SWADHAR YOJANA | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

SWADHAR YOJANA | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनानरे सन २०१६-२०१७ मध्ये सुरू केलेली योजना आहे. या योजनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे.  ही योजना महाराष्ट्र राज्यातिल विद्यार्थ्यांसाठी आहे. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध  असलेल्या  व ११ वी -१२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध  प्रवर्गामधील ज्या विद्यार्थ्याना शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहा मध्ये  प्रवेश मिळालेला नाही असहेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेमध्ये भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधां साथी थेट अनुदान प्राप्त होते. या योजनेला महाराष्ट्र शासनाणे सन २०१८-२०१९ पर्यन्त ३५,३३६ विद्यार्थ्याना लाभ दिल आहे व त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च केली आहे .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने चा overview –

योजनेचे नावडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना | SWADHAR YOJANA
कोणी सुरवात केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागसमाज कल्याण विभाग
कुणासाठी आहे ही योजनाअनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्ग तिल उमेदवार
उद्देशशिक्षणसाठि आर्थिक मदत करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन आणि ऑफलाइन

SWADHAR YOJANA

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने चा उद्धेश –

  • महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी इ. ११ वी -१२ वी मध्ये आणि व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेत आहेत आणि त्यांना शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतीगृहांमद्धे प्रवेश मिळाला नाही आशा विद्यार्थ्याना शिक्षणा मध्ये प्रोत्साहान पर भोजन भत्ता , निवासी भत्ता व इतर शैक्षणिक खर्च करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा महत्वाचा उद्देश या योजनेचा आहे.
  • समाजातील आर्थिक रित्या मागास असलेल्या पण शिक्षण घेण्याची इछ्या असलेल्या विद्यार्थ्याना आर्थिक पाठबळ देवून समान संधी उपलब्ध करून देणे.
  • स्वाधार योजने अंतर्गत अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील शिक्षणा साठी  बाहेर असलेल्या विद्यार्थ्याना भोजन, निवास आणि शिक्षण खर्चा साठी आर्थिक मदत देणे व समाजातील होतकरू विद्यार्थ्याना पाठबळ देणे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने चे वैशिष्टे-

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने मार्फत विद्यार्थ्याना दिले जाणारा आर्थिक लाभ हा थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्या मध्ये DBT द्वारे जमा केला जातो.
  • ही योजना ही समाजामधील आर्थिक रित्या दुर्बल आणि अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्याना इयत्ता १० वी च्या पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी आर्थिक रित्या पाठबळ देण्याचे काम करत आहे.
  • या योजनेमद्धे इ. ११ वी – १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच जे उच्च शिक्षण घेत आहेत जसे की डिप्लोमा, पदवी, व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण विद्यार्थी अर्ज करून लाभ घेवू शकतात.
  • या योजनेमद्धे विद्यार्थ्याना वार्षिक रुपये ६०००० इतक्या रकमे पर्यन्त आर्थिक सहाय्य केले जाते.

SWADHAR YOJANA |डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने मधून मिळणार लाभ / अनुदान –

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी इ. ११ वी -१२ वी मध्ये आणि व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेत आहेत आणि त्यांना शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतीगृहांमद्धे प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्याना निवासी खर्च, भोजन खर्च, तसेच इतर शैक्षणिक खर्च करण्यासाठी वार्षिक रुपये ६०००० इतकी रक्कम दिली जाते, त्याबद्दल खाली सविस्तर माहिती दिली आहे.

 मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा  शहरात शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्याना मिळणाऱ्या लाभाची रक्कम इतर महसूल विभागीय शहरातील व क वर्ग महानगर पालिका क्षेत्र मध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्याना मिळणाऱ्या लाभाची रक्कम उर्वरित भागातील शिक्षण घेणाऱ्या घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्याना मिळणाऱ्या लाभाची रक्कम 
निवासी भत्ता ( वार्षिक )२०,००० रुपये फक्त१५,००० रुपये फक्त१२,००० रुपये फक्त
निर्वाह भत्ता ( वार्षिक )८००० रुपये फक्त८,००० रुपये फक्त६,००० रुपये फक्त
भोजन भत्ता ( वार्षिक )३२,००० रुपये फक्त२८,००० रुपये फक्त२५,००० रुपये फक्त
एकूण मिळणार भत्ता६०,००० रुपये फक्त५१,००० रुपये फक्त४३,००० रुपये फक्त

या व्यतिरिक्त अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्याना वारिक ५,००० रुपाऊयए इतकी रक्कम अधिकतर दिली जाते, त्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदी च्या हेतूने.

इतर शाखेतील विद्यार्थ्याना देखील वार्षिक २००० रुपये इतकी रक्कम, शैक्षणिक साहित्य खरेदी साठि ज्यादा दिली जाते.


SWADHAR YOJANA |डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने साठी पात्रता-

  • अनुसूचित जाती व नव बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी च फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थीया कडे जात प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्या चे राष्ट्रीय कृत बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे व त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेला विद्यार्थी हा आर्थिक रित्या दुर्बल आहे हे सिद्ध होण्यासाठी त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ही २.५ लाखाच्या अंत असणे आवश्यक आहे आणि तसा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
  • विद्यार्थी ज्या शिक्षण संस्थे मध्ये शिकत आहे ते आणि त्या विद्यार्थ्या चे घर ही एकाच ठिकाणी / शहरात नसावे, दोन्ही ठिकाणे वेग वेगळी पाहिजेत, अन्यथा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • या योजने अंतर्गत विद्यार्थी हा ११ वी – १२ वी आणि त्यानंतर चे शिक्षण ही २ वर्षा पेक्षा जास्त काळ शिक्षण घेणारा असावा. 
  • इयत्ता १० वी मध्ये किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे .
  • अर्ज करीत असलेला विद्यार्थी हा मान्यता प्राप्त अभ्यासक्रमास किंवा मान्यता प्राप्त महाविद्यालया मध्ये शिक्षण घेणारा असावा, या मध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतातील वैद्यकीय शिक्षण परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वैद्यकीय परिषद, वास्तूकला परिषद, कृषि परिषद, अशा प्रकारच्या शासनाच्या संस्था कडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी व निकष –

  • या योजणेश पात्र विद्यार्थी हा अभ्यासक्रम औरं होई पर्यन्त या योजणेश पात्र राहील.
  • या योजनेसाठी विद्यार्थ्या ची निवड ही गुणांच्या आधारे करण्यात येईल.
  • या योजनेमद्धे दिव्यांग विद्यार्थी जे की अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील आहेत त्यांना ३ % आरक्षण मिळेल व त्यांच्या पात्रतेसाठी गुणांची यात ही फक्त ५० % आहे.
  • या योजनेतील लाभार्थी ना सत्र परीक्षेचा निकल लागला की त्याची प्रत आपल्या जवळच्या कार्यालयात जमा करणे बंधानकारक आहे.
  • एकदा पात्र झालेला विद्यार्थी हा जर फुडहिल परीक्षा मध्ये किमान ६० % गुण मिळवत राहील तर च तो या योजनेसाठी पात्र राहील, अन्यथा त्याला पुढील शिक्षण साठी योजनेच्या लाभाची रक्कम मिळणार नाही.

SWADHAR YOJANA |स्वाधार योजने साठी लागणारी कागदपत्रे-

  • अर्ज करीत असलेल्या विद्यार्थ्याचे वैध जातीचे प्रमाण पत्र
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी आहे याचा पुरावा ( यामध्ये जन्माचा दाखला, रेशनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास / domicile  प्रमाणपत्र ही कागदपत्रे चालतील. )
  • आधार कार्ड ची झेरॉक्स
  • बँक पासबुक ची झेरॉक्स
  • अधिकृत उत्पन्नाचा दाखला, जर पालक निकरू करीत असतील तर त्यांचा form 16 बंधनकारक आहे.
  • महाविद्यालाय कडून मिळणारे बोनफाईड
  • इ. 10 वी 12 वी चे गुण पत्रक
  • आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले असल्याचा पुरावा
  • विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्नाचा दाखला
  • सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत
  • महाविद्यालयाचे उपस्थिती चा रीपोर्ट
  • मोबाइल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • राहत असलेल्या ठिकानचा भाडे करारनामा
  • मेस/खानावळ ची बिलची पावती
  • सध्या राहत असलेल्या ठिकानचा पुरावा म्हणून त्या ठिकानचा जिओग्राफीक लोकेशन चा फोटो

SWADHAR YOJANA |डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला अर्ज करण्याची प्रक्रिया –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने साथी विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही मार्गाने अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • अर्जदारला प्रथम SWADHAR YOJANA योजनेच्या शासनाने दिलेल्या वेबसाइट वरती जाऊन , होम पेज वरती नवीन नोंदणी करून लॉगिन करावे.
  • फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती भरून देणे व फोर्म संबीत करायचा . भरलेल्या अर्जाची प्रिंट काढायची. तसेच त्या अर्जा ला आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज समाज कल्याण कार्यालयात जमा करणे.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया-

  • अर्जदाराने सर्व प्रथम आपल्या विभागच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन योजनेचा फॉर्म घेणे.
  • फॉर्म मध्ये सर्व माहिती भरून देणे सीबत अवशेक कागदपत्रे जोडून देणे आणि तो फॉर्म जमा करावा.

SWADHAR YOJANA |स्वाधार योजनेचा अर्ज बाद होण्याची प्रमुख कारणे-

  • अर्जदाराने जर अर्जा मध्ये खोटीची माहिती दिली असल्यास..
  • अर्जा सोबत जर एखादे आवश्यक असलेले कागद पात्र जोडलेले नसल्यास
  • मुदत संपून गेलूया नंतर अर्ज भरला तर..
  • महाराष्ट्र शासनाने जर ही योजना बंद केली किंवा या योजनेसाठी असलेला निधी जर संपला तर..

SWADHAR YOJANA |स्वाधार योजनेचा अर्ज बाद झाल्यानंतर की करायचे ?

  • योजणेच अर्ज जर बाद झाला तर खालील बाबींकडे लक्ष द्या
  • अर्ज रद्द केल्याचे कारण माबाईल वर मेसेज द्वारे किंवा ईमेल आयडी वरती कळवण्यात येते.
  • त्यानंतर तुम्ही अर्ज जमा केला त्या समाज कल्याण ऑफिस मध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्या कडे चौकशी करा व त्रुटि भरून काढा. आवश्यक कागदपात्र न ची पूर्तता करून पुनः अर्ज जमा करावा.

महत्वाची सूचना –

कोणत्याही योजनेचे नियम व अटी या बदलत असतात, योजनेच्या अचूक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइट वरती जाणे किंवा जवळच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये चौकशी करणे.