YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना विभक्त जाती भटक्या जमाती यांना घर देणारी योजना काढलेली आहे. या योजनेअंतर्गत विभक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना जमिनीचा भूखंड देऊन त्यांना त्या ठिकाणी घर बांधून देण्याची सोय महाराष्ट्र शासन करते.

चला तर मग बघूया आपण YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA नेमकी काय आहे त्याच्या पात्रतेची आयटी काय आहेत त्याचा अर्ज कसा करायचा इत्यादी सर्व माहिती

चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला…


योजनेचे नावयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती योजना | YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग
योजनेचा उद्देशविजाभज प्रवर्गातील कुटुंबांचा विकास करणे.
योजनेतून मिळणाऱ्या लाभमोफत घर वितरण
अर्ज कसा करायचाऑफलाइन

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA

Table of Contents

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना चा उद्देश –

  • विभक्त जाती व भटक्या जमातीचा विकास होण्यास त्यांना प्रोत्साहन देणे.
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे.
  • विनोद जाती व भटक्या जमाती यांचे राहणीमान उंचावण्यासाठी त्यांना मदत करणे.
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती यांचे उत्पन्न स्त्रोत वाढण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांना स्थिरता प्राप्त करून देण्यास मदत करणे.
  • विमुक्त जाती व भटक्या जमातींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
  • विमुक्त जाती व भटक्या जमातींना वसाहत उभी करून देणे त्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे.

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये खालील घटकांना प्राधान्य दिले जाईल –

  • या योजनेसाठी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील खालील घटकांना प्रथम प्राधान्य मिळेल.
  • गावोगावी भटकंती करणारे जे लोक पालत राहतात ते.
  • विभक्त जाती व भटक्या जमाती मधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • विधवा परी तक्त्या किंवा अपंग महिला ज्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील आहेत.
  • नुकसान त्यांनी भटक्या जमाती मधील पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिक

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या लाभार्थ्याच्या पात्रतेची निकष पुढील प्रमाणे –

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना विमुक्त जाती भटक्या जमातीतील सर्वप्रवर्गा साठी आहे.
  • ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न आहे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करीत असलेल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती मधील कुटुंबा हे बेघर किंवा झोपडी मध्ये राहणारे किंवा कच्च्या घरांमध्ये किंवा पालामध्ये राहणारे असले पाहिजे.
  • अर्ज करीत असलेले विजा भज प्रवर्गातील कुटुंब ही भूमी नसणे गरजेचे आहे परंतु घर बांधण्याची जागा ही त्यांच्या स्वतःच्या मालकीची असावी.
  • अर्ज करीत असलेला व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीने या अगोदर महाराष्ट्र राज्यां मधील कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे.
  • अर्ज करतो असलेला व्यक्ती हा कोणत्याही बँकेचा किंवा पतसंस्थेचा किंवा वित्त संस्थेचा कर्जाचा थकबाकीदार नसावा.
  • मी का कुटुंबातील एकाच व्यक्तींना योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • वर्षातून सहा महिने एका ठिकाणी वास्तव्य करत असणे बंधनकारक आहे.
  • या योजनेचा लाभ घेतल्यानंतर अर्जदाराला परत कोणत्याही राज्य शासन किंवा केंद्र शासनाचे घरकुल योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही व तसेही त्याने या अगोदर अशा कोणत्याही योजनेचे लाभ घेतलेला नसावा.

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे नियम व अटी –

  • योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी मर्यादित आहे महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत कुटुंबांना दिले जाणारे जमीन आणि त्यावरील घरे ही संयुक्तरीत्या पती व पत्नी या दोघांच्या नावावरती केली जाते.
  • विधवा आणि परितक्त्या असलेल्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन आणि त्याच्यावरचं घर हे मात्र त्यांच्या नावावर केले जाईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळालेला जमिनीचा तुकडा आणि त्यावर बांधलेले घर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यात येणार नाही.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यांच्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीचा तुकडा आणि बांधून दिलेले घर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये विकता येणार नाही तसे आढळल्यास अर्जदारावरती कारवाई केली जाईल.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीशी या योजनेचा लाभ घेता येईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळालेल्या जमिनीच्या तुकड्यावरती कायदेशीर रित्या उत्पन्न चे स्रोत वाढविण्यासाठी त्याचा उपयोग करणे गरजेचे आहे.
  • तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळालेल्या जमीन व त्याच्या वरती बांधून मिळालेल्या घर हे कोणालाही भाडेतत्त्वावरती देता येणार नाही तसेच पोट भाडेकरू देखील या घरांमध्ये ठेवता येणार नाही. चे आढळून आल्यास त्या अर्जदाराचा योजनेचा मिळणारा लाभाब बंद केला जाईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत बांधून दिलेल्या घराचे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदार ही सर्वस्वी लाभार्थीची राहील तसेच ज्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये त्याचे घर आहे त्या ग्रामपंचायत मार्फत आकारण्यात येणारे वार्षिक घरपट्टी आणि पानपट्टी ही भरणे त्याला भरतीची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये शासन कोणत्याही प्रकारची मदत देत नाही.

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मिळणारा भूखंड त्यावरील घराचे क्षेत्रफळ आणि त्याची किंमत –

  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला पाच गुंठे क्षेत्रफळाची जमीनीचा तुकडा देण्यात येईल.
  • त्या पाच गुंठेच्या जमिनीवरती २६९ चौरस फूट आकाराचे घर बांधून देण्यात येईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घराच्या बांधकामासाठी 70 हजार रुपये जास्तीत जास्त रक्कम खर्च केली जाईल ती त्याची कमाल खर्चाची मर्यादा आहे.
  • या योजनेअंतर्गत घराचा आराखडा हा अनुसूचित जाती आणि नाव बद्दल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनेतील घराच्या आराखड्यात प्रमाणेच सेम राहील.

YASHWANTRAO CHAVHAN MUKT VASAHAT YOJANA | यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वसाहतीचा प्रकल्प अहवाल बांधकाम तसेच पायाभूत सुविधा पुढीलप्रमाणे –

  • प्रत्येक जिल्ह्याच्या ग्रामीण विकास यंत्रणे कडून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घराचे बांधकाम करून दिले जाईल तसेच त्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांची तरतूद केली जाईल जसे की पिण्याचे पाणी अंतर्गत रस्ते गटारे समाज मंदिरे विद्युत पुरवठा या सर्व गोष्टी तिथे पुरवल्या जातील त्या गोष्टीसाठी प्रकल्प आराखडा नकाशा व अंदाजपत्रक तयार करणे हे सर्व जबाबदारी ग्रामीण विकास यंत्रणेची आहे.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घराचे बांधकाम ही लाभार्थीला स्वतःलाच करायची आहे शासनाने देऊ केलेल्या अनुदानाची रक्कम ही जिल्हा विकास यंत्रणेमार्फत कामाच्या प्रगतीनुसार तीन टप्प्यांमध्ये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येईल.
  • जर काही अपवादात्मक स्थितीमध्ये लाभार्थीने घर बांधण्यासाठी नकार दिला तर जिल्हाधिकारी यांनी निवडलेल्या काही बांधकाम व्यवसायातील काही संस्था किंवा एनजीओ यांच्यामार्फत घराचे बांधकाम करण्यासारखं नसावी आणि अशा संस्थांची निवड ही शासन मान्यतेनेच होईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने ला अर्ज करण्यासाठी अर्जदाराने खालील कागदपत्रे सादर करावेत –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • अर्जदाराच्या जात प्रमाणपत्र जे सक्षम प्राधिकार्‍याने स्वाक्षंकित केले आहे असे
  • सक्षम प्राधिकरण दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि त्या प्रमाणपत्रावरती उत्पन्न हे एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे उल्लेख असणे गरजेचे आहे.
  • भूमी नसलेल्या चा दाखला
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या दाखला किंवा डोमासाईल
  • या अगोदर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्य किंवा केंद्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नाही असे शंभर रुपयाचे स्टॅम्प वरती लिहून दिलेले शपथपत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज चे फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये करण्यात आलेली सुधारणा –

  • जर 10 पात्र लाभार्थी कुटुंबासाठी जमीन उपलब्ध होत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • जर वीस कुटुंबांसाठी लागणारे एक हेक्टर जमीन उपलब्ध होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये जमिनीची अट शिदिल करायचे अधिकार हे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योजनेतून लाभार्थ्याला मिळणारा आर्थिक लाभ हा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर ती देण्यात येतो हा लाभ राज्य शासनाच्या ग्रामीण गृहनिर्माण कक्षमार्फत थेट उपलब्ध करून दिला जातो.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून मिळणाऱ्या लाभा ग्रामीण भागामध्ये देण्यात यावा.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये विजा भज प्रवर्गाच्या व्यक्ती कुटुंबांना सुद्धा लाभ देण्यात यावा.
  • ज्या अर्जदाराने किंवा लाभार्थ्यांनी अजून पर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचे लाभ घेत नाही आणि त्याच्याकडे स्वतःची जागा आहे अशा लाभार्थ्याला यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही जर ग्रामीण भागामध्ये जास्त जागा उपलब्ध झाली तर सामूहिकरीता राबविण्यात यावी जर जागा उपलब्ध नाही झाली तर वैयक्तिकरित्या देखील राबविण्यात यावे.
  • यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाही फक्त ग्रामपंचायत लेवलला किंवा त्याच्या अधिकार क्षेत्रातच लागू होईल ही योजना नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रामध्ये लागू होत नाही.
  • या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थीला एक लाख वीस हजार रुपये प्रमाणे लाभाचे रक्कम राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याद्वारे मंजुरी करून देण्यात येईल.
  • जर सामूहिक वसाहतीच्या प्रकल्पामध्ये शासकीय जमीन उपलब्ध नसेल तर लाभार्थीला स्वतःची वैयक्तिक जागा खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत –

  • आपल्या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त यांच्या जवळ चौकशी करायची त्यांच्याकडून अर्ज घेऊन अर्ज विचारलेले सर्व माहिती अचूक रित्या भरून आवश्यकते सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करायचा.