SHUBHMANGAL VIVAH YOJANA | आज जर आपण बघितलं तर जो महाराष्ट्राचा गरीब शेतकरी आहे किंवा जे शेतमजूर आहेत त्यांना त्यांचं शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी काय कमी आहेत का. त्यांना भरपूर साऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच्यामध्ये हेच मला न मिळणारा भाव असेल वाढत्या खतांच्या किमती असतील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या असतील पाण्याचा प्रश्न असेल ओला दुष्काळ असेल कोरडा दुष्काळ असेल इत्यादी.
यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतकऱ्याला किंवा शेतमजुराला आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यावरती तोडगा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक बाल व विकास विभाग यांच्यामार्फत शुभमंगल विवाह योजना नावाची एक योजना सुरू करण्यात आलेली आहे.
सदरच्या योजनेअंतर्गत गरजू गरीब शेतमजूर किंवा शेतकरी याच्या मुलीला लग्नासाठी आर्थिक पाठबळ पुरवले जाते आर्थिक अनुदान दिले जाते विवाहासाठी लागणारे गोष्टींच्या खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते. त्याच पद्धतीने सामूहिक विवाह मध्ये लग्न लावून देण्याची जबाबदारी एका स्वयंसेवी संस्थांवर ती महाराष्ट्र सरकारने टाकलेली असते.
तरी SHUBHMANGAL VIVAH YOJANA नेमकी काय आहे त्याच्या पात्रतेच्यासाठी काय आहेत त्या कोणकोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो लागणारे कागदपत्रे कोणती आहेत एचडी सर्व माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरु करूया….
योजनेचे नाव | शुभमंगल विवाह योजना | SHUBHMANGAL VIVAH YOJANA |
योजना चालू करणे मागचा उद्देश | लग्नासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे |
योजनेतून मिळणाऱ्या लाभ | दहा हजार रुपये पर्यंतच्या आर्थिक मदत |
योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता | शेतमजूर किंवा शेतकऱ्यांच्या मुली |
अर्ज कसा करायचा | ऑफलाईन |
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेचे उद्दिष्ट –
- आर्थिक दृष्ट्या घरी बसणारे शेतकरी किंवा शेतमजूर यांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक मदत पुरवणे या हेतूने सदरची योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- गरीब शेतकरी शेतमजुरांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणारे पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेचे वैशिष्ट्य –
- सदरची योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास कल्याण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे.
- शुभमंगल विवाह योजनेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुलीचा सामूहिक विवाह करून देणे आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवणी हा आहे.
- शुभमंगल विवाह योजना ही जात्या जिल्ह्यातील नियोजन समिती यांचा मार्फत राबविण्यात येते.
- जर एखाद्या जोडप्याने सामूहिक विवाह मध्ये वाहन करता थेट नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन विवाह केला तर त्या जोडप्याला दहा हजार रुपये आर्थिक अनुदान देण्यात येईल.
- शुभ मंगल विवाह योजनेअंतर्गत मिळणारे लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत जमा केली जाते.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत दिले जाणाऱ्या अनुदान –
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी वदुला दहा हजार रुपये इतकी आर्थिक अनुदान देण्यात येते.
- शुभमंगल विवाह योजनेला सामूहिक विवाहाचे नियोजन करणाऱ्या संस्थेला दोन हजार रुपये इथे आर्थिक अनुदान देण्यात येते.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेचे लाभार्थी –
- शुभमंगल विवाह योजनेचे लाभार्थ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील गरीब शेतकरी किंवा शेतमजूर यांच्या मुली यांचा सहभाग होतो.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेचा फायदा –
- शुभमंगलविवाह योजनेअंतर्गत गरीब शेतमजूर किंवा शेतकरी यांच्या मुलीच्या विवाहासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत सामूहिक लग्न विवाह सोहळ्यांमध्ये लग्न पार पाडण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
- वधूला मंगळसूत्र आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी रुपये दहा हजार इतक्या रकमेपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते. सदरची अनुदानाची रक्कम ही त्या वधूच्या आईच्या नावावरती आई हयात नसेल तर वडिलांच्या नावावरती आई-वडील दोन्ही हात नसतील तर त्या वधूच्या नावावरती ते पैसे जमा केले जातात.
- जी संस्था सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन करते त्या संस्थेला दोन हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक भेट सरकार मार्फत दिली जाते.
- गरीब शेतकरी शेतमजूर यांना त्यांच्या मुलीचा लग्न लावून देण्यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाते त्यामुळे त्या गरीब शेतमजुरांना किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही.
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत वधूला मंगळसूत्र आणि इतर विवाह संबंधित गोष्टी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते.
- सामूहिक विवाह समारंभाच्या नोंदणी बद्दल मदत सदर योजनेअंतर्गत केली जाते.
- सर योजनेअंतर्गत विवाहाच्या साहित्य पुरवले जाते.
- शुभमंगल विवाह योजना अंतर्गत संस्थांना स्वयंसेवी संस्थांना आर्थिक प्रोत्साहन दिले जाते.
- लग्नपत्रिका छापायसाठी लाभार्थीला आर्थिक मदत केली जाते.
- विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमासाठी देखील मदत केली जाते.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेच्या साठी आवश्यक पात्रता –
- अर्ज करीत असलेल्या व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेच्या अटी आणि शर्ती – .
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ सारे वर्षाने बंधनकारक आहे महाराष्ट्राच्या बाहेरी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या किंवा शेतमजुराच्या पहिल्या मुलीच्या विवाहासाठी हा आर्थिक लाभ दिला जाईल.
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेणारा लाभार्थी हा शेतकरी कुटुंबातील असणे बंधनकारक आहे.
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत जर आर्थिक लाभ घ्यायचा असेल तर त्या अर्जदाराचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपये च्या आत असणे आवश्यक राहील.
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत सामुदायिक विवाह नियोजन करणारे संस्था नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी वधू ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तसाच रहिवासी दाखला त्यांनी ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून घेऊन अर्ज सोबत जोडावा.
- शुभमंगल विवाह योजनेच्या अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर लग्न करतानाचे वधूचे वय हे कमीत कमी 18 वर्षे आणि वराचे वय हे कमीत कमी 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
- जर वधू ही विधवा असेल किंवा घटस्फोटीत असेल तर त्यांच्या पुनर्विवाहासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते परंतु जर वधु वर पुनर्विवाह करत असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जाणार नाही.
- सदरची योजना ही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्ग इत्यादी लोकांना वगळून तयार करण्यात आलेली आहे कारण वरील दिलेल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत वेगवेगळे योजना राबवण्यात आलेले आहेत.
- शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत कागदपत्रांची छाननी करायची जोडपेंची पात्रता निश्चित करायची इत्यादी कामे जिल्हा महिला व बालविकास विभागाला शक्य होत नाहीत त्यामुळे त्यांनी स्वयंसेवी संस्था ची नेमणूक केली असते या संस्थेमार्फत सामूहिक विवाह पार पाडले जातात.
- स्वयंसेवी संस्था या कमीत कमी पाच किंवा जास्तीत जास्त 100 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून देऊ शकतात 100 पेक्षा जास्त जोडप्यांचे सामूहिक विवाह त्यांना लावण्याचा अधिकार नाही कारण तसं करण्यासाठी त्या स्वयंसेवी संस्थांची आर्थिक स्थिती खूप चांगली असणे आवश्यक आहे.
- एक्स एन सी सी संस्था वर्षातून फक्त दोन वेळा सामूहिक विवाह मेळाव्याच्या आयोजन करू शकते दोन पेक्षा जास्त सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजन केल्यानंतर त्या स्वयंसेवी संस्थेला आर्थिक अनुदान दिले जाणार नाही.
- जी स्वयंसेवी संस्था शुभमंगल विवाह योजनेअंतर्गत सामूहिक विवाह घडवून आणत आहे अशा संस्थेला लग्नाच्या एक महिना अगोदर सर्व कागदपत्रे अचूक रित्या महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे अन्यथा आर्थिक लाभ मिळणार नाही.
- ज्या जोडप्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेतला आहे अशा जोडप्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो हे महिला व बालविकास मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA |शुभमंगल विवाह योजनेसाठी लागणारी कागदपत्रे-
- वधूचे आधार कार्ड
- वराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला ग्रामसेवक किंवा तलाठी यांचा
- रेशनिंग कार्ड
- पालकांच्या बँक पासबुकची झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- लाभार्थ्याचे पालक हे शेतकरी आहेत म्हणून शेत जमिनीचा सातबारा उतारा
- पास पोर्ट साईज फोटो
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- लग्नाचा दाखला
- जन्म नोंद प्रमाणपत्र किंवा जन्माला दाखला
- वधू आणि वर यांनी लिहून दिलेले बालविवाह प्रतिबंधक कायदा व होंडा प्रतिबंधक कायद्याच्या भंग ण केले प्रतिज्ञापत्र.
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेमध्ये अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे पुढील प्रमाणे –
- जर अर्ज करीत असलेली व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची मूळचे रहिवासी नसेल तर त्या व्यक्तीचा अर्ज हा रद्द केला जातो.
- अर्ज करीत असलेल्या वधू हे शेतकरी कुटुंबातील नसेल तर
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अर्ज रद्द केला जाईल
SHUBHMANGAL VIVAH YOJANA | शुभमंगल विवाह योजनेचा अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- अर्जदारासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागांमध्ये जाऊन शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जामध्ये विचारले सर्व माहिती अजून कृत्या भरायची आवश्यकते सर्व कागदपत्रे त्याच्यासोबत जोडून तो अर्ज अधिकार्यांकडे जमा करायचा.
- सॅमसंग संस्थांनी एकदा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला की किमान एक महिना अगोदर आपल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सर्व अर्ज सहकागतपत्रे दाखले सादर करायचे.
- विवाह सोहळ्यामध्ये भाग घेतलेले चा व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी सादर करायचे.
तर अशा रीतीने आपण वरती बघितल्याप्रमाणे शुभमंगल विवाह योजनाही एक महत्त्वकांक्षी अशी योजना महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे.
या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील भरपूर गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचा येणारा प्रॉब्लेम हा सॉल्व होणार आहे.
चला तर मग अशाच एखाद्या नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्याच्याला….