SHABARI GHARKUL YOJANA | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातींमध्ये प्रामुख्याने आर्थिकरित्या गरीब कुटुंब येतात. अशा कुटुंबांना दैनंदिन जीवन जगताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते. बारकाईने बघितले तर अशा कुटुंबांकडे राहण्यासाठी स्वतःची पक्की घरी देखील नसतात. यावरती एक तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारने शबरी घरकुल योजना नावाची एक योजना सुरू केलेली आहे.
SHABARI GHARKUL YOJANA अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मधील आर्थिक रित्या गरीब कुटुंब गरजू कुटुंब यांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी रुपये दोन लाख पर्यंतचे आर्थिक मदत ही महाराष्ट्र सरकारकडून केली जात आहे.
फक्त घर बांधण्यासाठी रुपये दोन लाख पर्यंतचे आर्थिक मदतच नाही तर यासोबतच मनरेगा अंतर्गत न व दिवसांचे काम देऊन 18 हजार रुपये त्याचा आर्थिक लाभ लाभार्थीला मिळतो त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी 12000 रुपये ची रक्कम लाभार्थीला दिली जाते.
तर शबरी घरकुल योजना नेमकी काय आहे याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत यासाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे याच्यामध्ये अर्ज निवड कसा केला जातो अर्ज कोणाकडे करायचं या योजनेअंतर्गत किती आर्थिक लाभ दिला जाणार आहे या योजनेला अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत इत्यादी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | शबरी घरकुल योजना | SHABARI GHARKUL YOJANA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभाग |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्रातील नागरिकांना गरीब बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे. |
कोण लाभ घेऊ शकता | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती कुटुंबे |
योजनेतून मिळणारा लाभ | दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज कसा करायचा | ऑफलाइन |

SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील गरज कुटुंबांना स्वतःचे घर बांधून देण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीतील नागरिकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे.
- अनुसूचित जमाती मधील अशा कुटुंब ज्यांना राहायला स्वतःचे पक्के घर नाही अशा कुटुंबांना ओके घर बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवणी आणि त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणणे.
- आर्थिकरित्या घरी बसलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबांना स्वतःचं घर बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी दुसऱ्या कोणावर त्या अवलंबून राहण्याची गरज नाही.
- ज्या कुटुंबांना राहायला स्वतःचे घर नाही अशा कुटुंबांना ऊन वारा थंडीपासून संरक्षण करणारे पक्की घर पुरवणे.
- महाराष्ट्र राज्यातील गरजू कुटुंबांना स्वतःची घर बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- आर्थिकरित्या घरी बसलेल्या अनुसूचित जमाती मधील कुटुंबांना चांगले घर बांधून देऊन त्यांना समाजाचे मुख्य प्रवाहामध्ये आणणे.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेचे वैशिष्ट्य –
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक राशी ही डीबीटी मार्फत लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
- शबरी घरकुल योजना सोबतच लाभार्थीला घरासोबत शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपयांचे हार्दिक साह्य देखील योजनेअंतर्गत दिले जाणार आहे.
- एकूण 18 544 कुटुंबांना घर बांधून देण्याचे लक्ष शबरी घरकुल योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेला आहे.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांग कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबांना पाच टक्के आरक्षण देऊन प्राधान्य देण्यात येत आहे.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजना अंतर्गत पुढील प्रवर्गांना प्रथम प्राधान्य मिळेल –
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जमात पारधी जमात विधवा महिला निराधार महिला दिव्यांग महिला घटस्फोटित महिला दिव्यांग व्यक्ती दुर्गम क्षेत्रातील कुटुंबे या सर्वांना प्राधान्यक्रमाने घरकुल चे वाटप होईल.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे आरक्षण –
- शबरी घरकुल योजना अंतर्गत दिव्यांग कुटुंबांना पाच टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आलेले आहे.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेची लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमाती मधील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंब
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती मधील अशी कुटुंबीयांची कच्च्या मातीच्या पडक्या घरात राहत आहेत ज्यांच्याकडे राहिला स्वतःचे पक्क घर नाही अशी कुटुंब.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेचा फायदा –
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील अशी कुटुंब त्यांच्याकडे स्वतःचे पक्क घर बांधण्यासाठी पैसे नाहीत अशा कुटुंबांना दोन लाख रुपये पर्यंतच्या हार्दिक साह्य शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणार आहे.
- आर्थिकरित्या गरीब अनुसूचित जातीतील कुटुंबांना पैशासाठी कोणावर अवलंबून राहतात स्वतःचे पक्के घर बांधणे सदरच्या योजनेमुळे पॉसिबल होणार आहे.
- शबरी घरकुल योजनेमुळे अनुसूचित जमातीचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण होऊन अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबांना पक्क घर मिळेल.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य पुढील प्रमाणे –
- ग्रामीण भाग 1.32 लाख रुपये नक्षलवाद आणि डोंगराळ भाग 1.42 लाख रुपये नगर परिषद क्षेत्र 1.50 लाख रुपये नगरपालिका क्षेत्र दोन लाख रुपये
- वरती ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त खर्च जर झाला तर ती रक्कम लाभार्थीला स्वतःच्या पदर ने भरणे आवश्यक आहे.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेची निवड प्रक्रिया-
- शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करताना त्याच्या सध्या असलेल्या मातीच्या कच्च्या घराची पाहणी केली जाते त्यानंतर लाभार्थीची निवड केली जाते.
- ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावर आपत्ती लाभार्थीला मंजुरी मिळते.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्याची आवश्यकता पात्रता-
- ज्या व्यक्तीला सुधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती व्यक्ती महाराष्ट्र राज्याची मूळचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेच्या अटी आणि शर्ती –
- शबरी घरकुल योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीतील कुटुंबांना देण्यात येईल.
- महाराष्ट्राच्या बाहेरील अनुसूचित जमातीतील कुटुंबांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- शबरी घरकुल योजना ही फक्त अनुसूचित जमाती मधील कुटुंबांसाठी आहे.
- ज्या कुटुंबांचे महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्ष आहे अशा कुटुंबांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.
- ज्या व्यक्तीला सुधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
- शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करीत असलेल्या व्यक्तीकडे पहिले पक्के घर नसावे.
- ग्रामीण भागातील अर्जदारांसाठी शबरी घरकुल योजनेला पात्र ठरण्यासाठी त्या कुटुंबाची वार्षिक आर्थिक उत्पन्नाची अट ही एक लाख रुपये एवढी आहे.
- शरीरातील अर्जदाराला शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- जोरदार शबरी घरकुल योजनेचा लाभ घेणार आहे अशा अर्जदाराचे या अगोदर केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्ज भरित असलेल्या व्यक्तीच्या घरातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामाला नसावा.
SHABARI GHARKUL YOJANA | शबरी घरकुल योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड
- रेशनिंग कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र
- दिव्यांग अर्जदार असल्यास त्याची प्रमाणपत्र
- अर्जदार विधवा असल्यास पतीची मृत्यू प्रमाणपत्र
- घटस्फोटित महिला जर अर्ज करीत असेल तर त्याचा न्यायालयीन आदेश
- जागेचा सातबारा
- ग्रामपंचायतचा ना हरकत दाखला आणि
- बँक खात्याचा तपशील
शबरी घरकुल योजनेचा अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे –
- जरा अर्ज करीत असलेला कुटुंब ही महाराष्ट्र राज्याचे मूळचे रहिवाशी नसेल तर अर्ज रद्द होईल.
- अर्जदाराकडे जातीचा दाखला नसेल तर अर्ज केला जाईल.
- अर्जदारांनी भरलेल्या अर्जामध्ये जर काही चुकीची माहिती आढळून आली तर अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार हा अनुसूचित जमाती मधील नसेल तर अर्ज रद्द होईल.
- अर्जदार आणि जर या अगोदर कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा अर्ज रद्द केला जाईल
शबरी घरकुल योजनेचा अर्ज करण्याची पद्धत –
- ग्रामीण भागातील अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या कुटुंब आणि आपल्या ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय मध्ये जाऊन योजनेचा अर्ज घ्यायचा.
- शहरी भागातील अर्जदाराने आपल्या नगरपालिका महानगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन शबरी घरकुल योजनेचा अर्ज घ्यायचा.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायची भरलेला अर्ज पुन्हा एकदा तपासून बघायचा.
- संपूर्ण भरलेला अचूक अर्ज हा संबंधित अधिकाऱ्याकडे संबंधित ऑफिसमध्ये जमा करायचा.
- अशा रीतीने शबरी घरकुल योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
शबरी घरकुल योजनेची कार्यपद्धती –
- एकदा लाभार्थ्याचे निवड झाली की त्याला भारताच्या पहिल्या कच्च्या पडक्या घराचे पाहणी केले जाते, त्यामध्ये जिओ टीव्ही जॉब कार्ड मॅपिंग केले जाते.
- लाभार्थीची बँक खातं हे PFMS प्रणालीकडे संलग्न करून पंचायत समिती लाभार्थीची यादी ही जिल्हास्तरावरती मंजुरीसाठी पाठवत असते.
- जिल्हास्तरावरून मान्यता मिळाली की लाभार्थीला पहिला हप्ता हा तालुकास्तरावरून डीबीटी मार्फत बँकेत जमा केला जातो.
- लाभार्थीने घर बांधून घेताना स्वतः लक्ष देऊन घर बांधून घेणे गरजेचे आहे म्हणजे लाभार्थीला पाहिजे असे घर बांधून घेता येईल.
- घर बांधण्याच्या प्रत्येक टप्प्यावर जिओ टॅग व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिल्हा लेवल किंवा तालुका लेवल वरून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो त्यानुसार लाभार्थीला पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हफ्ता आणि अंतिम हप्ता याचे वितरण केले जाते.
- ज्याला भारताची घर बांधायचे चाललेले आहे त्याला वरच्या 90 दिवसांचा रोजगार मनरेगाच्या अंतर्गत दिला जातो व त्याचे 18 हजार रुपये सेप्रेटरित्या त्याला जमा केले जातात.
- शबरी घरकुल योजनेअंतर्गतच स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्रपणे लाभार्थीला 12000 रुपयाची रक्कम दिले जाते.