VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | महाराष्ट्र साक्षरतेच्या बाबतीत प्रगती करत आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. महाराष्ट्र शासन शिक्षणाच्या बाबतीत जनजागृती करत आहे. सरकारने इयत्ता आठवी पर्यंतचे शिक्षण हे सक्तीचे केलेले आहे. आणि मोफत शिक्षण हे सरकार मार्फत पुरवले जाते.
परंतु आठवी किंवा दहावी बारावीच्या पुढे भरपूर विद्यार्थी इच्छा असून शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्याचं मुख्य कारण हे त्या विद्यार्थ्यांची असणारी आर्थिक हालकीची परिस्थिती. भरपूर विद्यार्थी आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात.
याच्यावरती एक पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे.
महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकारचे इच्छुक हुशार विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये या गोष्टीची काळजी महाराष्ट्र सरकारला आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी खास विद्यार्थी देखभाल योजना सुरू केली. तसे बघायला गेलं तर बाकी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक पाठपुरावा करणारे योजना आहेत. सध्या आपण आज अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी असणारे योजना बघणार आहोत.
ज्या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी अनुसूचित जातीतील आहेत अशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार त्यांना वस्तीगृहात राहण्याचे अन्नाचे व इतर शैक्षणिक वस्तू घेण्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवते. त्या आर्थिक पाठबळ किती रुपयात असते ते कसे मिळते त्याला अर्ज करण्याची पद्धत काय आहे हे सर्व आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…
योजनेचे नाव | शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता | VIDYARTHI DEKHBHAL BHATTA |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी सुरू केली |
योजना सुरू करण्याचा उद्देश | शिक्षण घेत असलेले विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास प्रोत्साहन देणे. |
योजनेचे लाभार्थी | व्यवसायिक अभ्यासक्रम घेत असणारे विद्यार्थी आणि वस्तीगृहामध्ये राहणार विद्यार्थी |
योजनेतून मिळणारा लाभ | विद्यार्थ्यांना शैक्षणिक देखभाल साठी आर्थिक भत्ता पुरवणे |
अर्ज कसा करायचा | ऑनलाइन |
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | योजनेचे उद्दिष्ट-
- महाराष्ट्र राज्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- व्यवसायिक शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी खरेदीसाठी देखभालीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे.
- आर्थिक परिस्थिती खराब असल्याकारणाने कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये.
- गरजू विद्यार्थ्याला व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी कोणावरती अवलंबून न राहता स्वतःला आत्मनिर्भर बनवणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे.
- आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | योजनेची वैशिष्ट्ये-
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला मिळणारे आर्थिक लाभाची कमी त्याच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि बँक एकमेकांना संलग्न असणे आवश्यक आहे अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | योजना कोणासाठी आहे –
योजना व्यवसायिक शिक्षण घेत असणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी आहे.
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ पुढीलप्रमाणे –
या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना लागणारे विविध गोष्टींची देखभाल म्हणून या भत्याद्वारे अभ्यासक्रमात लागणारी पुस्तके असतील स्टेशनरी असेल निवास आणि अन्न यासाठी लागणारा खर्च असेल हे या योजनेद्वारे मिळवता येईल. तपशील पुढे दिल्याप्रमाणे –
विद्यार्थी सहकारी वस्तीगृहामध्ये राहतात –
अभ्यासक्रमाचा कालावधी | आर्थिक सहाय्य |
चार ते पाच वर्ष | दर महिन्याला 700 ते 7000 रुपये |
दोन ते तीन वर्ष | दर महिन्याला पाचशे ते पाच हजार रुपये |
दोन वर्ष | दर महिन्याला पाचशे ते पाच हजार रुपये |
सरकारी वस्तीगृहासाठी पात्र असलेले परंतु वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे तपशील –
अभ्यासक्रमाचा कालावधी | मिळणारे आर्थिक साह्य |
चार ते पाच वर्ष | महिन्याला एक हजार रुपये ते दहा हजार रुपये |
दोन ते तीन वर्ष | महिन्याला ₹700 ते 7000 रुपये |
दोन वर्ष | याला पाचशे रुपये ते पाच हजार रुपये |
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | योजनेची लाभार्थी –
- जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत आणि चे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयाच्या वस्तीगृहामध्ये राहत आहेत असे अनुसूचित जातीतील विद्यार्थी.
विद्यार्थ्यासाठी देखभाल भत्ता योजनेचे फायदे –
- महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यास आर्थिक पाठबळ मिळेल.
- विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला शैक्षणिक उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तू तसेच अभ्यासक्रम पुस्तके स्टेशनरी निवासाचा खर्च अन्नाचा खर्च इत्यादी गोष्टी ंसाठी निधी देण्यात येतो.
- महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढेल परिणामी साक्षरता प्रमाण वाढेल.
- इतर विद्यार्थी ज्यांनी मधून शिक्षण सोडले आहे असे विद्यार्थी देखील व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी आकर्षित होतील.
- विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गोष्टींसाठी कोणावरतीही अवलंबून न राहता शिक्षण पूर्ण करता येईल.
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील व्यवसाय शिक्षण घेणारे विद्यार्थी हे आत्मनिर्भर बनतील.
VIDYARTHI DEKHBHAL BHATTA | अर्जदाराची आवश्यक पात्रता –
- अर्ज करू इच्छित असलेला विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेच्या अटी आणि शर्ती –
- ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठीच आहे महाराष्ट्र बाहेर विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्ज करीत असलेल्या विद्यार्थी हा अनुसूचित जातीतील असणे आवश्यक आहे इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार नाही.
- जे विद्यार्थी सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना कार्यरत आहे.
- भारत सरकारकडून मिळत असलेल्या शिष्यवृत्ती चे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येईल.
- अनुसूचित जातीतील ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न २.५ लाखा पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
- या योजनेसाठी जे विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेत आहेत असे विद्यार्थीच फक्त पात्र होतील.
- जे विद्यार्थी सरकारी वस्तीगृहामध्ये राहत आहेत किंवा सरकारी वस्तीगृहासाठी पात्र आहेत परंतु त्यांना प्रवेश मिळाला नाही असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.
- या योजनेच्या लाभाची रक्कम मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची स्वतःचे वैयक्तिक बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे बंधनकारक आहे अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्ज करत असलेल्या विद्यार्थ्याने या अगोदर राज्य शासन किंवा केंद्र शासन च्या कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसल्या पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला महाडीबीटी या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.
- आणि शेवट अर्जदाराने अर्जामध्ये सर्व माहिती अचूक इथे भरायचे आहे चुकीचा माहिती भरल्याने त्या विद्यार्थ्यांचा अर्ज रद्द केला जाईल.
योजनेसाठी महत्त्वाच्या तारखा –
- देखभाल योजनेला अर्ज करण्यासाठी मुदत ही ऑगस्ट महिना ते सप्टेंबर महिना एवढी असते.
योजनेला अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –
- विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड
- विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला
- विद्यार्थ्याची जात प्रमाणपत्र
- विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्नाचे प्रमाण पत्र
- महाविद्यालयाचे प्रवेशाची पावती
- जर विद्यार्थी वस्तीगृहात राहत नसेल तर वॉर्डन पत्र
- पोस्टमेट्रिक शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांचा नोंदणी चा अर्ज आयडी
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज चे फोटो
योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे –
- विद्यार्थ्याला या योजनेला अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वरती यायचे आहे.
- त्यानंतर नवीन युजर ची नोंदणी करायसाठी नवीन अर्जदार नोंदणी या बटनावरती क्लिक करायचे.
- तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये विचारलेले सर्व माहिती असूकरीत्या भरून रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचे अशा प्रकारे तुमचे नवीन अर्जदाराची नोंदणी होईल.
- परत मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून परत एकदा लॉग इन बटणावरती क्लिक करायचे.
- लॉगिन केल्यानंतर होम पेज वरती पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती या बटनावरती क्लिक करून त्यानंतर सोशल जस्टीस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट या बटणावरती क्लिक करायचे.
- त्यानंतर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेले विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी देखभाल भत्ता या बटणावरती क्लिक करायचे.
- नंतरचे पेज मध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक रित्या भरायची आवश्यकती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे.
- अशा रीतीने तुमचा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
देखभाल भत्ता योजनेबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
देखभाल भत्ता योजना कोणामार्फत सुरू करण्यात आले ?
विद्यार्थी देखभाल भत्ता ही योजना महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत अंमलबजावणी केलेली आहे.
विद्यार्थी देखभाल योजनेचा उद्देश काय आहे ?
अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक पाठपुरा पुरवणे.
ही योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे ?
विद्यार्थी देखभाल योजना अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे.
विद्यार्थी देखभाल योजनेचा अर्ज कसा करायचा?
विद्यार्थी देखभाल योजनेचा अर्ज ऑनलाईन रित्या महाडीबीटीच्या पोर्टलवरून करायचा असतो.
तर अशा रीतीने वरती दिल्याप्रमाणे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी देखभाल भत्ता योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
तर या योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि उच्च शिक्षण घ्यावे व स्वतःच्या पायावरती उभे राहावे. चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या आपल्या कुटुंबाचा व आपल्या समाजाचा जास्तीत जास्त विकास कसा होईल या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे.
अशीच नवीन नवीन प्रकारचे ब्लॉग घेऊन आपण भेटूया पुढच्या ब्लॉगला….