motivational suvichar
“समुद्रातील तुफाना पेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.“
“जेव्हा सगळच संपले असं तुम्हाला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची…“
“नेहमी लक्षात ठेवा की लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाही.“

“रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा.“
“विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केला पाहिजे.“
“माणूस म्हणतो पैसा आल्यावर मी काहीतरी करीन पण पैसा म्हणतो काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येईल.“
“काही गोष्टी हो म्हणून सोडून दिल्या पाहिजेत कारण आपण प्रत्येकाला समजावून नाही सांगू शकत.“
“जन्माला आल्यावर सुद्धा आपण काही घेऊन येत नाही आणि मेल्यानंतर सुद्धा काही घेऊन जात नाही, उरते ती फक्त माणसाची माणुसकी.”
“स्वतःला इतकं मजबूत बनवा की आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळात ही तुमचा संयम ढळला नाही पाहिजे.”
“ज्याच्याकडे प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना असते तोच आयुष्यभर सन्मानाने जगू शकतो आणि ज्याची भावना कष्ट न करता जगण्याची असते तोच कुमार्ग चा अवलंब करत असतो.”
“वेळ खूप जखमा देते म्हणूनच कदाचित घड्याळाला फुल नाही काटे असतात.”
“विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.”
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधात नक्की येईल.”
“पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात.”
“रागामध्ये हजारो शब्दांचा प्रयोग करण्यापेक्षा मौन ह्या एका गोष्टीमुळे जीवनात शांतता निर्माण होते.”
“आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.”
“प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचा अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.”
motivational suvichar