SHELI PALAN YOJANA | महाराष्ट्र राज्य मध्ये किंवा भारतामध्ये शेती हा प्रामुख्याने खूप मोठ्या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय आहे. भावना शेती हेच बहुसंख्य लोकसंख्येचे जीविकेचे साधन आहे. या शेतीबरोबरच अजून एक जोडधंदा सध्या उदयाला येत आहे तो म्हणजे पशुपालन.
पशुपालनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पशुंचे पालन करू शकता परंतु महाराष्ट्र मध्ये पशुपालनाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने एक योजना काढलेली आहे. ती योजना ही शेळीपालन आणि मेंढीपालन याच्या संबंधात आहे. तर मोठ्या प्रमाणावरती शेळीपालन आणि मेंढी पालनाचा प्रोजेक्ट उभारणाऱ्या शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगारांना इच्छुक अर्जदारांना महाराष्ट्र सरकार अनुदान पुरवत आहे. महाराष्ट्र सरकारचा पशुसंवर्धन विभाग किती अनुदान देते तर महाराष्ट्र सरकारकडून दहा लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान शेळीपालनाच्या प्रोजेक्टसाठी दिले जाते.
सदर योजनेमागचा सरकारचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी पशुपालनाकडे वळावे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फक्त शेती या एकाच गोष्टीवरती आर्थिक उत्पन्नासाठी अवलंबून न राहता पशुपालना सारखा जोडधंदा देखील करावा. त्यानंतर महाराष्ट्र मध्ये असणारे सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसायाकडे आकर्षित करून त्यांना व्यवसायासाठी चालना देऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. महाराष्ट्राचे मास आणि दुधाचे उत्पादन वाढू महाराष्ट्र या क्षेत्रात अग्रेसर बनावा असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.
सदरची जी SHELI PALAN YOJANA आहे ही योजना नेमकी काय आहे याच्या पात्रतेच्या अटी काय आहेत त्याला अर्ज कसा करायचा योजना कोणी सुरू केली योजने मागचा उद्देश काय योजनेतून मिळणारा लाभ काय आहे लाभ किती लाभ मिळतो आणि अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व गोष्टी आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.
चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | शेळी पालन योजना | SHELI PALAN YOJANA |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे. |
योजनेची लाभार्थी कोण | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
योजनेतून मिळणारा लाभ | दहा लाख ते पन्नास लाख रुपये |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन किंवा ऑफलाइन |

SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचे उद्दिष्ट –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पशुपालनाबद्दल जनजागृती निर्माण करून त्यांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती सोबतच पशुपालनाचा जोडधंदा चालू करून देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- महाराष्ट्र राज्यात शेळी आणि मेंढी यांची जास्तीत जास्त संख्या वाढवणे.
- महाराष्ट्र राज्याचे दुधाचे आणि शेळी मेंढी यांच्या मांसाचे उत्पन्न वाढवून महाराष्ट्र राज्याला अग्रेसर बनवणे.
- महाराष्ट्र राज्यांमध्ये तरुणांची असणारी बेरोजगारी कमी करणे.
- महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पशुपालन सारख्या व्यवसायाकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाची संधी देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचे वैशिष्ट्य –
- सदरची जी शेळीपालन आणि मेंढी पालन योजना आहे योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग यांनी चालू केलेली आहे.
- सदर योजनेचा जो लाभार्थी आहे त्याचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे कारण सदर योजनेअंतर्गत केला जाणारा लाभा लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केला जातो.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचे लाभार्थी –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी
- महाराष्ट्र राज्यातील कोणताही सामान्य नागरिक
- महाराष्ट्र राज्यात असणारे सध्याचे पशुपालक
- वरील सर्व सदरच्या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेअंतर्गत खालील प्रवर्गांना प्राधान्य दिले जाते –
- शेळीपालन करण्यासाठी सरकार दहा लाख रुपये ते 50 लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेच्या अनुदान देत आहे त्यामुळे सरकार अनुदान देताना सगळ्यात महत्त्वाची खबरदारी घेते की ज्या व्यक्तीला त्या अनुदान मिळणार आहे त्या व्यक्तीला पशुपालनातील आणि प्रामुख्याने शेळीपालना बद्दल माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी ज्या अर्जदारांनी पशुपालनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे त्यांच्याकडे त्याचे प्रमाणपत्र आहे अशा पशुपालकांना अशा अर्जदारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
- महाराष्ट्र राज्यात दारिद्र रेषेखालील असणारे कुटुंबातील अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
- महाराष्ट्रातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी जे आहेत ज्यांच्याकडे एक हेक्टरच्या आतमध्ये जमीन आहे असे शेतकरी सदर योजनेच्या प्राधान्यक्रमामध्ये येतात.
- जे शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे त्यांची शेतजमिनी एक हेक्टर ते दोन हेक्टर या दरम्यान आहे असे शेतकरी देखील सदर योजनेच्या प्राधान्यक्रमांमध्ये येतात.
- महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यांमध्ये असणारे सुशिक्षित बेरोजगार ज्यांचे रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्रांमध्ये नाव नोंदवलेले नाही असे सुशिक्षित रोजगार सुधार योजनेत प्राधान्य क्रमाने लाभ घेऊ शकतात.
- महिला बचत गटातील सदस्य
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान पुढीलप्रमाणे –
- शेळीपालन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गाला 75 टक्के अनुदान दिले जाते.
- सदरच्या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना 50 टक्के अनुदान हे शेळीपालन यासाठी दिले जाते.
- महाराष्ट्र शासनाकडून दहा लाख रुपयांचे अनुदान हे 100 मादी आणि पाच नर यांच्यासाठी दिले जाते.
- दोनशे मादी आणि दहा नर यांच्यासाठी सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.
- सदर योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावरती शेळीपालनाचा प्रोजेक्ट टाकण्यासाठी देखील सरकारकडून मदत करण्यात येते या मोठ्या लेवलच्या प्रोजेक्ट मध्ये 500 मादी आणि 25 नर यांचा समावेश केला जातो आणि यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 50 लाख रुपये इतकी आर्थिक अनुदान दिले जाते.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचा फायदा –
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पशुपालक सामान्य नागरिक सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील.
- शेळीपालन योजनेमुळे महाराष्ट्राचा पशुपालनाच्या बाबतीत विकास होईल.
- पशुपालनाची प्रामुख्याने शेळीपालन आणि मेंढी पालन याची विकास झाल्याने महाराष्ट्र राज्याचा मांस उत्पादनात चांगला विकास होईल.
- फक्त मास च नाही तर याबरोबर शेळीचे दूध आणि मेंढ्यांची लोकर याचा देखील फायदा हा सदर योजनेमुळे होणार आहे.
- महाराष्ट्रा राज्यातील जे काही शेतकरी सुधार योजनेचा लाभ घेतील त्यांना शेतीबरोबरच एक पशुपालनाचा धंदा चालू करून त्यातून देखील आर्थिक उत्पन्नाचा सोर्स निर्माण होईल.
- महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार शेतकरी सामान्य नागरिक पशुपालक यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेसाठी लाभार्थ्याची आवश्यक पात्रता –
- अर्ज करीत असलेला व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेच्या अटी आणि शर्ती पुढीलप्रमाणे –
- शेळीपालन योजनेचा आणि मेंढी पालन योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना देण्यात येईल महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना सदर योजनेचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये घेता येणार नाही.
- सदर योजनेच्या कागदपत्रांमध्ये रहिवासी दाखला जोडावा लागतो त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- जोरदार हा सदर योजनेसाठी अर्ज करीत आहे अशा अर्जदाराने या अगोदर कोणत्याही केंद्र शासन किंवा राज्य शासनाच्या शेळी पालन किंवा मेंढी पालन योजनेचा लाभ घेतलेला नसतो पाहिजे अन्यथा तो अर्जदार सुधार योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
- भव्य सदर योजनेसाठी अर्ज करीत आहे अशा व्यक्तीकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे जमिनीची जागा आहे 9000 स्क्वेअर मीटर एवढी असणे आवश्यक आहे. त्या जागेमध्ये कमीत कमी 100 शेळ्या आणि पाच नर राहण्याची कॅपॅसिटी पाहिजे.
- अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे वय हे 18 पूर्ण असणे बंधनकारक आहे.
- जोरदार सदर योजनेसाठी अर्ज करीत आहे त्याच्याकडे त्या शेळ्या आणि मेंढ्यांच्या चाऱ्याची स्रोत असणे आवश्यक आहे चारा आणि निवारा पुरवणे हे अर्जदाराचे काम आहे.
- जो अर्जदार सुद्धा योजनेसाठी अर्ज करीत आहे त्याला दोन रुपये भरून सूत्र योजनेचा अर्ज करायला लागतो.
- अर्ज करीत असलेल्या व्यक्तीकडे शेळी आणि मेंढी पालनाचा अनुभव असणे बंधनकारक आहे किंवा अर्जदाराने शेळीपालन किंवा भेंडी पालन किंवा पशुपालनाचा प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
- जे अर्जदार अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातून सदर योजनेसाठी अर्ज करीत आहेत आणि त्यांना 75 टक्के अनुदानाचा फायदा घ्यायचा आहे अशा अर्जदारांनाही आपले जातीचा दाखला अर्ज सोबत जोडणे बंधनकारक राहील.
- अर्ज करीत असलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि बँक एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे कारण सदर योजनेचा लाभ हा डीबीटी मार्फत बँक खाते मध्ये दिला जातो आणि त्यासाठी हे आधार आणि बँक लिंकिंग असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला रेशन कार्ड जोडावे लागते आणि रेशन कार्ड वरती जेवढे कुटुंब सदस्य आहेत त्या सर्व कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड नंबर अर्ज सोबत जोडणे बंधनकारक आहे.
- एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे –
- आधार कार्ड
- रेशनिंग कार्ड
- रहिवासी दाखला
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईट चे फोटो
- जातीचा दाखला
- जमिनीचा सातबारा आणि आठ अ
- पशुपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- उत्पन्नाचा दाखला
- हमीपत्र
- अर्जदार दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करीत असेल तर ते प्रमाणपत्र
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत –
- ज्या व्यक्तीला सदर योजनेसाठी अर्ज करायचा आहे अशा व्यक्तीने शेळी पालन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती भेट द्यायची.
- होम पेजो वरती शेळी मेंढी पालन योजना या अर्ज करा बटणावरती क्लिक करायचे.
- त्यानंतर योजनेचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल त्या अर्जामध्ये विचारले सर्व माहिती अचूक रित्या भरायची.
- आवश्यकते सर्व कागदपत्रे अपलोड करायची.
- त्यानंतर अशा प्रकारे तुमचा अर्ज भरून होईल आणि सबमिट बटणावर क्लिक करायचे पूर्ण अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.
SHELI PALAN YOJANA | शेळीपालन योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्ज करत असलेल्या व्यक्तीला आपल्या क्षेत्रातील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायचे आहे.
- शेळी पालन योजनेचा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडून घ्यायचा.
- अर्जामध्ये विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरायचे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्ज सोबत जोडायची आणि तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करायचा.
- अशा रीतीने अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण होईल.