SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजना

SHASAN APLYA DARI YOJANA |सध्याच्या काळात महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे नागरिकांच्या हितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढत असते. आता सध्याचा जर विचार केला तर सध्या आता तुम्ही ज्यावेळेस ब्लॉग वाजता या सध्याच्या घडीला देखील शेकडो योजना ऍक्टिव्ह असतील परंतु तुम्हाला त्याचे किती माहिती आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारच्या विविध प्रकारच्या योजना येतात जातात त्यांची मुदत संपते तुम्हाला मुदत संपल्यानंतर त्या योजना बद्दल माहिती होतं कधी कधी तर येऊन गेलेल्या देखील कळत नाही. लाडकी बहीण योजना अशासारख्या योजना ज्या आहेत त्या काही अपवादात्मक योजना आहेत

अशा योजना या राजकीय हेतूमुळे लवकरात लवकर तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात. परंतु सर्व योजना तळगाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचतीलच असे नाही. आणि त्यात अजून होतं काय की प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कष्ट करायची किंवा खर्च करायचा सरकारला देखील ती खूप जिकेरीचे जाते.

परंतु या योजना सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त लोकांना योजनांचा फायदा व्हावा आणि त्यांचे जीवनमान सुधारावे हीच इच्छा सरकारची असते.  पहिले कसे असायचे वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या योजना असायच्या आणि त्या योजना जो तो विभाग आपापल्या पद्धतीने त्या योजना राबवायचा त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करायचं परंतु अशा वेगवेगळ्या रीतीने काम करण्यामुळे सर्व योजना तळातील लोकांपर्यंत पोहोचत नव्हता.

सरकारने ही अडचण विचारात घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्यास निर्णय घेतला. आणि तोच निर्णय म्हणून महाराष्ट्र सरकारने SHASAN APLYA DARI YOJANA सुरू केली. नेमकं सरकारने केलं काय तर लोकांना जी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्रास होतो तो त्रास कमी करण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेले हे पाऊल आहे. महाराष्ट्र सरकारने काय केलं तर शासन आपल्या दारी योजना ही योजना म्हणा याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उपक्रम आहेत किंवा ज्या जुन्या योजना आहेत त्याच योजना ह्या उपक्रमाच्या अंतर्गत राबवले. त्या सर्व योजनांसाठी अर्ज करण्याची जी पद्धत किंवा अर्ज करण्यासाठी जे लागणारे कागदपत्रे वगैरे जे आहेत ते सर्व एकच आहेत आणि तो अर्ज हा एकाच वेबसाईटवरून करायचा आहे.

म्हणजे जे जुन्या व्यवस्थेप्रमाणे वेगवेगळ्या अर्ज वेगवेगळ्या योजनांसाठी भरावा लागत होते तसं आता एकाच पोर्टल वरती महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे योजनांचे अर्ज मागून घेते.

यामुळे फायदा असा होणार आहे की नागरिकांना प्रत्येक वेळेस वेगवेगळे विभागाच्या सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही तिथे जाऊन योजनांची चौकशी करण्याची गरज नाही. नागरिक घरबसल्या आपल्या ठिकाणाहून ऑनलाईन रीतीने अर्ज करू शकतात योजनेबद्दलची माहिती घेऊ शकतात. भरल्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतात.

तर शासन आपल्या दारी ही योजना नेमकी काय आहे याचे पात्रतेचे निकष काय आहेत याच्यामध्ये कोणत्या उपक्रमांचा समावेश होतो त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत यासाठी अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला….


योजनेचे नावशासन आपल्या दारी योजना | SHASAN APLYA DARI YOJANA
योजनेची सुरुवात2023
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
योजनेचा उद्देशमहाराष्ट्र शासनाचा द्वारे किंवा केंद्र शासनाद्वारे सध्या जेवढ्या चालू आहेत तेवढ्या सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
अर्ज कसा करायचाऑनलाइन.

SHASAN APLYA DARI YOJANA

Table of Contents

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेचे उद्दिष्ट-

  • महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार यांच्यामार्फत जेवढे सध्या योजना राबवण्यात येत आहेत त्या सर्व योजनांची माहिती महाराष्ट्रातल्या तळागाळात असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सध्या चालू असलेल्या कोणत्याही योजनेची माहिती घेण्यासाठी विविध कार्य कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लागू नयेत त्यांना तीन सर्व माहिती घरबसल्या भेटावी.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी एकाच छताखाली भेटावी.
  • सरकारचे विविध योजनांना अर्ज करताना त्याचा लाभ घेताना येणारे वेगवेगळे प्रकारचे अडचणींना सामोरे जाण्यासाठी त्याच्यावरती पर्याय कसे अप्लाय करायची त्या सर्वांची माहिती पुरवणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहे.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेचे वैशिष्ट्य-

  • एक महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र राज्य सरकार यांनी सुरू केलेली आहे.
  • 5457 कोटी रुपये निधीच्या वस्तूंचे वाटप महाराष्ट्र शासन शासन आपले दारी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना करणार आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती सर्व एकाच पोर्टल वरती भेटणार आहे.
  • महाराष्ट्र शासन थेट लोकांच्या दारात येत आहे आणि या योजनांचा लाभ देत आहे. महसूल कृषी शिक्षण आरोग्य इत्यादी महामंडळाच्या योजनांचा समावेश शासन आपल्या दारी योजना यामध्ये होणार आहे

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेचे लाभार्थी –

  • महाराष्ट्र राज्यातील असलेले सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत ही योजना कोणत्याही धर्म जातीसाठी राखीव ठेवलेली नाही.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेचा फायदा-

  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सर्व योजनांची माहिती एकाच पोर्टल वरती भेटणार आहे त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या योजनांची माहिती घेण्यासाठी सर्व वारंवार सरकारी कार्यालयाचे फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.
  • शासन आपल्या दारी योजना ही महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या प्रकारचे कामगार कष्टकरी शेतकरी महिला दिव्यांग बांधव विद्यार्थी आदिवासी बांधव यांना केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व गोष्टी सोयीस्कर व्हाव्यात याहीतूनही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • या योजनेमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना अर्ज करण्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही ते सर्व आपापल्या घरी मोबाईल वरती किंवा कम्प्युटर वरती बसून या योजनांसाठी अर्ज करू शकतात.
  • शासन आपल्या दारी योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे वेळ आणि पैशाची बचत होणार आहे.
  • शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना आपण ऑनलाईन रित्या अर्ज करणार आहोत तसेच त्या योजनांमधून मिळणारा आर्थिक लाभ असेल वितरण असेल कोणत्याही वस्तूंचे हे याची सर्व प्रोसेस ऑनलाईन होणार आहे त्यामुळे सरकारी कामांमध्ये त्याची अंमलबजावणी मध्ये पारदर्शकता आणि जबाबदारपणा बनतो.
  • शासन आपल्या दारी ही योजना सर्वसमावेशक योजना आहे म्हणजेच या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
  • शासन आपल्या दारी योजना ही ऑनलाईन रित्या राबवली जाते त्यामुळे याच्यामध्ये भ्रष्टाचाराचे शक्यता अत्यल्प आहे.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत खालील उपक्रम किंवा कार्यक्रम राबविले जातात –

  • रक्तदान शिबिर
  • रोजगार मेळावे
  • आरोग्य शिबिर
  • पासपोर्ट
  • कृषी सेवा केंद्राचे परवाने
  • सेवानिवृत्तीनंतरचा लाभ
  • आधार कार्डची सुविधा
  • पॅन कार्डची सुविधा
  • पी एम किसान योजना
  • विवाह नोंदणी
  • श्रम कार्ड
  • भरती मेळावा
  • पीएफ
  • घरकुल योजना
  • मनरेगा जॉब कार्ड
  • डिजिटल इंडिया
  • सखी किट वाटप
  • शेतकरी ते ग्राहक बाजारपेठ योजना
  • मुलींना सायकलीचे वाटप योजना
  • नवीन मतदाराची नोंदणी
  • दिव्यांगांच्या साहित्याची वाटप
  • शिकाऊ चालक परवाना
  • कृषी प्रदर्शन

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेच्या अटी आणि शर्ती-

  • जो व्यक्ती शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ घेऊ इच्छित आहे असा नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • अर्जदाराला अर्जासोबत महाराष्ट्र राज्यात रहिवासी असलेला रहिवासी दाखला जोडावा लागतो.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळवण्याची प्रोसेस पुढील प्रमाणे –

  • महाराष्ट्र राज्यातील विविध प्रकारच्या नागरिकांना शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत जेवढ्या काही उपक्रम आहेत त्या सर्व उपक्रमांचे जर योजनांचे लाभ घ्यायची असतील तर त्यांना महा लाभार्थी या पोर्टल वरती नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • ही नोंदणी करण्यासाठी ते आपल्या जवळच्या कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतील सीएससी केंद्र असतील एमएस-सीआयटी केंद्र असतील अशा ठिकाणी जाऊन तेथील प्रतिनिधींची मदत घेऊन शासन आपल्या दारी योजनांसाठी लाभ घेऊ शकतात.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी –

  • शासन आपल्या दारी योजना ही सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जात आहे.
  • शासन आपल्या दारी योजनेमध्ये वरती जे दिलेले उपक्रम यांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये कधीही नवीन योजनांच्या समावेश केला जाऊ शकतो किंवा पहिल्या योजना काढल्या जाऊ शकतात यामध्ये वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात.
  • अद्यावत माहितीसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला वेळोवेळी भेट देऊन माहिती घ्यावी गरजेचे आहे.

SHASAN APLYA DARI YOJANA | शासन आपल्या दारी योजना याच्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

शासन आपल्या दारी योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?

शासन आपल्या दारी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यामार्फत सुरू करण्यात आली.

शासन आपल्या दारी योजना याचा उद्देश काय आहे ?

शासन आपल्या दारी योजनेचा महत्त्वाचा मुख्य उद्देश हा आहे की महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाकडून असणारे विविध योजना यांची सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

शासन आपल्या दारी योजनेचा अर्ज कसा करायचा आहे ?

शासन आपल्या दारी योजनेसाठी ऑनलाइन रीतीने अर्ज करायचा आहे.

शासन आपल्या दारी ही योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे त्याच्या लाभार्थीच्या पात्रतेच्या अटी काय आहेत?

शासन आपल्या दारी योजना ही महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे आणि अर्ज करीत असलेल्या व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.