SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI || आज काल आपण बघत आहे कि शासन मुलींच्या शिक्षणाला, सबलीकरणाला, उज्ज्वल भविष्याला, मुलींच्या आरोग्याला, उच्च शिक्षणाला खूप सपोर्ट करत आहे, यासाठी केंद्र शासन आणि राज्य शसन वेगवेगळ्या योजना आणत आहे. या योजना तुमच्या सारख्या सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम आम्ही करत आहे. तर चला मग आज आपण “सुकन्या समृद्धी योजना” याबद्दल सविस्तर माहिती घेवू या.
केंद्र शासनाने हि योजना मुलींच्या भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने चालू केली आहे. हि एक गुंतवणूक योजना असून, हि एक कमीत कमी गुंतवणुकीची आणि मुलीच्या फायद्याची योजना आहे.
या योजनेमध्ये तुम्हाला भाग घेण्यसाठी मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्ष पर्यंत मुदत मिळते. या कालावधी मध्ये तुम्ही केव्हाही या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेसाठी तुम्हाल मुलीच्या नावे राष्ट्रीय कृत बँक मध्ये खाते उघडावे लागते. आणि या खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी २५० रुपये दरवर्षी ते जास्तीत जास्त १.५०.००० रुपये प्रती वर्ष इतकी रक्कम तुम्ही गुंतवू शकता. हे पैसे तुम्ही मुलीच्या वयाच्या १५ व्या वर्ष पर्यंत जमा करायचे असतात, तिथून पुढे वयाच्या २१ वर्ष पर्यंत कोणतीही रक्कम जमा करायची नाही.
मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी तुम्ही हि रक्कम काढू शकता. हि रकम त्यावेलोई मुलीच्या उच्च शिक्षणाला, लग्नाला, काही आजार असल्यास तिच्या हॉस्पिटल च्या खर्चाला उपयोगी पडू शकते.
याच योजनेला संलग्न केंद्र शासनाची आम आदमी विमा योजना अंतर्गत मुलीच्या पालकाचा विमा उतरवला जातो. हा विमा ३०००० ते ७५००० रुपये इतक्या रकमेच असतो. आणि या विम्याच्या हफ्त्याला १०० रुपये प्रती वर्ष हे मुलीच्या गुंतवणुकीतून कात करून घेतले जातात.
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धी योजना | SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |
कोणा मार्फत | केंद्र शासन |
लाभार्थी | देशातील सर्व १० वर्षाच्या खालील मुली |
लाभ | आर्थिक लाभ |
उददेश | मुलींचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम असावे. |
अर्ज कसा करायचा ? | ऑफलाईन |

SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |सुकन्या समृद्धी योजनेची उद्दिष्टे –
- भारता मध्ये मुलींचे जन्म दरा मध्ये वाढ होण्यास प्रोत्साहन मिळावे.
- मुलींची होणारी गर्भहत्या थांबवणे.
- समाजातील मुलींच्या जन्माबद्दल असेलली नकारात्मकता, अंधश्रद्धा, नाहीशी करणे.
- भारतातील मुलींचे भविष्य आर्थिक, शैक्षणिक, आरोग्याच्या दृष्टीने सबळ करणे हे प्रमुख उद्दिष्टे आहे.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |सुकन्या समृद्धी योजनेची काही खास वैशिष्टे-
- सुकन्या समृद्धी योजना हि एक केंद्र शासनाची योजना आहे. आणि याचे नाव प्रधानमंत्री योजनेमध्ये येते. “प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना”
- या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे गुंतवणूक खाते हे कोणत्याही राष्ट्रीय कृत बँक मध्ये किंवा पोस्ट कार्यालयात उघडता येते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे खाते दुसरीकडे दुसऱ्या बँक मध्ये किंवा पोस्ट कार्यालयात ट्रान्स्फर करता येते.
- या योजने मधील गुंतवणुकीवर भारत सरकार कोणता व्याज दर आकारणार आहे हे प्रत्येक तिमाहीत जाहीर करत असते, त्यामुळे मार्केट च्या परिस्थिती परमेण गुंतवणुकी वरती रिटर्न मिळतात.
- या योजनेचे पैशे हे मुलीच्या उच्च शिक्षणसाठी, लग्नासाठी व इतर गोष्टींसाठी तुमी वापरू शकता.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |सुकन्या समृद्धी योजनेचा मुदत कालावधी –
- या योजने ची मुदत मुलीचे खाते उघडल्या पासून ते मुलीचे वय वर्ष २१ होईपर्यंत आहे. या दरम्यान मुलीच्या पालकांना मुलीचे वय १४ वर्षे होई पर्यंत फक्त पैसे जमा करायचे / गुंतवायचे आहेत. तिथून पुढे ७ वर्षे रेस्टिंग पिरेड असतो.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने मध्ये गुंतवणुकी वरती कसे रिटर्न आकारले जातात.
- जर तुम्ही दरवर्षी ५००० रुपये एवढी रक्कम जमा केली तर १४ वर्षात ७.६ % टक्के व्याज दराने १,२६,६०७ एवढी रक्कम मिळेल आणि त्याच ५००० च्या गुंतवणुकी नुसार २१ वर्ष नंतर २,११,४२० रुपये एवढी रक्कम मिळेल. जेवढी जास्त रक्कम गुंतवाल तेवढे जास्त रिटर्न मिळतात.
- अधिक माहिती आपण या पुढील चार्ट च्या माध्यमातून…
अधिक माहिती आपण या पुढील चार्ट च्या माध्यमातून…
Year | Oening Balance | Deposit | Interest | Closing Balance |
1 | 0 | 5000 | 380 | 5380 |
2 | 5380 | 5000 | 789 | 11169 |
3 | 11169 | 5000 | 1229 | 17398 |
4 | 17398 | 5000 | 1702 | 24100 |
5 | 24100 | 5000 | 2212 | 31312 |
6 | 31312 | 5000 | 2760 | 39071 |
7 | 39071 | 5000 | 3349 | 47421 |
8 | 47421 | 5000 | 3984 | 56405 |
9 | 56405 | 5000 | 4667 | 66071 |
10 | 66071 | 5000 | 5401 | 76473 |
11 | 76743 | 5000 | 6192 | 87665 |
12 | 87665 | 5000 | 7043 | 99707 |
13 | 99707 | 5000 | 7958 | 112665 |
14 | 112665 | 5000 | 8943 | 126607 |
15 | 126607 | 0 | 9622 | 136230 |
16 | 136230 | 0 | 10353 | 146583 |
17 | 146583 | 0 | 11140 | 157723 |
18 | 157723 | 0 | 11987 | 169710 |
19 | 169710 | 0 | 12898 | 182608 |
20 | 182608 | 0 | 13878 | 196487 |
21 | 196487 | 0 | 14933 | 211420 |
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |सुकन्या समृद्धी योजने साठी पात्रता –
- भारताची रहिवाशी असलेली आणि नागरिक असलेली कोणत्याही जाती, धर्माची मुलगी या योजनेसाठी पात्र आहे.
- मुलीचा जन्म ते वय वर्ष १० या दरम्यान असलेल्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI |आवश्यक कागदपत्रे-
- लाभार्थी मुलगी लहान असल्या कारणाने तिची सर्व कागदपत्रे असतीलच असे नाही, अशा वेळी मुलीच्या पालकांचे / आई-वडील कागदपत्रे जोडावीत.
- सुकन्या सम्रुधी योजनेचा अर्ज
- आधार कार्ड
- पेंन कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- इ-मेल आय डी
- पासपोर्ट फोटो
- मुलीचा जन्माचा दाखला
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने मध्ये अर्ज रद्द खालील कारणांनी होवू शकतो-
ज्या मुलीच्या नावाने अर्ज करायचा आहे ती जर तिसरे अपत्य असले तर
अर्जदार मुलीचे वय १० वर्ष पेक्षा जास्त असल्यास
अर्जात खोटी माहिती भरल्यास
लाभार्थी मुलीचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास, योजनेचे खाते बंद करण्यात येते.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत बँक खाते उघडण्याची प्रोसेस –
- या योजने मध्ये भाग घेण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही राष्ट्रीय कृत बँक मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज घेवून टो सर्व योग्य माहिती सह भरायचा आहे आणि कागदपत्रे जोडायची आहेत.
- तो अर्ज बँक द्वारे तपासाला जाईल, काही तृती असतील तर त्या कळवल्या जातील. आणि जर सर्व माहिती आणि कागदपत्रे बरोबर असतील तर योजनेसाठी तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
- सुरवातीला तुम्हाला कमीत कमी २५० रुपये बँक खात्य मध्ये जमा करायचे आहेत, हि रक्कम तुम्ही नंतर वाढवू शकता. याची कमाल मर्यादा हि वार्षिक १५०००० एवढी आहे.
- जेवढे जास्त गुंतवणूक तुम्ही करत राहणार तेवढे तुमचे रिटर्न वाढत राहणार आहेत.
- एकदा का तुमचे खाते उघडले कि तुम्हाला बँक कडून एक पासबुक मिळेल त्या पासबुक वरती तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या रक्कमेचा तपशील बघयला मिळेल.
- तुम्हाला या खात्यामध्ये १४ वर्ष पर्यंत पैसे जमा करत राहायचे आहे, त्यानंतर २१ वर्ष नंतर तुम्हाला याचे रिटर्न मिळतील.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडण्याची प्रोसेस –
- हि प्रोसेस देखील बँक खात्या प्रमाणे च आहे.
- आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजने चा अर्ज घेवून त्यामध्ये सर्व माहिती भरावी आणि आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून अर्ज पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावी.
- पोस्ट ऑफिस चे अधिकार अर्जाची पडताळणी करतील, सर्व गोष्टी योग्य असतील तर योजनेला हिरवा कंदील देतील. तुम्ही कमीत कमी २५० रुपये पासून या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता, हि रक्कम जास्तोई जास्त १५०००० रुपये प्रती वर्षी एवढी आहे.
- जेवढे जास्त गुंतवणूक तुम्ही करत राहणार तेवढे तुमचे रिटर्न वाढत राहणार आहेत.
- एकदा का तुमचे खाते उघडले कि तुम्हाला पोस्ट ऑफिस कडून एक पासबुक मिळेल त्या पासबुक वरती तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या रक्कमेचा तपशील बघयला मिळेल.
- तुम्हाला या खात्यामध्ये १४ वर्ष पर्यंत पैसे जमा करत राहायचे आहे, त्यानंतर २१ वर्ष नंतर तुम्हाला याचे रिटर्न मिळतील.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने चे खाते जर कोणत्या परिस्थिती मध्ये बंद होवू शकते –
- अर्जदार मुलीचे पालक जर अचानक मृत्यू पावले तर
- लाभार्थी मुलगी जर अचानक मृत्यू पावली तर
- योजनेचे खाते उघडल्यापासून ५ वर्ष नंतर कोणतेही कारण न देता मुलीचे पालक हि योजना व खाते बंद करू शकतात.
- लाभार्थी मुलगी जर गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहे आणि अशा परिस्थिती मध्ये सर्व रक्कम काढून योजना आणि त्याचे खाते बंद करता येवू शकते.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने चे पैसे कधी काढू शकता –
- लाभार्थी मुलगी १८ वर्षाची झाली कि ५० % रक्कम हि काढायला येते, अशा वेळी तुम्ही टी रक्कम काढू शकता.
- मुलीच्या लग्न नंतर देखील हि रक्कम तुम्ही काढू शकता.
- उच्च शिक्षणासाठी देखील तुम्ही हे पैसे काढून खर्च करू शकता.
- २१ वर्षा नंतर तुम्ही सर्व गुंतवलेली रक्कम काढू शकता.
SUKANYA SAMRUDHHI YOJANA IN MARATHI | सुकन्या समृद्धी योजने साठी खालील पैकी कोणत्याही राष्ट्रीय कृत बँक मध्ये खाते उघडता येवू शकते-
BANK OF MAHARASHTRA | ICICI BANK |
STATE BANK OF MYSORE | STATE BANK OF BIKANER AND JAIPUR |
UNITED BANK OF INDIA | UNION BANK OF INDIA |
YUKO BANK | STATE BANK OF PATIALA |
INDIAN BANK | IDBI BANK |
BANK OF INDIA | BANK OF BADODA |
AXIS BANK | ANDHRA BANK |
ILAHABAD BANK | INDIAN STATE BANK |
INDIAN OVERSEAS BANK | STATE BANK OF HYDERABAD |
STATE BANK OF TRAVANKOR | VIJAYA BANK |
SINDIKATE BANK | PANJAB NATIONAL BANK |
DENA BANK | CORPORATION BANK |
CENTRAL BANK OF INDIA | CANARA BANK |