

त्या योजनेचे नाव MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना असे आहे. महिलांना किंवा महिला बचत गटाला त्यांचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज दिले जाते, ते कर्ज पाच लाख ते दहा लाख यादरम्यान असू शकते. त्या कर्जाच्या रकमेवर साधारण 12 % व्याज आकारले जाते. महाराष्ट्र शासन हे व्याज स्वतः भरते आणि महिलांना व्याजमुक्तरित्या कर्ज दिले जाते. महिला स्वयंशुद्धी व्याज परतावा योजना ही महाराष्ट्र राज्यांमध्ये इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश हा महिला सशक्तिकरण सबळीकरण आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

चला तर मग आपण महिला स्वयंसेवी व्याज परतावा योजना बद्दल सविस्तर माहिती घेऊया.


योजनेचे नावमहिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना | MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य – इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
लाभार्थी पात्रतामहाराष्ट्राच्या इतर मागास वर्गातील महिला
योजने अंतर्गत मिळणार लाभ५ ते १० लाख रुपये दरम्यान आर्थिक बिन व्याज कर्ज
योजनेचा उद्देशमहाराष्ट्रातील महिलांना स्वतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
अर्ज कसा करायचाऑफलाइन

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA

Table of Contents

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेची उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी प्रोत्साहन देणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात कामगिरीसाठी प्रोत्साहित करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वयंरोजगार च्या संधी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • या योजनेअंतर्गत महिलांना आजच्या युगात जगण्यासाठी सशक्त करणे.
  • महिलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी कोणावर अवलंबून राहायला लागू नये म्हणून उपाययोजना करणे.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंशुद्धी व्याज परतावा योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत दिली जाणारे आर्थिक कर्जाची रक्कम ही महिला बचत गटाच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केली जाते.
  • या योजनेअंतर्गत महिलांना मिळालेल्या कर्जाच्या रकमेवरती शून्य टक्के व्याज आकारले जाईल.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे

  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत  पाच ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांना उपलब्ध करून देणे.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकते

  • महाराष्ट्र राज्यामध्ये रहिवासी असलेल्या इतर मागास प्रवर्गांमधील अशा महिला ज्या महिला चा बचत गट आहे अशा महिला ह्या महिला स्वयंसिद्धी व्याज परवा योजनेसाठी पात्र आहेत.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा फायदा

  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मार्फत आर्थिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या सुशिक्षित होतकरू बेरोजगार महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • पैशासाठी कुणावरती अवलंबून न राहता महिला स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला बचत गटातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला या स्वतःच्या पायावरती उभा राहतील आणि आत्मनिर्भर बनतील.
  • महाराष्ट्र राज्यातील महिला या महिला स्वयंशुद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत आर्थिक कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी सक्षम बनतील.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या अटी आणि शर्ती

  • महाराष्ट्र राज्यातील  इतर मागास प्रवर्गातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • अर्ज करीत असलेल्या महिला या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे गरजेचे आहे, महाराष्ट्र बाहेरील महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत.
  • या योजनेला अर्ज करण्यासाठी महिलांचा बचत गट असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या बचत गटातील महिला या 18 ते 60 वय वर्ष वयोगटातील असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदार महिला या कोणत्याही बँकेचा किंवा वित्त संस्थेच्या कर्ज थकबाकीदार नसणे गरजेचे आहे.
  • जर अर्जदार महिलांनी यापूर्वी शासनाच्या कोणत्याही व्याज परतावा योजनेचा किंवा कर्ज योजनेचा लाभ घेतलेला असेल तर ती कर्जाची रक्कम पूर्ण फेड केली आहे असे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे.
  • कर्जासाठी अर्ज करत असताना व्यवसायाचा प्लॅन देणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी एका कुटुंबातील एकच महिला अर्ज करू शकते.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी योजनेचा अर्ज करताना लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे –

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड,
  • रेशनिंग कार्ड जातीचा दाखला (इतर मागास प्रवर्गाचा पुरावा)
  • जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा म्हणून रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड लाईट बिल फोन बिल
  • बचत गटाच्या बँक डिटेल्स
  • प्रतिज्ञापत्र
  • मोबाईल नंबर
  • ई मेल आयडी
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याच्याबद्दलचा आराखडा
  • बचत गटातील इतर महिला सदस्यांचे कौटुंबिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी योजनेचा अर्ज करण्याची प्रोसेस खालील प्रमाणे

  • अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलांना आपल्या जिल्ह्याच्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करायची आहे.
  • कार्यालयातून महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा अर्ज घ्यायचा.
  • त्याच्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची.
  • पुन्हा एकदा सर्व अर्ज आणि कागदपत्रे तपासून बघायची.
  • संबंधित अधिकाऱ्याला हा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा अर्ज जमा करायचा.
  • अशा रीतीने या योजनेला अर्ज करण्याची प्रोसेस संपन्न होईल.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –

  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत महिलांना जे कर्ज मिळणार आहेत त्या कर्जाशी रक्कम ही महिलांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे.
  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेचे जे काही व्याज होणार आहे ते व्याज ओबीसी महामंडळ यांच्या मार्फत बँकेला देण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना मिळणारे कर्जही शून्य टक्के व्याजदराने मिळणारे कर्ज होऊन जाते.
  • महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही योजना व्याज परतावा योजना अशा दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते.

MAHILA SWAYAMSIDHHI VYAJ PARTAVA YOJANA | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही कोणामार्फत सुरू करण्यात आली ?

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत चालू करण्यात आली.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना चालू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता ?

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना योजना चालू करण्यामागचा प्रमुख उद्देश हाच आहे की महाराष्ट्र राज्यातील महिला या आर्थिक रित्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत महिला आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत आणि त्यांची व्यवसायिक प्रगती झाली पाहिजे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत काय लाभ मिळतो ?

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गांमधील महिलांना स्वतःचा रोजगार किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी रुपये पाच लाख ते रुपये दहा लाख यादरम्यानचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने दिले जाते.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना चे लाभार्थी कोण आहेत ?

महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गांमधील अशा महिला ज्या महिलांचा बचत गट आहे अशा महिला या महिला स्वयंशुद्धी व्यास परतावा योजनेचा लाभार्थी असतील.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना चा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ?

अर्जदाराचे आधार कार्ड रेशनिंग कार्ड रहिवासी दाखला वयाचा पुरावा जातीचा दाखला शपथपत्र मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड साईट चे फोटो व्यवसायाचा प्लॅन म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे सदर योजनेच्या अर्जासोबत जोडणी बंधनकारक आहे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना चा अर्ज कसा केला जातो ?

ऑफलाईन मार्गाने महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा अर्ज केला जातो.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत दिले जाणारे कर्ज किती रकमेची असते ?

सदर योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज हे रुपये पाच लाख ते रुपये दहा लाख यादरम्यान आहे.

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरती किती टक्के व्याजदर आकारला जातो ?

महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक कर्जावरती शून्य टक्के व्याजदर आकारला जातो.


अशा रीतीने महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन देणारी महत्त्वकांक्षी योजना महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आहे.

तरी जास्तीत जास्त महिलांनी सदर योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासावरती भर द्यावा आणि एक उत्कृष्ट देश घडवण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे.