PIK KARJ YOJANA | महाराष्ट्र चा शेतकरी खूप साऱ्या समस्यांनी ग्रासलेला आहे, त्यामध्ये कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, शेतमालाला कमी भाव, निर्यात बंदी, आत्महत्या, भांडवलाची कमी, इत्यादी प्रकारच्या समस्या या शेतकऱ्याला आहेत.
केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन या सगळ्या समस्या वरती उपाय योजना शोधात आहे, यामधले बरेचशे प्रोब्लेम हे एक मेकांना संलग्न आहेत.
शेतकऱ्यांचे या साऱ्या समास्यापैकी एक समस्या म्हणजे भांडवलाची समस्या, कमी करण्यसाठी महाराष्ट्र सरकार ने पाउल उचालाले आहे. आणि त्या प्रमाणे शेतकऱ्याला शेतीसाठी ३ लाख रुपये चे आर्थिक कर्ज बिनव्याजी स्वरुपात देण्यात येते.
या योजनेचा मुख्य उद्देश च हा आहे कि शेतकर्यांना ना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
योजनेचे नाव | पिक कर्ज योजना | PIK KARJ YOJANA |
योजनेचा उद्देश | शेतकर्याची आर्थिक समस्या सोडवणे. |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेलेल सर्व शेतकरी |
योजनेतून मिळणारा फायदा | रुपये ३ लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |

PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजनेची प्रमुख उद्दिष्टे –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना असणारा शेत भांडवलाचा प्रोब्लेम सोडवणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना शेती करत असताना येणाऱ्या समस्या कमी करून, त्याना शेती साठी प्रोत्साहन देणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर असणारा कर्जाचा बोजा विविध समस्यांचा बोजा कमी करणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अशा उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा पुरवणीची त्या बघून राज्यातील इतर नागरिक शेती या व्यवसायाकडे आकर्षित होतील.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजनेची वैशिष्टे-
- हे कर्ज बँक द्वारे दिले जाते आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला कर्ज घेवून देण्यास मदत करत असते.
- पीक कर्ज योजना च्या अंतर्गत दिले जाणारे कर्ज हे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केले जाते आणि त्यासाठी त्या शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि बँक एकमेकांना लिंक करणे गरजेचे आहे.
- महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणारी एक महत्त्वकांक्षा योजना सुरू केलेली आहे.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज विमा योजनेचा फायदा –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला ३ लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
- पीक कर्ज विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळणारे कर्ज याच्या वरती जे काही बँक व्याज आकारत असते ते व्याज महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत बँकेला मिळत असते त्यामुळे ती बँक शेतकऱ्याकडून कोणत्याही प्रकारचे व्याज घेत नाही.
- पीक कर्ज विमा योजनेमुळे महाराष्ट्र राज्यांमध्ये जी काही नवीन तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील तरुण असतील शहरी भागातील तरुण असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुण जे की नोकरी मिळवण्याचे तयारीत आहेत किंवा नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत अशा प्रकारच्या तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यास प्रोत्साहित करणारी ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
- पीक कर्ज विमा योजनेमध्ये शेतकऱ्याला जे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे त्यामुळे व्याजाचे रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार नाही परिणामी त्याच्या पैशाची बचत होण्यास मदत होईल.
- पीक कर्ज विमा योजनेअंतर्गत जे कर्ज मिळणार आहे त्या कर्जाच्या रकमेतून शेतकरी त्याला शेतीसाठी लागणारे आवश्यक गोष्टी घेऊ शकतो जसे की अवजारे बियाणे खते औषधे मजुरांचे खर्च देणे इत्यादी गोष्टी तो करू शकतो.
- शेतकऱ्याला पैसे अभावी जी काही शेतीतील कामे करताना अडचणी येतात त्या अडचणी या सदर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जामुळे सोडवल्या जातील.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजने मध्ये मिळणारे कर्जाची रक्कम –
- पिक कर्ज योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या वतीने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला बँकेकडून रुपये तीन लाख पर्यंतचे कर्ज देऊ केले जाते.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजने अंतर्गत व्याजदर-
- पिक कर्ज योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन कर्जाच्या रक्कमे वर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारात नाही.
- पिक कर्ज योजनेमध्ये जे काही कर्ज शेतकऱ्याला देण्यात येणार आहे त्या कर्जाच्या रकमेवरती बँक जे काही व्याज आकार येईल ते व्याज महाराष्ट्र सरकार यांच्याकडून बँकेला दिले जाते त्यामुळे बँक शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचे व्याज लावत नाही.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज फेडीचा कालावधी –
- पिक कर्ज योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या फेडीचा कालावधी हा शेतकरी सध्या घेत असलेल्या पिकाच्या उत्पादनांवर निर्धारित केलेला आहे.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजने साठी पात्रता, अटी आणि शर्थी –
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुळचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र च्या बाहेरील शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरत नाही.
- ज्या शेतकऱ्याला पीक कर्ज योजनेअंतर्गत पीक कर्जाचा लाभ घ्यायचा आहे अशा अर्जदार शेतकऱ्याची सध्या कसत असलेली जमीन ही त्याच शेतकऱ्याच्या नावावर असणे बंधनकारक आहे.
- पिक कर्ज योजनेसाठी अर्ज करीत असलेला शेतकरी हा किमान २१ वय वर्षे ते कमाल ६५ वय वर्षे या दरम्यान असावा.
- ६५ वर्षे पेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्याला जर कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर त्या कर्ज अर्जामध्ये सामान्य वयाचा एक कर्ज अर्जदार सामील करावा.
- शेतकर्याने घेतलेले कर्ज हे फक्त शेती संबंधी कामासाठी च वापरले पाहिजे.
- पिक कर्ज योजनेसाठी अर्ज करीत असलेला शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब प्रवर्गांमधील असणे बंधनकारक आहे.
- पिक कर्ज योजनेसाठी अर्ज करीत असलेला शेतकरी हा कोणत्याही बँकेचा किंवा इतर कोणत्याही वित्त संस्थेचा थकबाकीदार नसणे गरजेचे आहे.
- एका कुटुंबातील एक व्यक्ती फक्त अर्ज करू शकतो.
- जो शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी अर्ज गृहीत आहे अशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि बँक एकमेकांना लिंक असणे बंधनकारक आहे कारण दिले जाणारे कर्ज हे थेट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा केले जाते.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजने साठी आवश्यक कागदपत्रे-
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा रहिवाशी दाखला
- ७/१२ आणि ८ अ
- मोबाइल नंबर
- ई-मेलआय डी
- अर्जदाराचे पासपोर्ट साइज फोटोज
- स्वयंघोशनापत्र
- बँक खात्याचा तपशील
- NOC / ना हरकत प्रमाणपत्र
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज योजने साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
या योजने साठी अर्ज करण्यासाठी दोन मार्ग आहेत. १. आपल्या क्षेत्रातील बँकेत जाऊन २. शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करून
बँकेत जाऊन अर्ज करण्याची पद्धत –
- आपल्या जवळील बँक मध्ये जाऊन पिक कर्ज योजनेचा अर्ज घेवून, त्यात सर्व माहिती भरावी आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज बँक मध्ये जमा करावा.
- या प्रकारे तुम्ही बँक मध्ये अर्ज करू शकता.
पिक कर्ज विमा योजनेचा online application-
- योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून तुम्ही अर्ज करू शकता.
- “नवीन कर्ज साठी येथे कीलक करा” असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- अर्ज उघडला कि विचारलेली सर्व माहिती भरून द्यावी , आवश्यक कागदपत्रे online जमा करावीत आणि अर्ज सबमिट करावा.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज विमा योजनेच्या अर्जाची स्थिती कुठे आणि कशी बघायची ?
- तुम्ही योजनेसाठी भरलेला अर्ज ची सध्या ची स्थिती काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला योजनेच्या वेबसाईट वरती जावे लागेल.
- होम पेज वर “ अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.” असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचे लोगिन डीटेल्स भरून लोगिन करा आणि अर्जाची सध्या ची परिस्थिती बघा.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज विमा योजने अंतर्गत कर्जाची वितरण व्यवस्था-
- एकदा का अर्ज केला कि, अर्जाची छाननी करून सर्व माहिती योग्य असल्यावर, कागदपत्रे योग्य असल्यावर कर्ज मंजूर केले जाईल.
- कर्जाची रक्कम हि थेट शेतकऱ्याच्या खात्य मध्ये जमा केली जाते.
PIK KARJ YOJANA | पिक कर्ज विमा योजने बद्दल जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न –
पिक कर्ज योजना कोणामार्फत चाळूकारण्यात आली आहे ?
पिका कर्ज योजना हि महाराष्ट्र शासनाने चालू केली आहे.
या योजनेमध्ये किती रक्कमेचे कर्ज मिळते ?
या योजनेमार्फत रुपये ३ लाख पर्यंतचे कर्ज मिळते.
पिक कर्ज ची परतफेड न केल्यास काय होईल ?
कर्जाची परतफेड करण्यासाठी एक कालावधी दिला जातो, त्या कालावधी च्या ९० दिवसानंतर देखील जर शेतकऱ्याने कर्ज नाही भरले तर त्या शेतकऱ्याचे खाते NPA मध्ये जाते.
पिक कर्ज ची पात्रतेचे काय निकष आहेत.
महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
स्वताची जमीन असावी.
वय वर्षे २१ ते ६५ दरम्यान असावे.
६५ वर्षे पेक्षा जास्त च्या अर्जदाराने सह-कर्जदार दुसरा नेमावा.
पिक कर्ज योजनेतून कर्ज घेतल्यावर किती व्याजदर आहे ?
पिक कर्ज योजनेबिनव्याजी कर्ज मिळते.
पिक कर्ज योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावरती परतफेडचा कालावधी किती निश्चित करण्यात आलेला आहे ?
शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज याचा परतफेड कालावधी हा शेतकऱ्याने सध्या लावलेली पीक किती कालावधीची आहे यानुसार ठरत असतो.
पीक कर्ज योजनेला अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात ?
पिक कर्ज योजनेला अर्ज करतेवेळी अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड रहिवासी दाखला जमीन सातबारा आणि आठ अ मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड चे फोटो शपथपत्र रेशनिंग कार्ड बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे लागतात.
पीक कर्ज योजनेसाठी शेतकरी कोणत्या मार्गाने अर्ज करू शकतो ?
पीककर्ज योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला दोन पद्धती आहेत एक तर शेतकरी आपल्या जवळच्या बँक मध्ये जाऊन सदर योजनेसाठी अर्ज करू शकतो किंवा शेतकऱ्याला पीक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रित्या अर्ज करावा लागतो.
अशा रीतीने पीक कर्ज योजनेची माहिती वर दिल्याप्रमाणे आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा आपल्या जवळच्या शेतकऱ्यांना देखील या योजनेबद्दल सांगावे आपले नातेवाईकांना देखील या योजनेबद्दल सांगावे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक सदर योजनेचा लाभ घेतील आणि महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत या योजनेची माहिती मिळावी यासाठी तुम्ही तुमचे मोलाचे योगदान द्यावे.
चला तर मग परत भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये…