RAMAI AVAS YOJANA | रमाई आवास योजना |

RAMAI AVAS YOJANA | आज आपण बघत आहे की जग खूप प्रगती करत आहे, लोकांचे राहणीमान उंचावत आहे. परंतु समाजात आज पण असे काही लोक आहेत की त्यांना राहायला पक्की घरे नाहीयेत, स्वतची घरे नाहीयेत. समाजातील अशा घटकतील लोकांचे राहणीमान उंचवावे आणि त्यांना निवाऱ्याच्या दृष्टीने सक्षम बनवावे यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्वकांक्षी अशी योजना चालू केली आहे, त्या योजनेचे नाव हे “ रमाई घरकुल योजना ” असे आहे.

या योजने अंतर्गत समाजातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषे खालील असणाऱ्या कुटुंबांना महाराष्ट्र शासन हे घर स्वतच्या जागेत पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते. आर्थिक मदत ही रुपये 250000 एवढ्या पर्यन्त आहे .

तर आज आपण रमाई आवास योजना / रमाई घरकुल योजना याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


योजनेचे नावRAMAI AVAS YOJANA | रमाई आवास योजना
विभागग्रामविकास व गृहनिर्माण विभाग
लाभार्थीअनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्ग
उद्देशगरिबांना घरे उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन किंवा ऑफलाइन

RAMAI AVAS YOJANA

Table of Contents

RAMAI AVAS YOJANA |रमाई आवास योजनेचे उद्दिष्टे-

  • समाजात राहणाऱ्या प्रामुख्याने अनुसूचित जाती, नवबौद्ध , अनुसूचित जमाती, इत्यादि प्रवर्गातील जे कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत, जे पडक्या, कच्या घरात राहतात; व असे कुटुंब जे आर्थिक रित्या अक्षम आहेत नवीन स्वतचे पक्के घर बांधण्यास अशा कुटुंबाला पक्के घर बांधण्यास प्रोत्साहन पर मदत करणे.
  • समाजातील आर्थिक मागास लोकांना पक्की घरे बनवून देवून, अशा लोकांना सक्षम बनवणे, समाजात सन्मान मिळवून देणे.
  • ज्या कुटुंबाना राहायला पक्का निवारा नाही, त्यांना पक्की घरे बांधून देवून त्यांचे ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करणे हे उदिष्ट आहे.

RAMAI AVAS YOJANA | रमाई आवास योजनेच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया-

  • सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 च्या नियमावली नुसार लाभयार्थ्याची निवड केली जाते.
  • अनुसूचित जाती, अनुसुसचीत जमाती, नव बौद्ध प्रवर्गातील लोकांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • अर्जदारांकडे स्वतचे पक्के घर नसणे गरजेचे आहे, अशा अर्जदारांची निवड ही ग्राम पंचायत, पंचायत समिति, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत केली जाते.
  • हेच काम शहरी भागामध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या कडून पार पाडले जाते.
  • अनुसूचित जाती, जमाती, नव बौद्ध प्रवर्गाला 3% घरकुल देणे बंधनकारक आहे.
  • आलेल्या अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभरठ्यानची निवड केली जाते.

RAMAI AVAS YOJANA | योजनेची कार्यपद्धती-

  • लाभार्थी ची योजनेसाठी जर निवड झाली तर तो सध्या राहत असलेल्या कच्या व पडक्या घराचे geo mapping केले जाते, ते करणे आवश्यक आहे.
  • ग्रामीण भागातील लाभार्थी असेल तर जॉब कार्ड mapping करणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी ला योजनेची रक्कम थेट बँक खात्या मध्ये यावी यासाठी त्याचे बँक अकाऊंट PFMS प्रणालीकडे संलग्न केले जाते.
  • गावातून अशा लाभार्थी न ची यादी जिल्हा समिति कडे मान्यते साठी ग्राम पंचायत मार्फत पाठवली जाते.
  • जिल्हा समिति च्या मान्यते नंतर तालुका स्तरावरून लाभार्थी ला पहिलं हफ्ता बँक खात्या मध्ये दिल जातो.
  • एकदा का बांधकाम सुरू झाले की जसे जसे बांधकाम कहाऊ असेल तसे प्रत्येक टप्या टप्या मध्ये लाभार्थी ला योजनेचा आर्थिक लाभ हा त्याच्या बँक खात्या मध्ये जमा केला जातो.
  • बांधकाम चालू झाल्या नंतर ग्राम पंचायत कडून अधिकारी येवून काम ची देखरेख ठेवत असतात.
  • नवीन परी पत्रकातील बदल नुसार घर बांधकाम पूर्ण झाले की लाभार्थी ला गॅस शेगडी देखील दिली जाते.

रमाई आवास योजने अंतर्गत अर्जदारा ला पात्र होण्यासाठी वार्षिक उत्पन्न ची अट ही पुढील प्रमाणे आहेत-

  • ग्रामीण भाग – अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 120000 पेक्षा जास्त नसावे.
  • नगर परिषद क्षेत्र- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 150000 पेक्षा जास्त नसावे.
  • महानगर पालिका क्षेत्र- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 200000 रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • योजनेची पात्रता / लाभार्थी –
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मुळ चा रहिवाशी असावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नव बौद्ध प्रवर्गातील असावा.
  • अर्जदारकडे आर्थिक उत्पन्न वरती नमूद केल्या प्रमाणे असावे व सध्या तो राहत असलेले घर ही कच्या स्वरूपाचे तसह भाड्याचे असावे. किंवा त्याला राहायला स्वतचे घर नाहीये अशी परिस्थिति असावी.
  • ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील आर्थिक रित्या मागास असलेल्या गरजू कुटुंबा साठी आहे.

रमाई आवास योजने अंतर्गत मिळणारे अनुदान पुढील प्रमाणे

सर्व साधारण क्षेत्र१,३२,000 रुपये इतके अनुदान मिळते.
शहरी भागासाठी२,५०,००० रुपये इतके आर्थिक अनुदान मिळते.
डोंगराळ भागासाठी१,४२,००० रुपये अनुदान मिळते.
शौचालय बांधणीसाठी१२,००० रुपये इतके अनुदान मिळते.

रमाई आवास योजनेचा फायदा-

  • समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नव बौद्ध प्रवर्गातील गरजू कुटुंबाना ( ज्यांच्या कडे राहायला पक्के घर नाही असे ) पक्के घरे बांधून दिले जाते.
  • रमाई आवास योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी घर बांधायची जागा ही स्वतच्या मालकीची असणे गरजेचे आहे, परंतु काही कुटुंबा कडे जागा स्वतच्या मालकीची नसते अशा लोकांना जागा खरेदी साठी दीनदयाळ उपाध्याय योजेच्या सहाय्याने जागा खरेदीसाठी ५०००० रुपये आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेचा लाभ घेवून लाभार्थी चे ऊन, वारा, पाऊस, इत्यादि पासून संरखसं होण्यास मदत केली जाते.
  • रमाई आवास योजने अंतर्गत स्वतचे घर बांधत असताना अर्जदारणे स्वत काम केले तर त्याला नरेगा योजने अंतर्गत आर्थिक लाभ दिल जातो. रुपये १८,००० इतका आर्थिक अधिकच लाभ भेटून जातो लाभार्थी ला.
  • लाभार्थी ला एक पक्के, टिकाऊ घरा मुळे दीर्घ काळा साठी चा कायमचा निवाऱ्याचा प्रश्न मिटून जातो.
  • अनुसूचित जाती साठी ७.५ % घरे ही राखीव ठेवली जातात. १०% आरक्षण ही नव बौद्ध प्रवर्गासाठी आहे.
  • घरा सोबत शौचालय बांधणी साठी देखील १२,००० रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते.
  • या योजने अंतर्गत लाभार्थी ला मोफत वीज कनेक्शन जोडून दिले जाते.

रमाई आवास योजने अंतर्गत गॅस शेगडी चा लाभ-

  • गॅस शेगडी चा लाभ हा फक्त घरकुल योजनेचे लाभार्थी आणि केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत गॅस कनेक्शन योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी ना मिळेल.
  • अशा लाभार्थीना २ बर्नर असलेली शेगडी ही मोफत दिले जाते.ही शेगडी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन यांच्या अधिकृत पॅनल वरील पुरवठा धारक रेसन्स लाईफ सायन्सेस प्रा. लि. व हिंदुजा इंटरनॅशनल या अधिकृतपुरवठा धारककडून केला जातो.

RAMAI AVAS YOJANA |योजने अंतर्गत लाभार्थी निवडीचा प्राधान्य क्रम –

  • दंगली मध्ये आगीमऊले, तोडफोडी मुळे ज्यांच्या घराचे आर्थिक नुकसान झाले आहे अशे लोक
  • एट्रोसिटी कायद्या नुसार पीडित अनुसूचित जातीच्या पात्र व्यक्ति
  • नैसर्गिक आपत्ती मुळे घराचे नुकसान झाले असल्यास, त्यामध्ये भूकंप, पुर-महापूर, अती वृष्टि, त्सुनामी, इत्यादि गोष्टींचा समावेश होत असतो.
  • घरामध्ये कोण कामावते नाही असे विधवा महिलेचे कुटुंब

किती क्षेत्रफळ असलेल घराला आर्थिक मदत दिली जाते ?

  • रमाई आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागात २६९ चौरस फुट व शहरी भागासाठी ३२३ चौरस फुट इतक्या क्षेत्रफळ साठी आर्थिक लाभ दिल जातो.  यापेक्षा जर जास्त क्षेत्रफळ बसलेकिंवा अर्जदारला जास्त क्षेत्रा साठी घर बांधायचे असल्यास वरची उर्वरित खर्च ची रक्कम लाभार्थी ला भरावी लागणार आहे.

रमाई आवास योजने अंतर्गत आर्थिक अनुदान वितरण पुढीलप्रमाणे-

पहिलं हफ्ता५० % रकमेच हफ्ता हा घराचे बांधकाम सुरू असताना लाभार्थी च्या थेट बँक खात्यात जमा केला जातो.
दूसरा हफ्तापहिलं ५०% चा हफ्ता उपयोग जल आहे याचा प्रमाण पत्र जमा केले की पुढचा ४० % रकमेचा हफ्ता दिला जातो.
तिसरा हफ्ताअधिकाऱ्यानी घर पूर्ण झाले याचा दाखला दिल की राहिलेल्या १०% रकमेचा हफ्ता दिल जातो.

वर दिलेले अनुदान हे गृह निर्माण समिति अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्या समतीने स्वाक्षरीने विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या सहाय्याने दिले जाते.


RAMAI AVAS YOJANA |रमाई आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-

  • आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ओळखीचा पुरावा म्हणून द्यावा लागतो.
  • रहिवाशी पुरावा- रेशन कार्ड, वीज बिल
  • दारिद्र्य रेषे खालील दाखला- पिवळे रेशन कार्ड, BPL प्रमाण पत्र
  • अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यूपत्र
  • घर बांधायच्या जागेत सह हिस्सेदार सल्यास तीचे समतीपत्र
  • शाळा सोडल्याच दाखला, जन्म दाखला
  • पूरग्रस्त, पीडित असल्याचा दाखला ( संबंधित अर्जदारा ना )
  • फोटो, इ-मेल आय डी, बँक पासबूक झेरॉक्स, जात प्रमाण पत्र
  • उत्पन्नाचा दाखला.
  • इत्यादि कागदपत्र लागतात.

RAMAI AVAS YOJANA |ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत –

  • शासनाच्या रमाई आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागतो.
  • आवश्यक ती माहिती भरावी, योग्या ती कागद पत्र upload करून अर्ज जमा करावा.
  • अर्ज पात्र आहे की नाही हे बघण्यासाठी पुनः याच वेबसाईट वरती जाऊन चेक करावे लागते. त्या मध्ये तुम्ही अर्ज नंबर टाकून यादी मध्ये आपले नव चेक करू शकता.

RAMAI AVAS YOJANA |ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत-

  • आपल्या संबंधित ग्राम पंचायत कार्यालयात जाऊन रमाई आवास योजनेचा अर्ज घेवून त्यातील सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्र त्या सोबत जोडावीत.
  • तो अर्ज पुनः आपल्या ग्राम पंचायत कार्यालय मध्ये जाऊन जमा करणे.
  • आपण या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे बघण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात संपर्क साधावा. ग्राम पंचायत लाभार्थी ची यादी फलका वर लावत असते.