VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | आज आपण बघत आहे आपल्या आजु बाजुला किती बेरोजगारी वाढली आहे. अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकार ने एक महत्व पूर्ण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. समजा मध्ये असणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास वर्ग प्रवर्ग मध्ये अगोदर पासूनच आर्थिक परिश्तिती हलाकीची असते, त्यामध्ये बेरोजगारी च संकट हे खूप वेदनादायी होवून जाते.

महाराष्ट्र राज्यामधील विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास वर्गातील बेरोजगार परंतु होतकरू नागरिकांना स्वताचा व्यवसाय सुरु करण्यसाठी महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने “ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित” हे चालू केले आहे. या महामंडळाची स्थापना हि ८ फेब्रुवारी १९८४ रोजी कंपनी कायदा १९५६ नुसार करण्यात आली होती. या महामंडळाच्या स्थापणे चा उद्देश हा विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील लोकांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास व्हावा हे होते.

याच उद्देशाला पुढे नेण्यासाठी महामंडळा मार्फत एक योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना स्वताचा छोटासा उद्योग चालू करण्यसाठी प्रोत्साहन पर १,००,००० रुपये इतक्या रकमेची आर्थिक बिनव्याजी कर्ज देवू केले जाते.


योजनेचे नाववसंतराव नाईक कर्ज योजना | VASANTRAO NAAIK KARJ YOJANA
शासनमहाराष्ट्र राज्य सरकार
विभागइतर मागास बहुजन कल्याण विभाग
आर्थिक कर्ज१ लक्ष रुपये
उद्देशमहाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास वर्गातील नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील रहिवाशी आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्गातील नागरिक
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन  आणि ऑफलाईन

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA

Table of Contents

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने चे उद्दिष्टे –

  • हि योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ च्या धर्तीवर वसंतराव नाईक महामंडळ च्या या योजनेची सुरवात केली आहे.
  • महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना स्वतचा व्यवसाय सुरु करण्यास आर्थिक स्वरुपात बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास वर्गातील आर्थिक रित्या मागास असलेल्या लोकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देवून बेरोजगारी कमी करणे.
  • समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास करून त्याना समाजा मध्ये मनाचे स्थान प्राप्त करून देणे.

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने चे वैशिष्टे-

  • कर्जाची रक्कम हि थेट पात्र लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये दिली जाते DBT मार्फत.
  • महामंडळा कडून देण्यात आलेल्या कर्जाचे हफ्ते जर नियमित रित्या परतफेड केली तर अर्जदाराला कोणत्याही प्रकारचा व्याज भरावा लागत नाही.
  • महाराष्ट्र शासना चा हिस्सा या योजनेमध्ये १०० % इतका आहे.

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने अंतर्गत खालील व्यवसाय सुरु करता येर्तील

  • कृषी क्लिनिक
  • टेलिफोन बूथ / अन्य तांत्रिक लघु उद्योग
  • आठवडा बाजारातील दुकान
  • फळ विक्री
  • किराणा दुकान
  • इलेक्ट्रिकल शॉप
  • ए. सी. दुरुस्ती
  • चिकन / मटन शॉप
  • फ्रीज दुरुस्ती
  • मोबाईल रिपेअरिंग
  • गेरेज
  • ऑटो रिपेरिंग दुकान
  • ड्राय क्लीनिग सेंटर
  • स्वीट मार्ट
  • हॉटेल
  • टायपिंग कोचिंग
  • भाजी विक्री
  • ऑटो रिक्षा
  • वडापाव विक्री केंद्र
  • मसाला मिरची कांडप उद्योग
  • मत्स्य व्यवसाय
  • संगणक प्रशिक्षण
  • हार्ड वेअर व पेंट शॉप
  • पावर टिलर
  • हार्ड वेअर व पेंट शॉप
  • चहा विक्री
  • सोफ्ट टोईज विक्री
  • झेरोक्स
  • स्टेशनरी
  • मासळी विक्री
  • आईस्क्रीम पार्लर

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधन कारक आहे.
  • विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील लोकं च फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतील, इतर प्रवर्ग च्या लोकांसाठी इतर योजना आहेत त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाची वेबसाईट तपासून बघावी.
  • एका वेळी कुटुंबातील एक च व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकतो.
  • शहरी आणि ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे मिळून वार्षिक उत्पन्न हे रुपये १,००,००० च्या आत असावे.
  • महामंडळाच्या वेबसाईट वरून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा कोणत्याही वित्त संस्थेचा किंवा बँकेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराचे वय हे अर्ज करत असताना १८ वर्षे ते ५० वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करते वेळी अर्जदाराने ह्या महामंडळाचा किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ घेतलेले नसावा अन्यथा तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • अर्जदाराचे बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे.

VASANTRAO NAAIK KARJ YOJANA | योजनेसाठी अर्ज करीत असताना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे

  • रेशनिंग कार्ड
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीज बिल
  • मोबाईल नंबर
  • इ-मेल आय डी
  • उत्पन्नाचा दाखला
  • पास पोर्ट साईझ चे फोटोस
  • डोमासाईल प्रमाण पत्र
  • प्रतिज्ञापत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला – जन्म पुरावा म्हणून
  • व्यवसाय सुरु करत आहे त्याचे कोटेशन
  • रहिवाशी दाखला
  • बँक स्टेटमेंट
  • प्रकल्प चा अहवाल

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने मध्ये खालील लोकांना प्राधान्य दिले जाते

  • निराधार व्यक्ती
  • विधवा महिला
  • शासनाच्या कौशल्य विकास शिक्षण विभाग मार्फत शिक्षण घेतेलेले तरुण / तरुणी.

जाणून घ्या लाभार्थी कसा निवडला जातो ?

  • आप आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक जिल्हा लाभार्थी निवड समोइति स्थापन करत असतात आणि त्या समिती मार्फत या योजनेच्या लाभार्थींची निवड केली जाते.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेच्या अटी व नियम-

  • केवळ महाराष्ट्रातील मुलाचे रहिवाशी असलेल्या लोकांना च फक्त या योजनेचा लाभ घेता येवू शकतो त्यासाठी रहिवाशी दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र (अधिवास प्रमाणपत्र) जोस्दाने गरजेचे आहे.
  • जे लोकं मुळचे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत परंतु आत्ता सध्या महाराष्ट्र मध्ये राहत आहेत अशा लोकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • हि योजना फक्त आणि फक्त विमुक्त जाती, भटक्या जमाती, व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी च मर्यादित आहे.
  • जर या योजनेचा व्याज परतावा पाहिजे असेल तर लाभार्थी ला कर्जाची रक्कम / हफ्ते वेळे वरती भरणे बंधनकारक आहे. हफ्ते चुकले तर व्याज परतावा मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
  • १८ वर्षे पेक्षा कमी आणि ५५ वर्षे पेक्षा जास्त च्या अर्जदारांना या योजनेच अलभ घेता येणार नाही.
  • अर्ज करीत असलेल्या अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १००००० रीउपये च्या आत असणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचा व्यवसाय हा महाराष्ट्र राज्यात स्थित असला पाहिजे, महाराष्ट्र बाहेर असलेला व्यवसाय या योजनेसाठी पात्र होवू शकत नाही.
  • एकदा का योजनेचा लाभ घेतला तरी देखील ओंलैन पोर्टल वरती लाभार्थी ला त्याच्या व्यवसायाचे कमीत कमी २ फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा वैध व्यवसाय करत असावा अन्यथा कोणताही गैर कानुनी व्यवसाय या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाही.
  • अर्जदार हा कोणत्याही बँकेचा आणि पतसंस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • अर्जदाराने या अगोदर महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेले नसावा.
  • व्यवसायाचे विमा उतरवणे आणि त्याचे दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक आहे.
  • वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेच्या व्याज रकमेचा परतावा हा लाभार्थी च्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. जेव्हा लाभार्थी हा कर्जाचा हफ्ता भारत असतो त्यानंतर च फक्त व्याज हा परत केले जाते.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेच्या कर्जाची वसुली-

  • कर्जाचे वितरण झाले कि ९० दिवसानंतर कर्जाची परतफेड चालू केली जाते.
  • कर्जाच्या परतफेडीच्या पुढील तारखेचे चेक अगोदर घेतले जातात.
  • दर महिना २०८५ रुपये इतकी रक्कम हि लाभार्थी ला ४८ महिने परतफेड करणे बंधनकारक आहे.
  • जर कर्जाची नियमित परतफेड नाही झाली तर कर्जाच्य थकीत हफ्त्यावर ४ % दसादशे प्रमाणे व्याज आकारण्यात येईल.
  • काही प्रकरणांमध्ये लाभार्थी हे काही कारणास्तव कर्जाची परत फेड करत नाहीत अशा वेळी महामंडल हे कर्जासाठी जमीन राहिलेल्या लोकांकडून कर्जाची वसुली करत असते.

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजने साठी अर्ज करण्याची पद्धत –

  • या योजनेला अर्ज करण्यासाठी दोन पद्धत आहेत, त्यामध्ये ओंलैन आणि ओफ्लैन अशे दोन्ही ऑप्शन आहेत.

ओनलाईन अर्ज प्रक्रिया –

  • सगळ्यात पहिल्यांदा महामंडळाच्य वेबसाईट वरती जाऊन होमे पेज वरती जावे.
  • नोंदणी करून घ्या. योजनेचा अर्ज उघडला कि आवश्यक ती सर्व माहिती (वयक्तिक माहिती, पत्याचा तपशील, उत्पन्न, व्यवसाय, बँक माहिती, इत्यादी ) भरून द्या आणि अर्ज सबमिट करा.

ऑफलाईन अर्ज प्रक्रिया –

  • आपल्या जिल्ह्याच्या मागास बहुजन विभागाच्या कार्यालयात जाऊन वसंतराव महामंडळ कर्ज योजनेची चौकशी करावी आणि तिथून अर्ज घ्यावा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व माहिती आणि योग्य टी सर्व कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सदर भरलेला अर्ज आणि कागद पत्रे कार्यालयात जमा करावीत.

सदर योजना हि वयक्तिक लाभ कर्ज योजना आणि तसेच गट कर्ज व्याज परतावा योजना देखील आहे. त्यामध्ये तुम्हाला गट कर्ज हे व्यवसाय सुरु करण्यसाठी मिळेल.


वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

ही योजना कोणामार्फत सुरू करण्यात आली ?

महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत योजना सुरू करण्यात आली.

ही योजना सुरू करण्यामागे काय उद्दिष्टे आहे ?

महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या विशेष मागासवर्ग भटक्या जमाती विमुक्त जाती यांचा आर्थिक विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली.

या योजनेअंतर्गत किती रकमेचे कर्ज प्राप्त होते ?

या योजनेअंतर्गत एक लाख रुपये रकमेपर्यंतचे कर्ज मिळते.