ROJGAR HAMI YOJANA | रोजगार हमी योजना

ROJGAR HAMI YOJANA |आज जर आपण आपल्या आसपास बघितले तर आपल्याला लक्षात येईल की ग्रामीण भागमध्ये बेरोजगारी खूप वाढली आहे. मजूर लोकाना काम मिळत नाहीये. त्यांना काम साथी वन वन फिरावे लागत आहे. ही बेरोजगार मजूर प्रामुख्याने अशिक्षित आणि अकुशल असतात. अशा बेरोजगार लोकाना काम उपलब्ध करून देणारी केंद्र शासन आणि राज्य शासन यांची संयुक्त एक योजना आहे.

त्या योजनेचे नाव हे  “महात्मा गांधी रोजगार हमी योजना” ROJGAR HAMI YOJANA |असे आहे. या योजनेमध्ये अकुशल बेरोजगारांना 100 दिवसंपर्यंत काम पुरवण्याची हमी ही केंद्र शासन घेत असते तर तिथून पुढे काम राज्य शासन काम पुरवत असते. तर चला  मग आपण या योजने बद्दल सविस्तर माहिती बघू या.


योजनेचे नावमहात्मा गांधी रोजगार हमी योजना |ROJGAR HAMI YOJANA |
योजनेचा प्रमुख उद्देशअकुशल बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे.
लाभार्थीराज्या च्या ग्रामीण भागातील लोक
लाभरोजगाराची हमी
अर्ज करणाऱ्याची पद्धतऑफलाइन
राज्यमहाराष्ट्र राज्य

ROJGAR HAMI YOJANA

ROJGAR HAMI YOJANA |रोजगार हमी योजनेचे उद्देश-

  • महाराष्ट्र राज्यातील अकुशल बेरोजगार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे.
  • ग्रामीण भागातील मजुरांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.
  • समाजातील बेरोजगारी कमी करणे.
  • गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास करून त्यांचे जीवनमान सुधारणे.

ROJGAR HAMI YOJANA |रोजगार हमी योजने साठी पात्रता-

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील वय वर्षे 18 पूर्ण असलेले स्त्री व पुरुष याला पात्र आहेत.

वयक्तिक लाभाची कामे देताना पुढील प्रवर्गातील लोकाना जास्त प्राधान्य दिले जाईल.

  • अनुसूचित जाती,
  • अनुसूचित जमाती,
  • विमुक्त जाती,
  • भटक्या जमाती,
  • शारीरिक दृष्ट्या विकलांग कुटुंब,
  • स्त्री करता असलेले कुटुंब,
  • दारिद्र्य रेषे खालील कुटुंब,
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी,
  • पारंपरिक वनवासी ,
  • जमीन सुधारणांचे लाभार्थी.

ROJGAR HAMI YOJANA |रोजगार हमी योजने मध्ये मिळणारी कामाची यादी-

  • मत्स्य पाळणारे तलाव दुरुस्ती करणे व नवीन बांधणे.
  • वितरक व किरकोळ प्रकारच्या कालावांची बांधकामे कामे करणे.
  • कालव्याचे अस्तरीकरण – जल कोर्स बांधणे, पानी पुरवठा कालवा, वितरण कालवा, छोटा कालवा, उप-गौण कालवा अशा विविध प्रकारच्या  कालावांचे अस्तरीकरणाची कामे मिळतात.
  • नूतणी करणाची कामे- पानी पुरवठा नूतनीकरण, कालव्याचे नूतणीकरण, किरकोळ, उपप-किरकोळ कालव्याचे नूतनीकरण, पानी पुरवठा, पानी वितरण करणाऱ्या कालवांचे नूतनीकरण करणे, अशा प्रकारच्या नूतणी करणाची कामे केली जातील.
  • सार्वजनिक तळ्याचे नूतनीकरण व मजबुतीकरणाचे कामे मिळतात.
  • भूमिगत बंधारा बांधणे.
  • नदी व ओढ्यानच्या कढेला पुर संरक्षण भिंत बांधणे.
  • वयक्तिक व सार्वजनिक लाभ साठी सिंचन विहीरिंची कामे करणे.
  • सिंचन विहिरिंचा कठडा बांधणे व दुरुस्तिकरणा चे कामे.
  • वयक्तिक लाभ व समुदाय साठी लहान पाझर तलाव बांधणे व दुरुस्ती करणे.
  • पुर नियंत्रण साठी नाले बांधणे व दुरुस्तिकरण करणे.
  • सार्वजनिक गटारे बांधकाम व दुरुस्तिकरण करणे.
  • पडीक जमिनीचा विकास करणे.
  • पाणथळ जमिनीचा विकास करणे व गटार खोदणे कामे.
  • वयक्तिक व गटा साठी कंपोस्ट खड्डे बांधणे, दुरुस्तिकरण करणे.
  • धान्य साठवण साठी इमारत बांधणे व दुरुस्तिकरण करणे.
  • रेशीम पीक ची लागवड करणे.
  • पडीक जमीनिवर्ति वृक्ष लागवड.
  • सीमा रेषे वरती वयक्तिक वृक्षरोपण करणे.
  • किनारपट्टीवर्ति वृक्ष लागवड करणे.
  • पडीक जमिनी वरती वयक्तिक लाभसाठी जंगली वृक्ष लागवड करणे.
  • वयक्तिक लाभमद्धे निवाऱ्यासाठी वृक्ष लागवड करणे.
  • वयक्तिक लाभमद्धे फळ बाग लागवड करणे.
  • पडीक जमिनी वर फळ बाग लागवड करणे.
  • शेती विषयक झाडांची लागवड करणे- वयक्तिक लाभासाठी पडीक जमिनी वरती लागवड करणे.
  • वयक्तिक लाभार्थी च्या शेता वरती व पडीक जमिनी वरती तुतीची लागवड करणे.
  • वयक्तिक लाभार्थी च्या शेता वरती व पडीक जमिनी वरती बायो ड्रेनेज  झाडांची लागवड करणे.
  •  वयक्तिक लाभार्थी च्या शेता वरती निवाऱ्या साठी झाडांची लागवड करणे.
  • कालव्याच्या कडेला वृक्षरोपण करणे.
  • वनीकरण वृक्षांची सीमा रेषेत लागवड करणे.
  • बंधाऱ्याच्या कडेला वृक्षारोपण करणे.
  • रस्त्यांच्या कडेला, किनारपट्टीच्या कडेला वृक्षरोपण करणे.
  • सार्वजनिक पडीक जमिनीत वृक्षरोपण करणे.
  • सरकारी इमारत आवारात वृक्षारोपण करणे.
  • वयक्तिक, सार्वजनिक, समूह रोपवाटिका तयार करणे.
  • वयक्तिक लाभार्थीसाठी मातीपासून, दगडापासून, गारगोटी पासून, बांध- समोच्च बांध तयार करणे.
  • समुदयासाठी लाभार्थीसाठी मातीपासून, दगडापासून, गारगोटी पासून, बांध- समोच्च बांध तयार करणे.
  • समूह साठी पोट कालवा ची निर्मिती करणे.
  • वयक्तिक लाभांसाठी व समूहसाठी पडीक जमिनीला सपाटी करण करणे व आकार देणे.
  • वयक्तिक लाभसाठी ब्रशवूड , बोल्डर , दगडी, सी सी बंधारा, मातीचे व अंगड बंधारा बांधणे.
  • समूहसाठी लाभसाठी ब्रशवूड , बोल्डर , दगडी, सी सी बंधारा, मातीचे व अंगड बंधारा बांधणे.
  • गॅबियन बंधारा दुरुस्तिकरण व नूतनीकरण करणे.
  • वयक्तिक लाभसाठी कंपोस्ट खड्डा बांधणे.
  • वयक्तिक लाभसाठी गांडूळ खत निर्मिती साचा, नाडेप कंपोस्ट साचा बांधणे, दुरुस्ती करन करणे.
  •  समूहाच्या लाभसाठी गांडूळ खत निर्मिती साचा, नाडेप कंपोस्ट साचा बांधणे.
  • वयक्तिक लाभा अंतर्गत शेत तळे बांधणे.
  • गॅब्रियन बांधकाम करणे.
  • दगडाचे, मातीचे स्पूअर चे बांधकाम, दुरुस्तीकरन करणे.
  • लेवल बेंच, जमीनि वरती बेंच बांधणे.
  • लेवल बेंच टेरेस, जमिनी वरती बेंच टेरेस बांधणे.
  • अझोला लागवडीसाठी खड्डा बांधणे, दुरुस्तिकरण करणे.
  • वयक्तिक लाभ, गटासाठी, सार्वजनिक, जैविक खत निर्मिती साठी खड्डा तयार करणे, दुरुस्ती करण करणे.
  • शेत तळे बांधणे, दुरुस्ती करण करणे, नूतनीकरण करणे.
  • शासकीय इमारतींचे बांधकाम, दुरुस्तिकरण, नूतणीकरणाची कामे- ग्राम पंचायत, पंचायत, भारत निर्माण सेवा, अंगण वाडी, स्मशान शेड बांधणे, बचतगट फेडरेशन इमारत बांधणे,
  • मासे सुखावणीसाठी ओटा बांधणे, देखबाल करणे, दुरुस्ति करणे.
  • डांबरी रस्ता, खंडीकरण रस्ता करणे.
  • सिमेंट, ब्लॉक रस्ता तयार करणे.
  • माती मुरूम, दगड विटा, सिमेंट, डांबर रस्ता, खंडीकरण रस्ता चे देखबाल व दुरुस्तिकरण करणे.
  • चक्रीवादळ पासून संरक्षण सती निवारा तयार करणे,देखबाल करणे, दुरुस्ती करणे.
  • खेळाचे क्रीडांगण बांधणे, देखबाल करणे, दुरुस्ती करणे,
  • सरकारी शाळांची संरक्षण भिंत बांधणे, देखबाल, दुरुस्ती करणे.
  • वयक्तिक लाभाचे घराचे बांधकाम करणे.
  • स्वयंपाक घर शेड बांधणे, दुरुस्ती करणे, देखबाल करणे.
  • वयक्तिक लाभसाठी मातीचे, दगडाचे गली प्लग बांधणे, दुरुस्ती करणे, देखबाल करणे.
  • सामूहिक लाभाचे मातीचे, दगडाचे गली प्लग बांधणे, दुरुस्ती करणे, देखबाल करणे.
  • वयक्तिक पुनर्भरण खड्डा तयार करणे, देखबल करणे, दुरुस्ती करणे.
  •  विहीर पुनर्भरण, बोरवेल पुनर्भरण साठी लागनारी वाळूची गाळण तयार करणे.
  • वयक्तिक लाभा मध्ये, गुरांसाठी, शेळी साठी, डुकरा साठी निवारा तयार करणे, देखबाल लरणे, दुरुस्ती करणे.
  • वयक्तिक लाभासाठी  शोष खड्डे बांधणे.
  • वयक्तिक, सार्वजनिक शौचलाय बांधकाम करणे, दुरुस्ती करणे.
  • ग्रामीण भागात बाजार हाट बांधणे, देखबाल करणे, दुरुस्ती करणे.

 ROJGAR HAMI YOJANA |रोजगार हमी योजने मध्ये मजूरी कशी दिली जाते.

  • मजुराचे जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
  • जॉब कार्ड काढताना जे बँक पासबुक दिले असेल त्या खात्यात मजुरी जमा होईल. बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. E-muster चा कालावधी संपला की तीतून पुढे 8-10 दिवसात बँक खात्या मध्ये DBT द्वारे पैसे जमा होतात.
  • फळबाग लागवड मध्ये रोपे लागवड, पिशव्या खरेदी, इ साहित्य खरेदी केलेले वयक्तिक कामांमध्ये कुशल चे पेमेंट ही सुद्धा डायरेक्ट खात्या मध्ये जाम होते फक्त सार्वजनिक कामाचे कुशलचे पेमेंट ही यंत्रणांच्या खात्यात जमा होवून नंतर त्याची विभागणी करून मजुरांना दिले जाते.

ROJGAR HAMI YOJANA |रोजगार हमी योजनेमध्ये किती मंजूरी दिली जाते..?

  • सुधारित आदेशानुसार (2023) प्रतिदिवस मजुरीचा दर २७३/- रुपये प्रती दिवस इतका आहे. 

जॉब कार्ड साठी पात्रता-

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा, व तो ग्रामीण भागात राहत असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचे वय वर्षे 18 पूर्ण असले पाहिजे.
  • अर्जदार ला शारीरिक कष्टाचे काम करायचे असल्या मुले तो शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.

जॉब कार्ड काढण्याची पद्धत-

  • जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्याला ग्रामसेवक यांना संपर्क साधावा लागतो. आवश्यक कागदपत्रे घेवून आपल्या ग्रामपंचयात मध्ये जाऊन ग्रामसेवक यांना जाऊन भेटावे.
  • ग्रामसेवक देतील तो फॉर्म भरून देणे तो फॉर्म ग्रामसेवक रोजगार हमी च्या वेबसाइट वरती भरतील व तुम्हाला जॉबकार्ड दिले जाईल.

वयक्तिक लाभच्या कामांसाठी खालील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

  • अर्ज भरणे.
  • जॉब कार्ड.
  • ग्रामसभेची मान्यता.
  • आधार कार्ड.
  • रेशनिंग कार्ड.
  • रहिवाशी दाखला.
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • मोबाइल नंबर
  • ई -मेल आयडी

रोजगार हमी मध्ये काम मागण्याची पद्धत –

  • अर्जदाराला ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधून, अर्ज भरणे आवश्यक आहे. ग्रामसेवक त्या अर्जातिल माहिती रोजगार हमी च्या वेबसाइट वरती भरतील.
  • ती माहिती भरून झाल्यानंतर १५ दिवसात अर्जदारला रोजगार मिळून जात असतो.

रोजगार हमी योजनेच्या अटी व शर्ती-

  • मजुराचे किमान १४ कामाचे दिवस भरणे आवश्यक आहे, अन्यथा त्या मजुरला १४ पेक्षा कमी दिवस भरले की मजुरीची रक्कम दिली जाणार नाही.
  • महाराष्ट्र चे राहिवाशी व ग्रामीण भागात राहत असणाऱ्या मजुरांना च फक्त या योजनेचा लाभ घेत येईल.
  • मजुराचे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे, अन्यथा त्या संबंधित व्यक्ति ला रोजगार उपलब्ध करून दिला जात नाही.
  • रोजगार हमी चे काम घेण्यासाठी अगोदर ग्राम पंचायत मध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे, अन्यथा अशा परिस्थिति मध्ये देखील रोजगरला पात्र राहत येत नाही.
  • अर्ज करीत असलेला मजूर हा बेरोगार असणे आवश्यक आहे तसेच तो शारीरिक दृष्ट्या सदृढ असणे बंधनकारक आहे.