PITHACHI GIRANI YOJANA | सध्याच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील काम करत आहेत. पुरुषांप्रमाणेच महिला देखील सर्वच क्षेत्रात अग्रेसरित्या नोकरी करत आहेत. एवढेच नाही तर महिला फक्त नोकरीचेच क्षेत्रात नाही तर सध्या जर बघितले तर त्या उद्योग क्षेत्रात देखील अग्रेसर आहेत.
परंतु यामध्ये चिंता करण्याचं कारण एकच आहे की हा महिलांचा सहभाग हा फक्त शहरी भागाम पुरता मर्यादित राहिलेला आहे. ग्रामीण भागात आज देखील महिला तेवढा पुढे सरून नोकरी क्षेत्रात नाहीत किंवा व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या नाहीत. महिलांनी जास्तीत जास्त नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये सहभाग घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन वेगवेगळे प्रकारच्या योजना काढून त्यांना प्रोत्साहन देत आहे. आणि ग्रामीण भागासाठी प्रामुख्याने काही योजना ह्या महाराष्ट्र शासनाने काढलेले आहेत.
आज आपण जी योजना बघणार आहोत त्या योजनेचे नाव आहे PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजना. ही जी पिठाची गिरणी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत चालू करण्यात आलेली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देशच हा आहे की ग्रामीण भागातील महिलांनी जास्तीत जास्त रोजगाराकडे वळावं त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करावा त्यासाठी त्यांनाही प्रोत्साहन देणारी योजना.
पिठाची गिरणी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील आर्थिक रित्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील महिलांना नवीन पिठाची गिरणी ही 100% अनुदान तत्त्वावरती दिली जाते.
लाभार्थी महिलांना पिठाची गिरणी घेण्यासाठी स्वतःच्या पदरचा एक रुपयाही न खर्च करता त्यांना पिठाची गिरणी घेता येते. महाराष्ट्र शासन ही सदरची योजनेअंतर्गत पिठाची गिरणी घेण्यासाठी शंभर टक्के आर्थिक अनुदान पुरवत आहे.
PITHACHI GIRANI YOJANA मुळे जास्तीत जास्त महिलांना स्वतःचा पिठाचा गिरणीचा व्यवसाय चालू करण्यासाठी मदत होणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की ग्रामीण भागातील महिला या आत्मनिर्भर बनतील स्वतःचा रोजगार चालू करू शकतील. याचबरोबर समाजामधील इतर असणाऱ्या महिलांना देखील त्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करतील.
चला तर मग बघूया ही PITHACHI GIRANI YOJANA नेमकी काय आहे या योजनेच्या पात्रतेच्या अटी काय आहेत यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी अर्ज रद्द होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यायची अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….
योजनेचे नाव | पिठाची गिरणी योजना | PITHACHI GIRANI YOJANA |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे त्यासाठी पिठाची गिरणीची वाटप करणे. |
योजनेची लाभार्थी कोण आहेत | महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला |
योजनेतून मिळणारा लाभ काय | मोफत पिठाची गिरणीचे वितरण त्यासाठी 100% अनुदान देणे. |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |

PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजना चे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबातील महिलांना पिठाची गिरणीचे वितरण करणे.
- महाराष्ट्रातील गरजू गरीब महिलांना शंभर टक्के अनुदान तत्वावरती पिठाची गिरणीचे वाटप करणे.
- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे.
- ग्रामीण भागातील महिलांना पैसे कमवण्याचा नवीन सोर्स उपलब्ध करून देणे.
- महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करून घडवून आणणे.
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना व्यवसाय देखील समान संधी उपलब्ध करून देणे.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजना चे वैशिष्ट्य –
- पिठाची गिरणी योजनेअंतर्गत महिलांना शंभर टक्के अनुदान हे पिठाची गिरणी घेण्यासाठी देण्यात येते.
- सदर योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःच्या पदाची कोणतेही रक्कम न भरता पिठाची गिरणी 100% अनुदान तत्त्वावरती मिळते.
- पिठाची गिरणी योजना ही ग्रामीण भागातील महिलांसाठी एक वरदान ठरलेली आहे.
- पिठाची गिरणी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदान हे डीबीटी मार्फत थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते त्यामुळे सदर योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची अपारदर्शकता राहत नाही.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक अनुदान पुढीलप्रमाणे –
- सदर योजनेअंतर्गत पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी लाभार्थी महिलेला पिठाच्या गिरणीच्या किमती एवढेच म्हणजेच 100% अनुदान दिले जाते.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजनेचे लाभार्थी पुढील प्रमाणे –
- पिठाची गिरणीची योजना यास चे लाभार्थी ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये असणारी महिला आहे.
- सदर लाभार्थी महिलाही आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजनेअंतर्गत होणारा फायदा –
- पिठाची गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील गरजू महिलांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत चालू होईल.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांना पिठाची गिरणी योजनेमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- सदर योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 100% अनुदान मिळणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागामध्ये असणारी बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
- महाराष्ट्रातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिला या आत्मनिर्भर बनतील.
- महिलांना नोकरी करण्यासाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता नाही.
- पिठाच्या गिरणीचा व्यवसाय महिला या घरी राहून घरचे बाकीच्या गोष्टी बघत करू शकतात.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजनेचे नियम आणि अटी-
- जी महिला पिठाची गिरणी योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छित आहे अशी महिला ही महाराष्ट्र राज्याची मूळचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- ज्या महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहेत अशा महिलांनाच सदर योजनेचा लाभ घेता येईल, महाराष्ट्राच्या बाहेरील असलेल्या महिलांना पिठाची गिरणी योजना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- पिठाची गिरणीय योजना ही महाराष्ट्र राज्यापुरती मर्यादित आहे.
- पिठाची गिरणी योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठीच मर्यादित आहे.
- पिठाची गिरणी योजनेअंतर्गत शहरातील महिलांना लाभ घेता येणार नाही.
- पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना प्राधान्य देण्यात येईल किंबहुना अशाच महिलांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- जर अर्ज करीत असलेल्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा शासकीय नोकरदार असेल तर अशा महिलेला मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- जर अर्ज करीत असलेल्या महिलेने या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या पिठाच्या गिरणीच्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशी महिला सध्याच्या पिठाच्या गिरणीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाही.
- एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त महिला असल्या तरी देखील एका कुटुंबातील एकाच महिलेला सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांना सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशा महिलेचे रेशनिंग कार्ड हे वेगवेगळे असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेसाठी अर्ज करीत असलेल्या महिला अर्जदाराचे वय हे 18 वर्ष ते साठ वर्षे या वयोगटादरम्यान असणे आवश्यक आहे.
- ज्या महिलांच्या कुटुंबाची वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये याच्यापेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.
- अर्जदार महिलेचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट असणे आवश्यक आहे आणि ते अकाउंट सध्या ॲक्टिव्ह असणे बंधनकारक आहे.
- अर्ज करीत असलेल्या महिलेचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजना यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- अर्जदार महिलेचे रेशनिंग कार्ड
- पिठाची गिरणी योजनेचा अर्ज
- अर्जदार महिलेचा रहिवाशी दाखला
- अर्जदार महिलेचा उत्पन्नाचा दाखला – उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये त्याच्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेच्या बँक खात्याचा तपशील
- अर्ज करीत असलेल्या महिलेच्या घराचा उतारा – व्यवसाय चालू करण्यासाठी जागा असल्याबाबतचा हा पुरावा आहे.
- सदर जागेवरती विद्युत पुरवठा आहे यासाठीचे एम एस सी बी चे लाईट बिल.
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
- शपथ पत्र
PITHACHI GIRANI YOJANA | पिठाची गिरणी योजनेचा अर्ज रद्द होण्याची खालील प्रमुख कारणे –
- अर्ज करीत असलेली महिला ही महाराष्ट्र राज्याची जर रहिवासी नसेल किंवा ती महिला जर तसा रहिवासी दाखला देऊ शकली नाही तर त्या महिलेचा अर्ज रद्द केला जाईल.
- जर अर्ज करीत असलेल्या महिलेने या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या पिठाची गिरणी योजनेचा आजार लाभ घेतला असेल तर महिला सदरच्या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- जर महिलेने एकाच वेळी चुकून दोन अर्ज केले तर अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेचा एक अर्ज हा रद्द केला जाईल.
- जर महिलेने केलेल्या अर्जामध्ये काही चुका असतील तर अशा परिस्थितीमध्ये सदर महिलेचा अर्ज रद्द केला जाईल.
- जर अर्ज करीत असलेल्या महिलेचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या अर्जदार महिलेचा अर्ज बाद केला जाईल.
पिठाची गिरणी योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिलेला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात भेट द्यायची आहे.
- संबंधित कार्यालयात भेट दिल्यानंतर पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यायचा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकरीत्या भरायची.
- अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायची.
- भरलेला अर्ज आणि जोडलेले कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून घ्यायची.
- भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
- अशाप्रकारे पिठाची गिरणी योजनेअंतर्गत तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया संपन्न होईल.
- अशा रीतीने पिठाची गिरणी योजना आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी सुदर योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आसपासच्या महिलांना देखील सदर योजनेबद्दल सांगावे जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेच्या अंतर्गत पीठाची गिरणी घेऊ शकतात.