NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजना

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये शेतीला खूप सारे अडचणींना सामोरे जावे लागते. शेती करणारे शेतकऱ्यांचे जीवन हे खूप हलकीचे आहे त्यांच्या दैनंदिन जीवनात खूप सारे अडचणी आहेत त्या अडचणी या शेतमालाचा भाव असेल पाण्याची कमतरता असेल वाढणारे खतांचे दर असतील नैसर्गिक आपत्तीमुळे पुरामुळे महापुरामुळे पिकाचे होणारे नसतोच असेल अशा भरपूर सारे अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.

याचे परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती होते आणि परिणामी शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न घटते. जर शेतकऱ्याचे उत्पन्नामध्ये घट झाली तर त्याच्या दैनंदिन जीवनातील बाकीच्या गोष्टींवरती या गोष्टीचा परिणाम होतो जसे की त्याचे घरगुती खर्च मला बाळांची शिक्षण घरातील वृद्ध व्यक्तींचे आरोग्याचे खर्च अशा भरपूर साऱ्या गोष्टींवरती या शेतीच्या उत्पादनाच्या घट चा होणारा परिणाम आहे.

शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या भरपूर साऱ्या गोष्टींसाठी भांडवलासाठी कर्ज काढत असतो. आणि जर कर्ज काढले आणि दुर्दैवाने जर भविष्यामध्ये शेतमालाला भाव नाही मिळाला किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाची नासधूस झाली तर खूप अवघड होऊन जाते. शेतकऱ्याला ते कर्ज कसे फेडायचे ही मोठी अडचण त्याच्यासमोर निर्माण होते. सरकार अधून मधून शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे म्हणजे शेतकऱ्याला कुबड्या चालायला देणे असा आहे. वारंवार होणारे कर्जमाफीमुळे शेतकरी या गोष्टीसाठी सोकला आहे. शेतकरी स्वतः काही खटपट न करता आत्मनिर्भर बनत नाहीयेत आणि ही चिंतेची बाब आहे.

यावरती पर्याय म्हणून सरकारने एक योजना काढली त्या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी सन्मान योजना. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्देश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे परंतु या योजनेमध्ये 50 टक्के वाटा हा केंद्र शासन आणि 50 टक्के वाटा हा राज्य शासन यांचा आहे. म्हणजेच ₹6000 राज्य शासन देते आणि 6000 रुपये केंद्र शासन यांच्याकडून दिले जातात.

चला तर मग आपण नमो शेतकरी सन्मान योजना नेमकी काय आहे तिच्या पात्रतेच्या अटी काय आहेत त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये बघून घेऊ या…


योजनेचे नावनमो शेतकरी सन्मान योजना | NAMO SHETKARI SANMAN YOJANA
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना प्रोत्साहन देणे
लाभार्थ्याची पात्रतामहाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी
योजनेतून मिळणारा लाभदरवर्षी 12 हजार रुपयांचा आर्थिक लाभ
अर्ज कसा करायचाऑनलाइन आणि ऑफलाइन

NAMO SHETKARI SANMAN YOJANA

Table of Contents

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेचे उद्दिष्ट-

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत देऊन त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणे.
  • शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणे.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेचे वैशिष्ट्य –

  • योजना केंद्र शासनाने राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यात आलेली आहे.
  • या योजनेचा उद्देश हा एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना लाभ देणे असा आहे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने सहा हजार नऊशे कोटी रुपयांचे बजेट ठरवले आहे.
  • या अंतर्गत मिळणारी लाभ आणि त्याचे आर्थिक कमी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत पुरवली जाणार आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत कोणताही गैर प्रकार होण्याचे चान्सेस नाहीत.
  • पिक विम्याचे रक्कम देखील या योजनेअंतर्गत राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येईल.
  • नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांसाठी खुली आहे.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी कोण –

  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र आहेत तो शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा पुढीलप्रमाणे –

  • शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी 12 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्यता निधी मिळणार आहे.
  • नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सरकारकडून एक आर्थिक पाठबळ मिळणार आहे प्रोत्साहन मिळणार आहे परिणामी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखल्या जाणार आहेत.
  • ही एक महत्वकांक्षी योजना असूनही शेती व्यवसायाला प्रोत्साहन देणारी योजना आहे यामुळे इतर नागरिक देखील शेतीकडे आकर्षित होऊन शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी आवश्यक पात्रता –

  • अर्जदार शेतकऱ्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेचे नियम अटी आणि शर्ती –

  • योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्र बाहेरील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • अर्ज करीत असलेल्या व्यक्ती हा शेतकरी असणे गरजेचे आहे तसा त्याला पुरावा जोडावा लागतो.
  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर ती जमीन असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन किंवा ऑफलाइन रित्या या योजनेचा अर्ज केला जातो.
  • अर्ज करीत असलेल्या शेतकऱ्याकडे नॅशनलाईज बँक चे खाते असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांच्या आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे कारण येणाऱ्या लाभाची रक्कम ही डीबीटी मार्फत डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
  • जर अर्ज करीत असलेला शेतकरी हा शासकीय कर्मचारी असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे-

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्यांचे रेशन कार्ड
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • अर्जदार शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स
  • जमिनीची कागदपत्रे सातबारा आणि आठ अ
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

NAMO SHETKARI SANMAN YOJANA | नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज कसा करायचा –

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत –

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला आपल्या जिल्ह्याच्या कृषी कार्यालयांमध्ये जावे लागेल.
  • कृषी कार्यालयामध्ये चौकशी करून नमो शेतकरी सन्मान योजनेचा अर्ज घ्यायचा त्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडायची पुन्हा एकदा अर्जाची पडताळणी करून घ्यायची.
  • तो अर्ज संबंधित कृषी विभागातील अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
  • अशा रीतीने तुमचा ऑफलाइन अर्ज भरून होईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत –

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
  • विशाल वरती भेट दिल्यानंतर नवीन युजर चे रजिस्ट्रेशन करायचे त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणी या बटनावरती क्लिक करायचे.
  • त्यानंतर समोर एक पेज ओपन होईल त्यावरती विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आणि सेव बटनावरती क्लिक करायचं.
  • अशाप्रकारे नवीन रजिस्ट्रेशन होईल.
  • त्यानंतर पुन्हा एकदा लॉगिन करून होमपेज वरती नमो शेतकरी सन्माननीय योजनेच्या बटनावरती क्लिक करायचे.
  • आता तुमच्यासमोर योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती असुकरित्या भरायची आवश्यकता सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि सेव बटनावरती क्लिक करायचे.
  • अशा रीतीने तुमचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्याची यादी कशी बघायची –

  • लाभार्थ्याची यादीमध्ये शेतकऱ्यांनी आपले नाव शोधण्यासाठी शेतकऱ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होम पेज वरती नमो शेतकरी सन्माननिधी योजनेच्या लाभार्थीच्या यादीवरती क्लिक करायचे.
  • त्या यादीमध्ये शेतकऱ्यांनी आपले नाव सर्च करायचे.

नमो शेतकरी सन्मान योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

नमो शेतकरी सन्मान योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?

नमो शेतकरी सन्मान योजना ही केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये ती महाराष्ट्र सरकार यांच्या मार्फत राबवली जाते.

नमो शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश नेमका काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना प्रोत्साहन म्हणून आर्थिक लाभ पुरवणे .

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत किती आर्थिक लाभ मिळतो ?

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला प्रतिवर्षी 12 हजार रुपये इतका आर्थिक लाभ दिला जातो.

नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत लाभाचे वितरण कसे होते ?

नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दिला जाणारा लाभा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो.

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभाच्या रकमेमध्ये केंद्र शासनाने राज्य शासन यांच्या वाटेचे प्रमाण कसे आहे ?

केंद्र शासन यांच्याकडून 6000 रुपये आणि राज्य शासन यांच्याकडून 6000 रुपये असे 50-50% वाटायचे प्रमाण केंद्र शासनाने राज्य शासन यांचे नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी काय पात्रता आहे ?

महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेला कोणताही शेतकरी या योजनेसाठी पात्र होऊ शकतो. योजनेला पात्र होण्यासाठी कोणत्याही जाती धर्माची अट घालण्यात आलेली नाही.

नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत ती शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्देश सरकारने ठेवले आहे ?

नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्धार सरकारने केलेला आहे.

नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत किती बजेट राज्य सरकारने ठरवलेले आहे ?

सहा हजार नऊशे कोटी इतके बजेट महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी राखून ठेवलेले आहे.

नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणती ?

अर्ज करत असलेल्या शेतकऱ्याने आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आयडी उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जमिनीचा सातबारा उतारा आणि पासपोर्ट साईट चे फोटो त्यादि कागदपत्रे अर्ज सोबत जोडणे गरजेचे आहे.